मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘स्वच्छ – निर्मल तट अभियान‘ या विषयावर सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ.दिनेश कुमार त्यागी यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल. या मुलाखतीमध्ये प्रधान सचिव वने विकास खारगे यांच्या प्रतिक्रियेचा समावेश आहे.
‘दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर‘ या ॲपवरही शुक्रवार दि.२२ आणि सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका कल्पना साठे यांनी घेतली आहे.
या मुलाखतीमध्ये स्वच्छ निर्मल तट अभियानाचा उद्देश, व्याप्ती व कार्यक्रमाचे स्वरूप,सागरी स्वच्छतेमध्ये स्थानिक प्रशासन व लोकांचा सहभाग,कांदळवन संवर्धन व जतन याविषयी सविस्तर माहिती डॉ.त्यागी यांनी ‘जय महाराष्ट्र‘ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.