मंगळवार, मे 20, 2025
Home Blog Page 1672

शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 28 : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठोस मदत करण्यासाठी आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीस मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉ.नितीन राऊत उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत वास्तववादी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारताना महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य करायचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांना आपले वाटेल या दिशेने प्रयत्न असतील.

सर्वांना अभिमान वाटावा अशा रायगड संवर्धनाच्या 20 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रथम मंजूरी देण्याचे भाग्य मिळाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधानसभेच्या २८६ आमदारांचा शपथविधी संपन्न

मुंबई,दि.27 :विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी14व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या288पैकी उपस्थित285सदस्यांना (दु.1वा.पर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली. श्री. कोळंबकर यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.

        

14व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ’वंदे मातरम्’ने तर समारोप राष्ट्रगीताने झाला.

0000

सचिन गाढवे/ श्रद्धा मेश्राम/ वि.सं.अ./ दि.27.11.2019   00000

286 विधायकों की शपथविधि पूर्ण

मुंबई,दि. 27 : विधानसभा के  हंगामी  अध्यक्ष,कालिदास  कोळंबकर  ने 14वीं विधानसभा में चुने गए 288 सदस्यों में से उपस्थित 285 सदस्यों को (दो. 1 बजे तक) सदस्यता की शपथ दिलाई। श्री.  कोळंबकर ने कल ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के समक्ष अध्यक्ष के रूप में शपथ ली है। सुधीर मुनगंटीवार और देवेंद्र  भुयार की अनुपस्थिति के कारण,आज उनका शपथविधि नहीं हो सका।

14 वीं विधानसभा के निर्वाचित सदस्यों को शपथ दिलाने के लिए  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने आज विधानसभा की बैठक बुलाई थी। बैठक वंदे मातरम के साथ शुरू हुई और राष्ट्रगान के साथ समाप्त हुई।

०००००  

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या संविधान दिन कार्यक्रमाचा वृत्तान्त

मुंबई,दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीम’शुभारंभ कार्यक्रमाचा वृत्तान्त प्रसारित होणार आहे. हा वृत्तान्त राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. 28 आणि शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी या वृत्तान्ताचे वाचन केले आहे.

राज्यात 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या वर्षाच्या कालावधीत‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीम’राबविण्यात येणार असून पुढील वर्षभर विविध विभागांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,विधिज्ञ डी.एन. संदानशीव,बार्टीचे महासंचालक कैलास कणसे,समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते. या जागरुकता मोहीम शुभारंभ कार्यक्रमाचा वृत्तान्त’दिलखुलास’या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे. 

मंत्रिमंडळाच्या शपथविधीचे उद्या दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी समारंभ शिवतीर्थ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे उद्या गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण सायं. 6.30 वाजल्यापासून मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार असल्याचे मुंबई दूरदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी कळविले आहे.

मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून

मुंबई,दि. 27 :मुंबईच्याशिवाजीपार्कयेथेगुरुवार,दि. 28नोव्हेंबर2019रोजीसायंकाळी6.40वाजतानवीनमंत्रिमंडळाचाशपथविधीसोहळाहोणारआहे.यासोहळ्याचेथेटप्रक्षेपण(लाईव्हस्ट्रिमिंग)माहितीवजनसंपर्कमहासंचालनालयाच्याट्विटर,युट्यूबआणिफेसबुकयासमाजमाध्यमांवरूनसायंकाळी6.15वाजल्यापासूनकरण्यातयेणारआहे.लाईव्हस्ट्रिमिंगपाहण्यासाठीखालीललिंकवरक्लिककरा.

ट्विटर-https://twitter.com/mahadgipr

युट्यूब-  http://bit.ly/2snDQ2D 

फेसबुक-https://www.facebook.com/MahaDGIPR/

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासमवेत उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर. श्रीनिवास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त  शिवाजी दौंड, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (रवका) अंशू सिन्हा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेशकुमार वाघमारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज. जी. वळवी, राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव राजेंद्र गायकवाड यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

भारतीय संविधान दिवस के अवसर पर

मंत्रालय में उद्देश्यपूर्ण सामूहिक वाचन

मुंबई,दि.26 :भारतीय संविधान दिवस के अवसर पर मंत्रालय में आज भारतीय संविधान के उद्देश्य के सामूहिक वाचन द्वारा संविधान दिवस मनाया गया। राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता के साथ उपस्थित सभी अधिकारियों और कर्मचारियों ने उद्देश्य को पढ़ा।

इस मौके पर सामान्य प्रशासन विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे,सूचना एवं प्रौद्योगिकी विभाग के प्रमुख सचिव एस.वी.आर. श्रीनिवास,मुख्यमंत्री के प्रधान सचिव भूषण गगराणी,कोंकण विभाग के आयुक्त शिवाजी दौंड,सामान्य प्रशासन विभाग के सचिव (रवका) अंशु सिन्हा,सामाजिक न्याय विभाग के प्रधान सचिव दिनेश कुमार वाघमारे,महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम के मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन,सामान्य प्रशासन विभाग के उप सचिव ज.जी. वळवी,राजस्व विभाग के अवर सचिव राजेंद्र गायकवाड सहित मंत्रालय के अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में मौजूद थे। 0000

Group reading of preamble in Mantralaya on the Indian Constitution Day

Mumbai, date,26th: Indian Constitution Day was celebrated in the Mantralaya by reading preamble in the groups. Chief Secretary of the state Ajoy Mehta along with other present office-bearers and employees read the preamble.

Upper Chief Secretary of General Administration Department Sitaram Kunte, Principal Secretary of Information Technology Department S.V.R. Srinivas, Principal Secretary of Cm Bhushan Gagrani, Konkan Divisional Commissioner Shivaji Daund,   Secretary of General Administration Department Anshu Sinha, Principal Secretary of Social Justice Department Dinesh Kumar Waghmare, Chief Executive Officer of Maharashtra Industrial Development Corporation P. Anbalgan, Deputy Secretary of General Administration Department J.J. Valvi, Under Secretary of the Protocol Department Rajendra Gaikwad and other office-bearers and employees were present in a large number at the programme.

0000

मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिसांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 26 : मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिसांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस जिमखाना येथे श्रद्धांजली वाहिली.

माजी मंत्री आशिष शेलार, माजी आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह शहीद पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. शहीदांच्या कुटुंबियांनीही शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पोलिसांच्या पथकाने मानवंदना दिली. ०००००

Maharashtra Governor, CM pay tribute to martyrs of

26/11 terrorist attacks on 11th anniversary

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari and State Chief Minister Devendra Fadnavis placed wreaths and saluted the police martyrs at the Police Memorial in Mumbai on Tuesday (26th Nov). The Governor met the family members of martyr police officers and police personnel present on this occasion.

The Salutation Ceremony was organised by the Mumbai Police to pay tributes to the police offers, jawans and commandos of NSG who laid down their lives during the terrorist attacks on Mumbai 11 years ago.

Former Minister Ashish Shelar, former MLA Raj Purohit, Chief Secretary Ajoy Mehta, Director General of Police Subodh Jaiswal, Commissioner of Police, Brihan Mumbai Sanjay Barve and family members of martyred police officers and police personnel also paid tributes at the Police Memorial.

The Police Band played the Last Post and Rouse on the occasion.

Veteran police officers J F Ribeiro, M N Singh, Ronald Mendonca and others were present on the occasion.

000

मुंबई हमले में शहीद हुए पुलिस जवानों

को राज्यपाल,मुख्यमंत्री ने दी श्रद्धांजली

मुंबई,दि.26 :मुंबई हमले में शहीद हुए पुलिस जवानों को राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज पुलिस जिमखाना में श्रद्धांजली अर्पित की.

इस मौके पर पूर्व मंत्री आशिष शेलार,पूर्व आमदार राज पुरोहित,मुख्य सचिव अजोय मेहता,पुलिस महासंचालक सुबोध जयस्वाल,मुंबई पुलिस आयुक्त संजय बर्वे सहित शहीद पुलिस जवानों के परिजन उपस्थित थे. शहीदों के परिवार के सदस्यों ने शहीद स्मारक पर पुष्प चक्र चढ़ाकर श्रद्धांजलि दी।

इस दौरान पुलिस दल ने शहीदों को सलामी दी.

००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारतीय संविधानाला वंदन

मुंबई,दि.26: भारतीय संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी संविधानाला वंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संविधानापुढे नतमस्तक होत संविधानाप्रती आदर व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वोत्कृष्ट संविधानाच्या माध्यमातूनच भारत संपूर्ण जगाला मार्गदर्शन करेल,असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी वर्षा निवासस्थानी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संविधानाला वंदन केले.

संविधान दिनानिमित्त राजभवनात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई,दि. 26 : संविधान दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी उपसचिव रणजित सिंह यांच्यासह अधिकारी,कर्मचारी,राजभवनात तैनात असलेले पोलीस,राज्य राखीव दलाचे पोलीस आदींनीही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले 0000

संविधान दिवस पर राजभवन में

संविधान के उद्देश्य का वाचन

मुंबई,दि.26 :संविधान दिवस के अवसर पर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने राजभवन मे भारतीय संविधान के उद्देश्य का वाचन किया। इस मौके पर उप सचिव रणजित सिंह सहित अधिकारी,कर्मचारी,राजभवन में तैनात पुलिस,राज्य रिजर्व बल के पुलिसकर्मी आदि ने भी संविधान के उद्देश्य का वाचन किया।

००००

Preamble reading at Raj Bhavan on the Indian Constitution Day

Mumbai, date.26th: Governor Bhagat Singh Koshyari read the preamble of the constitution on the Indian Constitution Day.

Deputy Secretary Ranjit Singh and other office-bearers, employees, police deployed at Raj Bhavan, SRPF also read the preamble.

0000

सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन

विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन होण्यासाठी

गणनेत संकलित माहिती अत्यंत उपयुक्त

मुंबई, दि.26 :विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे विकास धोरणे अत्यंत लक्ष्यवेधीपणे निश्चित करता येतात व त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देणे शक्य होते.  त्यामुळे सातव्या आर्थिक गणनेचे प्रगणक तुमच्या घरी आले, तर त्यांना आपल्या उद्योग,व्यवसाय,उपक्रम,मनुष्यबळाची सर्व माहिती देऊन सहकार्य करा असे आवाहन राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी केले.

सातव्या आर्थिक गणनेचा आज राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम श्री. चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाला,  त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या उप-महानिर्देशक  सुप्रिया रॉय,राज्याच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे संचालक र.र. शिंगे,  नियोजन विभागाच्या उपसचिव प्रज्ञा महाले,सह संचालक जयवंत सरनाईक,कॉमन सर्व्हिस सेंटरचे प्रमुख सल्लागार वैभव देशपांडे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती रॉय यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी  आर्थिक गणनेचे काम कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याची उपस्थितांना माहिती दिली.

राज्यात26नोव्हेंबर2019ते फेब्रुवारी2020या कालावधीत सातव्या आर्थिक गणनेचे काम होणार आहे. या आर्थिक गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी प्रथमच मोबाईल आज्ञावली (ॲप) विकसित करण्यात आली असून,त्यावर आर्थिक गणनेचा तपशील नोंदवला जाईल. राज्यात सातव्या आर्थिक गणननेदरम्यान ग्रामीण आणि शहरी भागात मिळून सुमारे64हजार411प्रगणक आणि31हजार472पर्यवेक्षक काम करणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात मिळून अनुक्रमे2कोटी5लाख80हजार163आणि1कोटी16लाख24हजार830घरांना हे प्रगणक भेट देतील. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात संघटित आणि असंघटित क्षेत्रात विविध आर्थिक कार्य करणाऱ्या आस्थापनांची यात गणना केली जाईल. या आस्थापनांमध्ये कार्यरत कामगारांची माहिती  संकलित करण्यात येईल.

सातव्या आर्थिक गणनेची माहिती गोळा करण्याचे काम यावेळी कॉमन सर्विस सेंटर (CSC)यांच्याकडून नेमलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांकडून होत आहे. तर दुसऱ्या स्तरावरील पर्यवेक्षणाचे काम राज्यातील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय व राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अधिकारी कर्मचारी करतील.

आर्थिक गणनेत प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आर्थिक गणनेच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अपर मुख्य सचिव नियोजन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समिती,उप महानिर्देशक,एनएसओ (एफओडी) यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रकाम संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

टोल फ्री क्रमांक

क्षेत्रीय स्तरावरील प्रगणकांच्या तसेच नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक भाषेत1800-3000-3468)हा टोल फ्री क्रमांक निर्माण करण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने सातव्या आर्थिक गणनेतील विविध पैलूंवरील माहितीचा प्रसार सुलभ होण्यासाठी  http://mospi.nic.in/7theconomic-census  हे संकेतस्थळ विकसित केले आहे. 

                    

राज्यात आतापर्यंत झालेल्या आर्थिक गणना

आर्थिकगणनेचेविवरण आस्थापनांचीसंख्या(लाख) आस्थापनांमधीलरोजगारितव्यक्तींचीसंख्या(लाख)
दुसरी1980 18.39 67.50
तिसरी1990 २६.२३ 89.60
चौथी1998 32.24 104.44
पाचवी2005 42.25 113.08
सहावी2014 61.37 145.12

००००

ताज्या बातम्या

गेवराई नगर परिषदेकडून १८ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

0
गेवराई, जिल्हा बीड :- गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून तब्बल 18 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच अतिक्रमण धारकांना हक्काच्या पी.टी.आर. (Property Tax Receipt)...

खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी ३१ मे पर्यंत करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १९ : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीची नोंदणी शी...

भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंडमधील ‘बीएलओ’ पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

0
मुंबई, १९ : भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंड राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील अग्रभागी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय क्षमता-विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात दिल्ली येथील...

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

0
मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्‍यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या...

संग्राह्य असे बीड कॉफी टेबल बुक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बीड, दि. 19 (जि.मा.का.)  बीड जिल्ह्याची सचित्र आणि उत्तम अशी मांडणी कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे पुस्तक कुणालाही आपल्या संग्रही  ठेवावे असे...