शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1670

केंद्र शासनाच्या सागर परिक्रमा अभियानाला महाराष्ट्राचे सर्वतोपरी सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही

नवी दिल्लीदि. १६ : महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर सागरी किनाऱ्याची परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राच्या सागर परिक्रमा अभियानात महाराष्ट्र सर्वतोपरी सहकार्य करेल आणि सहभागी होईलअशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसायपशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांना आज येथे दिली.

केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या अध्यक्षतेखाली सागर परिक्रमा टप्पा 3 च्या आढावा बैठकीचे आयोजन गरवी गुजरात भवन येथे करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियानराज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारखासदार विनायक राऊतआमदार सुनील राणेमासेमारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम वानखेडेमत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव तथा मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांच्यासह केंद्र शासनातील मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारताला एकूण ८ हजार किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात सागरी भागातील मासेमारीशी निगडित समस्याअडचणी जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सागर परिक्रमा हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत सागरी मार्गातून परिक्रमा करून प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्यांना भेडसावणारे प्रश्नांना समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री रूपाला यांनी यावेळी सांगितले. यातंर्गत गुजरात राज्याची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. पुढचा तिसरा आणि चौथा टप्पा महाराष्ट्राचा आहे. सागरी परिक्रमेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावाअसा प्रयत्न असल्याचेही श्री. रूपाला म्हणाले.

सागर परिक्रमा या उपक्रमाचे कौतुक करीत श्री. मुनगंटीवार म्हणालेकेंद्र शासनाकडे  मत्स्यव्यवसायाशी संबंधित अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती राज्यांनाही देण्यात यावी तसेच अशा तंत्रज्ञानाचे उपकेंद्र राज्यात स्थापित करावे. यासह पांरपारिक मासेमारांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या सहायाने मासेमारी करणाऱ्यांसाठी देशभर समान नियमावली असावी. सध्या यात तफावत दिसत असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निर्दशानास आणून दिले.

ज्या राज्यांमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जातेअशा राज्यांच्या दोन दिवसीय परिषेदेचे आयोजन केंद्राने करावेअशी विनंतीश्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना लागून सागरी किनारा आहे. पंरतु राज्यात अंतरदेशीय मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मासेमारी विक्रीच्या कामात हजारो लोक गुंतले आहेत. माश्यांची साठवणूकविक्री संदर्भातील तसेच अन्य अडचणी आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून मॉडेल तयार करून याचा लाभ मासेमारी व्यवसायातील लोकांना वर्षभर होईलअशी योजना केंद्रीय स्तरावर असावीअशी अपेक्षा श्री मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

यासह किसान क्रेडीट कार्डमासेमारांसाठी पायाभूत विकासजुन्या जेट्टींचे निराकरणअशा महत्वपूर्ण विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांचा महाराष्ट्रातील सागर परिक्रमा अंतर्गत टप्पा-3 आणि 4 मध्ये अधिकाधिक मासेमारांशी थेट  संपर्क होईलअसे नियोजन केले जाईलअसे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

000

महाराष्ट्रातील सागरी किनारा परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, दि. १६ : महाराष्ट्राला लाभलेल्या  ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्याची केंद्रीय सागर परिक्रमा उपक्रमांतर्गत परिक्रमा करून येथील मच्छिमारांशी थेट संपर्क करून समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल, असे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या अध्यक्षतेत सागर परिक्रमा टप्पा 3 च्या आढावा बैठकीचे आयोजन गरवी गुजरात भवन येथे करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालियान, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील राणे, मासेमारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव तथा मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, यांच्यासह केंद्र शासनातील मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारताला एकूण 8 हजार किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात सागरी भागातील मासेमारी व्यवसायाशी निगडित समस्या, अडचणी  जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सागर परिक्रमा हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत सागरी मार्गातून परिक्रमा करून प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांनी यावेळी सांगितले. यांतर्गत गुजरात राज्याची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. पुढचा 3 आणि 4  टप्पा महाराष्ट्राचा आहे.  सागरी परिक्रमेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा, असा मानस असल्याचेही श्री. रूपाला म्हणाले.

 

सागर परिक्रमा या उपक्रमाचे कौतुक करीत श्री. मुनगंटीवार म्हणाले, केंद्र शासनाकडे मत्स्यव्यवसायाशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती राज्यांनाही देण्यात यावी तसेच अशा तंत्रज्ञानाचे उपकेंद्र राज्यात स्थापित करावे. यासह पांरपरिक मासेमारांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्यांसाठी देशभर समान नियमावली असावी. सध्या यात तफावत दिसत असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निर्दशानास आणून दिले.

ज्या राज्यांमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते, केंद्राने अशा राज्यांची दोन दिवसीय परिषदेचे आयोजित करावी, अशी विनंती श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना लागून सागरी किनारा आहे. परंतु, राज्यात अंतरदेशीय मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच मासेमारी विक्रीच्या कामात हजारो लोक गुंतले आहेत. माश्यांची साठवणूक, विक्री संदर्भातील तसेच अन्य अडचणी आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून मॉडेल तयार करून याचा लाभ मासेमारी व्यवसायातील लोकांना वर्षभर होईल, अशी योजना केंद्रीय स्तरावर असावी, अशी अपेक्षा श्री मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

यासह किसान क्रेडीट कार्ड, मासेमारांसाठी पायाभूत विकास, जुन्या जेट्टींचे निराकरण, अशा महत्त्वपूर्ण विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांचा महाराष्ट्रातील सागर परिक्रमा योजनेंतर्गत टप्पा-3 आणि 4 मध्ये अधिकाधिक मासेमारांशी थेट संपर्क होईल, असे नियोजन केले जाईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

000

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 6 /दि. 16.01.2023

ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

मुंबईदि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी या निधीस सढळ हाताने मदत करावीअसे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव ल. गो. ढोके यांनी केले आहे.

माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात ७ डिसेंबर हा दिवस ध्वज दिन’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी संकलित केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केलेअशा जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. मे १९९९ पासून जम्मू- काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या युद्धजन्य तणावाची परिस्थिती हाताळताना अथवा देशातील सर्वच क्षेत्रातअंतर्गत सुरक्षा मोहिमेतचकमकीत धारातीर्थी पडलेल्या सैन्य दलातील तसेच सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील महाराष्ट्रातील अधिकारीजवानांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी १ कोटी रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते.

या कार्यवाहीत अपंगत्व आलेल्या या दलातील महाराष्ट्राचे अधिकारी व जवानांना त्यांच्या अपंगत्वाचे प्रमाण लक्षात घेवून राज्य शासनातर्फे २० ते ६० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. याशिवाय अन्य योजनांनुसार राज्यातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य केले जाते. माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वज दिन निधीचा विनियोग केला जातो. यंदा राज्यासाठी ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करून कालबद्ध कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपायुक्तजिल्हा उद्योग अधिकारीशिक्षणाधिकारीजिल्हा माहिती अधिकारी सदस्य असून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सदस्य सचिव आहेत.

कोणत्याही प्रकारच्या माजी सैनिक संघटनांना सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलीत करता येणार नाही. ध्वज दिन निधीस योगदान द्यावयाचे असल्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी व अध्यक्षजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि विभागीय स्तरावर संचालकसैनिक कल्याण विभाग यांच्या नावाने धनादेशाद्वारे जमा करावे.

ध्वज दिन निधी संकलनाचे जिल्हानिहाय उद्दिष्ट असे : कोकण विभाग : मुंबई शहर व मुंबई उपनगर- ३ कोटी ८२ लाख ९४ हजार रुपये (प्रत्येकी). ठाणे- १ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये. पालघर- २५ लाख ४८ हजार रुपये. रायगड- ६० लाख ९८ हजार रुपये. रत्नागिरी- ६१ लाख १८ हजार रुपये. सिंधुदुर्ग- ३६ लाख ९९ हजार रुपये. नाशिक विभाग- नाशिक- १ कोटी ३८ लाख ६७ हजार रुपये. धुळे- ६१ लाख १८ हजार रुपये. नंदुरबार- ३६ लाख ३० हजार रुपये. जळगाव- १ कोटी १८ लाख १० हजार रुपयेअहमदनगर- १ कोटी ८४ लाख ९८ हजार रुपये. पुणे विभाग- पुणे- २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपयेसातारासांगली- १ कोटी ४२ लाख २९ हजार रुपये (प्रत्येकी)सोलापूर- १ कोटी ५४ लाख ४१ हजार रुपयेकोल्हापूर- १ कोटी ६० लाख ७९ हजार रुपये. औरंगाबाद विभाग- औरंगाबाद- १ कोटी २० लाख रुपयेजालना- ३८ लाख ३० हजार रुपयेपरभणी- ३५ लाख ४५ हजार रुपयेहिंगोली- २८ लाख रुपयेबीड- ३५ लाख ३० हजार रुपयेनांदेड- ४५ लाख ३० हजार रुपयेउस्मानाबाद- ५१ लाख २८ हजार रुपयेलातूर- ४२ लाख २२ हजार रुपये. अमरावती विभाग- अमरावती- १ कोटी १० लाख रुपयेबुलढाणा- ५३ लाख ३८ हजार रुपयेअकोला- ७३ लाख ३० हजार रुपयेवाशीम- ४८ लाख ५३ हजार रुपयेयवतमाळ- ५९ लाख ६८ हजार रुपये. नागपूर विभाग- नागपूर- १ कोटी ९१ लाख ९८ हजार रुपयेवर्धा- ६० लाख ६१ हजार रुपयेभंडारा- ३५ लाख ४५ हजार रुपयेगोंदिया- ३३ लाख ४५ हजार रुपयेचंद्रपूर- ३९ लाख ८४ हजार रुपयेगडचिरोली- २७ लाख ७६ हजार रुपये.

विभागनिहाय ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट असे : कोकण – ११ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपयेनाशिक – ५ कोटी ३९ लाख २३ हजार रुपयेपुणे- ८ कोटी ५९ लाख ६३ हजार रुपयेऔरंगाबाद- ३ कोटी ९५ लाख ८५ हजार रुपयेअमरावती- ३ कोटी ४४ लाख ८९ हजार रुपयेनागपूर- ३ कोटी ८९ लाख ९ हजार रुपये. एकूण ३६ कोटी ६४ लाख रुपये.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी

मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी काढले आहे.

दरवर्षी पतंग उडवण्याच्या उत्सवात प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक घटकाद्वारे तयार केलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांना व पक्ष्यांना दुखापत होत असल्याचे आढळून आले आहे व अशा जखमा अनेकदा प्राणघातक ठरतात, त्यामुळे नायलॉन किंवा प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक धाग्यांपासून बनवलेल्या पतंग उडवण्याच्या नायलॉन मांजाच्या जीवघेण्या परिणामांपासून माणसांचे आणि पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.

हा आदेश दि. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड प्रक्रिया संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय राहणार आहे, असे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी काढले आहे.

०००

पवन राठोड/ससं/

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

मुंबई, दि. १६ :  राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा  क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य  क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ,शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ ,२०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ  क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन डाउनलोड करुन व्यवस्थितरित्या भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत १६ ते ३० जानेवारी, २०२३ अशी ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अद्ययावत माहिती पहावी. तसेच पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळांनी “विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000

राजू धोत्रे/विसंअ/

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ ,२०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत.

डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणार दर्जेदार शिक्षण – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १६ : डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई येथील कवडे मठ महापालिका शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर येथे आज डिजिटल बालवाडीच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी भव्यता फाऊंडेशनचे  संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार, रोमा सिंघानिया, नीला पारीख, गोरक्षनाथ गंभीरे, रीना जोगानी आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा  म्हणाले, राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. ज्या अंतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. व व्यक्ती, कुटुंब आणि  समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना शासन राबवत आहे. लोकसहभागातून सामाजिक संस्था या क्षेत्रात काम करू शकतात. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाड्या दत्तक घेवून या अंगणवाड्यातील बालके व मातांना सक्षम करण्यासाठी मदतच केली आहे, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

आदिवासी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्येही काम करणार : कुलीन मणियार

भव्यता फाउंडेशनचे  संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार म्हणाले, 2018 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नियुक्त केलेल्या 37 बालवाड्या भव्यता फाउंडेशन चालवत आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करून मुंबईतील आणखी पाच अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. अंगणवाड्या दत्तक घेण्‍यासाठी राज्‍य शासन आणि महिला व बालकल्‍याण विभाग यांनी खूप सहकार्य केले आहे. कॉर्पोरेट्स आणि उल्लेखनीय सामाजिक संस्थांसोबत भागीदारी करून, विस्तार योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांतील आणखी 100 अंगणवाड्यांमध्ये ही सामग्री आणि रचना पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील बोलीभाषांची विविधता लक्षात घेऊन आणि मातृभाषेतून शिकवण्याची गरज लक्षात घेऊन डिजिटल अंगणवाड्या हे शहर-आधारित प्ले स्कूल आणि  आरंभ एलएमएसच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत.

यावेळी भव्यता फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन, शाश्वत व्यवसायासाठी राज्यात आता महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रम

मुंबईदि. १६ : स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणेसुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे अशा विविध उद्दीष्टांच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनी राज्याचे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ करण्यात आला.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मामहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन.अर्था – स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपचे सहसंस्थापक टी. एन. हरीमाणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक चेतना गालायुअर स्टोरी मीडियाच्या संस्थापक श्रद्धा शर्मास्टार्टअप एक्स्पर्ट रवी रंजन आदी मान्यवर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ञांद्वारे मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले.

महिला व ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना प्राधान्य

महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचे उद्दीष्ट हे प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व्यावहारिक माहिती मिळण्यासाठी मदत करणेस्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे हे आहे. या उपक्रमासाठी अंमलबजावणी भागीदार म्हणून अर्था-स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप” काम करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांसाठी ही संस्था “अर्था स्केल प्रोग्राम” चालवतेज्याद्वारे स्टार्टअप्सना आर्थिक आणि सामाजिक समृद्धीमध्ये पाठबळ देऊन त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला गती देण्याचे काम केले जाते. हा उपक्रम महाराष्ट्रातील DPIIT नोंदणीकृत स्टार्टअप्ससाठी 6 महिन्यांचा विस्तृत उपक्रम असणार आहे. यामध्ये मागील एक वर्षात 1 कोटी ते 15 कोटी रुपयांदरम्यान उलाढाल असणाऱ्या निवडक 25 स्टार्टअप्सना याचा विशेष फायदा होणार आहे. या उपक्रमाच्या लाभार्थींमध्ये महिला उद्योजक स्टार्टअप व ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना प्राधान्य दिले जाणार आहे.

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले कीग्रामीण भागासह शेवटच्या घटकापर्यंत स्टार्टअप संस्कृती निर्माण करणे हा राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सना चालना देण्यात येत आहे. राज्यातही स्टार्टअप्सना प्रोत्साहनासाठी विविध उपक्रमयोजना राबविण्यात येत असून यापुढील काळात त्यांना अधिक गती देण्यात येईल.

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या कीविविध शासकीय विभागांमध्ये नाविन्यता आणण्यासाठी तसेच स्टार्टअप्सचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही शासनाच्या विविध विभागांसमवेत भागीदारी करत आहोत. येणाऱ्या काळात व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप्ससाठी सीड फंडची योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. रामास्वामी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून राज्यातील नवउद्योजक व स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तसेच येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील  नवउद्योजक व महिला उद्योजकांसाठी नाविन्यता सोसायटीमार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी अर्था – स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपचे सहसंस्थापक टी. एन. हरी यांनी आपल्या अनुभवातून देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेचा सुरवातीपासूनचा प्रवास सांगितला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्था बळकटीसाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक चेतना गाला यांनी ग्रामीण भागात सुरु असलेल्या विविध कामांची माहिती दिली.  महिला उद्योजिकांना यशस्वी होण्यासाठी त्यांचे धैर्य हेच खरे भांडवल आहे असे सांगून त्यांनी महिला उद्योजकांना प्रेरित केले. युअर स्टोरी मीडियाच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी भारतीय स्टार्टअप व नाविन्यता परिसंस्थेच्या मागील १४ वर्षातील प्रवासाविषयी आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील नवउद्योजकांच्या यशोगाथा सर्वत्र पोहोचविण्यासाठी  युअर स्टोरी मीडिया काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. स्टार्टअप एक्स्पर्ट रवी रंजन यांनी स्टार्टअप संस्थापक व इनक्यूबेटर्सला एंजेल फंडींगबाबत विशेष मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहाय्यक व्यवस्थापक अमित कोठावदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

उद्योग, व्यवसाय वाढीतील स्थानिक अडथळे जिल्हास्तरावर दूर करावेत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूरदि. 16 (जि. मा. का.) – जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योजकव्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांमधील धोरणात्मक बाबीसंबंधी शासनस्तरावर पाठपुरावा करू. स्थानिक अडथळे जिल्हास्तरावर दूर करावेत. स्थानिक समस्या जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांच्या सहकार्याने मार्गी लावाव्यातअशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

सोलापूर जिल्ह्याचा सर्वंकष विकास करण्याची ग्वाही दिल्यानंतरत्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योजक,  व्यावसायिकांची बैठक व चर्चासत्र घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष देशमुख,आमदार विजयकुमार देशमुखआमदार सचिन कल्याणशेट्टीजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरसोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजु राठीउद्योजक नितीन बिज्जरगीचिंचोळी एमआयडीसीचे अध्यक्ष राम रेड्डीउद्योजक अभिजीत टाकळीकरजयेश पटेल आदिंसह शहरातील विविध क्षेत्रातील उद्योजकव्यापारीबांधकाम व्यावसायिकडॉक्ट़रसी. ए.वकील आदी उपस्थित होते.

उद्योगव्यवसाय क्षेत्रातील एक एक प्रश्न मार्गी लावूअशी ग्वाही देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुशल कामगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी तसेचअग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेचचिंचोळी एमआयडीसीमध्ये उपलब्ध इमारतीमध्ये आयटी हब करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा. आवश्यक कार्यवाही करूअसे त्यांनी आश्वस्त केले.

क्रीडाईचे अध्यक्ष श्री. जिद्दीमणी यांनी सोलापूर शहरामध्ये जर एखादी मिळकत भाडेतत्त्वावर द्यायची असल्यास 64 टक्केपर्यंत रेंट टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स कमी होणे गरज व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी तुलनात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊनत्यानंतर आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येईलअसे सांगितले.

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने प्रयत्न करून सोलापूरात स्मार्टसिटीच्या माध्यमातून प्रदर्शन केंद्राची उभारणी केल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेसदर प्रदर्शन केंद्रामुळे  वेगवेगळे प्रदर्शन भरवणे व मार्केटिंग करणे सोईचे होईल. त्यामुळे रोजगार वाढण्याची संधी मिळेल. या केंद्राला आवश्यक सहकार्य केले जाईलअसे ते म्हणाले.  

स्वागत व प्रास्ताविक राजु राठी यांनी केले. आभार नितीन बिज्जरगी यांनी मानले.

00000

वन विभागाकडील रस्ते व इतर कामांबाबत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला आढावा

सांगली दि. 16 (जि. मा. का.) : वन विभागातील रस्ते व इतर कामांबाबत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आढावा घेन प्रस्तावित कामांबाबत संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी आज येथे  दिल्या.

वन विभागाकडील रस्ते व अन्य प्रलंबित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटीलआमदार गोपीचंद पडळकरआमदार मानसिंगराव नाईकजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडीकोल्हापूर वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एच. एस. पद्मनाभा, उपवनसंरक्षक निता कट्टे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादवयांच्यासह वन व सार्वजनिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वन विभागाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यांबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. प्रस्तावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता संबंधित विभागांनी कटाक्षाने घ्यावी. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी. वन विभागाने त्यांच्या जागेतून जाणारे रस्ते व होणाऱ्या विकास कामांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवावाअशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत दिल्या.

00000

‘जी-२०’राष्ट्रांच्या अतिथी प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण

पुणे दि.१६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त श्रीमती वर्षा लढ्ढा आदी उपस्थित होते.

 

‘जी-२०’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची दोन दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरात चर्चासत्राच्या निमित्ताने विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आले असता सुरुवातीला त्यांच्या हस्ते, विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुनिंब, सोनचाफा, ताम्हण, बकुळ, सप्तपर्णी, मुचकुंद आदी वृक्षांचा समावेश आहे. वृक्षारोपण प्रसंगी काही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी वृक्षांची माहिती औत्सुक्याने जाणून घेतली.

अतिथी प्रतिनिधींचे मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने स्वागत

विद्यापीठामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर अतिथी प्रतिनिधींचे चर्चासत्राच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्य इमारत परिसरात आगमन होताच मराठमोळे ढोल- ताशे, तुतारी, लेझीम वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सुंदर अशा स्वागताने अतिथी भारावून गेले. त्यांनी उपस्थित सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व काही कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी कलाकारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही प्रतिनिधींनी जागीच फेटा बांधून घेतला व अवघ्या काही क्षणात फेटा बांधणाऱ्यांचेही कौतुक केले. काहींनी आपल्या मोबाईलमध्येही महाराष्ट्राची सांस्कृतिक छबी उत्साहाने टिपली.

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...