गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1800

भ्रष्टाचार उच्चाटनाला प्राधान्य देण्याचा राज्यपालांनी दिला संदेश

मुंबई, दि. 30 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या उच्चाटनाला प्राधान्य द्यावे लागेल, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाविरुध्द लढण्यासाठी “लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही”तसेच सर्व कामे प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावित असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस कर्मचारी यांना दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त “सत्यनिष्ठा प्रतिज्ञा”दिली, तसेच राज्यपालांच्या संदेशाचे वाचन केले.

          

दि.२८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरया कालावधीत राज्यात दक्षता, जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून “प्रामाणिकपणा- एक जीवनशैली”असे या  सप्ताहाचे ध्येय वाक्य ठरविण्यात आले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या राज्यभर ‘एकता दौड’

मुंबई, दि. 30 :लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याकरिता त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुंबईत आयोजित एकता दौडचा आरंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीपीए, मरीन ड्राईव्ह येथून सकाळी ८.००वाजता होणार आहे.

मुंबईतील एकता दौड ही 31 ऑक्टोबर रोजी सकाळी८.००वाजता एनसीपीए गेट क्र.3, मरीन ड्राईव्ह येथून सुरू होणार असून, त्याचे विसर्जन ग्रँट मेडिकल जिमखाना, मरीन ड्राईव्ह येथे होणार आहे. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांनी दिली आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त’रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.

नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा उद्यान येथून सकाळी 7.30 वाजता दौडचा आरंभ होणार आहे. 21 क्रीडा संघटनांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. अहमदनगर येथे सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दौडला सुरूवात होईल. टिळकरोडमार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल मार्ग, दिल्ली गेट, सिद्धीबाग मार्गे पोलीस मुख्यालय येथे एकता दौडचा समारोप होईल.

धुळे येथे सकाळी8 वाजता जमनालाल बजाज मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथून दौडचा प्रारंभ होणार असून महापालिका जुन्या इमारतीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दौडचा समारोप होणार आहे. जळगाव येथे देखील एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून एकतेची शपथ घेऊन दौडचा आरंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजी रोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी स. 8.00वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे.

विदर्भात नागपूर येथे ही दौड अमरावती रोड येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  मैदानावर सकाळी8 वाजता  सुरु होणार आहे. अकोला येथे ही दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडीयम येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी7 वाजेपर्यंत वसंत देसाई स्टेडियम येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून दौड सुरु होणार असून नवीन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता ही दौड सुरु होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी 7 वाजेपर्यंत वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

बुलडाणा येथे ही दौड जिल्हा पोलीस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलीस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. ही दौड31ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता सुरु होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हा पोलीस मैदान येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनच्यावतीने करण्यात आले आहे.

उस्मानाबाद येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी  7.00 वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय दौडमध्ये युवक-युवती,विद्यार्थी,खेळाडू,योगप्रेमी,स्वयंसेवी संस्था, पोलीस, व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यात सकाळी 7 वाजता क्रिडा भवन अलिबाग बीच येथून एकता दौडचा प्रारंभ करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या दौडचे आयोजन करण्या आले आहे.

लातूर येथे गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर 2019  रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय एकता दौडला टाऊन हॉल येथून सुरुवात होणार आहे. सदर दौड शिवाजी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे. ही दौड यशस्वी करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि विविध विभागांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सांगली येथे एकतादौड पुष्कराज चौक येथूनसकाळी 7 वाजतासुरु होणार असून मार्केट यार्ड,विश्रामबाग चौक परत त्याचमार्गाने पुन्हा पुष्कराज चौक येथे आल्यानंतर एकता दौडचा समारोप होईल.अशी माहितीजिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनीदिलीआहे.

बीड येथे सकाळी08.00  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल पर्यंतएकता दौड” (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.

हिंगोली येथे राष्ट्रीय एकता दौडची सकाळी7.00 वाजता अग्रसेन चौक (नांदेड नाका) येथून सुरुवात होणार आहे. बस स्थानक-इंदिरा गांधी चौक – महेश चौक मार्गे महात्मा गांधी चौक येथे राष्ट्रीय एकतेची शपथ घेवून या दौडचा समारोप होणार आहे.

कोकण विभागातील रत्नागिरी व पालघर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय कार्यालय, शाळा यांच्या सहभागाने  एकता दौडचेआयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीजिल्ह्यातशिवाजी स्टेडियम, मारुती मंदीर ते जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील 100 फुटी ध्वजस्तंभ पर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दौडची सुरुवात सकाळी7 वाजता पाच बत्ती ते आर्यन हायस्कूल या मार्गाने होणार आहे. तर समारोप पाचबत्ती येथे होणार असून या राष्ट्रीय दौंडमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती खेळाडू सामाजिक संस्था पोलीस दल सहभागी होणार आहेत.

चंद्रपूर येथे रन फॉर युनिटीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी 6 वाजता केले आहे. राष्ट्रीय एकता दौड ही जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होणार असून जनता महाविद्यालय वरोरा नाका प्रियदर्शनी हॉल ते जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

अकोला येथे एकता दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम  येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार असून वसंत देसाई स्टेडियमच्या बँडमिंटन हॉलकडील प्रवेशद्वार येथे समारोप होईल. या दौडमध्ये सुमारे400 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सकाळी  6.15 वा. राष्ट्रीय  एकता दौड क्रांतीचौक ते बाबा पेट्रोल पंपपर्यंत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 8 वा. शहरातील मम्मादेवी येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी पुतळा इथपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

तसेच परभणी येथे सकाळी 7.30 वा. राजगोपालाचारी उद्यान ते जिल्हा क्रिडा संकुल येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे.

याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये दौडसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी राज्यभर एकता दौड

मुंबई,दि. 29 :सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (31 ऑक्टोबर २०१९) राज्यात जिल्हा मुख्यालये,महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस देशभरात‘राष्ट्रीय एकता दिवस’म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत.

नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा उद्यान येथून सकाळी 7.30 वाजता दौडचा शुभारंभ होणार आहे. 21 क्रीडा संघटनांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. अहमदनगर येथे सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दौडला सुरूवात होईल. टिळकरोडमार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, रुपीबाई बोरा हायस्कूल मार्ग, दिल्ली गेट, सिद्धीबाग मार्गे पोलीस मुख्यालय येथे एकता दौडचा समारोप होईल.

धुळे येथे सकाळी 8 वाजता जमनालाल बजाज मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान येथून दौडचा प्रारंभ होणार असून महापालिका जुन्या इमारतीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दौडचा समारोप होणार आहे. जळगाव येथे देखील एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून एकतेची शपथ घेऊन दौडचा शुभारंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजी रोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने  31ऑक्टोबर रोजी स. 8.00 वा. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे.

विदर्भात नागपूर येथे ही दौड अमरावती रोड येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  मैदानावर सकाळी 8 वाजता  सुरु होणार आहे. अकोला येथे ही दौड जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडीयम येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून दौड सुरु होणार असून नवीन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. बुलडाणा येथे ही दौड जिल्हा पोलीस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलीस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये दौड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 28 :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना  दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि. 28 : राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

राज्यातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने तत्काळ मदत केली आहे. सध्या काही भागांत विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. मात्र, राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे गरजेचे असून तसे आदेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले आहेत.

संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना समजणार निवृत्तीवेतनाचा तपशील

मुंबई, दि. 25 : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशीलwww.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना आपला हा तपशील जाणून घेता येईल, अशी माहिती अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपला निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनविषयक तपशील जाणून घेण्यासाठी   www.mahakosh.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर NIVRUTIVETANVAHINI  या टॅबवर क्लिक करावे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर लॉगिन करण्याकरिता युजरनेम PENSIONER  असे टाईप करावे. पासवर्ड ifms123  असा आहे. कॅपचा टाईप केल्यानंतर लॉगिन करावे.  लॉगिन झाल्यानंतर स्क्रीनवर वर्क लिस्ट व पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट  असे दोन टॅब दिसून येतात. पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट वर क्लिक केल्यास  निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून निवृत्तीवेतनधारकाला त्याचे दरमहा किती निवृत्तीवेतन दिले जाते याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

वर्कलिस्ट टॅब वर क्लिक केल्यास क्रियेट पेन्शनर युजर या टॅब वर क्लिक करून निवृत्तीवेतनधारकास स्वत:चे स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने त्यांचा निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक, निवृत्तीवेतन बँक खाते, अचूक नोंदवणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून क्रियेट युजर वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतनधारकाला स्वत:चे लॉगिन (युजर नेम व पासवर्ड) उपलब्ध होईल. या नवीन युजर नेम आणि पासवर्ड ने लॉगिन केल्यानंतर निवृत्तीवेतनधारकास स्वत:च्या निवृत्तीवेतनाची तपशीलवार माहिती उपलब्ध करून घेता येईल, निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे ही अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.

००००

राज्यातील जनतेला राज्यपालांकडून दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित आणि निराधार लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करुया. राज्यातील सर्व लोकांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Maharashtra Governor extends Diwali greetings to people

Mumbai, 25th Oct : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has conveyed his greetings to the people of Maharashtra on the eve of Diwali.  In a message to the people, the Governor has said:

“May Deepawali, the festival of lights bring happiness, prosperity and peace in the lives of all the people. This is an occasion to spread and share our happiness with the poor, the under privileged and the less fortunate. I extend my warmest greetings to the people on the auspicious occasion of Diwali.”

0000

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’

मुंबई,दि. 25 : प्रसारभारतीच्या  न्यूज ऑन एअर या ॲपवर  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  विशेष निवडणूक वार्तापत्रदि. 26 ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७. ४० या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आकाशवाणीवरील’दिलखुलासकार्यक्रमात विशेष निवडणूक वार्तापत्रशनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते   ७. ४० या  वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ‍नाशिक, जळगाव, कोल्हापूर,परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या २२ आकाशवाणीकेंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.

मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार

मुंबई, दि. 25 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.

लोकशाही बळकटीकरणासाठी2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क – श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली – 110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/25.10.2019

000000

माध्यम संस्थाओं को मतदाता जनजागरण के लिए

निर्वाचन आयोग की ओर से मिलेगा पुरस्कार

मुंबई, दि. 25 : लोकशाही के राष्ट्रीय उत्सव रहे चुनाव में मतदाताओं ने सक्रिय सहभागिता दर्ज करने के लिए जनजागरण करनेवाले प्रसार माध्यम संस्थाओं को प्रथमत: ही राष्ट्रीय पुरस्कार से भारत निर्वाचन आयोग की ओर से सम्मानित किया जाएगा। भारत निर्वाचन आयोग के जरिए मुद्रित माध्यम,  टेलीविज़न, रेडियो और ऑनलाईन (इंटरनेट) /सोशल मीडिया इन चार गुटों में यह पुरस्कार दिया जाएगा।

लोकशाही को मजबूत करने के लिए वर्ष2019 में हो रहे चुनाव में ज्यादा से ज्यादा मतदान हो सके, इसके लिए चुनाव की पूरी प्रक्रिया के संदर्भ में जनजागरण, आम जनों में मतदान  जागृति और मतदाता पंजीयन के लिए विशेष प्रयास करनेवाली प्रसार माध्यम संस्थाओं को 25 जनवरी 2020 को आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम में यह पुरस्कार दिया जाएगा। मतदाता जागृति अभियान, बड़े पैमाने पर विशेष प्रसिद्धी, जनता पर इसका प्रभाव इन सभी निष्कर्षों के आधार पर पुरस्कार का चयन किया जाएगा। इसके लिए माध्यम संस्थाओं ने 31 अक्तूबर 2019 तक आवेदन करने का आवाहन भारत निर्वाचन आयोग के अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण ने किया है।

प्रसार माध्यम अंग्रेजी तथा हिंदी में प्रवेशिका भेज सकते है। अन्य किसी भी भाषा में स्पर्धा के लिए प्रवेशिका भेज सकेंगे। लेकिन इसके साथ अंगेजी भाषा  में अनुवादित की हुई एक प्रत संलग्न करना होगा।  संपर्क है – श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निर्वाचन आयोग,  निर्वाचन सदन, अशोका रोड, नई दिल्ली – 110001, ई-मेल- media.election.eci@gmail.com, तथा diwaneci@yahoo.co.in,  दूरध्वनी क्र. 011-23052133.

००००

Election commission will give award to media organizations for voter awareness

Mumbai, 25 : The “Media organizations that raise awareness about the voters’ active participation in the elections, which are the national celebration of democracy, will be honored by the Election Commission of India for the first time. The awards will be given to four groups – print media, television, radio and online (internet) / social media through the Election Commission of India” informed Pawan Diwan, Under Secretary (Communication) Election Commission of India.

He further stated that the awards would be given at the National Voters Day event on January 25, 2020, to the media organizations that make special efforts for public awareness, voting awareness among the general public and voter registration, to ensure maximum voting in the 2019 elections for the strengthening of democracy. The awards would be chosen based on the criteria for voter awareness campaign, large scale publicity, and influence on the public. The media organizations should apply for this by October 31, 2019.

The media organizations should send applications in English and Hindi. Application for this contest can be sent from any other language. However, the copy translated from English will have to be attached. Contact – Mr. Pawan Diwan, Under Secretary (Communication), Election Commission of India, Election House, Ashoka Road, New Delhi – 110001, Email-media.election.eci@gmail.com, or diwaneci@yahoo.co.in, Telephone no. 011-23052133.

0000

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर

मुंबई, दि. 25 – प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली.

या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठित झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री.सिंह यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत.

राज्यातील निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली.

यावेळी भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अनुज जयपुरीयार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड व अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर हे उपस्थित होते.

**

State Chief Electoral Officer presents List of Elected Assembly Members to Governor

Mumbai Dt.२५ – The State Chief Electoral Officer of Maharashtra Baldev Singh today presented the list of elected members to the Legislative Assembly to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Friday (२५th Oct).

Baldev Singh told the Governor that with the publication of the Notification of the Election Commission of India, the new Maharashtra Legislative Assembly has been constituted. The Notification contains constituency-wise and party-wise list of members elected to the State Legislative Assembly.

The State Chief Electoral Officer apprised the Governor about the efforts taken for the conduct of free and fair elections.

Principal Secretary of the Election Commission of India Anuj Jaipuriyar, Additional Chief Electoral Officer Dilip Shinde, Joint Chief Electoral Officers Shirish Mohod and Anil Valvi were present.

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...