अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई,दि.24 :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. यास्तव शासनाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मी सर्व नागरिकांना करीत आहे.

गुढी पाडव्याचा मंगल सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. ‘घरी राहा आणि सुरक्षित राहा ! नवे वर्ष सर्वांकरिता सुख, समाधान,आरोग्य व संपन्नता घेऊन येवो’ अशा सर्वांना शुभेच्छा देतो. युगादि, चेती चाँद तसेच संवर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

000

Greetings to people on Gudhi Padwa, New Year

Governor appeals to people to celebrate Gudhi Padwa staying at home

Governor Bhagat Singh Koshyari has appealed to the people to celebrate Gudhi Padwa and welcome New Year staying at home in view of the unprecedented situation prevailing in the state and the country.

“Even as we are readying to celebrate Gudhi Padwa and welcome the New Year, the State is passing through an unprecedented situation. The Government is doing all that is required to tackle the situation. However the success of the efforts by the government depends on the complete cooperation from the people. I therefore appeal to the people to extend full cooperation to the Government in tackling the situation.”

“Stay at home and be safe !  May the New Year bring happiness, contentment, good health and prosperity to all. I also take this opportunity to extend my warm greetings to the people on Ugadi, Cheti Chand and Samsar Padvo,” Governor Koshyari has said in his message.

000