Saturday, December 28, 2024
Home Blog Page 17

‘लोकराज्य’ च्या दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावे – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

  • मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक

नागपूर, दि. १६ : ‘लोकराज्य’ चे दुर्मिळ अंक हे माहितीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजिटायजेशन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी विधानभवन परिसरातील लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले.

उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, लोकराज्यचे संपादक तथा संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक (माहिती)  किशोर गांगुर्डे, वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते.

महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले.

प्रदर्शनात वैविध्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक

1964 पासूनचे अंक येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंक, मराठी संगीत रंगभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा विकास व सांस्कृतिक अंक, स्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वे, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असा वैविध्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.

मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे

विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली.

भेट देणाऱ्यांमध्ये मंत्री, ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, बाबूसिंग राठोड, अबू आझमी, श्रीजया चव्हाण, सुहास बाबर, देवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून हे प्रदर्शन पाहण्यास उपलब्ध राहणार आहे.

०००

मंत्री, राज्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या ध्वनीचित्रफिती एका क्लिकवर

मुंबई दि. १६: नागपूर येथे काल राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद व गोपनियतेची शपथ दिलेले सर्व मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या शपथ घेतानाच्या ध्वनीचित्रफितींच्या लिंक्स (दुवे) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उपलब्ध करुन दिल्या आहेत.
सोबतच्या फाईलमध्ये मंत्री व राज्यमंत्र्यांच्या नावासमोरील लिंकवर क्लिक करुन व्हिडीओ पाहता, डाऊनलोड करता येतील.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांची नावे व व्हिडीओ लिंक

अ.नु मंत्री व राज्यमंत्री व्हिडीओ लिंक
चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे https://drive.google.com/file/d/1RfqzWwrGpoNUuS7UKRovRbrl6dN8wRzq/view?usp=sharing

 

राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील https://drive.google.com/file/d/18o-wv3uJw6YIQhSSBMPZIE_ekRtHNXrO/view?usp=sharing

 

⁠हसन शकिना मियालाल मुश्रीफ https://drive.google.com/file/d/1Dx1MOF12KioqAC_sw66249yPmsapWQq-/view?usp=drive_link

 

चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील https://drive.google.com/file/d/1T3z1Y2UQ_oT3vzYR1fheswT3_Ds6U-FA/view?usp=drive_link

 

⁠गिरीश गीता दत्तात्रय महाजन https://drive.google.com/file/d/1KYr9uDpvWuVhy0cL3t_Fv53PvTpaPiH9/view?usp=drive_link

 

गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील https://drive.google.com/file/d/1iH2FDQ1ADLd7iKqZcyXBgMkN_xrJ_jmT/view?usp=drive_link

 

गणेश रामचंद्र नाईक https://drive.google.com/file/d/1G543BQNHutgrniMTXCoWkjauKCmxbk6H/view?usp=drive_link

 

दादाजी रेशमाबाई दगडु भुसे https://drive.google.com/file/d/19bT6l3lz1RMUv0qV5IGgjqiekgGA3fIA/view?usp=sharing

 

⁠संजय प्रमिला दुलीचंद राठोड https://drive.google.com/file/d/1H7ccQ4WnzyjCL04EjSgQTI4c5fBPQB0p/view?usp=drive_link

 

१० धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे https://drive.google.com/file/d/1xd-B9rkf5KxIdD7O5hzYGReNCrrU1B-J/view?usp=drive_link

 

११ मंगलप्रभात गुमानमल लोढा https://drive.google.com/file/d/1XTncZGuEQqgXGjnGtUmMMH3SoAkwrG5w/view?usp=drive_link

 

१२ उदय स्वरूपा रवींद्र सामंत https://drive.google.com/file/d/19mDZz2_Fp46dB1v-XTIjSxhgnahzzsgt/view?usp=drive_link

 

१३ जयकुमार नयनकौर जितेंद्रसिंह रावल https://drive.google.com/file/d/1GO0NcXS3OmXxedAGCLJA5L5rxGR-yrC0/view?usp=drive_link

 

१४ पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे https://drive.google.com/file/d/1hi7TdyJn_zVyunbpOxSJQKZ0uXvQ80y7/view?usp=drive_link

 

१५ अतुल लीलावती मोरेश्वर सावे https://drive.google.com/file/d/1pAHAXoXpciGrf0SNAoViLs2YkNwxV9BM/view?usp=drive_link

 

१६ अशोक जनाबाई रामाजी उईके https://drive.google.com/file/d/1Q7IK8zFl6mdAOqYMZLS3tS5ks2xAS-JJ/view?usp=drive_link

 

१७ शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई https://drive.google.com/file/d/1raz5TQGdjJ7IdARtmrl7_nMRMBCqwfW6/view?usp=drive_link

 

१८ अॅड. आशिष मीनल बाबाजी शेलार https://drive.google.com/file/d/1d91j67k7-If1w3dpSc9ePRInipJgplmj/view?usp=drive_link

 

१९ दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे https://drive.google.com/file/d/1JXllH5oWdjNswJJ7AKO7Pq0hZYMrNlYA/view?usp=drive_link

 

२० आदिती वरदा सुनील तटकरे https://drive.google.com/file/d/1H8HB3d-kuumTxSLvZel4Yo1Dt4oL_vIV/view?usp=drive_link

 

२१

 

शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

 

https://drive.google.com/file/d/1XkVpc0nFGRhAmWqFYnYjnZbF0n_rI9B7/view?usp=drive_link

 

२२

 

अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे

 

https://drive.google.com/file/d/1uGaPsh5j7iCezpIg_qehbquveqa-F78C/view?usp=drive_link

 

२३ जयकुमार कमल भगवानराव गोरे https://drive.google.com/file/d/1DWSgP5de1owCV1Qjx5jfRm674sJanObO/view?usp=drive_link

 

२४ ⁠नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ https://drive.google.com/file/d/11FQrk0jh3t4H2_FoaYF78aYRJZkW6stX/view?usp=drive_link

 

२५ संजय सुशीला वामन सावकारे https://drive.google.com/file/d/17_NljYAtePI6-oS1OQ8rYtORnFk2WoTq/view?usp=drive_link

 

२६ संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट https://drive.google.com/file/d/1DnGz0wxWt_A76sGrc-Nu1bs2zZBjRV0L/view?usp=drive_link

 

२७ प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक https://drive.google.com/file/d/1HGaVXmH5Z1NUt7O2jfo_vInpNy1h0hjj/view?usp=drive_link

 

२८ भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले https://drive.google.com/file/d/1AyAH-iLKmsn08Id6XS1Bf5b0jp_u78kB/view?usp=drive_link

 

२९ मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील https://drive.google.com/file/d/1vlJR8Oy3HExgpfPtdBGTrMMBhYkQ1Ow1/view?usp=drive_link

 

३० नितेश निलम नारायण राणे https://drive.google.com/file/d/1OpHdWKYTdMFMnmX1Hbs9Bbe3fao3gV3a/view?usp=drive_link

 

३१ आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर https://drive.google.com/file/d/1bCcAA-11nBkJxzKCZTd9w6GXgIYtTt-v/view?usp=drive_link

 

३२ बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील https://drive.google.com/file/d/128gRB54r7gwEpEyumJawQdhYqyshJPI-/view?usp=drive_link

 

३३ प्रकाश सुशीलादेवी अनंतराव अबिटकर https://drive.google.com/file/d/108BA8SvVcQ8xyKq1M15cSyVgZ99tGUK9/view?usp=drive_link

 

३४

 

माधुरी मीरा सतीश मिसाळ (राज्यमंत्री)

 

https://drive.google.com/file/d/1lZldSwZouaQomBJrg0dhtBNMl3PpS-dq/view?usp=drive_link

 

३५ आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (राज्यमंत्री) https://drive.google.com/file/d/1xghyaWnDMQqCdQPJtJ190IacNk2C_fAR/view?usp=drive_link

 

३६ पंकज कांचन राजेश भोयर (राज्यमंत्री) https://drive.google.com/file/d/17TpbAVk2ZVMAgCsbM-LNMUt0TyH5JK1c/view?usp=drive_link

 

३७ बोर्डीकर मेघना दीपक चाकोरे (राज्यमंत्री) https://drive.google.com/file/d/1L-hDXiDdQDb_B7hmVoiPigc88aI9yrgP/view?usp=drive_link

 

३८ ⁠इंद्रनील अनिता मनोहर नाईक (राज्यमंत्री) https://drive.google.com/file/d/1W0Yv86Gk5Z_6SMi73nbm-HAtZDX9vxjj/view?usp=drive_link

 

३९ ⁠योगेश ज्योती रामदास कदम (राज्यमंत्री) https://drive.google.com/file/d/1x-E_BseVOw6NQyIgVPowaKtL4UJGu4Vc/view?usp=drive_link

 

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांची नावे link (1)
०००

 

कलाविश्वाचा ताल चुकला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. १६ : भारतीय अभिजात संगीताचा समृद्ध खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते.

उस्ताद अल्लारखाँ साहेबांसारखा पिता आणि गुरु त्यांना घरातच लाभला. कुरेशी घराणे हे तालविश्वातील एखाद्या नक्षत्रासारखे अढळ होते. अतिशय साधी राहाणी, आणि कुठलाही कर्मठपणा व्यक्तिमत्त्वात नसलेले उस्तादजी रसिकांना क्षणार्धात आपलेसे करत. भजनी ठेक्यापासून तबल्याचे अवघड कायदे आणि अनवट ताल त्यांच्या बोटात जणू वस्तीला होते. दिग्गज गायक-वादकांना संगत तर ते करत होतेच, पण तीन-तीन तास तबल्याची सोलो मैफल रंगवणारे बहुदा ते पहिलेच उस्ताद असतील. तबलावादनाला सरस्वतीचे पूजन मानणारा हा कुणी देवदूतच पृथ्वीवर येऊन गेला, असे आता म्हणावे लागेल.

०००

उस्ताद झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीतातील जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद  झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे.

उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले. प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अशा दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबलावादनाने मंत्रमुग्ध केले. त्याचे तबलावादन ऐकून लाखो युवक युवती तबलावादनाकडे वळले.

भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवून एकल तबलावादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साथ संगीतकार म्हणून आपला अमीट ठसा उमटवताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक संगीतकारांसोबत तबलावादन केले.

त्यांच्या निधनामुळे भारताने-विशेषतः महाराष्ट्राने आपला अत्यंत लाडका सुपुत्र व संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा गमावला आहे. झाकीर हुसेन यांचे संगीत चिरंतन राहील व संगीतकारांच्या पिढ्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरित करील. या दुःखद प्रसंगी मी दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय व लाखो संगीत चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या  शोकसंदेशात  म्हटले आहे.

०००

ज.सं.अ./ राजभवन

तालिका सभापतींच्या नावांची घोषणा

नागपूर, दि. 16 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी नियुक्त नावे जाहीर केली.

तालिका सभापती पदी सर्वश्री निरंजन डावखरे, शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, सुनील शिंदे, धीरज लिंगाडे यांच्या नावाची घोषणा श्रीमती गोऱ्हे यांनी केली.

०००

 

बीड येथील घटना गंभीर; प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 16 : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून यास सरकारने गांभीर्याने घेतले आहे. संबंधीत आरोपी व दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 289 अन्वये उपस्थित केलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या घटनेसाठी ‘सीआयडी’ची एक विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून फरार आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यांस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून एकास निलंबित करण्यात आले आहे. आरोपी कोणत्याही जाती, धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी तसेच कोणत्याही दबावाचा विचार न करता यासंदर्भात कडक  कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

0000

‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 16 : मुंबईतील बेस्ट बसच्या अपघाता़ची घटना गंभीर असून राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले की, ‘बेस्ट’ बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केली आहे. या घटनेनंतर यादृच्छिक (रॅन्डम) पद्धतीने तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदविण्यात आली असून त्या लवकरच बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत. बेस्ट बसेसची वस्तुस्थिती जाणून घेऊन उपाययोजना राबविण्यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना ‘बेस्ट’ प्रमुखांशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या पीठासीन अधिकारी होत्या.

००००

 

झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

नागपूर, १६ : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबला क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील. वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरुवात करणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबलावादनाला अत्युच्च अशा शिखरावर नेले. गाणारा तबला ही त्यांच्या जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ कलाकारांबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती. तरूण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसेन होते. साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

नागपूर, दि. १६ : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मंत्री, राज्यमंत्री व नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

यामध्ये मंत्री म्हणून सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, ॲड. आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, ॲड. माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर – साकोरे, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांचा समावेश होता.

नवनियुक्त सदस्यांचा परिचय

तसेच भावना गवळी, प्रज्ञा सातव, परिणय फुके, योगेश टिळेकर या सदस्यांसह राज्यपाल नियुक्त सदस्य धर्मगुरू बाबुसिंग राठोड या सदस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला परिचय करून दिला.

०००००

माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, दिनकरराव जाधव यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर, दि. १६ :  महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिवंगत एस. एम. कृष्णा आणि विधानपरिषदेचे दिवंगत  सदस्य दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा, माजी विधानपरिषद सदस्य दिनकरराव जाधव यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.

००००

ताज्या बातम्या

माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांचे निधन; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

0
मुंबई,  दि. 27 :-माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर...

‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी

0
मुंबई, दि. २७ : नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी...

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. 27 :  सर्वोच्च न्यायालयाने  सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत.  त्यानुसार राज्य...

मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि.२७ :सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पदकंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.१५ जानेवारी,...

राजधानीत डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीदिनी अभिवादन

0
नवी दिल्ली, 27: देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख  यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित...