महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान

0
10

सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक

नवी दिल्ली, दि.8 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्ससाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राला आज प्रथम क्रमांकाच्या‘प्रभासाक्षी’सोशल मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशातील आघाडीचे  हिंदी न्यूज पोर्टल‘प्रभासाक्षी’च्या वतीने  समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणाऱ्या देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो.यावर्षी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   

येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आयोजित‘प्रभासाक्षी’च्या18व्या वर्धापनदिन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे आरोग्य व  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग,माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय,खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे,जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.      

यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत’प्रभासाक्षी’द्वारे सर्वेक्षण करण्यात आले.यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या अपडेट्सचेही सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाज माध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली.मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणित)ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले.ट्विटरद्वारे1952पासून ते2014पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविध्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच या कालावधीतील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले.त्यासाठी इन्फोग्राफिक्स,व्हिडिओ आदिंचा प्रभावी वापर करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही  ट्विटर हँडलवरुन दररोज महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत.ट्विटरसोबतच कार्यालयाचे फेसबुक पेजेस(तीन),ब्लॉग,यूट्यूब चॅनेल,वॉट्सॲप ग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते.समाजमाध्यमांद्वारे अचूक,योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी  घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री.ब्रिजेश सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळी‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजिटल मीडिया पर बढती भूमिका’विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.यात वरिष्ठ पत्रकार तथा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे माजी महासंचालक के.जी.सुरेश,उत्तर प्रदेशचे आरोग्य व  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग,माजी खासदार   ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय,खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांनी विचार मांडले.

******

                                                    

रितेश भुयार/वृ.वि.क्र. 244 /दि.08.11.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here