राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तुळजापूर येथे घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

उस्मानाबाद : महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे, मंदिर प्रशासनाचे श्री.झंपलवाड, श्री.इंतूले, गणेश मोटे आदींची उपस्थिती होती.