शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1599

संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ

मुंबई, दि. 26 : नागरिकांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करुन संविधानाप्रति व देशाप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधिज्ञ डी.एन. संदानशीव, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले, भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांचा उचित सन्मान व्हावा म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिनम्हणून साजरा केला जातो. राज्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी वर्षभर राबविण्यात येणारी मोहीम ही कौतुकास्पद आहे. नागरिकांनी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपली कर्तव्य बजावावी. भारतीय राज्यघटना जगातील सर्वोत्तम राज्यघटनांपैकी एक असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यात 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या वर्षाच्या कालावधीत‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीमराबविण्यात येणार असून पुढील वर्षभर विविध विभागांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्य या विषयावर विधिज्ज्ञ प्रा.डी.एन. संदानशीव यांचे व्याख्यानही झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर

मुंबई, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला.

श्रीमती वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. या उपचारावरील खर्चासाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. या अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/25.11.2019

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

कैंसर के इलाज के लिए सीएम की तरफ से

1 लाख 20 हज़ार का चेक

मुंबई, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज पदभार संभालने के बाद पहले हस्ताक्षर मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कोष के चेक पर किए और १ लाख २० हज़ार रूपए का चेक दादर की श्रीमती कुसुम किरण  वेंगुर्लेकर को कैंसर के इलाज के लिए सौंपा।

श्रीमती वेंगुर्लेकर का धनवंतरी अस्पताल में कैंसर का इलाज चल रहा है। इस उपचार की लागत के लिए उन्होंने कुछ दिन पहले मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कोष में आवेदन किया था। इस आवेदन पर तत्काल कार्रवाई की गई और आज मुख्यमंत्री के हाथों उन्हें यह चेक को सौंप दिया गया। इस मौके पर प्रमुख सचिव अजोय मेहता, वित्त विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव मनोज  सौनिक, प्रधान सचिव भूषण  गगराणी  सहित अन्य अधिकारी उपस्थित थे।

००००

Chief Minister’s Medical Assistance Cell CM signs

cheque of Rs. 1 lakh and 20 thousand for the cancer treatment

Mumbai, date.25 : CM Devendra Fadnavis took upcharge today and signed the first cheque for Chief Minister’s Medical Assistance. The cheque of Rs. 1 lakh and 20 thousand was given to Smt. Kusum Kiran Vengurlekar, Dadar for her cancer treatment. Smt. Vengurlekar is getting treated for cancer in Dhanvantari hospital.  She had applied for the Chief Minister’s Medical Assistance. The application proceeded immediately and the CM gave her the cheque today.  Chief Secretary Ajoy Mehta, Upper Chief Secretary of Finance Department Manoj Sounik, Principal Secretary Bhushan Gagrani, and other office-bearers were present at that time.

0000

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधीनंतर प्रथमच मंत्रालयात आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, माजी मंत्री अनिल बोंडे, बबनराव लोणीकर, राहुल कुल, मुख्य सचिव अजोय महेता, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, जलसंधारण व कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजय चहांदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   00000

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

राजमाता जिजाऊ को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

की तरफ से अभिवादन

मुंबई, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के शपथ ग्रहण के बाद, वे सबसे पहले मंत्रालय आए। उन्होंने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर और राजमाता जिजाऊ की प्रतिमा को पुष्प अर्पित कर अभिवादन किया।

इस मौके पर केंद्रीय खाद्य और नागरिक आपूर्ति और उपभोक्ता संरक्षण राज्य मंत्री रावसाहेब दानवे, सांसद प्रतापराव-पाटिल चिखलीकर, पूर्व मंत्री अनिल बोंडे, बबनराव लोणिकर, राहुल कुल, मुख्य सचिव अजोय महेता, सामान्य प्रशासन विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त गृह सचिव संजय कुमार, राजस्व विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव भूषण गगराणी, शहरी विकास विभाग के सचिव नितिन करीर,

वन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे, आदिवासी विकास विभाग की प्रधान सचिव मनीषा वर्मा, सिंचाई व कृषि विभाग के सचिव एकनाथ डवले, सहायता व पुनर्वास विभाग के सचिव किशोरराजे निंबालकर, जल आपूर्ति और स्वच्छता विभाग के सचिव संजय चहांदे सहित मंत्रालय के अधिकारी और कर्मचारी उपस्थित थे।

00000

CM Devendra Fadnavis paid tribute to Chhatrapati Shivaji Maharaj, Dr. Babasaheb Ambedkar and Rajmata Jijau

Mumbai, date.25 : CM Devendra Fadnavis paid his tributes to Chhatrapati Shivaji Maharaj,Dr. Babasaheb Ambedkar, and Rajmata Jijau by offering flowers to their photos, entering Mantralaya for the first time after taking oath as the new CM.

State Minister for Central Food, Civil Supply and Consumer Protection Department Ravsaheb Danve, Former minister Anil Bonde, Babanrao Lonikar, Rahul Kul, Chief Secretary Ajoy Mehta, Upper Secretary of General Administration Department Sitaram Kunte,Upper Chief Secretary of Home Department Sanjay Kumar, Upper Chief Secretary of Revenue Department Manukumar Srivastav, Principal Secretary Bhushan Gagrani,  Secretary of Urban Development Department Nitin Karir, Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Principal Secretary of Tribal Development Department Manisha Verma, Secretaryof Water Irrigation and Agriculture Department Eknath Davle, Secretary of Relief and Rehabilitation Department Kishorraje Nimbalkar,  Secretary of Water Supply and Sanitation Department Sanjay Chahande, other officer-bearers and employees were presentat that time.

0000

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 25: राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून

अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार प्रतापराव- पाटील चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले,उपसचिव राजेंद्र तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आदिंनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 0000

CM paid tributes in Vidhan Bhavan

on the death anniversary of Yashwantrao Chavan

Mumbai, date. 25: Speaker of Legislative Assembly Haribhau Bagde and CMDevendra Fadnavis paid their tribute to the first CM of Maharashtra YashvantraoChavan on his death anniversary by offering garland to his statue.

Deputy CM Ajit Pawar, MP Prataprao- Patil Chikhalikar, Legislative Assembly Member Sarvshri Dilip Valse-Patil, Chhagan Bhujbal, Secretary of Legislature (Charge) Rajendra Bhagwat, Deputy Secretary Vilas Athwale, Deputy Secretary Rajendra Tarvi, Secretary of the Chairman Mahendra Kaj, Secretary of the Speaker Rajkumar Sagar paid their tributes through offering flower.

०००

यशवंतराव चव्हाण के स्मृति दिवस

पर मुख्यमंत्री का विधानसभा में अभिवादन

मुंबई, दि. 25: राज्य के पहले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण की पुण्यतिथि के मौके पर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागड़े और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनकी पुर्णाकृती मूर्ति के पास प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया।

इस मौके पर उपमुख्यमंत्री अजीत पवार, सांसद प्रतापराव-पाटिल  चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप  वळसे-पाटिल, छगन भुजबल, विधान सभा सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, उपसचिव राजेंद्र तारवी, सभापति के सचिव महेंद्र काज, अध्यक्ष के सचिव राजकुमार सागर आदि ने पुष्प अर्पण अभिवादन किया।

०००

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव डॉ.नीलिमा केरकेटा यांची मुलाखत

    

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात  महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलिमा केरकेटा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

   

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना व उद्देश, रोजगार निर्मितीसाठी मंडळाच्या विविध योजना व उपक्रम, उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून दिले जाणारे प्रोत्साहन, कारागीर हमी योजना, मधमाशी-प्रजनन, मध उत्पादन योजना, महाबळेश्वर येथे ऑर्गेनिक हनी प्रोजेक्टची अंमलबजावणी, हँड मेड पेपर इन्स्टिट्यूटमार्फत घेतले जाणारे उत्पादन, आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ.केरकेटा यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुलाखत

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. 26 आणि बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

   

वन विभागाला मिळालेला अर्थ केअर पुरस्कार, या पुरस्काराचे स्वरूप, पुरस्कारासाठीचे निकष,  वृक्षलागवडीसाठी व्यापक लोकसहभाग, वृक्षलागवडीची लॅण्ड बँक कशाप्रकारे निश्चित करण्यात आली, वृक्षलागवडीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल प्लॅटफॉर्मवर लावलेले रोप नोंदवणे, 50 कोटी वृक्षलागवडीचे फलित आणि भविष्यातील वाटचाल कशा प्रकारची असेल आदी विषयांची माहिती श्री. खारगे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी

नवी दिल्ली, 25 : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या खेलो इंडियाया महत्वाकांक्षी  योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

          

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशात क्रीडा क्षेत्राच्या विकास व प्रोत्साहनासाठी2017 मध्ये खेलो इंडियाही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील 28 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 173  प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 226 कोटी 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत एकूण 580 कोटी 62 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात‘खेलो इंडियायोजनेंतर्गत एकूण 8  प्रकल्पांसाठी 90 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

००००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २५७ /  दिनांक25/11/2019

महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेचे नुकसान किंवा हानी प्रतिबंध) अधिनियम राज्यात लागू

तीन वर्षांपर्यंत कारावास,५० हजार रुपये दंड  किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद

मुंबई दि. २५ :  राष्ट्रपती यांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती, प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) करणारा अधिनियम २०१७ संपूर्ण राज्यात ८ नोव्हेंबर २०१९ पासून लागू करण्यात आला आहे.  तो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्याच तारखेला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जो कोणी या अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करेल किंवा करण्याचा प्रयत्न करेल किंवा करण्यास अपप्रेरणा  किंवा चिथावणी देईल  किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे.

दखलपात्र आणि अजामीनपात्र

पोलीस उप अधीक्षक पदाच्या दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखाली अपराधाचा तपास करू शकेल आणि या अधिनियमाखालील केलेला कोणताही अपराध  हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल तो प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून न्यायचौकशी योग्य असेल.

या अधिनियमाखालील केलेल्या कोणत्याही अपराधामध्ये न्यायालयाने दिलेल्या शिक्षेव्यतिरिक्त  मालमत्तेचे नुकसान झाल्यास झालेल्या हानीबद्दल किंवा नुकसानीबद्दल न्यायालयाने निर्धारित केलेली नुकसान भरपाई देण्याचे दायित्व अपराध्यावर असेल व त्याला प्रसारमाध्यमातील व्यक्तीने केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देखील करावी लागेल.

या अधिनियमाखाली अपराध सिद्ध झालेल्या अपराध्याने त्याच्यावर लादलेली नुकसानभरपाई किंवा वैद्यकीय खर्च दिला नाही तर ती रक्कम जमीन महसूलाची थकबाकी होती असे समजून वसूल करण्यात येईल.

अधिनियमातील तरतूदींचा गैरवापर केल्यास

जी कोणी प्रसारमाध्यमातील व्यक्ती या अधिनियमाच्या तरतूदींचा हेतुपुरस्सर गैरवापर करील किंवा दुष्ट प्रयोजनासाठी त्याचा वापर करील  किंवा या अधिनियमाखाली खोटी तक्रार करील अशा व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत कारावास  किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

प्रसारमाध्यमातील व्यक्तीचा अशा पद्धतीने अपराध सिद्ध झाल्यास प्रसारमाध्यमातील व्यक्ती म्हणून ती व्यक्ती कोणतेही शासकीय लाभ मिळवण्यास हक्कदार नसेल, त्याची अधिस्वीकृती पत्रिका कोणतीही असल्यास ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.

विविध संकल्पनांची स्पष्टता

या अधिनियमात  प्रसारमाध्यम संस्थेचा अर्थ स्पष्ट करण्यात आला असून  यात कोणतीही नोंदणीकृत वृत्तपत्र आस्थापना, वृत्तवाहिनी आस्थापना, वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम आस्थापना किंवा वृत्तकेंद्र आस्थापना यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमातील व्यक्ती याचा अर्थ स्पष्ट करताना अधिनियमात म्हटले आहे की, ज्या व्यक्तीचा प्रमुख व्यवसाय पत्रकाराचा असेल आणि जी एक किंवा अधिक प्रसारमाध्यम संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या संबंधात  नियमित किंवा कंत्राटी तत्वावर पत्रकार म्हणून नियुक्त केली गेली असेल अशी व्यक्ती म्हणजे प्रसारमाध्यमातील व्यक्ती होय. यामध्ये संपादक, वृत्तसंपादक, उप संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस, मुद्रितशोधक यांचा समोवश आहे.  व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय नात्याने नेमलेली किंवा पर्यवेक्षकीय नात्याने नेमलेली व तसे कार्ये पार पाडणाऱ्या व्यक्तीचा यात समावेश होणार नाही.

अपराधी कुणाला म्हणायचे

या अधिनियमात वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आस्थापना या सर्व  संकल्पना जशा स्पष्ट करण्यात आल्या आहेत तसेच या अधिनियमाखाली अपराधी कुणाला संबोधायचे याचा अर्थही सांगण्यात आला आहे. या अधिनियमाखाली हिंसाचाराचे कृत्य करील, ते करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा देईल किंवा चिथावणी देईल  किंवा त्यासाठी प्रक्षोभित करील अशी कोणती ही व्यक्ती या अधिनियमाद्वारे अपराधी ठरणार आहे.

या अधिनियमाची निर्दोष पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक असलेल्या इतर संकल्पनांची स्पष्टता यात करण्यात आली आहे जसे की मालमत्ता म्हणजे काय त्याचा अर्थ, हिंसाचार कशास म्हणावयाचे, या सर्व बाबी या अधिनियमात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

वातावरणातील सुधारणा पूर, दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

मुंबई, दि. 25 : राज्यात वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेल्या पूर व दुष्काळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या वातावरणातील सुधारणा, पूर व दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

बदलत्या वातावरणामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर व्यवस्थापन करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात पुन्हा कोल्हापूर, सांगली, सातारा सारखी पूरपरिस्थिती उद्भवू नये यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

सर्व तांत्रिक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्याचे निर्देश दिले. जागतिक बँक यासाठी 3500 कोटी रुपये खर्च करणार असून पैकी तीनशे पन्नास कोटी हे तांत्रिक सहाय्यतेसाठी असणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात पर्यावरणीय समतोल कायम राखत पाणी वळविण्याच्या कामाचा समावेश आहे. 10 हजार गावांमध्ये वीस लाख शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रकल्पावरही यावेळी चर्चा झाली.

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा मंगळवारी शुभारंभ

मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमे’चा शुभारंभ मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ प्रा. डी.एन. संदानशीव यांचे ‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...