राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

0
14

मुंबई,दि. ०१ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे,अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्यात आज १ मतदारसंघात १ उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. धुळे जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,जळगाव जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५ उमेदवार,बुलढाणा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३ उमेदवार,अकोला जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,वाशिम जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार,अमरावती जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,नागपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवार,भंडारा जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार,गोंदीया जिल्ह्यात २ मतदारसंघात ५ उमेदवार,गडचिरोली जिल्ह्यात २ मतदारसंघात २ उमेदवार,चंद्रपूर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार,यवतमाळ जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,नांदेड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११ उमेदवार,हिंगोली जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार,औरंगाबाद जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६ उमेदवार,नाशिक जिल्ह्यात ५ मतदारसंघात ८ उमेदवार,पालघर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६ उमेदवार,ठाणे जिल्ह्यात ११ मतदारसंघात १६ उमेदवार,मुंबई उपनगर जिल्ह्यात १० मतदारसंघात ११ उमेदवार,मुंबई शहर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,रायगड जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,पुणे जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५ उमेदवार,अहमदनगर जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७ उमेदवार,बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात १० उमेदवार,लातूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार,उस्मानाबाद जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार,सोलापूर जिल्ह्यात ८ मतदारसंघात २१ उमेदवार,सातारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार,रत्नागिरी जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार,सिंधुदूर्ग जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,कोल्हापूर जिल्ह्यात ९ मतदारसंघात १७ उमेदवार,सांगली जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

००००

इरशाद बागवान/वि.सं.अ./दि.01.10.2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here