रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1618

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’

मुंबई,दि.११ : प्रसारभारतीच्या  न्यूज ऑन एअर या ॲपवर  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  विशेष निवडणूक वार्तापत्र‘  दि. १२ ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७. ४५ या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आकाशवाणीवरील’दिलखुलासकार्यक्रमात विशेष निवडणूक वार्तापत्रशनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७. ४५ या  वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक,जळगांव, कोल्हापूर,परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या २२ आकाशवाणी केंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.                 

‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली दि. 11 : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले.

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय,अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील रुग्णालयांना‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार2018-19’ने गौरविण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि  विभागाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत देशभरातील रूग्णालये,संस्था आणि  विविध राज्यांतील रूग्णालयांना एकूण90पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. तसचे देशातील एकूण11खाजगी रूग्णालयांना यावेळी  विविध श्रेणींमध्ये  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय प्रथम

राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून तीन रुग्णालयांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छता मानकांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातून प्रथम ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैदाने यांनी हा पुरस्कार स्वीकारला.50लाख रूपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अमरावती व श्रीरामपूरचाही सन्मान

स्वच्छता मानकांची उत्तम अंमलबजावणी करणारे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हे‘कायाकल्प पुरस्कार स्पर्धेत’राज्यात उपविजेते ठरले. अमरावतीचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम आणि  जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. मंगेश राऊत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.20लाख रुपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय हे ग्रामीण रूग्णालयांमधून राज्यात प्रथम ठरले. या रूग्णालयाचाही कायाकल्प पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक  डॉ. विजय कंदेवाड आणि अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापक अशोक कोठारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.15लाख रूपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचाही सन्मान

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर्षी प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेअंतर्गत खाजगी रुग्णालयांनाही सहभागी करून घेतले. देशभरातील 643खाजगी रूग्णालयांनी यात सहभाग घेतला. यापैकी11रूग्णालयांची या पुरस्कारासाठी निवड झाली . खाजगी रूग्णालयांच्या प्रथम श्रेणीत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय,रूग्णालय व संशोधन संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे विश्वस्त तथा खजिनदार डॉ. यशराज पाटील,रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एस.चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूपात मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन,राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सचिव प्रिती सुदान यांनी  उपस्थितांना संबोधित केले.

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.229 /दि.11.10.2019

‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

मुंबई, दि. 11 : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी सी व्हिजीलॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. दाखल तक्रारींपैकी 490 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले.

आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, निवडणुकीच्या अनुषंगाने खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे अशा विविध घटना आढळून आल्यास मतदार स्वत: भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपद्वारे तक्रार करू शकतात.

प्रतिबंधित कालावधीत प्रचार करण्याच्या 52 तक्रारी, शस्त्राचे प्रदर्शन किंवा धाकदपटशा करण्याच्या 2 तक्रारी, कुपन किंवा भेटवस्तू देण्याच्या 13 तक्रारी, पैसे वितरित करण्याच्या 12, मद्य वितरित करण्याच्या 14, विनापरवाना पोस्टरच्या 589, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांसंदर्भातील 9 तक्रारी, विनापरवाना वाहनांचा वापर करणाऱ्या 22 तक्रारी, ध्वनिक्षेपकाचा निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वापराच्या 8 तक्रारी आणि इतर 471 तक्रारींचा यात समावेश आहे.

वाशिम  जिल्ह्यातून सर्वाधिक १८८ तक्रारी प्राप्त आहेत. सोलापूर १६५, ठाणे १४०, पुणे १३८, मुंबई उपनगर ४५, मुंबई शहर ३३ तर सर्वात कमी सिंधुदुर्गमधून १ तक्रार प्राप्त झाली आहे. याशिवाय अहमदनगर ३९, अकोला ६, अमरावती ७०, औरंगाबाद १५, बीड ६, भंडारा ७, बुलडाणा १८, चंद्रपूर ३, धुळे ७, गडचिरोली २, गोंदीया २९, हिंगोली ८, जळगाव २३, जालना ६, कोल्हापूर १६, लातूर ११, नागपूर ४०, नांदेड २६, नंदूरबार ३, नाशिक ७, उस्मानाबाद ११, पालघर २४, परभणी १४, रायगड २०, रत्नागिरी १०, सांगली १६, सातारा १७, वर्धा ११, यवतमाळ १८ याप्रमाणे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास सी व्हिजील ॲपद्वारे नागरिकांना तक्रार दाखल करता येते. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. नागरिक आपली ओळख गुप्त ठेवूनही या ॲपवर तक्रार दाखल करु शकतात.

समाजातील मान्यवरांनी खादीच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जागतिक व्यापार केंद्र, आय एम खादी फाऊंडेशन यांच्या वतीने महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या फॅशन शो व प्रदर्शनाचे आयोजन मुंबई, दि.11 : समाजातील सर्वच क्षेत्रातील श्रेष्ठांचे व मान्यवरांचे अनुकरण सामान्य जनता करीत असते. त्यामुळे या मान्यवरांनी खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना ही खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

जागतिक व्यापार केंद्र, आय एम खादी फाऊंडेशन यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या व्हिविंग पीस या फॅशन शोचे तसेच खादी वस्तू व कपड्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्रात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, रुपा नायर, दुपेंदर कौल, आयएम खादी फाऊंडेशनचे यश आर्य आदी उपस्थित होते. सुरुवातीस सुनीता भुयान यांनी व्हायोलिनवर वैष्णव जन…’ या गीताची धून वाजविली.

श्री. कोश्यारी म्हणाले की, वस्त्रौद्योगाचे महत्त्वाचे केंद्र अशी भारताची जगभर ओळख आहे आणि ती आजही टिकून आहे. महात्मा गांधी यांनी खादीच्या वापराला चालना दिली. आता भारताबरोबरच विदेशातही मोठ्या प्रमाणावर खादीचा प्रसार होत आहे. खादीच्या लघु उत्पादकांची उन्नती साधून महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले.

यावेळी टोरंटोतील आंतरराष्ट्रीय डिझायनर तारा भुयान,न्यूयॉर्कच्या मेगन ओलारी, ढाका येथील मंताशा अहमद यांच्या खादी व हातमागाच्या डिझायनर कपड्यांचे विविध मॉडेलनी प्रदर्शन केले. श्री. कलंत्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/11.10.2019

सरस आजीविका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचतगटांचे १० स्टॉल

नवी दिल्ली दि.११:केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने येथील इंडिया गेटवरील राजपथ लॉनवर आयोजित सरस आजीविका मेळाव्यात राज्याची हस्तकला व खाद्यसंस्कृती दर्शविणारे महिला बचतगटांचे10स्टॉल सहभागी झाले आहेत.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या‘दिनदयाल उपाध्याय अंत्योदय-राष्ट्रीय आजीविका योजनेंतर्गत’येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर सरस आजीविका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देशातील 29 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 500 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील 10 महिला बचत गटांनी यात सहभाग घेतला आहे.

राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण  मसाले,पापड,लोणचे आदी जिन्नस या मेळाव्यात विक्रीसाठी असून राज्यातील 4 महिला बचत गटांचे स्टॉल  येथे लावण्यात आले आहेत. राज्यातील हस्तकलेची ओळख करून देणारे 4 आणि खाद्यसंस्कृती दर्शविणारे 2 असे एकूण 10 बचत गटांचे स्टॉल्स  या ठिकाणी आहेत.

10 ते 23 ऑक्टोबर 2019 पर्यंत चालणाऱ्या  सरस आजीविका मेळाव्याचे  शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित राहणार आहेत.

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.230 / दि.11.10.2019

राष्ट्राचा गौरव वाढविण्यात ‘सेना विमानन कोर’चे विशेष योगदान – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

सेना विमानन कोरला ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान

नाशिक, दि.10 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे राष्ट्रपती निशाणप्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढविण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले.

गांधीनगर एअरफिल्ड येथे झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार,  श्रीमती मधुलिका रावत आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, सेना विमानन कोरने मागील 32 वर्षात अतुलनीय साहस आणि शौर्याचा परिचय देत अनेक मोहिमा यशस्वी केल्या. या कालावधीत आर्मी एव्हिएशनला 273 सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले. सियाचीनसारख्या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दृढनिश्चयाचा परिचय देत भारतीय सेनेला अभिमान वाटेल अशी कामगिरी या सैनिकांनी केली. त्यांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते, असेही श्री.कोविंद यांनी सांगितले.

 

राष्ट्रपती श्री.कोविंद म्हणाले, श्रीलंकेमधील‘ऑपरेशन पवनआणि आव्हानात्मक परिस्थितीत ‘ऑपरेशन मेघदूत’मध्ये या दलाने अतुलनीय कामगिरी केली. संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत भारताचे दूत म्हणून जवानांनी उत्तम कामगिरी केली. आर्मी एव्हिएशन जवानांचा पराक्रम भारतीय सेनेचे जवान आणि अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत आहे,असे त्यांनी सांगितले. आर्मी एव्हिएशनचे महासंचालक ले.ज.कवलकुमार यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी अभिनंदन केले.

यावेळी आर्मी एव्हिएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती श्री. कोविंद यांना मानवंदना दिली. संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडीअर सरबजीत सिंघ बावा भल्ला यांनी केले. राष्ट्रपती निशाणाला मानवंदना देण्यात आल्यानंतर श्री. कोविंद यांचेकडून ऑफिसर कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांनी निशाण स्वीकारले. आकाशातून तीन ध्रुव हेलिकॉप्टरच्या  समन्वय कृतीने निशाणाला मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी, आणि आर्मी एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलची कामगिरी महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

देवळाली तोफखाना स्कूलच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त उभारलेल्या रुद्रनादसंग्रहालयाचे उद्घाटन

नाशिक, दि. 10 : देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना समर्थपणे करतील, असा विश्वास राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.

देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित’रुद्रनादया ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन श्री. कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत,  राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार, श्रीमती मधुलिका रावत आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, मागील काही वर्षामध्ये सैन्यदलात नवनवीन पद्धतीने दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या तोफांचा समावेश करण्यात आला आहे. यात भारतीय उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. काकूल येथे सुरु झालेला तोफखाना स्कूलचा प्रवास अतिशय गौरवपूर्ण आहे. या तोफखाना केंद्रातील सैनिकांप्रती संपूर्ण देशाला अभिमान आहे, असेही श्री.कोविंद यांनी सांगितले.

देशाच्या तोफखान्याला अधिकाधिक दक्ष बनविण्यात देवळाली तोफखाना स्कूल आधारभूमी आहे. तोफखाना स्कूलमधील अधिकाऱ्यांची प्रशिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रशंसनीय आहे. देवळाली तोफखाना स्कूलचा नावलौकिक‘रुद्रनादप्रमाणे गर्जत राहिल आणि देशाकडे वाईट नजरेने बघणाऱ्या शत्रूंना भयभीत करेल, अशा शुभेच्छा श्री.कोविन्द यांनी दिल्या. देशाला प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्तीशाली सैन्यदल तयार करण्यात देवळाली तोफखाना केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे गौरवोद्वारही याप्रसंगी राष्ट्रपतींनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. कोविंद यांच्या हस्ते देवळाली तोफखाना स्कूलच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती देणाऱ्या‘रुद्रनादम्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शतकमहोत्सवी ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. स्कूल ऑफ आर्टिलरीया पुस्तकाचे प्रकाशन लष्करप्रमुख जनरल रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाची पहिली प्रत श्री. रावत यांनी  श्री. कोविंद व राज्यपाल श्री. कोश्यारी यांना भेट दिली.

याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, मेजर जनरल संजय शर्मा,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, बिग्रेडियर जे. बी. सिंग, कर्नल ए. के. सिंग, कर्नल रंजन प्रभा, कर्नल नवनीत सिंग, तोफखाना स्कूलचे वरिष्ठ अधिकारी, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची मुलाखत ‍

 

दिलखुलासकार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी याच मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र   दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे ‍यांची लोकशाहीचा बाळगू अभिमान,चला……..करू मतदान!’या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक११ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  सोमवार दि. १४ आणि  मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे. या कार्यक्रमात मतदार जागृती  उपक्रमांची जिल्हानिहाय माहिती दिलेली आहे. 

    

स्वीप उपक्रम नेमका काय आहे? निवडणुकांत मतदान वाढावे याकरिता सुरु असलेले प्रयत्न, विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर, मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम,सदिच्छादूतांचा सहभाग या विषयांची माहिती श्री. दिलीप शिंदे ‍यांनी जय महाराष्ट्रआणि  दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’कार्यक्रमात उद्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांची मुलाखत

   

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात आरोग्य विभागाच्या संचालक तथा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालक डॉ.साधना तायडे यांची  रक्तदान पवित्र दानया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर  २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होईल. निवेदक आशुतोष सावे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

     

या मुलाखतीमध्ये रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासण्या, राज्याची रक्ताची गरज, रक्त संकलन केंद्र, रक्त व रक्तगटाचे जीवनमान, राज्य रक्तसंक्रमण परिषदेचा उद्देश याविषयावर सविस्तर माहिती डॉ.साधना तायडे यांनी दिली आहे.

४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी

मुंबई, दि. 10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 अशी झाली आहे.

राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजेच 5 लाख 57 हजार 507 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 58 हजार 605 इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून 173 पुरुष आणि 10 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 576 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 5 लाख 58 हजार 083 मतदार आहेत.

राज्यात वडाळा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 2 लाख 03 हजार 776 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 06 हजार 219 आहे तर महिला मतदारांची संख्या 97 हजार 515 इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून 40 पुरुष आणि 2 महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण 224 नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण 2 लाख 04 हजार इतके मतदार आहेत. ००००

4 अक्टूबर तक 4 लाख 90 हजार नए मतदाताओं ने किया पंजीयन

मुंबई : मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय के मार्फत चलाए गए मतदाता पंजीयन अभियान में  4 अक्तूबर 2019 तक नए 4 लाख 90 हजार 050 मतदाताओं का पंजीयन हुआ हैं. अब राज्य में कुल मतदाताओं की संख्या 8 करोड़ 98 लाख 39 हजार 600 हुई हैं.

राज्य में पनवेल निर्वाचन क्षेत्र में सर्वाधिक है. पनवेल में 5 लाख 57 हजार 507 मतदाताओं का नाम मतदाता सूची में दर्ज किया हैं.  इसमें पुरुष मतदाताओं की संख्या 2 लाख 98 हजार 719 हैं जबकि महिला मतदाताओं की संख्या 2 लाख 58 हजार 605 हैं. सर्विस मतदाता के रूप में 173 पुरुष और 10 महिला मतदाताओ का पंजीयन किया गया है. मतदाता पंजीयन अभियान के बाद निर्वाचन क्षेत्र में कुल 576 नए मतदाताओं का पंजीयन पूर्ण हुआ है. इस निर्वाचन क्षेत्र में कुल 5 लाख 58 हजार 083 मतदाता हैं.

राज्य में वडाला निर्वाचन क्षेत्र में सर्वाधिक कम यानी 2 लाख 03 हजार 776 मतदाता हैं. इसमें पुरुष मतदाताओं की संख्या 1 लाख 06 हजार 219 है तथा महिला मतदाताओं की संख्या 97 हजार 515 तक हैं. सर्विस मतदाता के रूप में 40 पुरुष और 2 महिला मतदाताओं का पंजीयन किया गया हैं. मतदाता पंजीयन अभियान के बाद इस निर्वाचन क्षेत्र में  कुल 224 नए मतदाताओं का पंजीयन पूरा हुआ है. अब इस निर्वाचन क्षेत्र में  कुल 2 लाख 04 हजार मतदाता हैं.

००००

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...