नागपूर, दि. 16 :विधानसभेचे माजी दिवंगत सदस्य माणिकराव सबाणे व अशोक तापकीर यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री अजित पवार, बबनराव पाचपुते, डॉ.पंकज भोयर, अॅड. अशोक पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
००००
अजय जाधव/विसंअ/16.12.19