‘वंदे मातरम्’ने विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात

नागपूर, दि. 16 :विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम्ने करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

उद्देशिकेचे वाचन

विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाजाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. त्या दृष्टीने कामकाज झाले पाहिजे, असे आवाहन श्री.पटोले यांनी यावेळी केले.

००००