रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1602

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई, दि. 20 : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

आवास दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री.कोश्यारी बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य घरकुल योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्राम विकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशातील गरीब, मजूर यांच्यासाठी गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबविल्या. ज्यांच्याकडे बँक खाते नाही, अशा देशभरातील सुमारे 30 कोटीहून अधिक नागरिकांचे बँकेत खाते उघडून दिले. प्रत्येक घरात शौचालय पोहोचविण्याचे काम या काळात झाले. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीज व विद्युत दिवे पोहोचविण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. वीज पोहोचू न शकणाऱ्या दुर्गम भागातही सौरऊर्जेद्वारे घरांमध्ये प्रकाश निर्माण करण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न केले.

प्रत्येक घरात शौचालय योजनेप्रमाणेच सन 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याची योजना शासन सुरू करणार आहे. ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

          

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, राज्यात गेल्या तीन वर्षात 4.50 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 3.66 लाख घरे बांधण्यात आली असून आदिवासी विभागामार्फतही विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली आहे.

मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले, ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही, त्यांनाच घराचे महत्त्व कळते. मुंबईमध्ये घरांची निर्मिती हे मोठे आव्हान आहे. घर हे विकासाचे केंद्रबिंदू असते. घरामुळे स्वच्छता वाढते, कुटुंबांचे आरोग्य सुधारते व त्या कुटुंबातील शैक्षणिक दर्जाही सुधारतो. त्याचबरोबर स्वतःच्या घरामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होते. घर निर्मिती क्षेत्रामुळे रोजगार संधीही वाढतात. त्यामुळे घरांच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. घर निर्मितीसाठी जमिनीची उपलब्धता करून देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरांच्या बांधकामासाठी वित्त पुरविण्यासाठी बँकांनाही सांगण्यात आले आहे.

संचालक श्री. माळी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, राज्य व्यवस्थापन कक्षाच्या वतीने ग्रामीण भागात घरांच्या निर्मितीसाठी मोठ्या वेगाने कामे सुरू आहेत. जमिनी नसलेल्या लाभार्थ्यांना जमिनी देण्यासाठीही पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून मदत करण्यात येत आहे. तसेच शासकीय जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र शासनाच्या आवास प्लस योजनेनुसार केलेल्या सर्व्हेनंतर आणखी 57 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी, सरपंच, लाभार्थी यांचा राज्यपाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राज्य व्यवस्थापन कक्षातील उपव्यवस्थापक मंजिरी टकले यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/20.11.2019

मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित

मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार व शस्त्रक्रियेकरिता आर्थिक सहाय्य देण्याबाबत ही यंत्रणा कार्य करेल. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.

सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार (ESIS Hospital Compound), गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई ४०००१८, दुरध्वनी ०२२-२४९९९२०३/०४/०५ याठिकाणी गरजूंनी आपले अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट ५८१ समान उपचार पद्धती वगळून उर्वरित आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याबाबत अर्जांची छाननी करतील. आवश्यक कागदपत्रे व पात्रता तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र अर्जांची शिफारस करेल. शिफारसपात्र अर्जानुषंगाने निधी वाटपाबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या समितीच्या सदस्यांकडून निर्णय घेण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

अर्जाची छाननी करण्याची कार्यवाही करण्याकरिता लागणारा अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी करावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अर्जांची स्वीकृती, छाननी इत्यादी कार्यवाही करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

दरम्यान, काल निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या एका आदेशान्वये या यंत्रणेसाठी मंत्रालयीन संवर्गातील ४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा देण्यात आल्या आहेत.  एक उपसचिव, एक कक्ष अधिकारी, एक सहायक कक्ष अधिकारी व एक लिपीक टंकलेखक यांच्या सेवा या कामासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. इतर अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी करावी, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात आदेशित करण्यात आले आहे.

०००००

इर्शाद बागवान / विसंअ / दि. २० नोव्हेंबर २०१९

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 19 : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, मुख्य सचिव कार्यालयाचे  सहसचिव राजेश निवतकर, उपसचिव ज. जी. वळवी यांनी देखील माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून यावेळी, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व कधीही हिंसाचार अवलंबणार नाही. तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ०००००

पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी की जयंती पर

मंत्रालय में अभिवादन

मुंबई, दि. 19 : पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी की जयंती के अवसर पर, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे ने आज मंत्रालय में स्वर्गीय इंदिरा गांधी की प्रतिमा को पुष्पांजलि अर्पित कर अभिवादन किया।

इस अवसर पर, वन विभाग के प्रधान सचिव, विकास खारगे, सामान्य प्रशासन विभाग के सचिव, अंशु सिन्हा, मुख्य सचिव कार्यालय के सहायक सचिव, राजेश  निवतकर , उप सचिव ज.  वळवी  ने पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी की प्रतिमा को गुलाब का गुलदस्ता अर्पण कर अभिवादन किया।

इस दौरान राष्ट्रीय एकता दिवस के रूप में, देश की स्वतंत्रता और राष्ट्रीय एकता को बनाए रखने और मजबूत करने के लिए  निष्ठापूर्वक  कार्य करने व कभी भी हिंसा को बर्दाश्त नहीं किया जाएगा। इसी प्रकार सभी धार्मिक, भाषाई या क्षेत्रीय मतभेद और विवादों या अन्य राजनीतिक या आर्थिक मुद्दों को शांतिपूर्ण और संवैधानिक तरीके से सुलझाने के प्रयासों को जारी रखने की शपथ ली गई। इस दौरान मंत्रालय के अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे।

००००

 

Tribute paid in Mantralaya on the birth anniversary of

former Prime Minister Indira Gandhi

Mumbai, date. 19: Upper Chief Secretary Sitaram Kute offered a garland to the photo of former Prime Minister Indira Gandhi and paid tribute on her birth anniversary.

Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Secretary of General Administration Department Anshu Sinha, Assistant Secretary of Chief Secretary Office Rajesh Nivatkar, Deputy Secretary J. G. Valvi also paid their tributes to former Prime Minister Indira Gandhi by offering rose flower to the photo.

On the National Unity Day, oath was taken preserve freedom of the country and national unity, to work to strengthen it, not to do violence, to solve all religious, lingual or regional and other political or economic disputes by the peaceful and constitutional way. Office-bearers and employees of Mantralaya were present in a large number on the occasion.

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव डॉ. निलीमा केरकट्टा यांची मुलाखत

मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलीमा केरकट्टा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 20 आणि गुरुवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना व उद्देश, रोजगार निर्मितीसाठी मंडळाच्या विविध योजना व उपक्रम, उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून दिले जाणारे प्रोत्साहन, कारागीर हमी योजना,  मधमाशी-प्रजनन, मध उत्पादन योजना,  महाबळेश्वर येथे ऑर्गेनिक हनी प्रोजेक्टची अंमलबजावणी,  हँड मेड पेपर इन्स्टिट्यूट मार्फत घेतले जाणारे उत्पादन, आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. केरकट्टा यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर

अहमदनगर,पुणे,औरंगाबादसह8जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी

मुंबई,दि.19 :राज्यातील सर्व34जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.

ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील,ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागास वर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रविंद्र गुरव,औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर,चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते.

प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961मधील तरतुदीनुसार विविध प्रवर्गासाठीच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. आरक्षण काढताना2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.

विविध प्रवर्ग आणि त्यासाठी अध्यक्षपद आरक्षित झालेल्या जिल्हा परिषदा पुढीलप्रमाणे आहेत.

·         अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर,जालना

·         अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद

·         अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदूरबार,हिंगोली

·         अनुसूचित जमाती (महिला) : पालघर,रायगड,नांदेड

·         नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर,कोल्हापूर,वाशिम,अमरावती

·         नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे,सिंधुदुर्ग,सांगली,वर्धा,बीड

·         खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी,नाशिक,धुळे,गडचिरोली,गोंदिया,सातारा,अकोला,भंडारा

·         खुला (महिला) : जळगाव,अहमदनगर,पुणे,औरंगाबाद,परभणी,बुलडाणा,यवतमाळ,चंद्रपूर

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.19.11.2019 ००००

Draw declared for 34 ZP Chairman Seats

Eight ZP Chairman Seats including

Ahmednagar, Pune, and Aurangabad

reserved for women from open category

Mumbai, date.19th: Draws were declared for 34 ZP Chairman Seats in the State under the presidency of Sanjay Kumar, Upper Chief Secretary of Home Department.

Principal Secretary of Rural Development Asim Gupta, President of Maharashtra State Handlooms Corporation Prakash Patil, Assistant Secretary of Law and Judiciary Department D. S. Patil, Deputy Secretary of Rural Development Department R. A. Nagargoje, Deputy Secretary of Vimukta Jati, Nomadic Tribes, Other Backward Class and Special Backward Class Welfare Ravindra Gurav, ZP Chairman of Aurangabad Devyani Dongaonkar, Chandrapur ZP Chairman Devrao Bhongale, Thane ZP Chairman Deepali Patole, members of other ZPs and representatives of political parties were present that time.

Rules of reservation draw were explained in the beginning.  Reservation draws were selected for various categories as per rules decided in  The Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 196. Census 2011 was taken into account while completing draw process.  While declaring draws for SC and St, category wise draw in respective district’s descending population was done.  Chits for women reservation were taken out after deciding category reservation.

Various categories and Reserved ZP Chairman seats as following:

·      SC (General): Solapur, Jalna

·      SC (Women): Nagpur, Osmanabad

·      ST (General): Nandurbar, Hingoli

·      ST (Women): Palghar, Raigad, Nanded

·      Citizen Backward Category (General): Latur, Kolhapur, Washim, Amravati  Citizen Backward Category (Women): Thane, Sindhudurg, Sangli, Wardha, Beed

·      Open (General): Ratnagiri, Nashik, Dhule, Gadchiroli, Gondia, Satara, Akola, Bhandara

·      Open (Women): Jalgaon, Ahmednagar, Pune, Aurangabad, Parbhani, Buldhana, Yavatmal,   Chandrapur

0000

‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेअंतर्गत उद्या सिडनहॅम इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षणाचे आयोजन

मुंबई, दि. 19 : ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसारजागो ग्राहक जागो या मोहिमेअंतर्गत संबंधित अधिकारी, कर्मचारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना प्रशिक्षण देण्याबाबत तसेच ग्राहक चळवळीच्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळण्यासाठी व अत्याधुनिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे प्रशिक्षण दि.20 नोव्हेंबर 2019 रोजी सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 3 रा मजला, बी रोड, लॉ कॉलेजच्या मागे, चर्चगेट, मुंबई येथे सकाळी 9.00 ते सायं 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार राज्य जिल्हा ग्राहक मंचाचे कामकाज, न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये  ग्राहकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण, रेरा कायदा इ. अन्न सुरक्षा कायदा, ई पॉस मशिनबाबत माहिती, थेट विक्री करणाऱ्या कंपनीचे कामकाज त्यांच्याविरुद्ध येणाऱ्या तक्रारींचे निराकरण याबाबत माहिती तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य व यंत्रणेचे संगणकीकरण याबाबतची माहिती तसेच वस्तू व सेवा खरेदीमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक व त्याचे निराकरण, ग्राहकांचे विविध हक्क उदा. सुरक्षिततेचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारण, माहिती मिळविण्याचा हक्क इ. तसेच शेतकरी, प्रवासी,वीज ग्राहकांच्या तक्रारी, त्यांचे निवारण व उपाय इत्यादी विषयांवर संबंधित क्षेत्रातील अधिकारी, मान्यवरांमार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यात येणार आहेत.

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई, दि. 19 : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे उपसचिव रणजित कुमार यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

          

राज्यपालांचे अवर सचिव (प्रशासन) रमेश डिसोझा यांच्यासह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी  तसेच राज्य राखीव दलाचे जवान यांनी यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. दरवर्षी दिनांक १९नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. ०००००

Former PM Indira Gandhi remembered on Birth Anniversary

National Integration Pledge given to Raj Bhavan staff

Mumbai, 19th Nov : The102th birth anniversary of former Prime Minister of India Indira Gandhi was observed today at Raj Bhavan, Mumbai as National Integration Day.

Deputy Secretary to the Governor Ranjit Kumar offered floral tributes to the photograph of late Indira Gandhi and gave the ‘National Integration Pledge’ to the staff and officers of Raj Bhavan and to the police personnel and the Public Works staff posted at Raj Bhavan.

Under secretary(Administration) to the Governor  Ramesh Desouza and other senior officers were present on the occasion.

0000

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठीचा शासन निर्णय निर्गमित

शेती पिकासाठी8 हजार तर फळबागासाठी 18 हजार प्रती हेक्टर मदत

मुंबई, दि. 19 : ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रिवादळामुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शेतीपिकासाठी प्रती हेक्टर 8 हजार आणि फळबागासाठी 18 हजार, दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  

याशिवाय जमीन महसुलात सूट आणि शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

तसेच शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा झालेल्या रक्कमेतून बॅंकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेश संबंधित बँकांना देण्यात आले आहेत.

याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यांचा संकेतांक 201911191100094919 असा आहे. सदर शासन निर्णयwww.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

००००

काशिबाई थोरात/वि.सं.अ./19.11.19

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनी केले ‘लोकराज्य’चे सामूहिक वाचन

उस्मानाबाद:- “एकाच दिवशी एकाच वेळी”ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये दिनांक14नोव्हेंबर2019रोजी सकाळी10:30ते11:00या वेळेत शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकातील पंडित नेहरू यांच्यावरील लेखाचे सामूहिक वाचन हा उपक्रम राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.त्यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये लोकराज्यचे सामूहिक वाचन संपन्न झाले.जवळपास1हजार885शाळा-महाविद्यालयातील जवळपास10हजार शिक्षक आणि3लाख  विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन केले.गुगल फॉर्मच्या माध्यमातून संकलित होणारी अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येईल.

मागील वर्षीही दि.1सप्टेंबर2018रोजी हा उपक्रम राबविण्यात आला होता.त्यावेळी एकूण1लाख26हजार229शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून लोकराज्य मासिकाचे एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वाचन केले होते.

या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम दि. 14नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा या वेळेत भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे संपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमासाठी औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी,लातूर विभागाचे माहिती व जनसंपर्क चे उपसंचालक यशवंत भंडारे,शिक्षणाधिकारी सविता भोसले,उपशिक्षणाधिकारीरोहिणी कुंभार,माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील,उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे,उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी,सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्‍तात्रय थेटे,विस्ताराधिकारीसंतोष माळी,विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड ,विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे, अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर.बी.जाधव,पर्यवेक्षक हाजगुडे एन.एन.,इंगळे वाय.के.,श्रीमती गुंड, के.पी.पाटीलआणि तीन हजाराहून अधिक विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,नागरिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 19 : नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

निवडणूक कार्यक्रम

     नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019

     नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019

     अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019

     अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020

     मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020

     मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020

0-0-0

(Jagdish More, SEC)

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...