रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1622

मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकला ‘गुडबाय’; मुख्य सचिवांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्लास्टिकमुक्तीची शपथ

मुंबई, दि. १ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने ‘ स्वच्छता एक सेवाहा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालयात प्लास्टिक वस्तूंचा त्याग करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची  शपथ आज राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतली तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनाही शपथ दिली.

‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राबविला जात आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात नगरविकास विभागाने आयोजित केलेल्या’गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक‘या उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

यावेळी मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले की, आजपासून मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करणार नाही. मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा त्याग करुन विश्व पर्यावरण रक्षणात माझेही योगदान देईन. माझी हीच कृती बापूजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली असेल, असेही श्री.महेता यांनी सांगितले.

यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक,  पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव दिनेश वाघमारे, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सचिव विनिता वेद-सिंगल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंगल युज प्लास्टिकला गुडबाय करण्याच्या या मोहिमेमुळे नागरिकांत जागृती होईल. ‘आता आपल्यामुळेच फरक पडेल’, असे घोषवाक्य वापरत सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन नगरविकास विभागामार्फत करण्यात आले आहे. 0000

मंत्रालय में सिंगल यूज प्लास्टिक कोगुडबाय

मुख्य सचिव समेत अधिकारी-कर्मचारियों ने ली प्लास्टिक मुक्ति की शपथ

मुंबई, दि. १ : राष्ट्रपिता महात्मा गांधी की १५० वीं जयंति के उपलक्ष्य में स्वच्छता एक सेवायह उपक्रम पूरे राज्य में चलाया जा रहा है।  इस उपक्रम के अंतर्गत मंत्रालय में प्लास्टिक वस्तुओं का त्याग कर पर्यावरण की सुरक्षा में योगदान देने की शपथ आज राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता ने ली और मंत्रालय के वरिष्ठ  अधिकारी एवं कर्मचारियों को  शपथ दिलाई।

स्वच्छता ही सेवायह अभियान ११ सितंबर से २७ अक्तूबर २०१९ इस अवधि तक चलाया जा रहा है। नगरविकास विभाग द्वारा मंत्रालय के त्रिमुर्ती प्रांगण में आयोजित गुडबायसिंगल यूज प्लास्टिक’  इस उपक्रम में अधिकारी एवं कर्मचारियों ने शपथ ली।

इस दौरान मुख्य सचिव श्री. मेहता ने कहा कि आज से मैं सिंगल यूज प्लास्टिक के वस्तुओं का उपयोग नहीं करूंगा। मैं सिंगल यूज प्लास्टिक के वस्तुओं का त्याग कर विश्व पर्यावरण सुरक्षा में मैं अपना योगदान दूंगा। यहीं मेरा कार्य बापुजीं के १५० वीं जयंति के अवसर पर उन्हें दी हुई आदरांजली रहेगी।

कार्यक्रम में राजस्व विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल विकास एवं उद्योजकता विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिकपर्यावरण विभाग के प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभाग की प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सार्वजनिक निर्माणकार्य विभाग के प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग, उर्जा एवं कामगार विभाग के प्रधान सचिव राजेश कुमार, पदुम विभाग के प्रधान सचिव अनुप कुमार, सामाजिक न्याय एवं विशेष सहाय विभाग के सचिव दिनेश वाघमारे, वन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे, अल्पसंख्यक विभाग के प्रधान सचिव श्याम तागडे, सचिव श्रीमती विनीता वेद-सिंघल समेत मंत्रालय के विविध विभागों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 

सिंगल युज प्लास्टिक को गुडबाय करने की इस अभियान से नागरिकों में पर्यावरण की सुरक्षा के प्रति जनजागरण होगा।‘अब हमसे ही होगा परिवर्तन’ (आता आपल्यामुळेच फरक पडेल’) इस घोषवाक्य का आवाहन नगरविकास विभाग की ओर से किया गया है।

००००

शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार; गुरुवारी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली, 01 : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांची वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून 3 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी वयोश्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ्या इंचलकरंजी येथील शारदा दाते यांची या वर्षीच्या वयोश्रेष्ठ  प्रतिष्ठित माता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २ लाख ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. असाध्य रोगाच्या यातना असतानाही मुलाच्या  गतिमंदत्वाने डगमगून न जाता  शारदा दाते यांनी या दोन्हींचा समर्थपणे सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी जीवाचे रान करत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले.

इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्या ११ वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल  सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.

शारदा दाते या आईच्या कष्टाचेच हे फळ असून गौरवाची बाब म्हणजे या मुलाला घडवत त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बनविणाऱ्या मातेलाही आता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या श्रेष्ठ मातेच्या आदर्शामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी‍ निवड झाली आहे.

येथील विज्ञान भवनात ३ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते शारदा दाते यांना  गौरविण्यात येणार आहे.

०००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.225 / दि.01.10.2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध

मुंबई, दि. 1 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी96 हजार 661 मतदान केंद्रांसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची लगबग सुरु आहे. मतदानासाठी बॅलेट युनिट (बीयू) आणि कंट्रोल युनिट (सीयू) महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्या जोडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट वापरण्यात आले होते.

या सर्व यंत्रांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यंत्रांची पुरेशी उपलब्धता असून राखीव यंत्रांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

००००

अजय जाधव/विसंअ/1.10.2019 0000

विधानसभा चुनाव के लिए1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट

मुंबई, दिनांक 1: राज्य के विधानसभा सभा चुनाव में 96 हजार 661 मतदान केंद्रों पर 1 लाख 79 हजार 895 बॅलेट युनीट (बीयू) और 1 लाख 26 हजार 505 कंट्रोल यूनिट (सीयु) उपलब्ध कराई गई हैं। साथ ही एक लाख 35 हजार 255 व्हीव्हीपॅट उपकरण प्रदान किये गये हैं। इसमें से कुछ मशीनों को रिजर्व करके भी रखा जाएगा।

विधानसभा चुनाव के लिए प्रशासनिक व्यवस्था शुरू हो गई है। मतदान के लिए बैलेट यूनिट (बीयू) और कंट्रोल यूनिट (सीयू) महत्वपूर्ण भूमिका निभाती है। इनकी जोड़ी के लिए पहली बार इस साल राज्य के विधानसभा चुनाव में व्हीव्हीपॅटी का प्रयोग किया जाएगा। इसी साल सम्पन्न हुए लोकसभा चुनाव में पहली बार व्हीव्हीपॅटी का प्रयोग किया गया था।

इन सभी उपकरणों का राजनीतिक दलों के प्रतिनिधियों के समक्ष पहले स्तर का निरीक्षण को पूरा कर लिया गया हैं। ईवीएम और वीवीपीएटी उपकरण पर्याप्त रूप से उपलब्ध हैं और इनमें रिजर्व रखें गए उपकरण भी शामिल हैं।

0000

Use of 1 lakh 35 thousand VVPAT for Assembly elections

Mumbai,1:For the assembly election, 1,79,895 ballet units & 1,26,50 Control units have been provided for 96, 661 polling booths in the state. 1, 35,255 VVPAT devices have been provided, including reserve devices.

The administrative system for assembly elections is under way. The ballot unit (BU) and the control unit (CU) play an important role in voting. VVPAT will be used for the first time in the state assembly elections this year. VVPAT was first used in this year’s for the Lok Sabha elections.

All these instruments have been completed at the first level inspection before the representatives of the political parties. EVMs and VVPAT devices are sufficiently available and reserve devices are also included, in the election process.

0000

महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे जनतेला आवाहन

मुंबई, दि. 1 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या शिकवणीचे स्मरण देते. गांधीजींनी जीवनात वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेला अतिशय महत्त्व दिले. त्यामुळे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तसेच दिन-दुबळ्यांची सेवा आदी परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन करीत आहे, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे. 0000

150th Birth Anniversary of Mahatma Gandhi

Governor Koshyari appeals to people to pay respects to Mahatma through cleanliness

Mumbai,Dated 1:The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has appealed to the people to pay respects to Mahatma Gandhi through cleanliness, tree plantation and simple acts of goodness to the poor.

In a tribute to the Father of the Nation, the Governor has said:

“The 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi reminds us of ideals of Satya, Ahimsa and Self Reliance preached and practiced by him.

Gandhiji laid utmost thrust on cleanliness of the mind, body and surroundings. I appeal to the people to pay their respects to Mahatma Gandhi through cleanliness drives, tree plantation and simple acts of kindness to the poor and the needy.”

०००००

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई,दि. ०१ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे,अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्यात आज १ मतदारसंघात १ उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. धुळे जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,जळगाव जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५ उमेदवार,बुलढाणा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३ उमेदवार,अकोला जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,वाशिम जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार,अमरावती जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,नागपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवार,भंडारा जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार,गोंदीया जिल्ह्यात २ मतदारसंघात ५ उमेदवार,गडचिरोली जिल्ह्यात २ मतदारसंघात २ उमेदवार,चंद्रपूर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार,यवतमाळ जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,नांदेड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११ उमेदवार,हिंगोली जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार,औरंगाबाद जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६ उमेदवार,नाशिक जिल्ह्यात ५ मतदारसंघात ८ उमेदवार,पालघर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६ उमेदवार,ठाणे जिल्ह्यात ११ मतदारसंघात १६ उमेदवार,मुंबई उपनगर जिल्ह्यात १० मतदारसंघात ११ उमेदवार,मुंबई शहर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,रायगड जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,पुणे जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५ उमेदवार,अहमदनगर जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७ उमेदवार,बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात १० उमेदवार,लातूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार,उस्मानाबाद जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार,सोलापूर जिल्ह्यात ८ मतदारसंघात २१ उमेदवार,सातारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार,रत्नागिरी जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार,सिंधुदूर्ग जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,कोल्हापूर जिल्ह्यात ९ मतदारसंघात १७ उमेदवार,सांगली जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

००००

इरशाद बागवान/वि.सं.अ./दि.01.10.2019

मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी  घेतला आढावा

मुंबई, दि.30 : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मूल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच राष्ट्रपती भवन येथे देशातील सर्व राज्यपालांची परिषद होणार आहे. या राज्यपाल परिषदेमध्ये विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. यादृष्टीने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील सर्व अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे आयोजित केली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, रुसाचे संचालक पंकजकुमार,अकृषी, कृषी,आरोग्य आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले, उत्तम विद्यार्थी, गुणवत्तापूर्ण शिक्षण अशी महाराष्ट्राची ओळख तयार करताना प्रत्येक कुलगुरुंनी आपल्या विद्यापीठाचा दर्जा सर्वच क्षेत्रात उंचावण्यासाठी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना चांगल्या शरीरासाठी दैनंदिन जीवनात योग करण्यासाठी प्रवृत्त करणे, फिट इंडिया अभियान राबविण्यात पुढाकार घेणे, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

अकृषी विद्यापीठांचा आढावा घेताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. असे करीत असताना मनरेगाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कामांमध्ये शेतीला समाविष्ट करणे आवश्यक असेल. असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

प्रस्तावित नवे शैक्षणिक धोरण, विद्यापीठातील प्रशासनात आवश्यक असणाऱ्या सुधारणा, गुणवत्ता सुधार, संशोधन आणि नाविन्यता, डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम, अध्यापकांच्या रिक्त जागा भरणे, महाविद्यालयांचे नॅककडून राष्ट्रीय मूल्यांकन, विद्यापीठांना देण्यात येत असलेली स्वायत्तता, रुसाअंतर्गत विद्यापीठांना मिळणारा निधी यासह विविध विषयांवर उपस्थित कुलगुरु यांनी आपली मते मांडली.

याच बैठकीत उच्च शिक्षणात येत्या काळातील अपेक्षित गुणवत्ता सुधार, डिजिटल ग्रंथालये, ई -लायब्ररी, स्मार्ट वर्ग, कौशल्ययुक्त शिक्षण, योगचा अभ्यासक्रमात सहभाग, तर फिट इंडिया अभियान आणि उन्नत भारत अभियानाची अंमलबजावणी या बाबतही याबैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी यावेळी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे असेल याबाबत सादरीकरण केले. तर जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विद्यापीठाअंतर्गत करण्यात येणाऱ्या सुधारणा याविषयीची माहिती दिली. सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठांचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा करता येईल याबाबतच्या सुधारणा यावेळी सुचविल्या. 00000

Governor asks Vice Chancellors for suggestion to New Education Policy, doubling of farm income

Mumbai Dated 30:The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today sought the recommendations of the Vice Chancellors of state universities in Maharashtra for inclusion in the New Education Policy 2019.

Stating that Government of India is very serious about further improving excellence and access in higher education, the Governor said the recommendations from the Vice Chancellors would help the Government to frame the New Education Policy.

The Governor asked the Vice Chancellors of agricultural universities to give their specific suggestions for doubling the income of the farmers.

Governor Koshyari was addressing a meeting of Vice Chancellors of 20 public universities, agricultural and non agriculture universities, at Raj Bhavan, Mumbai on Monday (30 Sept).

The Governor told the Vice Chancellors that India needs an education system that will produces job – creators. He said in order to achieve the goal of inclusion, Universities must attach importance to Distance learning so that students deprived of education in the formal set up are brought on par with those have received the benefit of higher education.

The meeting took review of Governance issues in universities, filling of the posts of faculty, autonomy, Research and Innovation, Accreditation of Colleges, Use of Technology by universities, Digital Library, Employability and Social Resposibility, Linking Apprenticeship with Education and other initiatives such as Fit India Campaign and Unnat Bharat Abhiyan.

Secretary of Higher and Technical Educaiton Saurabh Vijay, Secretary, Water Resources Eknath Dawale, Director, RUSA Pankaj Kumar also attended the meeting.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘पर्यटन विशेष’ कार्यक्रम

मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात पर्यटनया विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात  पर्यटन  विभागाच्या सचिव  विनीता वेद सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक  दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर आणि पर्यटन व्यावसायिक अवधूत मोरे यांचा सहभाग आहे. हा माहितीपर कार्यक्रम राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर व बुधवार दि. २ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन  रेश्मा बोडके यांनी केले आहे.

        

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पर्यटनाची बलस्थाने, आधुनिक काळातील पर्यटनाचे बदलते स्वरूप, महाराष्ट्राला लाभलेली पर्यटनस्थळे, पर्यटनामुळे निर्माण होणारा रोजगार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्र, सागरी, वन्यजीव, कृषी, पावसाळी पर्यटन यासह पर्यटनामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मिळत असलेली चालना आदी  विषयाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.                                            

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘महात्मा गांधी यांचे विचार व कार्य’ या विषयावर मुलाखत

दिलखुलास कार्यक्रमात याच विषयावरील मुलाखतीचे गुरुवारी आणि शुक्रवारी प्रसारण

मुंबई, दि.30 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमात ज्येष्ठ  विचारवंत सदानंद मोरे आणि पत्रकार सचिन परब  यांचा सहभाग असलेली महात्मा गांधीजी यांचे  विचार व कार्यया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आणि राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून’दिलखुलासकार्यक्रमात गुरुवार दि. ३ आणि शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        

विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचे विचार आणि मूल्य, महात्मा गांधीजींच्या जीवनातील तत्वे, साहित्यिक गांधी, सत्य, अहिंसा आणि असहकार या विषयीचे  विचार या विषयाची माहिती श्री. मोरे आणि श्री.  परब   यांनी जय महाराष्ट्रदिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २९९ निवडणूक निरीक्षक

मुंबई, दि. ३० : विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत २९९ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उमेदवारांची नामनिर्देशने दाखल करण्यापासून ते निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवण्यासाठी १३८ सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून हे सर्व आयएएस (इंडियन ॲडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी १ सर्वसाधारण निरीक्षक काम बघतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आयपीएस (इंडियन पोलीस सर्व्हिस) दर्जाचे ४१ पोलीस निवडणूक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रत्येक पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त कार्यक्षेत्राला १ याप्रमाणे निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

उमेदवार आणि पक्षांच्या निवडणूकविषयक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) दर्जाचे ११२ खर्चविषयक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येकी २ किंवा ३ विधानसभा मतदारसंघासाठी हे निरीक्षक काम बघतील. निवडणुकीतील अवैध खर्च रोखण्याच्या दृष्टीने यांची भूमिका महत्त्वाची ठरते. याशिवाय आयोगाकडून राज्यस्तरावर अशा २ विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. त्या अनुषंगाने ६ विभागीय आयुक्तांना सुलभ निरीक्षक (Accessible Observer) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मतदान कालावधीत सोयी-सुविधा उपलब्ध करणे, त्यांची मतदार नोंदणी तसेच प्रत्यक्ष मतदान वाढविणे यासाठी करण्यात येणाऱ्या कामांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी हे सुलभ निरीक्षक काम करणार आहेत.

००००

इर्शाद बागवान / विसंअ / दि. ३०.०९.२०१९

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ३ लाख ९१ हजारांचे बनावट मद्य व मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

मुंबई, दि. 30 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वडाळा येथे एका व्यक्तीस अटक केली असून अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या  ठिकाणी  छापा टाकून एकूण 3 लाख 91 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उप-आयुक्त सुनील चव्हाण, संचालक उषा वर्मा, अधीक्षक सी.एच.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने वडाळा येथे नुकतेच बनावट मद्य पुरविणाऱ्या इसमास ताब्यात घेतले.

हा इसम समाजमाध्यमांद्वारे महाविद्यालयीन तरूणांना घरपोच सेवा देणारे संदेश पाठवत असे. विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे हलक्या प्रतीचे मद्य टाकून वितरित करत असे. या मद्याची पॅकिंग तो स्वत: करीत होता, त्याच्या वाशी येथील घरी उच्च प्रतीच्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या, लेबल, पॅकिंगचे सामान व हलक्या प्रतीचे मद्य जप्त करण्यात आले.

या कार्रवाईत मुंबई शहरचे निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक अजय बगाटे, दुय्यम निरीक्षक विनोद शिंदे, जवान भालचंद्र सकपाळ, जनार्दन पवार, सदानंद कांबळे इत्यादिंनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक विलास बामणे करीत आहेत.

विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाच्या आणि मद्याच्या वापराला आळा घालण्याचे निर्देश राज्यासाठीच्या विशेष खर्च निरीक्षक श्रीमती मधू महाजन, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यरत आहेत.

00000

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...