मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘विधानसभा निवडणूक- २०१९‘ या विशेष वार्तापत्राची निर्मिती केली आहे. हे वार्तापत्र आकाशवाणीवरील ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात दर शनिवारी सकाळी ७.२५ ते ७.४५ या कालावधीत प्रसारित केले जाणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील २२ आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केले जाईल.