राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राजभवन येथे आगमन

नागपूर, दि.16 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे 16 डिसेंबर रोजी नागपूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने राजभवन येथे आगमन झाले. यावेळी पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजून राज्यपालांना मानवंदना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख आणि कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांचे राजभवन येथील पारिवारिक प्रबंधक रमेश येवले प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपाल यांचा शनिवार, दिनांक 21 डिसेंबर पर्यंत राजभवन येथे मुक्काम आहे.

****