रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1601

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई,दि.22 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे2020मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार राज्य सेवा परीक्षा2020साठीची मुख्य परीक्षा शनिवारपासून तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार असून उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्याचे नियोजित आहे.

राज्य सेवा परीक्षा2020साठीची जाहिरात डिसेंबर2019मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा5एप्रिल2020रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार,8ऑगस्ट ते सोमवार10ऑगस्ट, 2020अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा1मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि.14जून2020रोजी घेण्यात येणार आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा जानेवारी2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा15मार्च, 2020रोजी तर मुख्य परीक्षा12जुलै2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा3मे2020रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा2020अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक1- 6सप्टेंबर2020रोजी,पेपर क्र.2 (पोलीस उपनिरीक्षक)13सप्टेंबर2020,पेपर क्रमांक2 (राज्य कर निरीक्षक)-27सप्टेंबर2020,पेपर क्र.2 (सहायक कक्ष अधिकारी)-4ऑक्टोबर2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा मार्च2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा10मे रोजी तर मुख्य परीक्षा11ऑक्टोबर2020रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा17मे2020मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिनांक‍18ऑक्टोबर2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा एप्रिल2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा7जून2020रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेअंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक1-दि.29नोव्हेंबर2020रोजी,संयुक्त पेपर क्रमांक2 (लिपिक-टंकलेखक)-  6डिसेंबर2020,संयुक्त पेपर क्रमांक2 (दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,गट-क)-13डिसेंबर2020रोजी तर संयुक्त पेपर क्रमांक2 (कर सहायक)-20डिसेंबर2020रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा मे2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा5जुलै रोजी तर मुख्य परीक्षा1नोव्हेंबर, 2020रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सप्टेंबर, 2020मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार28नोव्हेंबर, 2020रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्याwww.mpsc.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ/22.11.2019   

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई, दि.21 : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन  अभिवादन केले.

याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही यावेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

यावेळी मंत्रालय, महापालिका, पोलीस, नौदलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

Maharashtra Governor pays tributes to the martyrs of Samyukta Maharashtra movement

Mumbai, 21st Nov : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today visited the Hutatma Smarak in Mumbai and offered tributes to the martyrs of Samyukta Maharashtra movement.

The Governor placed a wreath at the Martyrs’ Memorial and stood in silence in memory of the martyrs who laid down their life in the agitation for Samyukta Maharashtra.

Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar, Additional Chief Secretary Sitaram Kunte, Director General of Police, Maharashtra Subodh Jaiswal, Commissioner of Police Sanjay Barve and senior government officials also paid their respects at the Martyrs’ Memorial. It was on 21st of November in the year 1955, that people agitating peacefully were fired upon.

0000

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 21: सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनया 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालनहे 6 महिन्यांचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 1 जानेवारी ते 30 जून 2020 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दरमहा 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.

प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान 4 थी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधारकार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधीत गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक मच्छिमारांनी मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.21.11.2019

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ ‍कार्यक्रमात उद्या ‘स्वच्छ – निर्मल तट अभियान’ या विषयावर मुलाखत

मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रदिलखुलास’‍ कार्यक्रमात स्वच्छ – निर्मल तट अभियान  या विषयावर सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ.दिनेश कुमार त्यागी यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर  शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल. या मुलाखतीमध्ये  प्रधान सचिव वने विकास खारगे यांच्या प्रतिक्रियेचा समावेश आहे.

दिलखुलास’‍कार्यक्रमात ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअरया ॲपवरही शुक्रवार दि.२२ आणि सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका कल्पना साठे यांनी घेतली आहे.      

या मुलाखतीमध्ये स्वच्छ  निर्मल तट अभियानाचा उद्देश, व्याप्ती व कार्यक्रमाचे स्वरूप,सागरी स्वच्छतेमध्ये स्थानिक प्रशासन व लोकांचा सहभाग,कांदळवन संवर्धन व जतन याविषयी सविस्तर माहिती डॉ.त्यागी यांनी जय महाराष्ट्र  दिलखुलासकार्यक्रमात  दिली आहे.

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

मुंबई, दि. 21 : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी तसेच इतर भरती कार्यालयामार्फत 41 डाक सेवक/ सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पनवेल यांनी कळविले आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतhttp://appost.in/gdsonline/या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. नवी मुंबई विभागकार्यक्षेत्रातील पात्र उमेदवारांना अर्जाची फी प्रधान डाकघर, पनवेल यांच्याकडे जमा करता येणार आहे.

अफवांना, भूलथापांना बळी पडू नये

भारतीय डाक विभाग पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन व संदेश पाठवित नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सिस्टिम जनरेटेड संदेश त्यांची निवड झाल्यावर प्राप्त होऊ शकेल. आवश्यक पत्र व्यवहार अधिकृत भरती कार्यालयामार्फत केला जाईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी आपला नोंदणीकृत क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करु नये व अफवांपासून सावध राहावे. तसेच भारतीय डाक विभाग कोणत्याही हेतूसाठी आपणास फोन करत नाही. म्हणून उमेदवारांनी या बाबतीत जागरुक राहावे व कोणत्याही अफवांना, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

न्यूझीलंडच्या खासदारांनी घेतली अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट

मुंबई,दि.21 :न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ’कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने आज राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते.

न्यूझीलंडचे खासदार कंवलजीतसिंग बक्षी,टीम मॅकलँडो,मेलीसा ली,न्यूझीलंड संसदेच्या (चेंबर) संसदीय मैत्र गटाच्या सचिव नताली मूर यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. यावेळी महाराष्ट्र विधान मंडळाचे उपसचिव शिवदर्शन साठे उपस्थित होते.

प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करुन श्री. कुंटे यांनी महाराष्ट्राची कृषी,अर्थव्यवस्था,उद्योग आदींविषयी संक्षिप्त माहिती दिली. देशामध्ये वाहन उद्योग,माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये राज्य देशात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानमंडळाची रचना,सभागृहे,कामकाज पद्धती,केंद्र-राज्य संबंध,राज्य शासनाच्या प्रशासनाची रचना,कररचना आदींविषयी माहिती श्री. कुंटे आणि श्री. भागवत यांनी दिली.‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये राज्य चांगल्या प्रकारे काम करत आहे. न्यूझीलंडबरोबरचे संबंध अधिक दृढ होण्यासह,विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी या भेटीमुळे मदत होईल,अशी आशा श्री. कुंटे यांनी यावेळी व्यक्‍त केली.

न्यूझीलंड उद्योग,डेअरी क्षेत्रात अग्रेसर असून दर्जेदार उच्चशिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याचे न्यूझीलंडच्या खासदारांनी सांगितले. त्यांनी तेथील संसदीय व्यवस्थेची,प्रशासनाची माहिती देऊन न्यूझीलंडला भेट द्यावी,असे सांगितले. या भेटीदरम्यान श्री. कुंटे आणि न्यूझीलंडच्या खासदारांनी परस्परांना स्मृतिचिन्ह दिले.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.21.11.2019

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधण्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांचे निर्देश

मुंबई,दि.21 :  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त6डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या काळात अनुयायांना शांततेत चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन करता यावे,यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे राज्य शासनाबरोबरच महानगरपालिका,बेस्ट,रेल्वे प्रशासन,एसटी महामंडळ आदींनी विविध सुविधा पुरविल्या आहेत. अनुयायांच्या सुरक्षेसाठी समुद्रात जास्तीचे जीवरक्षक तैनात करणे,बोटी तयार ठेवणे,महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकची ना नफा ना तोटा तत्वावर विक्री करणे,शिवाजी पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)वतीने पुरविण्यात येणाऱ्या भोजन सेवेची व्याप्ती वाढविणे आदींसंदर्भात श्री. संजय कुमार यांनी निर्देश दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी सर्वांनी सतर्क राहावे,असेही आवाहन संजय कुमार यांनी यावेळी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या वतीने शिवाजी पार्कवर तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील महाराष्ट्र शासन निर्मित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. त्याचबरोबर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील‘जय महाराष्ट्र’कार्यक्रम व आकाशवाणीच्या‘दिलखुलास’या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येईल,असे यावेळी सांगण्यात आले. श्री. कांबळे यांनी सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केल्याचे सांगितले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रजनीश शेठ,सहपोलीस आयुक्त वीरेश प्रभू,उपायुक्त प्रणय अशोक,रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त के.के. अश्रफ,महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे,उपाध्यक्ष महेंद्र साळवे,रवी गरुड आदी उपस्थित होते.

००००

उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ ‍डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.21: सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन2019या वर्षीच्या या पुरस्कारांसाठी सूक्ष्म व लघु उत्पादक घटकांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक  15‍डिसेंबर2019आहे.

          

मुंबई प्राधिकरण विभागातील मुंबई उपनगरामध्ये उत्पादन करणाऱ्या पात्र उद्योग घटकांना पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी,मुंबई उपनगर यांचे हस्ते सन2019या वर्षासाठी पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून पुरस्कारासाठी पात्र घटकांचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

1)     अर्जदार उद्योग घटकाने सूक्ष्म अथवा लघु उद्योग उत्पादक घटक उद्योग आधार मेमोरॅण्डम प्राप्त केलेले असावे व घटकाचे उत्पादन तीन वर्षापासून अथवा त्यापूर्वी सुरु झालेले असावे.

2)     आवेदन पत्रामध्ये नमूद असलेल्या उत्पादित बाबींसाठी घटक मागील तीन वर्षे सलग उत्पादनामध्ये असावा.

3)     यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कारप्राप्त झालेले घटक या पुरस्कारांसाठी पात्र ठरणार नाहीत.

4)   उद्योग घटक बँकेचा थकबाकीदार नसावा.

अर्जाचा नमुना व इतर माहितीसाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा –

            उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय,

            विकास सेंटर, 702, 7वा मजला,सी गिडवाणी मार्ग,

            बसंत सिनेमागृहाजवळ,चेंबूर (पूर्व),मुंबई-400 074.

            दूरध्वनी क्र.25208182/25206199

            Email ID : didicmumbai@gmail.com

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक15डिसेंबर2019आहे.

‘जलयुक्त शिवार’मधून सांगली जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली (विशेष वृत्त)

 

सांगली, दि.२१: सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी व शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत सन २०१५ ते २०१९ या कालावधीत २७६ कोटी ९० लाख रूपये खर्चून जिल्ह्यात ५२४ गावात १९ हजार ५७३ कामे करण्यात आली.  या कामातून सुमारे १ लाख ६९ हजार १६१ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली असून ८४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. तर यावर्षी या सर्व कामांमधून प्रत्यक्ष पाणीसाठा सुमारे १ लाख २६ हजार ८७१ टीसीएम झाला आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये एकूण १४१ गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये १०२ कोटी ९ लाख रूपये खर्चून ४ हजार ६४८ कामे करण्यात आली. सन २०१६-१७ मध्ये एकूण १४० गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये ९३ कोटी ८४ लाख रूपये खर्चून ४ हजार ३२१ कामे करण्यात आली. सन २०१७-१८ मध्ये एकूण १४० गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये ६१ कोटी ९३ लाख रूपये खर्चून ७ हजार ९४६ कामे करण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये एकूण १०३ गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये १९ कोटी ४ लाख रूपये खर्चून २ हजार ६५८ कामे करण्यात आली असून ३९ कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये एकूण १४१ गावांमध्ये केलेल्या ४ हजार ६४८ कामांमुळे ५५ हजार २२० टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन २७ हजार ६१० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली. सन २०१६-१७ मध्ये एकूण १४० गावामध्ये केलेल्या ४ हजार ३२१ कामांमुळे ५४ हजार ४४८ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन २७ हजार २४४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली. सन २०१७-१८ मध्ये एकूण १४० गावामध्ये केलेल्या ७ हजार ९४६ कामांमुळे ४५ हजार ९२८ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन २२ हजार ९६४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली. सन २०१८-१९ मध्ये एकूण १०३ गावामध्ये केलेल्या २ हजार ६४८ कामांमुळे १३ हजार ५६५ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण होऊन ६ हजार ७८२ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. सांगली जिल्ह्यात एकूण ५२४ गावात १९ हजार ५७३ कामे करण्यात आली.  या कामातून सुमारे १ लाख ६९ हजार १६१ टीसीएम इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली असून ८४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे

जागो ग्राहक जागोमोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण

मुंबई, दि. 20 : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी आज व्यक्त केले.

जागो ग्राहक जागोमोहिमेअंतर्गत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयामार्फत अशासकीय सदस्य आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे, कन्झ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सीताराम दीक्षित, परिमंडळाचे उपनियंत्रक शिधावाटप प्रशांत काळे आदी यावेळी उपस्थित होते.

ग्राहक आपल्या हक्कासाठी जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाशी निगडित अनेक प्रश्न आपोआप सुटतात, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, शासनाने ग्राहक हिताचे अनेक कायदे केले आहेत. या कायद्यांविषयक तसेच वस्तू किंवा सेवेची खरेदी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फसवणूक टाळता येणे शक्य आहे. यातूनही फसवणूक झाल्यास न्यायालयातून न्याय निश्चितच मिळू शकतो. ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्यांनी आपल्या परिमंडळातील किमान 10 शाळांमध्ये जाऊन ग्राहक जागृतीपर व्याख्यान, प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी यावेळी केले.

श्री. पगारे यावेळी म्हणाले, ग्राहक नेहमी चोखंदळ असावा, तो जागृत असावा या दृष्टीकोनातून यावर्षीपासून जागो ग्राहक जागोमोहीम सुरु करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील सहा अधिकारांची माहिती ग्राहकाला असल्यास आपली फसवणूक टाळणे शक्य आहे.

या कार्यक्रमात डॉ. सीताराम दीक्षित यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील विविध तरतुदींची माहिती दिली. ग्राहकाची व्याख्या, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वस्तू व सेवा, ग्राहकांचे सहा अधिकार, वस्तू व सेवांविषयी फसव्या जाहिराती, ग्राहकाच्या फसवणुकीचे प्रकार, भेसळ आदींविषयी माहिती देऊन फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करायची याबाबत माहिती यावेळी दिली.

प्रशिक्षणास अशासकीय सदस्य तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.20.11.2019

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...