दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित; राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0
30

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून विमानतळावरील स्क्रिनिंग सुविधेची पाहणी

मुंबई, दि. 19 : राज्यात आज दिवसभरात तीन  कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 48 झाली आहे. नगर जिल्ह्यातील 51 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी कोरोना निगेटिव्ह आढळली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज आरोग्यमंत्र्यांनी मुंबई विमानतळावर जाऊन तेथे सुरू असलेल्या स्क्रिनिंग सुविधेची पाहणी केली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील पुढीलप्रमाणे :

पिंपरी चिंचवड मनपा – 11

पुणे मनपा – 8

मुंबई – 9

नागपूर – 4        

यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण  प्रत्येकी -3,

अहमदनगर – 2,

रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी – 1       

एकूण – 48       

राज्यात आज 78 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण 1305 प्रवासी आले आहेत.

18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 1036 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 971 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर 48 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 1305 प्रवाशांपैकी 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

आज दुपारी अडीचच्या सुमारास आरोग्यमंत्री टोपे यांनी मुंबई विमानतळावर जाऊन प्रवाशांची होत असलेल्या स्क्रिनिंग सुविधेची पाहणी केली. ही तपासणी कशी केली जाते याची माहिती घेतली. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत त्यांचे कौतुकही केले. इमिग्रेशन अधिकारी तपा भट्टाचार्य, विमानतळ आरोग्य अधिकारी डॉ ए. आर. पसी आदी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/19.3.2020

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here