सोमवार, जुलै 28, 2025
Home Blog Page 1799

राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांचा परिचय

Ø नाव                 : श्री. दत्तात्रय विठोबा भरणे

Ø जन्म                 : 1 जून, 1968

Ø जन्म ठिकाण     : अंथुर्णे

Ø शिक्षण             : बी.कॉम.

Ø ज्ञात भाषा         : मराठी, हिंदी, इंग्रजी.

Ø वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सारिका.

Ø अपत्ये              : एकूण 1 (एक मुलगा)

Ø व्यवसाय          : शेती

Ø पक्ष                  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Ø मतदारसंघ        : 200-इंदापूर

Ø इतर माहिती      : 1992 पासून संचालक, 2003-2008 चेअरमन , श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, इंदापूर; 1996 पासून संचालक, 2002-2003 चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 1991-99 काँग्रेस पक्षाचे कार्य 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; 2012-14 सदस्य व मार्च 2012 ते सप्टेंबर 2014 अध्यक्ष, जिल्हापरिषद, पुणे; या काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल समाज कल्याण विभागाचा 2013 चा “अपंग कल्याण राज्य पुरस्कार” प्राप्त; 2014-19 सदस्य महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

संदर्भ: 12 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय

राज्यमंत्री श्रीमती आदिती सुनील तटकरे यांचा परिचय

Ø नाव                 : आदिती सुनील तटकरे

Ø शिक्षण             : बी.ए., मास्टर ऑफ आर्टस्

Ø ज्ञात भाषा         : मराठी, हिंदी, इंग्रजी.

Ø पक्ष                  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Ø मतदारसंघ        : 193-श्रीवर्धन

Ø इतर माहिती      : जयहिंद कॉलेजमध्ये2002-2009 प्राध्यापक म्हणून काम केले. यूपीएससी परीक्षांसाठी 2002-2009 पर्यवेक्षक (सुपरवायझर) म्हणून काम केले.2002-2009 पासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सामील.        कोकण विभागीय समन्वयक म्हणून काम सुरू. 23 फेब्रुवारी 2017 रोजी वरसे येथील रोहा ग्रुपमधून रायगड जिल्हा परिषद सदस्य.21 मार्च, 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड. 25 नोव्हेंबर 2019 पर्यंत रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. ऑक्टोबर, 2019 महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे यांचा परिचय

Ø नाव               : प्राजक्त तनपुरे

Ø जन्म                : 13 सप्टेंबर 1976

Ø शिक्षण            : बी.ई.,एम.बी.ए., एम.एस.

Ø ज्ञात भाषा        : मराठी, हिंदी व इंग्रजी

Ø वैवाहिक माहिती : विवाहित

Ø व्यवसाय          : शेती

Ø पक्ष                  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Ø मतदारसंघ        : 223-राहुरी

Ø इतर माहिती      : प्रसाद शुगर कारखान्याचे चेअरमन, लोकनियुक्त नगराध्यक्ष, ऑक्टोबर, 2019 मध्ये   महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

राज्यमंत्री श्री.संजय बनसोडे यांचा परिचय

Ø नाव                 : श्री.संजय बाबुराव बनसोडे

Ø जन्म                 : 1 जुलै, 1973

Ø शिक्षण             : 12 वी

Ø ज्ञात भाषा         : मराठी, हिंदी व इंग्रजी

Ø वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी शिल्पा

Ø व्यवसाय          : शेती/राजकारण

Ø पक्ष                  : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय).

Ø मतदारसंघ        : 237- उदगीर (अनुसूचित जाती)

Ø इतर माहिती      : ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधासभेवर निवड

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या आरोग्य विभागाच्या संचालक डॅा. अर्चना पाटील यांची मुलाखत

   

मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात  प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाया विषयावर  आरोग्य विभागाच्या संचालक डॅा. अर्चना पाटील यांची  विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  मंगळवार दि.31 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

      

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, या योजनेची सुरूवात, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, जननी सुरक्षा योजना, माता आरोग्याकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माहितीसाठी  विभागाने राबविलेले उपक्रम या विषयाची माहिती डॉ.अर्चना पाटील यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमात दिली आहे.

जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेली आपली ‘बेस्ट टीम’ – विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्री परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 30 : जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक“बेस्ट टीम”आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या वहिल्या मंत्री परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्री व राज्यमंत्री उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या मंत्री परिषदेला सर्व मंत्री व राज्य मंत्री उपस्थित होते.

प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, याठिकाणी भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर सगळे एक आहोत. एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणांस काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आपली ही बेस्ट टीम प्रत्येक सामना जिंकेलच आणि राज्याला अधिक प्रगतीपथावर पोहोचवेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

8 तारखेस विशेष अधिवेशन

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 334 मधील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 8 जानेवारी 2020 रोजी बोलवावे असेही मंत्री परिषद बैठकीत ठरले.

मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांचा परिचय

Ø नाव                       : श्री.आदित्य उद्धव ठाकरे

Ø जन्म                      : 13 जून, 1990

Ø शिक्षण                    : बी. ए., एलएल.बी

Ø ज्ञात भाषा               : मराठी, हिंदी, इंग्रजी.

Ø वैवाहिक माहिती      : अविवाहित

Ø पक्ष                        : शिवसेना

Ø मतदारसंघ               : 182-वरळी

Ø इतर माहिती             :  वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक२०१९ मध्ये विजयी, सध्या युवा सेनेचे प्रमुख आणि २०१७ मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, वर्ष २००७मध्ये“My Thoughts in White and Black”हा कविता संग्रह प्रसिद्ध. “उम्मीद”या खासगी अल्बमसाठी ८ गाण्यांची रचना, महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्या नेतृत्व शैलीची छाप पाडत पुढे राजकारणात आपले नेतृत्व गुण सिद्ध करीत आज युवकांचे प्रश्न ज्वलंतपणे मांडत तरुणांना आपला हक्क मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत.

आपल्या विशेष कार्यशैलीतून, शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आपले विशेष योगदान देत तंत्रज्ञ विकसित शिक्षण पद्धतींचा अंगीकार करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. शैक्षणिक सुधारणांसोबत तरुणांच्या रोजगारासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.  23 जानेवारी, 2018 पासून शिवसेना नेते; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे कर्तव्य बजावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी सत्र क्रमांक117चा दीक्षान्त समारंभ संपन्न

 नाशिक दि.30 -सक्षम समाज घडविण्यासाठी समर्थपणे आपले कर्तव्य बजवावे. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या वर्दीला भ्रष्टाचारमुक्त ठेवत चारित्र्यावर कुठलाही कलंक लागू नये याची दक्षता घ्यावी,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक सत्र क्र.117च्या दीक्षान्त संचलन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री एकनाथ शिंदे,पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले,प्रशिक्षणानंतर प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक आव्हाने स्वीकारण्यास आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशासोबत मिळालेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी सदैव तत्पर राहून आपल्या वरिष्ठांनी आणि यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन पोलीस दलाची मान उंचावली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक ही कर्तव्य व सेवेची परंपरा नेतील,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,वर्दीच्या आतला माणूस मजबूत करण्यासाठी पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ व निरोगी राहणे आवश्यक आहे. यासाठी शासन आवश्यक ती सर्व मदत करेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दल सक्षम करण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान,वाहने,प्रशिक्षण अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. संघटीत गुन्हेगारी,नक्षलवाद,सायबर गुन्हे अशा आव्हानांना पेलण्याची प्रेरणा मिळावी म्हणून पुढील वर्षी मानाच्या तलवारी सोबतच’मानाची रिव्हॉल्वर’हा पुरस्कार म्हणून देण्यात येईल,अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक117या  तुकडीचे प्रशिक्षण हे22ऑक्टोबर2018पासून सुरु झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील477पुरुष व192महिला व गोवा राज्यातील20पुरुष असे एकूण689प्रशिक्षणार्थींनी  प्रशिक्षण पूर्ण करुन ते आज पोलीस सेवेत रुजू होत आहेत. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव संस्था असून1जुलै1906रोजी भांबुर्डा,पुणे येथे सुरु झालेली प्रशिक्षण शाळा1जुलै1909रोजी नाशिक येथे स्थलांतरित करण्यात आली असून5फेब्रुवारी1990रोजी या शाळेला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती श्रीमती दोरजे यांनी यावेळी बोलताना दिली.  त्यांनी प्रशिक्षणार्थींना संविधानाची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण संचलनाचे निरीक्षण केले.  संचलन सुरु करण्यापूर्वी राष्ट्रध्वज व महाराष्ट्र पोलीस प्रबोधनीच्या ध्वज घेऊन जाणाऱ्या निशाण टोळीला सर्व उपस्थितींना मानवंदना दिली.  संचलनाचे नेतृत्व संतोष कामटे आणि विजया पवार यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संतोष कामटे यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (‘स्वॉर्ड ऑफ ऑनर) व  बेस्ट कॅडेट इनडोर स्डडीज (सिल्व्हर बॅटन) ने सन्मानित करण्यात आले. अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑल राऊंड वुमन कॅडेट व सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच विजया पवार,बेस्ट कॅडेट इन आऊट डोअर (गोल्ड कप) सागर साबळे यांना प्रदान करण्यात आला.

दीक्षान्त संचालनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते इनडोअर फायरिंग रेंज,ॲस्ट्रोअर्फ हॉकी व फुटबॉल मैदान तसेच आवेल मैदानातील सिन्थेटिक ट्रॅकचे भूमिपूजन करण्यात आले.

सहकार क्षेत्रात सामाजिक दायित्व महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते दि कल्याण जनता सहकारी बँकेचे समाजसेवा पुरस्कार प्रदान

ठाणे, दि. २९ : समाजाचे एक घटक या नात्याने आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. ही सामाजिक दायित्वाची भावना सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कल्याणच्या के.सी.गांधी सभागृहात दि कल्याण जनता सहकारी बँकेच्या न्यासाच्या वतीने देण्यात येणाऱ्या समाजसेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार कपिल पाटील, कोकण महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, न्यासाचे संचालक लक्ष्मीकांत उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात कार्यरत असतांना सामाजिक बांधिलकी जपणारे कृष्ण लाल धवण, भास्कर शेट्टी, महेश अग्रवाल यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ५१ हजार रुपये, ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कारार्थींनी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम संचालक न्यासाकडे सुपूर्द केली.

यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, सहकारात संस्कार महत्वाचे आहेत. या क्षेत्रात काम करताना विश्वासार्हता, सचोटी, त्याचबरोबर कामाप्रती निष्ठा असणे खूप गरजेचे आहे. या त्रिसूत्रीवर सामाजिक क्षेत्रात अनेक जण यशस्वी होतात. सहकार क्षेत्रात एक उत्कृष्ट मॉडेल म्हणून कल्याण जनता सहकारी बँक काम करत आहे.

ग्राहकांना चांगली सुविधा देण्याबरोबरच या बँकेने सामाजिक वनीकरण क्षेत्रातही सहभाग घ्यावा. बँकेच्या सर्व खातेदारांनी एक रोप लावून सामाजिक बांधिलकी जोपासावी असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांसह बँकेचे पदाधिकारी, सभासद आदी उपस्थित होते.

निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 वी वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षण रौप्य महोत्सवी कार्यक्रम

मुंबई, दि. 28 : निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम आहे, भारताला योगामुळे जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 व्या वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षणाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत हेाते. व्यासपीठावर योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र, मदन बहल, ऋषी योगेंद्र उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, योगविद्येशी भारताचे घट्ट नाते आहे. योगामुळे मानवी मन सकारात्मक विचार करते. मनाला नियंत्रित करण्याची क्षमता योगात आहे. योगामुळे अनेक व्याधीं दूर राहतात. आजच्या काळात आपल्या देशातील योग शिक्षणाची परंपरा जीवंत ठेवण्यात योगा इन्स्टिट्यूटने मोलाचे कार्य केले आहे. संस्थेने योग परंपरा शंभर वर्षांपासून जपल्याची बाब कौतुकास्पद आहे, असे सांगत राज्यपालांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. महानगर पालिकांच्या शाळेत गेल्या 25 वर्षांपासून संस्था योग शिक्षण देत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 60 शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...