गुरूवार, एप्रिल 24, 2025
Home Blog Page 1634

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’

          

नवी दिल्ली, 25 :एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बापु साळुंखे यांनाही प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने येथील विज्ञान भवनात सुरु असलेल्या6व्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारांचे’वितरण करण्यात आले.जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया  आणि विभागाचे सचिव यू.पी.सिंह,राष्ट्रीय जल अभियानाचे संचालक जी.अशोक कुमार  यावेळी मंचावर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने वर्ष2011पासून देशभर‘राष्ट्रीय जल अभियान’राबविण्यात येते. यावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभाग,खाजगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’प्रदान करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत ठरवून देण्यात आलेल्या5उद्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण9श्रेणींमध्ये23पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणाऱ्या धरणांच्या पाण्याचे एकात्मिक जल व्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणी अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1लाख50हजार रूपये,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उपलब्ध पाण्याचा प्रभावी उपयोग करून जलव्यवस्थापन व जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या वडनेर(भैरव)येथील  शेतकरी बापु साळुंखे यांना शेतकऱ्यांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. 2लाख रूपये,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी श्री.साळुंखे यांच्या मालकीच्या एकूण25एकर शेतीतील केवळ2एकर शेतीलाच पाणी उपलब्ध होते.मात्र,या स्थितीवर मात करण्यासाठी  वर्ष2004पासून सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा प्रभावी अवलंब करून श्री.सांळुखे यांनी आपली25एकर शेती ओलिताखाली आणली असून या जमिनीवर ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारासाठी घेण्यात आली.             

०००००

रितेश भुयार/वृत विशेष क्र.225 /दि.25.09.2019

मतदारांच्या सुविधेसाठी ५ हजार ४०० मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित

मुंबई, दि. 24 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे पाच हजार चारशे मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी सहभाग घेणे सुलभ होईल.

मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या महानगरांमध्ये जागेच्या मर्यादेमुळे लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली असून जेथे लिफ्टची सुविधा आहे अशाच ठिकाणची मतदान केंद्र पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. त्यात 5 हजार 325 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत 96 हजार 454 मतदान केंद्र आहेत. तेथे रॅम्प, व्हिल चेअर, पिण्याचे पाणी या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

भारत निवडणक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी‘सुलभ निवडणुकाहे घोषवाक्य जाहीर केले आहे. यावर्षीच्या मतदार यादीमध्ये आतापर्यंत 3 लाख 60 हजार 885 दिव्यांग मतदार समाविष्ट आहेत. त्यांच्या सुलभतेसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअर यांची सुविधा करण्यात येईल.

००००

अजय जाधव/विसंअ

चला मतदान करुया! माधुरी दीक्षितसह सदिच्छादूतांचे आवाहन

मुंबई दि.24 : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यामार्फत चला मतदान करुयाही मोहीम चित्रफितीच्या रुपाने राबविण्यास सुरुवात झाली आहे.

या चित्रफितीद्वारे श्रीमती दीक्षित या लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात जागरुक मतदारांच्या भूमिकेचे महत्त्व समजावून सांगताहेत. मतदार जागृतीच्या मोहिमेला कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध  मान्यवरांची सदिच्छादूतम्हणून साथ मिळाली आहे.

या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही याच 12 सदिच्छादूतांनी मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचे आवाहन केले होते. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

सातारा लोकसभा मतदार संघासाठी २१ ऑक्टोबरला पोटनिवडणूक

नवी दिल्ली,24 :  राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी पोटनिवडणूक   घेण्यात येणार असून 24 ऑक्टोबरला  मतमोजणी  होणार आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातील खासदार पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार आहे.

…असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम!

सातारा लोकसभा मतदार संघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून  5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी  पार पडेल. 27 ऑक्टोबरला  पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

*****

रितेश भुयार /वृत विशेष क्र.220 / दि.24.09.2019

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजराष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली.  दिनांक ५सप्टेंबर रोजी राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोश्यारी यांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.

००००

Governor calls on President Kovind

Mumbai, 24th Sept :The Govenror of Maharashtra Bhagat Singh Koshyari today (24 Sep)called on the President of India Ram Nath Kovind  at Rashtrapati Bhavan, New Delhi. This was the first meeting of Governor Koshyari with the President of India since taking charge as Governor of Maharashtra on September 5.

००००

तांत्रिक अडचणीमुळे शासकीय रेखाकला परीक्षा-२०१९ पुढे ढकलली

मुंबई, दि. 24 : शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दि. 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार मोहोरबंद प्रश्नपत्रिका वितरणाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.

परीक्षेचे पुढील वेळापत्रकwww.doa.org.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ज्या परीक्षा केंद्राने प्रश्नपत्रिकांची मोहोरबंद पाकिटे ताब्यात घेतली आहेत, ती सर्व मोहोरबंद पाकिटे प्रश्नपत्रिका वितरण केंद्रावर परत करावी, याची शासकीय रेखाकला परीक्षा 2019चे सर्व विद्यार्थी, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी केले आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण

15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा पुरविणार

– अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई,दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून 15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले की,भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची तारीख असून 5 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव,वाई,कराड उत्तर,कराड दक्षिण,पाटण व सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदानसाठी 15 हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त गरज भासणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी 3500 बॅलेट युनिट (बीयू),3000 कंट्रोल युनिट (सीयू) व 3200 व्हीव्हीपॅट हे जास्तीचे लागणार असून ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत,असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले,सातारामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची गफलत होणार नाही. तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार असून यंत्रावर मोठ्या अक्षरात लोकसभा व विधानसभा असे नमूद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतदार नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. परंतु विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली आहे. 1200 मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व पाच अधिकारी,तर 1200 पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व सहा कर्मचारी असतील.

आचारसंहिता काळात आतापर्यंत राज्यात ३ कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 24 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील तीन दिवसात आयकर विभाग,उत्पादन शुल्क विभाग,पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक कोटी 36 लाखांची रोख रक्कम,1 कोटी 68 लाख किंमतीचे मद्य,29 लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ व 46 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील 75 हजार 981,सार्वजनिक ठिकाणच्या 73 हजार 445 व खासगी ठिकाणावरील 16 हजार 428 जागांवरील अनधिकृत फलक,बॅनर,कटआऊट व झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती,पोस्टर व कटआऊट हटविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 50 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये व पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा वस्तू टाळाव्यात,असेही आवाहन श्री.शिंदे यांनी केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/24.9.19

महाराष्ट्राला ‘एनएसएस’चे दोन पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, 24 :राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचे किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन ढोले यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात‘वर्ष2017-18च्या एनएसएस’पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशातील विद्यापीठ,महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण10महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई येथील किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता बागला यांना  चषक आणि1लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर  याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना70हजार रूपये,रजत पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण29विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शाखेचा विद्यार्थी सचिन ढोले हा महाराष्ट्रातून सर्वोत्तम एनएसएस विद्यार्थी ठरला असून त्याला50हजार रूपये,रजतपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.                                                                        

००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.221 /दि.24.09.2019

For convenience of voters around 5400 polling booths shifted to the ground floor

Mumbai,24.Sep.19:“Preparations of the assembly elections are in full swing in the state. About5,400polling booths which were on the first and second floor during Loksabha election, now have been brought to the ground floor. This will make it easier for the disabled and senior citizens to participate in voting”, informed Dilip Shinde, Additional Chief Election Officer.

He further stated that due to space constraints in Mumbai, Mumbai suburbs, Thane, Nashik, Pune, polling booths were set up on the first or second floor for the Lok Sabha elections. But now, around5400polling booths have been shifted to the ground floor to facilitate senior citizens and handicapped voters for the assembly polls. The polling booths have been set up on the first or second floor only where the facility of lift is available.

“There were91,329polling booths in the state during the assembly elections of2014.Now, it has increased to5,325polling booths. Therefore, there are total96,454polling booths in this coming assembly election. There will be ramps, wheelchairs, drinking water facilities available for the people who will come to exercise their franchise”, said Mr. Shinde.

He further informed that this year, the Election Commission of India has announced the ‘Accessible Election’ (Sulabh Nivadnuka) phrase to increase the participation of voters with disabilities. This year3,60,885disable voters have registered their name in voting list. For their convenience, ramps, wheelchairs would be provided at every polling booths.

ताज्या बातम्या

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील तिघांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
ठाणे, दि.२३ (जिमाका): जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित...

काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

0
मुंबई, दि. 23 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर...

महाराष्ट्र-अर्जेंटिना यांच्यात व्यापार व सहकार्याच्या अमर्याद संधी – पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी, पर्यटन, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या विविध क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन पणन आणि राजशिष्टाचार...

महाराष्ट्र – जिबूती यांच्यात व्यापारासाठी नवीन दालन खुले होणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. 23 : जिबूती व महाराष्ट्र यांच्यात केवळ व्यापाराचे नव्हे, तर परस्पर विश्वासाचे संबंध आहेत. हा विश्वास दृढ करूया आणि एकत्रितपणे वाढ आणि समृद्ध भविष्यासाठी...

‘सीसीआय’ने राज्याच्या समन्वयाने कापूस खरेदीसाठी कार्यवाही करावी – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. 23 : राज्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांकडील कापूस हमी भावाने खरेदी करण्यात येतो. ही खरेदी...