नवी दिल्ली,24 : राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातील खासदार पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार आहे.
…असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम!
सातारा लोकसभा मतदार संघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल. 27 ऑक्टोबरला पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
*****
रितेश भुयार /वृत विशेष क्र.220 / दि.24.09.2019