रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 1805

नागपूरचे महापौर संदीप जोशींवरील हल्ल्याची गंभीर दखल; तपास गुन्हे शाखेकडे – मुख्यमंत्री

नागपूर, दि. 18 : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली.

विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री अनिल सोले, रामदास आंबटकर यांनी नियम 289 अन्वये हा विषय मांडला होता. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. या घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्तांना बोलावून माहिती घेतली असून तातडीने कडक सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. तसेच गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. महापौर श्री.जोशी यांच्याकडूनही माहिती घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नागपूरच्या हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष कार्यान्वित

नागपूर, दि. 18 : विदर्भातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मध्यंतरी राष्ट्रपती राजवटीच्या काळात या कक्षाचे कामकाज बंद होते.

इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनपुरे हे या कक्षाचे काम पाहतील. त्यांना सहाय्य करण्यासाठी एक लिपीक देखील देण्यात आला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील व ही समिती त्या रुग्णांना द्यावयाचे अर्थसहाय्य विहित निकषानुसार निश्चित करणार आहे. नागपूरच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून रक्कम देण्यात येईल. संबंधित रुग्णास लगतच्या मागील तीन वर्षात आर्थिक मदत मिळाली असल्यास तो नव्याने अर्थसहाय्य मिळण्यास पात्र असणार नाही. या कक्षाचे कामकाज तात्काळ सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले आहेत.

‘कदाचित अजूनही’ काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली, 18 :  प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनहीया काव्य संग्रहास वर्ष 2019 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला.

साहित्य अकादमीच्या वतीने आज वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची  घोषणा केली. कवयित्री अनुराधा पाटील यांच्या’कदाचित अजूनहीया काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.

कदाचित अजूनहीया काव्यसंग्रहाविषयी…

आपल्या प्रतिभेद्वारे मराठी कवितेवर स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांचा’कदाचित अजूनहीहा पाचवा काव्यसंग्रह आहे. या काव्य संग्रहातील कवितांच्या माध्यमातून त्या संयत विवेकशील सुरात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करतात. या सगळ्या कविता मिळून त्या मानवजातीसाठी एक प्रार्थनाच जणू करीत आहेत. या संग्रहातील कविता स्त्री दु:खाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. या काव्यसंग्रहात राने-वने, झाडे-झुडपे, नद्या-समुद्र-वारे, चंद्र-सूर्य असा निसर्ग मोठ्या प्रमाणावर येतो. या सर्व कविता ग्रामीण संस्कृती, शेती संस्कृती आणि एतद्देशीय पंरपरेशी घट्ट नाते सांगणाऱ्या आहेत. बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण या काव्यसंग्रहात असून गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगोऱ्यांचे तटस्थ दर्शनही घडते. मुंबई येथील शब्द प्रकाशनाने कदाचित अजूनहीहा 128 पृष्ठांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.

अनुराधा पाटील गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने कविता लिहत आल्या असून‘दिगंत’,  ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळहे त्यांचे  प्रसिद्ध काव्य संग्रह आहेत.

या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी  25 फेब्रुवारी 2020 रोजी हा पुरस्कार प्रदान  करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आसाराम लोमटेलक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत  यांचा समावेश होता.

000000

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.270/  दिनांक 18.12.2019

गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत बैठक

नागपूर, दि. 18 : गोवारी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याबाबत संशोधन व सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई (टिस) चा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शासनाला प्राप्त व्हावा यासाठी प्रशासनाने सकारात्मकतेने कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले.

विधानभवनात अध्यक्ष श्री.पटोले यांच्या उपस्थितीत आदिवासी गोवारी जमातीच्या अनुसूचित जमातीच्या संविधानिक हक्क, अधिकारांच्या मागण्यांबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे येथील अधिकारी, आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोवारी समाजातील शालेय विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र दिली जात आहे, मात्र राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या सवलती गोवारी समाजाला मिळाव्यात अशी मागणी आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली असता याबाबत शासन सकारात्मक असल्याचे श्री.पटोले म्हणाले.

००००

पवन राठोड/विसंअ/18.12.19

खारपाण पट्टा क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

अकोला जिल्हा आढावा बैठक

नागपूर, दि.18 : अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खारपाण पट्ट्यातील गावांमध्ये नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी एकत्रित आढावा घेऊन स्वतंत्र धोरण तयार करा,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज अकोला जिल्ह्याचा आढावा घेतला.

या बैठकीस आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. विप्लव बाजोरिया, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव अजोय मेहता,अपर मुख्य सचिव (महसूल) मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (गृह) संजयकुमार, अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव  डॉ. संजय चहांदे, मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त पियुष सिंह तसेच अकोल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी लोणकर यांनी  विविध मुद्देनिहाय जिल्ह्यातील माहिती सादर केली. त्यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी चर्चा करताना आपले म्हणणे मांडले.

आ. गोपिकिशन बाजोरिया यांनी जिल्ह्यातील पूर्णा बॅरेजसह विविध बॅरेजेस पूर्ण करुन जिल्ह्यात सिंचन सुविधांचे जाळे निर्माण करण्याची मागणी मांडली. तसेच गुंठेवारीमुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची कामे होण्याची अडचण मांडली.

आ. नितीन देशमुख यांनी  बाळापूर येथे पुनरुत्थान योजनेअंतर्गत पूर्ण बांधकाम झालेल्या व अद्यापही रिकामे असलेल्या दोन हजार घरकुलांचा, बंद पडलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या कामांचा तसेच सिंचन विहिरी अनुदान, पिक विमा अनुदानखारपाण पट्ट्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला.

आ. रणधीर सावरकर यांनी जिल्ह्यातील गुंठेवारी पट्ट्यांचे नियमानुकूलन करणे व त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची निर्मिती होऊ शकत नसल्याबद्दलचा मुद्दा मांडला, तसेच अकोला शहरात टॅगिंग न करताही शौचालयांचे अनुदान वितरण करण्याचा प्रकारही निदर्शनास आणून दिला.

आ. गोवर्धन शर्मा यांनी अकोला शहरासाठी  सांस्कृतिक भवन उभारणीसाठी निधीची मागणी करण्यासोबतच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील यंत्रसामुग्री खरेदी व कर्मचारी पदभरतीबाबतच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले.

आ. भारसाकळे यांनी अकोट शहरासाठी रुग्णालय, रस्ते विकास आदी सुविधांसाठी निधीची व  ताजनापूर प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी केली. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी खारपाण पट्ट्यातील गावांसाठी  पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्याच्या आढाव्याची ही पहिलीच बैठक आहे. अशाच बैठका आपण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात घेणार आहोत. त्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना सहभागी केले जाईल. अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा तात्काळ सोडविणे आवश्यक आहे. हा प्रश्न एकट्या अकोला जिल्ह्यापुरता मर्यादित नसून त्यात लगतच्या अमरावती, बुलढाणा या अन्य जिल्ह्यांनाही  ही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या सर्वच गावांसाठी एकत्रित पाणीपुरवठा धोरण आखण्याची गरज आहे. त्यादृष्टीने स्वतंत्र धोरण आखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावित, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच या विषयावर मंत्रालयात स्वतंत्र बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. पातुर तालुक्यात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बंद पडलेली कामे पुन्हा सुरु करुन तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्याच्या सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पूर्णा बॅरेजचे काम मार्गी लावण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालणार असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मार्ग काढावा,असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या बांधकामासाठी गुंठेवारी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा राज्यस्तरीय आढावा घेऊन समान अडचणी दूर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. बाळापूर येथील बांधकाम पुर्ण झालेले घरे लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्याआधी घरांचा दर्जा तपासून घ्या. विहिरींच्या अनुदानासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  पिक विमा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प याबाबतही मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रश्नांबाबत वेळोवेळी अवगत करावे,अशी सूचनाही त्यांनी केली.

0000

Akola District Review Meeting

Prepare separate water supply policy for saline water area

– CM Uddhav Thackeray

Nagpur, Dec 18: Chief Minister Uddhav Thackeray today directed the officers to prepare a separate water supply policy for providing potable water to citizens living in villages falling under the saline water belt in Akola, Amravati and Buldana districts.

       On the sidelines of ongoing state legislature winter session, the Chief Minister conducted the review of Akola district today. This review meeting was attended by MLAs Gopikishan Bajoria, Prakash Bharsakale, Randhir Sawarkar, and Nitin Deshmukh.

Besides, Chief Secretary Ajoy Mehta, Additioal Principal  Secretary (Revenue) Manukumar Shrivastava, Additional Principal Secretary (Home) Sanjaykumar, Additional Principal Secretary (Servces) Sitaram Kunte, CM’s Principal Secretaty Bhushan Gagrani, Principal Secretary of Water Supply and Sanitation Sanjay Chahande, Secretary Relief and Rehabilation Kishorraje Nimbalkar, Secretary Soil and Water Conservation department Eknath Dable, Divisional Commissioner Piyush Singh, In-charge district collector of Akola Narendra Lonkar, CEO Akola ZP Ayush Prasad, Municipal Commissioner Sanjay Kapadnis, RDC Sanjay Khadse and heads of various departments were present at the review meeting.

In-charge District Collector Lonkar presented the point-wise information and the public representatives expressed their views on those points during the discussion.

 Chief Miinister Thackeray said that this was the first review meeting of the district. We will be conducting similar meetings in each district of the state. The public representatives and administrative officers will be made participants in these meetings.

It is necessary to immediately resolve the issue of potable water supply to people living in saline water belt in Akola district. This issue is not related to Akola alone but also includes areas of Amravati and Buldana districts and other districts too. That is why is has become imperative to formulate a separate integrated policy to provide potable water to all the villages falling under this saline water belt. He directed the officers to take steps to formulate such a policy. He also asked them to convene a separate meeting in the Mantralaya on this issue. The Chief Minister also directed the officers to resume and complete the Kolhapur type bund works in Patur taluka.

Stating that he would be personally looking into the Purna Barrage completion as this is the most important project from irrigation point of view in the district, he directed the officers to find out ways to complete this project at the earliest. He also suggested them to take just decisions to resolve the issue of Gunthewari lands for construction of houses under PMAY and difficulties in PMAY will be removed by taking a state-level review of the scheme, he added.

He asked the officers to examine the quality of houses in Balapur taluka before landing them over to the beneficiaries. The Chief Minister also directed to remove the technical hurdles in providing funds for wells. The Chief Minister also directed the officers to convene meeting to discuss schemes like crop insurance, Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project etc. at Mantralaya level. He suggested the public representatives to intimate him about the issues in their districts from time to time.

0000

अकोला जिला जायजा बैठक

खारापानी पट्टा क्षेत्र के लिए स्वतंत्र जलापूर्ति नीति बनाएँ

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के निर्देश

            नागपूर, दि.18 : अकोला, अमरावती और बुलढाणा जिले के गुजरनेवाले खारापानी (खारपाण) पट्टा क्षेत्र के गांवों के नागरिकों को जल आपूर्ति करने के लिए एकीकृत जायजा लेकर स्वतंत्र नीति बनाने के निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज यहाँ पर दिए।

राज्य विधिमंडल के शीतकालीन अधिवेशन के अवसर पर मुख्यमंत्री ठाकरे ने आज अकोला जिले का जायजा लिया।

इस बैठक में  विधायक गोपिकिशन बाजोरिया, विधायक विप्लव बाजोरिया, विधायक प्रकाश भारसाकळे, विधायक रणधीर सावरकर, विधायक नितीन देशमुख उपस्थित थे। साथ ही इस बैठक में मुख्य सचिव अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (राजस्व) मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (गृह) संजयकुमार, अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे, मुख्यमंत्री के प्रधान सचिव भूषण गगराणी, जलापूर्ति एवं स्वच्छता विभाग के प्रधान सचिव  डॉ. संजय चहांदे, मदद पुनर्वसन विभाग के सचिव किशोरराजे निंबालकर, मृदा एवं जलसंधारण विभाग के सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त पियुष सिंह, अकोला के प्रभारी जिलाधिकारी नरेंद्र लोणकर, अकोला जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिलाधिकारी संजय खडसे एवं विविध विभागप्रमुख उपस्थित थे।

          बैठक में प्रभारी जिलाधिकारी लोणकर ने  विविध मुद्दों पर आधारित जिले की जानकारी प्रस्तुत की। इस पर जिले के जनप्रतिनिधियोंने भी चर्चा के दौरान अपना पक्ष रखा।

          बैठक में मुख्यमंत्री ठाकरे ने कहा कि जिले के जायजा की यह पहली ही बैठक है। इसी तरह बैठक हम राज्यभर में प्रत्येक जिले में लेंगे। उसमें जिले के जनप्रतिनिधि और प्रशासकीय अधिकारी को भी शामिल किया जाएगा। अकोला जिले के खारापानी पट्टे के गांवों के पीने के पानी की समस्या का तत्काल निराकरन करना आवश्यक है। यह समस्या सिर्फ अकोला जिले तक की सीमित नहीं है बल्कि उससे सटे अमरावती, बुलढाणा और अन्य जिलों से यह समस्या जुड़ी हुई है। इसलिए इस क्षेत्र के अंतर्गत आनेवाले सभी गांवों के लिए एकीकृत जलापूर्ति नीति बनाने की आवश्यकता है। इसी के मद्देनजर स्वतंत्र नीति बनाने के लिए प्रशासन ने काम करना चाहिए, इस तरह के निर्देश उन्होंने दिए।

          इसके अलावा इस विषय पर मंत्रालय में भी स्वतंत्र बैठक लिए जाने की सूचना भी उन्होंने इस दौरान दी। पातुर तहसील में कोल्हापुर पद्धति के बांध के बंद पड़े हुए काम भी फिर से शुरू कर उसे तत्काल पूरा करने के निर्देश भी उन्होंने दिए।

जिले की सिंचाई की दृष्टि से महत्त्वपूर्ण ऐसी पूर्णा बैरेज का काम पूरा करने के लिए हम इसपर वैयक्तिक रूप से ध्यान देंगे और यह प्रकल्प जल्द से जल्द पूरा करने के लिए अधिकारियों ने भी इस पर हल निकालने के  निर्देश मुख्यमंत्री ठाकरे ने दिए।

जिले के प्रधानमंत्री आवास योजना के मकानों के निर्माणकार्य के लिए (गुंठेवारी) जगह की समस्या का निराकरन के लिए योग्य निर्णय लेने की भी सूचना उन्होंने इस दौरान दी। साथ ही कहा कि प्रधानमंत्री आवास योजना का  राज्यस्तरीय जायजा लेकर समान समस्याओं का निराकरन किया जाएगा।

 उन्होंने कहा कि बालापुर स्थित बांधकाम का काम पूरा हुआ ऐसे मकान लाभार्थियों को हस्तांतरित करने के पहले मकानों की गुणवत्ता जांच ले। कुओं के अनुदान के लिए निधि उपलब्ध कराने  को लेकर तकनीकी समस्याएँ दूर करने के निर्देश भी उन्होंने दिए। पीक विमा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प इस पर भी मंत्रालय स्तर पर बैठक लेने के निर्देश मुख्यमंत्री ठाकरे ने दिए। जिले के जनप्रतिनिधियों ने समय-समय पर जिले की समस्याओं के बारे में रूबरू कराने की सूचना भी इस उन्होंने इस दौरान की।

००००

जिल्हा नियोजन समितीचे कामकाज आय-पास संगणकीय प्रणालीद्वारे होणार

योजनांची मान्यता, निधी वितरणाची माहिती मिळणार ‘एका क्लिकवर’

मुंबई, दि. 18 : जिल्हा नियोजन समितीकडील कामकाज अधिक जलद, पारदर्शक व लोकाभिमुख होण्यासाठी दिनांक 1 एप्रिल 2020 पासून इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टिम (आय-पास) या संगणकीय प्रणालीद्वारे कामकाज सुरु होणार आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आज सांगितले. 

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आय-पास प्रणालीसंदर्भात प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रणालीमुळे नियोजन विभागाचे कामकाज ‘पेपरलेस’ होणार असून त्यासाठी सर्व  संबंधित विभागांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 1 जानेवारी 2020 पासून सर्व विभागांनी आपले प्रस्ताव आय-पास प्रणालीद्वारेच जिल्हा नियोजन समितीकडे सादर करणे बंधनकारक असल्याचे श्री. जोंधळे यांनी  सांगितले.

आय-पास प्रणालीद्वारे नियोजन विभागातील टपालाचे व्यवस्थापन, कामाचे भौगोलिक स्थान, कामाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरावरचे डॅशबोर्ड ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना, आमदार निधी, खासदार निधी, पर्यटन, या सारख्या कामांना, मान्यता, निधी वितरण, सर्वकष नियंत्रण, जीपीएस लोकेशन, कामाची प्रगती आदींचा समावेश राहील. यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही आपल्या प्रस्तावाची सद्यस्थिती एका क्लिकवर कळण्यास मदत होईल.

जनतेकरिता प्रत्येक जिल्ह्यांचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कामे संगणकीकृत होऊन कामकाज सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या कार्यालयातील नियोजन शाखेतील अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण सुरु आहे.

या प्रक्रियेमध्ये जिल्हा नियोजन समितीसोबतच कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नियोजन समितीमार्फत कामांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांनी या प्रणालीबाबत अवगत होऊन  प्रशिक्षण प्राप्त करावे. जिल्हा नियोजन समितीकडील कामकाज अधिक जलद, पारदर्शक व लोकाभिमुख होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी शिवाजी जोंधळे यांनी  केले.

यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमात नियोजन विभागाचे उपायुक्त श्री. बी.एन.सबनीस, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बोरकर आदी अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी शाळा मंगरूळ चव्हाळा या संस्थेस अधिकचे सहकार्य करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर, दि.18 :आदिवासी शाळा मंगरूळ चव्हाळा ता. नांदगाव खंडेकश्वर जिल्हा अमरावती या संस्थेची जमीन समृद्धी महामार्गात गेली असल्याने त्यांना देण्यात आलेली नुकसानभरपाई वाढून मिळावी या विषयावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या संस्थेला त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून51 लाख रु देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली त्यावर बोलताना श्री. पटोले यांनी या शाळेत फासेपारधी समाजाची मुले शिकतात. हा समाज विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर अधिकचे सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले, संस्थेला पर्यायी जमीन व इतर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हा समाज विकासाच्या मुख्य धारेत येण्यासाठी त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न वाढवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. या समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक विषयावरील सद्यस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

घोडाझरी उजव्या कालव्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रकल्प तातडीने पूर्णत्वाला न्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर, दि. 18 : गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उजव्या कालव्याचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची कार्यवाही वेगाने  पूर्ण करून हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वाला न्यावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.

विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे व  इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उजव्या कालव्याच्या बांधकामासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने  भूसंपादन करावयाच्या जमिनीचे मूल्यांकन करून दर निश्चित करून दिले आहेत,  त्यानुसार प्रत्येक मौजामध्ये अस्तित्वात असलेले सरळ खरेदीचे व्यवहार व रेडी रेकनरचे दर यापैकी जे जास्त असतील  ते दर आकारगटाप्रमाणे निश्चित करून दिले आहेत , त्या दरांना जिल्हाधिकारी स्तरावर गठित समितीने मान्यता दिली आहे, या नियमानुसार  भूसंपादन खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत . जर जमीन सुपीक आणि बारमाही ओलिताखाली असेल तर त्यानुसार जमिनीचा आकारगट महसूल विभाग ठरवतो व त्यानुसार दर निश्चित होतो, ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, ऑर्डर पास झाल्या आहेत अशी माहिती बैठकीत देण्यात आली, यात आता प्रभावक्षेत्रातील ज्या गावात भूसंपादनाची प्रक्रिया बाकी आहे, त्या गावात भूसंपादन करताना जमीनधारकांना आवश्यक ते सहकार्य करून हा प्रकल्प  तातडीने पूर्ण करावा, असे श्री. पटोले यांनी यावेळी सांगितले.

००००

राज्यपालांचा गडचिरोलीतील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद

गडचिरोली, दि.18 :  आयुष्यात ध्येय मोठे ठेवा,कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवा. ध्येय मोठे असेल तर यशही मोठेच असणार आहे. आपल्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी जिद्द बाळगा असा दिलखुलास संवाद राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांसोबत साधला.

अहेरी येथील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई पॅटर्नच्या एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आज बोलत होते. राज्यपालांनी या शाळेला भेट दिल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. यावेळी राज्यपालांनी दिलखुलासपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

किरण मोचा या विद्यार्थ्याने राज्यपालांना विचारले की तुमच्या जीवनातील अविस्मरणीय आठवणी कोणत्या?यावर राज्यपालांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय कसा होईल असे काम करण्याचा सल्ला दिला. विपरित परिस्थितीत आपण शिक्षण पूर्ण केल्याचे सांगून ते म्हणाले की,यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुमचे उत्तराखंड आणि गडचिरोली यात आपणाला काय फरक दिसतो,या वेदिका नावाच्या विद्यार्थिनीच्या प्रश्नावर  उत्तर देताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले,आपण कुठेही गेलो तरी आपला भारत दिसतो. हिमालय असो की गडचिरोली,जिथे भारत माता की जय ऐकायला मिळते तिथे मला आपल्या घरातील लोक दिसतात असे त्यांनी सांगितले.  यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे राज्यपालांनी अवलोकन केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून त्यांना प्रत्येक प्रयोगाबाबतची माहिती दिली.राज्यपालांनी या विद्यार्थ्यांना प्रयोगाबाबत प्रश्न विचारले.त्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी दिली.विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी यावेळी कौतुक केले.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार,जिल्हाधिकारी शेखर सिंह,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड,पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा एसडीओ राहुल गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर केले.

ऑटोचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर दि. 18: ऑटोचालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.आज या संदर्भात त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यातआली होती त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस माजी विधानपरिषद सदस्य मोहन जोशी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, कामगार आयुक्त श्री. कल्याणकर यांच्यासह विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर व  सर्व संबंधितअधिकारी उपस्थित होते.

ऑटोरिक्षाचे आयुष्यमान सर्वत्र एकसारखे राहावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता श्री. पटोले यांनी व्यक्त केली तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरणस्नेही वाहने बाजारात येत असून त्यांची आयुष्यमर्यादा अधिकआहे.

वाहनांची वयोमर्यादा लक्षात घेताना ही बाबही विचारात घेतली गेली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ऑटोरिक्षाच्या विम्यासंदर्भात हा विषयविमा विनियामक व विकास प्राधिकरण यांच्याशी संबंधित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. विमा कंपन्यांनी वाहनास जारी केलेला विमा पॉलिसीचा डेटा दैनंदिनरित्या आयआरडीएकडून तपासला जातो.

वहीमाहिती म्हणजे वाहनाचा विमा ऑनलाईन पद्धतीने पाहण्याची सुविधा प्रणालीवर उपलब्ध असल्‍याचे बैठकीत सांगण्यात आले.

खाजगी रिक्षातून होणाऱ्या बेकायदा वाहतुकीस बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. त्यावर राज्यात वायुवेग पथकाद्वारे नियमितपणेअवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीत ऑनलाईन परवाने बंद करणे, शालेय विद्यार्थ्यांची ऑटोरिक्षातून वाहतूक यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

००००

ताज्या बातम्या

‘ई-लायब्ररी’ चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण: वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

0
अमरावती, दि. २६ (जिमाका): अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज  'स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चे अमरावती ल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना...

आरोग्य शिबिरातून मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून...

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय  – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना...

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ - पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी...

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य...

0
सातारा दि.२६ - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी ता. माण या संस्थेचे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे...