सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 1644

सातारा लोकसभा मतदार संघासाठी २१ ऑक्टोबरला पोटनिवडणूक

नवी दिल्ली,24 :  राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी पोटनिवडणूक   घेण्यात येणार असून 24 ऑक्टोबरला  मतमोजणी  होणार आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघातील खासदार पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच ही निवडणूक पार पडणार आहे.

…असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम!

सातारा लोकसभा मतदार संघासाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून  5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी  पार पडेल. 27 ऑक्टोबरला  पोटनिवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

*****

रितेश भुयार /वृत विशेष क्र.220 / दि.24.09.2019

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजराष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली.  दिनांक ५सप्टेंबर रोजी राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोश्यारी यांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.

००००

Governor calls on President Kovind

Mumbai, 24th Sept :The Govenror of Maharashtra Bhagat Singh Koshyari today (24 Sep)called on the President of India Ram Nath Kovind  at Rashtrapati Bhavan, New Delhi. This was the first meeting of Governor Koshyari with the President of India since taking charge as Governor of Maharashtra on September 5.

००००

तांत्रिक अडचणीमुळे शासकीय रेखाकला परीक्षा-२०१९ पुढे ढकलली

मुंबई, दि. 24 : शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दि. 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार मोहोरबंद प्रश्नपत्रिका वितरणाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.

परीक्षेचे पुढील वेळापत्रकwww.doa.org.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ज्या परीक्षा केंद्राने प्रश्नपत्रिकांची मोहोरबंद पाकिटे ताब्यात घेतली आहेत, ती सर्व मोहोरबंद पाकिटे प्रश्नपत्रिका वितरण केंद्रावर परत करावी, याची शासकीय रेखाकला परीक्षा 2019चे सर्व विद्यार्थी, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी केले आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण

15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा पुरविणार

– अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई,दि. 24 : भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून 15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले की,भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची तारीख असून 5 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव,वाई,कराड उत्तर,कराड दक्षिण,पाटण व सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदानसाठी 15 हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त गरज भासणार आहे. तसेच पोटनिवडणुकीसाठी 3500 बॅलेट युनिट (बीयू),3000 कंट्रोल युनिट (सीयू) व 3200 व्हीव्हीपॅट हे जास्तीचे लागणार असून ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत,असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले,सातारामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची गफलत होणार नाही. तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार असून यंत्रावर मोठ्या अक्षरात लोकसभा व विधानसभा असे नमूद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतदार नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. परंतु विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली आहे. 1200 मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व पाच अधिकारी,तर 1200 पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व सहा कर्मचारी असतील.

आचारसंहिता काळात आतापर्यंत राज्यात ३ कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 24 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील तीन दिवसात आयकर विभाग,उत्पादन शुल्क विभाग,पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक कोटी 36 लाखांची रोख रक्कम,1 कोटी 68 लाख किंमतीचे मद्य,29 लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ व 46 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील 75 हजार 981,सार्वजनिक ठिकाणच्या 73 हजार 445 व खासगी ठिकाणावरील 16 हजार 428 जागांवरील अनधिकृत फलक,बॅनर,कटआऊट व झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती,पोस्टर व कटआऊट हटविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 50 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये व पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा वस्तू टाळाव्यात,असेही आवाहन श्री.शिंदे यांनी केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/24.9.19

महाराष्ट्राला ‘एनएसएस’चे दोन पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली, 24 :राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचे किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी सचिन ढोले यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनएसएस पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात‘वर्ष2017-18च्या एनएसएस’पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात देशातील विद्यापीठ,महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण10महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई येथील किशनचंद चेल्लाराम (के.सी.) महाविद्यालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता बागला यांना  चषक आणि1लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर  याच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश कोलते यांना70हजार रूपये,रजत पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये देशातील एकूण29विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शाखेचा विद्यार्थी सचिन ढोले हा महाराष्ट्रातून सर्वोत्तम एनएसएस विद्यार्थी ठरला असून त्याला50हजार रूपये,रजतपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.                                                                        

००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.221 /दि.24.09.2019

For convenience of voters around 5400 polling booths shifted to the ground floor

Mumbai,24.Sep.19:“Preparations of the assembly elections are in full swing in the state. About5,400polling booths which were on the first and second floor during Loksabha election, now have been brought to the ground floor. This will make it easier for the disabled and senior citizens to participate in voting”, informed Dilip Shinde, Additional Chief Election Officer.

He further stated that due to space constraints in Mumbai, Mumbai suburbs, Thane, Nashik, Pune, polling booths were set up on the first or second floor for the Lok Sabha elections. But now, around5400polling booths have been shifted to the ground floor to facilitate senior citizens and handicapped voters for the assembly polls. The polling booths have been set up on the first or second floor only where the facility of lift is available.

“There were91,329polling booths in the state during the assembly elections of2014.Now, it has increased to5,325polling booths. Therefore, there are total96,454polling booths in this coming assembly election. There will be ramps, wheelchairs, drinking water facilities available for the people who will come to exercise their franchise”, said Mr. Shinde.

He further informed that this year, the Election Commission of India has announced the ‘Accessible Election’ (Sulabh Nivadnuka) phrase to increase the participation of voters with disabilities. This year3,60,885disable voters have registered their name in voting list. For their convenience, ramps, wheelchairs would be provided at every polling booths.

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई,दि. 24 : येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर व उपनगरातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मुंबईची मतदान टक्केवारी वाढवावी,असे संयुक्त आवाहन मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्ही सिटीजन ॲक्शन नेटवर्क तसेच जयहिंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमात मतदारांशी संवाद साधताना केले.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया परिसरातील यॉट क्लब येथे आयोजित या कार्यक्रमास व्ही सिटीजन ॲक्शन नेटवर्क या संस्थेचे विश्वस्त तथा राज्याचे माजी मुख्य सचिव व्ही.रंगनाथन,अध्यक्षा श्रीमती इंद्राणी मलकानी,निवडणूक दिव्यांग सदिच्छादूत निलेश सिंगीत तसेच मुंबई शहरच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती फरोग मुकादम व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.जोंधळे यांनी उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ दिली तसेच त्यांनी मुंबई शहरातील मतदान सुविधा व इतर अनुषंगिक माहिती देऊन नवमतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन निवडणूक टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी मतदान केंद्र प्रथम,द्वितीय मजल्यावरुन तळमजल्यावर स्थलांतरित केल्याचे सांगितले. पीडब्ल्यूडी व सी व्हीजील ॲपबाबतही सविस्तर माहिती दिली.

निर्भय,नि:पक्ष व पारदर्शी वातावरणात मुंबई उपनगर जिल्ह्यात निवडणूक संपन्न होत असून यावेळी मतदान टक्केवारी वाढेल,अशी अपेक्षा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री.बोरीकर यांनी व्यक्त केली. देशातील जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा असलेला हा जिल्हा आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणूक अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेची सविस्तर माहिती दिली. 1999 ला मतदान अधिकारी ते 2019 ला जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवास आपण केला असल्याने निवडणूक प्रक्रियेतील सर्व घटकांच्या संदर्भात सहानुभूती असल्याचे श्री.बोरीकर यांनी सांगितले.

श्रीमती मुकादम यांनी दिव्यांग तसेच पीडब्ल्यूडी मतदारांसाठी कोणत्या सुविधा राबविण्यात येत आहे याची सविस्तर माहिती देऊन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कसे पाहावे याची तांत्रिक माहिती दिली. तसेच व्हीव्हीपॅट संदर्भातील प्रात्यक्षिक देखील करण्यात आले. सदिच्छादूत श्री.सिंगीत यांनी राज्यातील तसेच मुंबईतील मतदान केंद्रे जास्तीत जास्त तळमजल्यावर आणल्याबद्दल निवडणूक यंत्रणेचे मन:पूर्वक आभार मानून आनंद व्यक्त केला. दिव्यांगांना मदत करणाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे,असेही त्यांनी सूचित केले.

यानंतर झालेल्या समक्ष व ऑनलाईन प्रश्नोत्तराच्या वेळी बोगस मतदान,मतदान ओळखपत्र,हौसिंग सोसायट्यांची जबाबदारी,निवडणूक यंत्रणा जबाबदारी,ईव्हीएम संदर्भातील प्रश्न,उपप्रश्न आदींबाबत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जिल्हाधिकारी द्वयांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी,मुंबई शहरचे निवडणूक तहसिलदार श्री.सावंत,मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Come, Let’s Vote! Appeal by goodwill ambassadors along with Madhuri Dixit

Mumbai, Sept24th – The office of the chief election officer is undertaking massive awareness campaign for maximum participation of voters in ensuing assembly elections in this coming October. As a part of the same, a video clip `Come, Let’s Vote’ showing actress Madhuri Dixit is being shown  to launch the campaign.

In this clip, Madhuri Dixit tells importance of informed voter in the process of democratic process and development of the country. The awareness campaign has active cooperation from the goodwill ambassdor in various celebrities from the field of arts, culture, sports and luminaries from social work.

Various personalities including nuclear scientist Dr Anil Kakodkar who is Padma Bhushan as well as Maharashtra Bhushan, noted writer Madhu Mangesh Karnik, actor Prashant Damle, actree Mrunal Kulkarni, Dr Nishigandha Wad, National award winning actress Udha Jadhav, cricketer Smruti Mandhana, Arjun Awarde winner athlete Lalita Babar, Arjun award winner swimmer Veerdhaval Khade, gold medallist at Coomonwealth Games and shooter Rahi Sarnobat, transgender activist Gauri Savant, differently abled Nilesh Singit are involved in this campaign.

It is interesting to note that the same team of12goodwill ambassadors had appealed voters to exercise their franchise as a part of National duty during the recently held2019Lok Sabha elections. Social media, print media, electronic media as well as advertising through display boards and flex are being used where these ambassadors are appealing people to vote for strengthening the democracy.

अमिताभ बच्चन यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून अतिशय आनंद वाटला. अभूतपूर्व लोकप्रियता लाभलेल्या अमिताभ बच्चन यांनी गेली चार दशके देशातील तसेच जगभरातील सिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. अनेक सामाजिक मोहिमांना त्यांनी आपला बुलंद आवाज दिला आहे. त्यांची कार्याप्रती निष्ठा व उत्कटता पूर्वीइतकीच कायम आहे. महाराष्ट्र ही बच्चन यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे या पुरस्काराचा राज्यातील लोकांना विशेष आनंद झाला आहे. राज्यातील जनतेतर्फे तसेच आपल्या स्वतःच्या वतीने श्री. बच्चन यांचे या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. यापुढेही त्यांना लौकिक व गौरव प्राप्त होवो, अशा शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.   0000

Governor Koshyari congratulates Amitabh Bachchan on Dadasaheb Phalke Award

Mumbai, 24th Sept : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has congratulated Indian film superstar Amitabh Bachchan for being selected for the Dadasaheb Phalke Award. In a congratulatory message, the Governor has said:

“I was extremely delighted to know that the Maha Nayak of Indian Cinema Shri Amitabh Bachchan Ji has been selected for the most prestigious Dadasaheb Phalke Award.  Amitabh Ji, has entertained the nation and the world at large for more than four decades.  He has lent his strong voice to numerous social causes. His passion and dedication for work remains unabated. Maharashtra has been the ‘Karmabhumi’ of Shri Amitabh Bachchan and therefore the people of Maharashtra are gladdened by the honour for him.  On behalf of the people of Maharashtra and on my own behalf, I convey my heartiest congratulations to Shri Amitabh Bachchan on being chosen for the Dadasaheb Phalke Award and wish him more glory and success in the years to come.”

ताज्या बातम्या

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

0
मुंबई दि. 28 :  मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या...

‘वेव्हज परिषद-२०२५’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

0
मुंबई दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’वेव्हज-2025 परिषदेनिमित्त उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांच्या...

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

0
मुंबई, दि. 28 :- पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय...

हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई दि. २९ : - पुण्यातील बी. जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे राज्यातील नामवंत असे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे....

माळशेज घाटात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री...

0
मुंबई दि. २९ : - माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचे...