शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1598

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 25: राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून

अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले,उपसचिव राजेंद्र तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आदिंनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 0000

CM paid tributes in Vidhan Bhavan

on the death anniversary of Yashwantrao Chavan

Mumbai, date. 25: Speaker of Legislative Assembly Haribhau Bagde and CMDevendra Fadnavis paid their tribute to the first CM of Maharashtra YashvantraoChavan on his death anniversary by offering garland to his statue.

Deputy CM Ajit Pawar, MP Prataprao- Patil Chikhalikar, Legislative Assembly Member Sarvshri Dilip Valse-Patil, Chhagan Bhujbal, Secretary of Legislature (Charge) Rajendra Bhagwat, Deputy Secretary Vilas Athwale, Deputy Secretary Rajendra Tarvi, Secretary of the Chairman Mahendra Kaj, Secretary of the Speaker Rajkumar Sagar paid their tributes through offering flower.

०००

यशवंतराव चव्हाण के स्मृति दिवस

पर मुख्यमंत्री का विधानसभा में अभिवादन

मुंबई, दि. 25: राज्य के पहले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण की पुण्यतिथि के मौके पर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागड़े और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनकी पुर्णाकृती मूर्ति के पास प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया।

इस मौके पर उपमुख्यमंत्री अजीत पवार, सांसद प्रतापराव-पाटिल  चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप  वळसे-पाटिल, छगन भुजबल, विधान सभा सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, उपसचिव राजेंद्र तारवी, सभापति के सचिव महेंद्र काज, अध्यक्ष के सचिव राजकुमार सागर आदि ने पुष्प अर्पण अभिवादन किया।

०००

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव डॉ.नीलिमा केरकेटा यांची मुलाखत

    

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात  महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलिमा केरकेटा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

   

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना व उद्देश, रोजगार निर्मितीसाठी मंडळाच्या विविध योजना व उपक्रम, उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून दिले जाणारे प्रोत्साहन, कारागीर हमी योजना, मधमाशी-प्रजनन, मध उत्पादन योजना, महाबळेश्वर येथे ऑर्गेनिक हनी प्रोजेक्टची अंमलबजावणी, हँड मेड पेपर इन्स्टिट्यूटमार्फत घेतले जाणारे उत्पादन, आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ.केरकेटा यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुलाखत

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 26 आणि बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

   

वन विभागाला मिळालेला अर्थ केअर पुरस्कार, या पुरस्काराचे स्वरूप, पुरस्कारासाठीचे निकष,  वृक्षलागवडीसाठी व्यापक लोकसहभाग, वृक्षलागवडीची लॅण्ड बँक कशाप्रकारे निश्चित करण्यात आली, वृक्षलागवडीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल प्लॅटफॉर्मवर लावलेले रोप नोंदवणे, 50 कोटी वृक्षलागवडीचे फलित आणि भविष्यातील वाटचाल कशा प्रकारची असेल आदी विषयांची माहिती श्री. खारगे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी

नवी दिल्ली, 25 : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या खेलो इंडियाया महत्वाकांक्षी  योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

          

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशात क्रीडा क्षेत्राच्या विकास व प्रोत्साहनासाठी2017 मध्ये खेलो इंडियाही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील 28 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 173  प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 226 कोटी 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत एकूण 580 कोटी 62 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात‘खेलो इंडियायोजनेंतर्गत एकूण 8  प्रकल्पांसाठी 90 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

००००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २५७ /  दिनांक25/11/2019

महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध) अधिनियम राज्यात लागू

तीन वर्षांपर्यंत कारावास,५० हजार रुपये दंड  किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद

मुंबई दि. २५ :  राष्ट्रपती यांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती, प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) करणारा अधिनियम २०१७ संपूर्ण राज्यात ८ नोव्हेंबर २०१९ पासून लागू करण्यात आला आहे.  तो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्याच तारखेला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जो कोणी या अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करेल किंवा करण्याचा प्रयत्न करेल किंवा करण्यास अपप्रेरणा  किंवा चिथावणी देईल  किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे.

दखलपात्र आणि अजामीनपात्र

पोलीस उप अधीक्षक पदाच्या दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखाली अपराधाचा तपास करू शकेल आणि या अधिनियमाखालील केलेला कोणताही अपराध  हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल तो प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून न्यायचौकशी योग्य असेल.

या अधिनियमाखालील केलेल्या कोणत्याही अपराधामध्ये न्यायालयाने दिलेल्या शिक्षेव्यतिरिक्त  मालमत्तेचे नुकसान झाल्यास झालेल्या हानीबद्दल किंवा नुकसानीबद्दल न्यायालयाने निर्धारित केलेली नुकसान भरपाई देण्याचे दायित्व अपराध्यावर असेल व त्याला प्रसारमाध्यमातील व्यक्तीने केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देखील करावी लागेल.

या अधिनियमाखाली अपराध सिद्ध झालेल्या अपराध्याने त्याच्यावर लादलेली नुकसानभरपाई किंवा वैद्यकीय खर्च दिला नाही तर ती रक्कम जमीन महसूलाची थकबाकी होती असे समजून वसूल करण्यात येईल.

अधिनियमातील तरतूदींचा गैरवापर केल्यास

जी कोणी प्रसारमाध्यमातील व्यक्ती या अधिनियमाच्या तरतूदींचा हेतुपुरस्सर गैरवापर करील किंवा दुष्ट प्रयोजनासाठी त्याचा वापर करील  किंवा या अधिनियमाखाली खोटी तक्रार करील अशा व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत कारावास  किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

प्रसारमाध्यमातील व्यक्तीचा अशा पद्धतीने अपराध सिद्ध झाल्यास प्रसारमाध्यमातील व्यक्ती म्हणून ती व्यक्ती कोणतेही शासकीय लाभ मिळवण्यास हक्कदार नसेल, त्याची अधिस्वीकृती पत्रिका कोणतीही असल्यास ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.

विविध संकल्पनांची स्पष्टता

या अधिनियमात  प्रसारमाध्यम संस्थेचा अर्थ स्पष्ट करण्यात आला असून  यात कोणतीही नोंदणीकृत वृत्तपत्र आस्थापना, वृत्तवाहिनी आस्थापना, वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम आस्थापना किंवा वृत्तकेंद्र आस्थापना यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमातील व्यक्ती याचा अर्थ स्पष्ट करताना अधिनियमात म्हटले आहे की, ज्या व्यक्तीचा प्रमुख व्यवसाय पत्रकाराचा असेल आणि जी एक किंवा अधिक प्रसारमाध्यम संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या संबंधात  नियमित किंवा कंत्राटी तत्वावर पत्रकार म्हणून नियुक्त केली गेली असेल अशी व्यक्ती म्हणजे प्रसारमाध्यमातील व्यक्ती होय. यामध्ये संपादक, वृत्तसंपादक, उप संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस, मुद्रितशोधक यांचा समोवश आहे.  व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय नात्याने नेमलेली किंवा पर्यवेक्षकीय नात्याने नेमलेली व तसे कार्ये पार पाडणाऱ्या व्यक्तीचा यात समावेश होणार नाही.

अपराधी कुणाला म्हणायचे

या अधिनियमात वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आस्थापना या सर्व  संकल्पना जशा स्पष्ट करण्यात आल्या आहेत तसेच या अधिनियमाखाली अपराधी कुणाला संबोधायचे याचा अर्थही सांगण्यात आला आहे. या अधिनियमाखाली हिंसाचाराचे कृत्य करील, ते करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा देईल किंवा चिथावणी देईल  किंवा त्यासाठी प्रक्षोभित करील अशी कोणती ही व्यक्ती या अधिनियमाद्वारे अपराधी ठरणार आहे.

या अधिनियमाची निर्दोष पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक असलेल्या इतर संकल्पनांची स्पष्टता यात करण्यात आली आहे जसे की मालमत्ता म्हणजे काय त्याचा अर्थ, हिंसाचार कशास म्हणावयाचे, या सर्व बाबी या अधिनियमात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

वातावरणातील सुधारणा पूर, दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि. 25 : राज्यात वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेल्या पूर व दुष्काळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या वातावरणातील सुधारणा, पूर व दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

बदलत्या वातावरणामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर व्यवस्थापन करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात पुन्हा कोल्हापूर, सांगली, सातारा सारखी पूरपरिस्थिती उद्भवू नये यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

सर्व तांत्रिक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्याचे निर्देश दिले. जागतिक बँक यासाठी 3500 कोटी रुपये खर्च करणार असून पैकी तीनशे पन्नास कोटी हे तांत्रिक सहाय्यतेसाठी असणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात पर्यावरणीय समतोल कायम राखत पाणी वळविण्याच्या कामाचा समावेश आहे. 10 हजार गावांमध्ये वीस लाख शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रकल्पावरही यावेळी चर्चा झाली.

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा मंगळवारी शुभारंभ

मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमे’चा शुभारंभ मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ प्रा. डी.एन. संदानशीव यांचे ‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे

मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिली शपथ

मुंबई दि. 23 : आज देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे 28व्या मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी राजभवन येथे दिली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उज्‍ज्वल भविष्यासाठी दोघेही परिश्रमपूर्वक कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, त्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा वाटचाल सुरू करणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

परिचय

नाव: श्री. देवेंद्र फडणवीस

जन्म दिनांक: २२ जुलै १९७०.

वय: ४९

आई-वडिलांचे नाव: श्रीमती सरिता आणि स्व.श्री गंगाधरराव फडणवीस

पत्नी: श्रीमती अमृता

सुपुत्री: कु. दिविजा

शिक्षण: श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.

परिचय

महाराष्ट्राचे २८वे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.

श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.

देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.

लोक प्रतिनिधित्व

·        २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

·        १९९९ ते आतापर्यंत – सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य

·        १९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

·        २०१३ – अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश

·        २०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश

·        २००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा

·        १९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा

·        १९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा

·        १९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम

·        १९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

सामाजिक योगदान

·        सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन

·        नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्यांबाबत रिसोर्स पर्सन

·        संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य

·        नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष

·        नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष

·        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य

आंतरराष्ट्रीय ठसा

·        १९९९ मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण

·        २००५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स

·        २००६ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण

·        चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण

·        २००७ मध्ये डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व

·        २००८ मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर

·        २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य

·        २०१० मध्ये मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य

·        २०११ मध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग,

·        २०१२ मध्ये मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग

·        २०१२ मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य

पुरस्कार

·        कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन २००२-२००३चा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

·        राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार

·        रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार

·        मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

मुख्यमंत्री कार्यकाळातील परदेश दौरे

–      २१ ते २५ जानेवारी २०१५ आणि २१ ते १५ जानेवारी २०१८- दावोस (स्वित्झर्लंड)- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी.

–      १२ ते १६ एप्रिल २०१५- जर्मनी- हॅनोव्हर मेसी परिषदेसाठी.

–      २६ ते २९ एप्रिल २०१५- इस्राईल

–      १४ ते १८ मे २०१५- चीन

–      २९ जून ते ६ जुलै २०१५ आणि 19 ते 22 सप्टेंबर २०१६- अमेरिका.

–      ८ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१५- जपान

–      १२ ते १६ नोव्हेंबर २०१५- लंडन

–      ९ ते १४ जुलै २०१६- रशिया.

–      २६ ते २९ सप्टेंबर २०१७- दक्षिण कोरिया-सिंगापूर.

–      ११ ते १४ ऑक्टोबर २०१७- स्वीडन- स्वीडन एक्स्पोसाठी.

–           ९ ते १६ जून २०१८- दुबई, कॅनडा, अमेरिका

माहिती संदर्भ – https://www.maharashtra.gov.in/

000

नाव                  : श्री. अजित अनंतराव पवार

जन्म                  : 22 जुलै 1959.

जन्म ठिकाण      : देवळालीप्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.

शिक्षण              : बी. कॉम.

ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी व इंग्रजी

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा

अपत्ये               : एकूण 2 (दोन मुले)

व्यवसाय           : शेती

पक्ष                   : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मतदारसंघ         : 201 बारामती, जिल्हा पुणे.

इतर माहिती       : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्रराज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघः 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा ( कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून ) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा);

ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; 23 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.

(संदर्भ 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

00000

आपत्ती मदत कार्यासाठी हवाई दल सदैव सज्ज – विंग कमांडर ए. श्रीधर

मुंबई,दि.22 :नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे. आपत्ती काळात स्थानिक प्रशासन,राज्य व केंद्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर मदत यंत्रणांबरोबर उत्तम समन्वय,संवाद असणे महत्त्वाचे आहे,असे मत एअर फोर्स स्टेशनचे विंग कमांडर ए. श्रीधर यांनी व्यक्त केले.

सांताक्रूझ येथील हवाई दलाच्या बेस स्टेशनच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनातील मानवी मदत कार्य या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होता.यावेळी  राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक अभय यावलकर,रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी,पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांच्यासह हवाई दल,नौदल,बृहन्मुबई महापालिका,ठाणे महापालिका,कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन कक्ष व केंद्रीय आपत्ती निवारण दल,अग्निशामक दल,आदी विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. श्रीधर म्हणाले की,गेल्या काही काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात  आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी. हवाई दल आपत्ती काळात मदतीसाठी नेहमी सज्ज असून आपत्तीची माहिती मिळाल्यानंतर काही वेळेत मदत पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात आहेत.

आपत्ती काळात संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमांचा योग्य उपयोग करता येईल,असेही त्यांनी सांगितले.

श्री. यावलकर म्हणाले,राज्यातील आपत्ती नियंत्रणासाठी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण  कक्ष24तास कार्यरत आहे. कोणत्याही भागात आपत्ती निर्माण झाली तर तात्काळ मदत कार्य सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यरत आहे.

पूरपरिस्थितीमध्ये लोकांची मागणी आणि विविध दलांना लागणाऱ्या साधन सामुग्रीसाठी केंद्र शासन आणि  विविध दलाच्या प्रमुखांनी तात्काळ मदत केली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी स्क्वॉड्रन लीडर प्रतिक बुऱ्हाणपूर व स्क्वॉड्रन लीडर संदीप पवार यांनी हवाई दलाने वेगवेगळ्या आपत्ती काळात केलेली कामे,या काळात कशा पद्धतीने यंत्रणा राबविण्यात आली या संबंधीचे सादरीकरण केले.

या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस,सांगली-कोल्हापुरातील पूर परिस्थिती आदी काळात हवाईदल,लष्कर,नौदल,कोस्ट गार्ड,  राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ),राज्य आपत्ती निवारण पथक,स्थानिक प्रशासन यांची टीम बचाव कार्यासाठी चोवीस तास कार्य करत होती. त्यावेळेचा अनुभव या कार्यशाळेत सांगितला. 0000

आपदा की स्थिति में मदद कार्य के लिए वायु सेना हमेशा तैयार

विंग कमांडर ए. श्रीधर

मुंबई,दि.22 :नैसर्गिक तथा मानवनिर्मित ऐसे किसी भी प्रकार के आपदा की स्थिति में मदद करने के लिए वायु सेना हमेशा सज्ज है। आपदा के समय स्थानीय प्रशासन,राज्य एवं केंद्रीय आपदा निवारण दल और अन्य मदद यंत्रणा के साथ-साथ उत्तम समन्वय,संवाद होना महत्वपूर्ण है,यह विचार एअर फोर्स स्टेशन के विंग कमांडर ए. श्रीधर ने व्यक्त किए।

सांताक्रूझ स्थित वायु सेना के बेस स्टेशन की ओर से आपदा व्यवस्थापन में मानवी मदद कार्य इस विषय पर कार्यशाला आयोजित की गई थी,इस अवसर पर वे बोल रहे थे।

कार्यशाला में  राज्य आपदा नियंत्रण कक्ष के संचालक अभय यावलकर,रायगड के जिलाधिकारी विजय सूर्यवंशी,पालघर के जिलाधिकारी कैलाश शिंदे समेत वायु सेना,नौसेना,बृहन्मुबई महापालिका,ठाणे महापालिका,कोल्हापुर आपदा व्यवस्थापन कक्ष एवं केंद्रीय आपदा निवारण दल,अग्निशामक दल आदि विविध यंत्रणा के प्रतिनिधि उपस्थित थे।

कार्यशाला में श्री. श्रीधर ने कहा कि पिछले कुछ दिनों में नैसर्गिक आपदा की स्थिति में वृद्धि हुई है। भविष्य  में आपदा की स्थिति का सामना करने के लिए सभी यंत्रणा ने पूर्वतैयारी करना चाहिए। वायु सेना आपदा के समय मदद के लिए हमेशा तैयार है और आपदा की स्थिति में सूचना तथा जानकारी मिलते ही कुछ ही समय में मदद पहुंचाने के लिए हेलिकॉप्टर तैनात है और रहते है।

उन्होंने कहा कि आपदा के समय संवाद साधने के लिए व्हॉट्सॲप जैसे समाजमाध्यमों का योग्य उपयोग किया जा सकता है।

कार्यशाला में श्री. यावलकर ने कहा कि राज्य के आपदा नियंत्रण के लिए मंत्रालय का आपदा नियंत्रण  कक्ष24घंटे कार्यरत है। किसी भी परिसर में आपदा की स्थिति हुई हो,वहाँ पर तत्काल मददकार्य शुरू करने के लिए आवश्यक यंत्रणा कार्यरत है।

बाढ़ की स्थिति में लोगों की मांग और विविध सेना के लिए आवश्यक संसाधन एवं सामग्री के लिए केंद्र सरकार और विविध सेना के प्रमुखों ने तत्काल मदद की,इस पर उन्होंने सभी के प्रति आभार व्यक्त किया।

इस अवसर पर स्कोड्रन लीडर प्रतिक बुऱ्हाणपुर और स्कोड्रन लीडर संदीप पवार ने वायु सेना ने आपदा की स्थिति में जो काम किया है,उन कामों को किस तरह से यंत्रणा कार्यरत रही,इससे संबंधित जानकारी दी।

इस कार्यशाला में ठाणे जिले में बाढ़ के पानी में फंसी महालक्ष्मी एक्सप्रेस,सांगली-कोल्हापुर की स्थिति आदि आपदा के समय वायु सेना,लष्कर,नौदल,कोस्ट गार्ड, राष्ट्रीय आपदा निवारण टीम (एनडीआरएफ),राज्य आपदा निवारण टीम,स्थानीय प्रशासन की टीम बचाव कार्य के लिए चौबीस घंटे कार्यरत थी,उस समय का अनुभव इस कार्यशाला में साझा किया गया।

000

 

Air Force always ready for disaster relief works

– Wing Cmdr A Sridhar

Mumbai, Nov 22: Air Force is always ready to extend help and relief in natural or manmade disaster situations. It is necessary to have better coordination and dialogue with local administration, SDRF and NDRF teams and other relief machineries, observed Air Force Station Wing Cmdr A Sridhar.

He was speaking at the workshop on human relief operations in disaster management organized by the Air Force Base Station at Santacruz. On this occasion State Disaster Control Room Director Abhay Yavalkar, Raigad Colletor Vijay Survanshi, Palghar Collector Kailash Shinde and representatives of Air Force, Navy, BMC, Thane Municipal Corporation, Kolhapur Disaster Management Room, NDRF, Fire Brigade, etc. were present.

Mr Sridhar said that natural disasters have shown a rising trend in last some years. The systems should brace for the future responsibilities. Air Force is always ready for relief and helicopters are kept in ready position so that they can be deployed as soon as the news reaches us.

Social media like WhatsApp can be used for sharing information and dialogue during the disaster time, he said.

Mr Yavalkar said that the Disaster Control Room in the Mantralaya is round the clock ready to deal with natural disasters in the state. The system is ready and active to provide relief in any part of the state.

He thanked the central government and chiefs of various units for providing material and relief during the flood disaster in the state to provide succor to the people.

On this occasion Sqd Ldr Pratik Burhanpur and Sqd Ldr Sandip Pawar made presentation about how the Air Force provided relief and implemented the system during the disaster period at different times.

Experiences of how relief operations during the flood affected Mahalakshmi Express, flood situation in Sangli-Kolhapur etc. were conducted by Air Force, Army, Navy, Coast Guard, NDRF, SDRF, local administration teams. These teams were busy providing relief to the affected people 24 x 7. These experiences were shared at the workshop.

0000

ताज्या बातम्या

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी...

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा दि. 19: कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

0
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,...

सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम

0
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार, 20 एप्रिल,...

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
बीड, दि. 19 :  बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93...