मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1783

संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना समजणार निवृत्तीवेतनाचा तपशील

मुंबई, दि. 25 : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशीलwww.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना आपला हा तपशील जाणून घेता येईल, अशी माहिती अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपला निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनविषयक तपशील जाणून घेण्यासाठी   www.mahakosh.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर NIVRUTIVETANVAHINI  या टॅबवर क्लिक करावे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर लॉगिन करण्याकरिता युजरनेम PENSIONER  असे टाईप करावे. पासवर्ड ifms123  असा आहे. कॅपचा टाईप केल्यानंतर लॉगिन करावे.  लॉगिन झाल्यानंतर स्क्रीनवर वर्क लिस्ट व पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट  असे दोन टॅब दिसून येतात. पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट वर क्लिक केल्यास  निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून निवृत्तीवेतनधारकाला त्याचे दरमहा किती निवृत्तीवेतन दिले जाते याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

वर्कलिस्ट टॅब वर क्लिक केल्यास क्रियेट पेन्शनर युजर या टॅब वर क्लिक करून निवृत्तीवेतनधारकास स्वत:चे स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने त्यांचा निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक, निवृत्तीवेतन बँक खाते, अचूक नोंदवणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून क्रियेट युजर वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतनधारकाला स्वत:चे लॉगिन (युजर नेम व पासवर्ड) उपलब्ध होईल. या नवीन युजर नेम आणि पासवर्ड ने लॉगिन केल्यानंतर निवृत्तीवेतनधारकास स्वत:च्या निवृत्तीवेतनाची तपशीलवार माहिती उपलब्ध करून घेता येईल, निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे ही अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.

००००

राज्यातील जनतेला राज्यपालांकडून दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना गरीब, उपेक्षित आणि निराधार लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करुया. राज्यातील सर्व लोकांना दीपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Maharashtra Governor extends Diwali greetings to people

Mumbai, 25th Oct : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has conveyed his greetings to the people of Maharashtra on the eve of Diwali.  In a message to the people, the Governor has said:

“May Deepawali, the festival of lights bring happiness, prosperity and peace in the lives of all the people. This is an occasion to spread and share our happiness with the poor, the under privileged and the less fortunate. I extend my warmest greetings to the people on the auspicious occasion of Diwali.”

0000

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’

मुंबई,दि. 25 : प्रसारभारतीच्या  न्यूज ऑन एअर या ॲपवर  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  विशेष निवडणूक वार्तापत्रदि. 26 ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७. ४० या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आकाशवाणीवरील’दिलखुलासकार्यक्रमात विशेष निवडणूक वार्तापत्रशनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते   ७. ४० या  वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ‍नाशिक, जळगाव, कोल्हापूर,परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या २२ आकाशवाणीकेंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.

मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार

मुंबई, दि. 25 : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.

लोकशाही बळकटीकरणासाठी2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क – श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली – 110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/25.10.2019

000000

माध्यम संस्थाओं को मतदाता जनजागरण के लिए

निर्वाचन आयोग की ओर से मिलेगा पुरस्कार

मुंबई, दि. 25 : लोकशाही के राष्ट्रीय उत्सव रहे चुनाव में मतदाताओं ने सक्रिय सहभागिता दर्ज करने के लिए जनजागरण करनेवाले प्रसार माध्यम संस्थाओं को प्रथमत: ही राष्ट्रीय पुरस्कार से भारत निर्वाचन आयोग की ओर से सम्मानित किया जाएगा। भारत निर्वाचन आयोग के जरिए मुद्रित माध्यम,  टेलीविज़न, रेडियो और ऑनलाईन (इंटरनेट) /सोशल मीडिया इन चार गुटों में यह पुरस्कार दिया जाएगा।

लोकशाही को मजबूत करने के लिए वर्ष2019 में हो रहे चुनाव में ज्यादा से ज्यादा मतदान हो सके, इसके लिए चुनाव की पूरी प्रक्रिया के संदर्भ में जनजागरण, आम जनों में मतदान  जागृति और मतदाता पंजीयन के लिए विशेष प्रयास करनेवाली प्रसार माध्यम संस्थाओं को 25 जनवरी 2020 को आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम में यह पुरस्कार दिया जाएगा। मतदाता जागृति अभियान, बड़े पैमाने पर विशेष प्रसिद्धी, जनता पर इसका प्रभाव इन सभी निष्कर्षों के आधार पर पुरस्कार का चयन किया जाएगा। इसके लिए माध्यम संस्थाओं ने 31 अक्तूबर 2019 तक आवेदन करने का आवाहन भारत निर्वाचन आयोग के अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण ने किया है।

प्रसार माध्यम अंग्रेजी तथा हिंदी में प्रवेशिका भेज सकते है। अन्य किसी भी भाषा में स्पर्धा के लिए प्रवेशिका भेज सकेंगे। लेकिन इसके साथ अंगेजी भाषा  में अनुवादित की हुई एक प्रत संलग्न करना होगा।  संपर्क है – श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निर्वाचन आयोग,  निर्वाचन सदन, अशोका रोड, नई दिल्ली – 110001, ई-मेल- media.election.eci@gmail.com, तथा diwaneci@yahoo.co.in,  दूरध्वनी क्र. 011-23052133.

००००

Election commission will give award to media organizations for voter awareness

Mumbai, 25 : The “Media organizations that raise awareness about the voters’ active participation in the elections, which are the national celebration of democracy, will be honored by the Election Commission of India for the first time. The awards will be given to four groups – print media, television, radio and online (internet) / social media through the Election Commission of India” informed Pawan Diwan, Under Secretary (Communication) Election Commission of India.

He further stated that the awards would be given at the National Voters Day event on January 25, 2020, to the media organizations that make special efforts for public awareness, voting awareness among the general public and voter registration, to ensure maximum voting in the 2019 elections for the strengthening of democracy. The awards would be chosen based on the criteria for voter awareness campaign, large scale publicity, and influence on the public. The media organizations should apply for this by October 31, 2019.

The media organizations should send applications in English and Hindi. Application for this contest can be sent from any other language. However, the copy translated from English will have to be attached. Contact – Mr. Pawan Diwan, Under Secretary (Communication), Election Commission of India, Election House, Ashoka Road, New Delhi – 110001, Email-media.election.eci@gmail.com, or diwaneci@yahoo.co.in, Telephone no. 011-23052133.

0000

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर

मुंबई, दि. 25 – प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली.

या अधिसूचनेद्वारे नवीन विधानसभा गठित झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री.सिंह यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना सांगितले. या अधिसूचनेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतदारसंघनिहाय तसेच राजकीय पक्षनिहाय नावे देण्यात आली आहेत.

राज्यातील निवडणूक मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी आयोगाने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली.

यावेळी भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अनुज जयपुरीयार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड व अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर हे उपस्थित होते.

**

State Chief Electoral Officer presents List of Elected Assembly Members to Governor

Mumbai Dt.२५ – The State Chief Electoral Officer of Maharashtra Baldev Singh today presented the list of elected members to the Legislative Assembly to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Friday (२५th Oct).

Baldev Singh told the Governor that with the publication of the Notification of the Election Commission of India, the new Maharashtra Legislative Assembly has been constituted. The Notification contains constituency-wise and party-wise list of members elected to the State Legislative Assembly.

The State Chief Electoral Officer apprised the Governor about the efforts taken for the conduct of free and fair elections.

Principal Secretary of the Election Commission of India Anuj Jaipuriyar, Additional Chief Electoral Officer Dilip Shinde, Joint Chief Electoral Officers Shirish Mohod and Anil Valvi were present.

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. 23 : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी  पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

मतमोजणी उद्या सकाळी8 वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे ईटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्राँग रूमपासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्व्हर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील.  सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँग रूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

मंत्रालयात एलईडीवर निकाल प्रदर्शित करणार

मंत्रालयात निकालाची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने व्यवस्था केली आहे. मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एलईडी स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तात्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्याresults.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘Voter Helpline’ या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ॲपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.23.10.2019

मतगणना की सभी तैयारियां पूरी;

पच्चीस हजार से अधिक कर्मचारियों की नियुक्ति

अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी जानकारी

मुंबई, दि. 23 : राज्य में 288 विधानसभा निर्वाचन क्षेत्र के सार्वत्रिक और सातारा लोकसभा निर्वाचन क्षेत्र के उपचुनाव के दि. 24 को हो रहे मतगणना की सभी तैयारियां पूरी हो चुकी है। इसके लिए पच्चीस हजार से अधिक अधिकारी-कर्मचारियों की मतगणना के लिए नियुक्ति किए जाने की जानकारी अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने आज दी।

मतगणना कल  (गुरुवार) को सुबह8 बजे शुरू होगी। इस बीच सभी मतगणना कर्मचारियों को मतगणना का 2 बार प्रशिक्षण दिया गया है। 269 जगहों पर 288 केंद्रों पर यह मतगणना होगी। एक निर्वाचन क्षेत्र के लिए मतदान केंद्र की संख्या के अनुसार 14 से 20 टेबल रखे जाते है। एक टेबल के लिए एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दो सहायक ऐसे तीन मतगणना कर्मचारी और प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक होता है। निर्वाचन क्षेत्र के  5 बूथ के वीवीपॅट के पर्ची की गणना की जाती है। यह पाँच बूथ पर्ची लगाकर उम्मीदवार तथा किंवा उनके प्रतिनिधि और निरीक्षक की उपस्थिति में चयनित किए जाते है। वीवीपॅट के पर्ची के मत और ईवीएमव के मतों जांच इस समय की जाती है।  प्रारंभ में टपाली मत और बारकोड के द्वारा इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) के मत गिने जाएंगे।

प्रत्येक टेबल पर मतगणना के लिए उम्मीदवारों के प्रतिनिधि उपस्थित रह सकते है।  प्रत्येक टेबल को स्ट्रॉंग रूम से ईवीएम लाने-ले जाने के लिए अलग से कर्मचारी नियुक्त किए गए है।

स्ट्रॉंगरूम एंव मतगणना केंद्रों में  सीसीटीवी लगाए गए है।  स्ट्रॉंगरूम से मतपेटी बाहर निकालना, मतगणना और उसके बाद पेटियाँ स्ट्रॉंग रूम जमा करना, इन सभी बिन्दुओं का वीडियो बनाए जाएंगे।

मतगणना प्रक्रिया के दौरान भारत निर्वाचन आयोग के निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित रहेंगे। फेरीनिहाय मतगणना की घोषणा निर्वाचन निर्णय अधिकारी करेंगे। आम जनता को मतगणना की जानकारी मिले, इसके लिए मतगणना केंद्रों के बाहर ध्वनिक्षेपक लगाए गए है।

मतगणना केंद्रों पर आवश्यकता के अनुसार पुलिस का पहरा भी रखा गया है। स्ट्रॉंगरूम को केंद्रीय सशस्त्र पुलिस बल, राज्य राखीव पुलिस बल  और स्थानीय पुलिस ऐसे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था उपलब्ध की गई है।

मंत्रालय में एलईडी पर परिणाम प्रदर्शित करेंगे

मंत्रालय में परिणामों की जानकारी देने के लिए मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय ने व्यवस्था की है। मंत्रालय के सामने स्थित सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के एलईडी स्क्रीन पर भी परिणाम प्रदर्शित किया जाएगा। प्रत्येक विधानसभा निर्वाचन क्षेत्र के मतगणना केंद्र के बाहर पत्रकारों को तत्काल परिणाम उपलब्ध कराने के लिए माध्यम कक्ष लगाया गया है।

भारत चुनाव आयोग के results.eci.gov.in  इस वेबसाइट पर और  ‘Voter Helpline’ इस गुगल प्लेस्टोअर पर उपलब्ध अँड्रॉइड ऍप पर निर्वाचन क्षेत्र के फेरीनिहाय परिणामराज्य के पक्षनिहाय जो आगे है उन (आघाडी) उम्मीदवार, विजयी उम्मीदवार, पक्षनिहाय मतदान का प्रतिशत आदि की जानकारी भी उपलब्ध होगी।

००००

 

All preparations of vote counting are complete;

More than twenty-five thousand employees have been appointment

Information by Additional Chief Electoral Officer Dilip Shinde

Mumbai, 23.Oct.19: “All preparations for the counting of votes of the general elections of 288 Assembly constituencies in the State and by-election of Satara Lok Sabha constituencies are completed. Results of both elections will be displayed on October 24. More than 25,000 officers and staff have been appointed for the counting. ” informed Additional Chief Electoral Officer, Dilip Shinde.

He further stated that counting begins at 8am on October 24. Meanwhile, all counting staff have been trained for counting for couple of times. Votes would be counted at 288 centers in 269 places. Around 14 to 20 tables are kept for the number of polling booths for a constituency. For a table there is a supervisor, two assistants, three counting staff, and one subordinate observer. Counting of VVPAT of five booths of the constituency take place on this occasion. These five booths are selected in the presence of candidates or their representatives and inspectors. Votes on VVPAT and on EVM would be verified. Initially, ETPB (electronically transmitted postal ballet) will be calculated by postal opinion and barcode.

“Candidate representatives can be present for each table which to be counted. Separate staff are assigned to move EVMs from the Strong Room to each table. CCTVs have been installed in the Strong room and vote counting centers. The video will be filmed showing the ballot box counting from the strong room and then keeping the boxes again to the strong Room.

Observers of the Election Commission of India will be present during the entire counting process. Round wise vote counting will be announced by Election decision officers. The soundtracks have been installed outside the counting center to allow the general public to get counting information” said Mr. Shinde.

He further informed that adequate police arrangements have been made at the counting center. Strong room has been provided with three-level security arrangements such as Central Armed Police Force, State Reserve Police Force and Local Police.

The results will display on the LED in the Ministry

The Chief Electoral Officer’s Office has made arrangements to inform the Ministry about the results of the election. The results will also be displayed on the LED screen of the Directorate General of Information and Public Relations. Media rooms have been set up outside the counting center of each constituency to provide immediate results to journalists.

Information will be available on the Election Commission of India’s website results.eci.gov.in as well as ‘Voter Helpline’ on Android app available on the Google play store. Information will also be available for the round wise results of the constituency, party-wise candidate from all over the state, the winning candidate, the percentage of the party-wise voting.

0000

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 23 : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय किंवा अन्य कोणत्याही बाह्य यंत्रणेशी जोडली किंवा त्याद्वारे नियंत्रित केली जाऊ  शकत नाहीत. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जॅमर्स लावण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

        

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी’नेटवर्क जॅमर्सलावण्याच्या तसेच अन्य मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या मागणीच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात पुढे माहिती देण्यात आली आहे की, मतमोजणी फेरीनिहाय केली जाते. त्या फेरीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील फेरीच्या मतमोजणीच्या ईव्हीएम मतमोजणी केंद्रात आणल्या जातात.

        

व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची ईव्हीएममधील मतांशी पडताळणीसाठी निवडावयाची मतदान केंद्रे चिठ्ठी टाकून निवडली जातात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. यासाठीच्या मतदान केंद्रांची निवड ही उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत केली जाते.

        

फेरमतमोजणीबाबतची तरतूद’निवडणूक संचालन नियम, 1961′ च्या नियम 56-डीनुसार निर्धारित केलेली आहे. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे कार्यवाही केली जाते.

        

सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू आणि अन्य विरुद्ध भारत सरकार आणि अन्य या रिट याचिका क्र.273/2019 मध्ये दि. 8 एप्रिल 2019 च्या निकालातील निर्देशानुसार प्रत्येक मतदारसंघात 5 व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाते, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे आहे.

000

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

राज्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण18पुरस्कार

नवी दिल्ली दि. 23 : पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कारानेआज  गौरविण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (बु) ग्रामपंचायतीला‘नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारानेतर राज्यातील एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि 14 ग्रामपंचायतींना दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने’  सन्मानित करण्यात आले.   

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा परिसरातील सी सुब्रमन्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2019’  प्रदान करण्यात आले. यावेळी छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू राज्यांचे पंचायतराज मंत्री तसेच केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा, अपर सचिव संजयसिंह मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण 5 श्रेणींमध्ये देशातील विविध राज्य, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना एकूण 246 पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला तीन श्रेणींमध्ये  एकूण 19  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पंचायतराज क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध इलेक्ट्रॉनिक्स सेवांची प्रभावी अंमलबजावणी  केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाच्या‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कारानेगौरविण्यात आले. राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्रामसभांच्या माध्यमातून गावांचा सामाजिक व आर्थिक विकास केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याच्या लोणी (बु.) ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्वच्छता,नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, ई-प्रशासन यांच्यासह नागरिकांना उत्तमरित्या शासनाच्या सेवा पुरविल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समिती आणि बुलढाणा  जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीला दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरणपुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्यातील  14 ग्रामपंचायतींना‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरणपुरस्काराने गौरविण्यात आले. यात सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्याच्या अंकलखोप ग्रामपंचायत, गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सिरेगांव, नागपूर जिल्हयातील मौदा तालुक्याच्या चिरव्हा ग्रामपंचायत याच जिल्हयातील कामठी तालुक्याच्या कढोली ग्रामपंचायत, अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील चंद्रपूर ग्रामपंचायत, गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा तालुक्याच्या सुदंरनगर, रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील धौलवेलीअहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या खदांबे (खु.), भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या बनवडी, अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील पुसदा, सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कंसगली, बुलढाणा जिल्हयाच्या शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या वियाहद (खु)  या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.238/ दि.23.10.2019

                   

दक्षता जागृती सप्ताह २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान; यावर्षीची संकल्पना ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ’

मुंबई, दि. 22 : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी राज्यात सन 2000 पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. भ्रष्टाचार निर्मुलन, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर परिणाम आणि धोके याविषयी परिणामकारक जनजागृतीचे माध्यम म्हणून केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) जनजागृती सप्ताहाकडे विशेष लक्ष केंद्रित करते. यावर्षी आयोगाने ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ’ या संकल्पनेनुसार जनजागृतीवर भर देण्याचे निश्चित केले आहे.

राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था व स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. त्यानंतर राज्यपालांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येणार असून हा संदेश राज्यातील जनतेसाठी प्रसूत करण्यात येईल.

या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावण्यात येणार आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विशेष पुस्तिकांचे प्रकाशन करणे तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या http://www.cvc.nic.in या संकेतस्थळावरील जनजागृती साहित्याचे जनतेमध्ये वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

नवलेवाडी येथील मतदान प्रक्रिया सुरळित

सातारा, दि.22 :विविध इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 250 नवलेवाडी ता. खटाव जिल्हा सातारा येथे 45 सातारा लोकसभा पोटनिवडणूक व 257 कोरेगांव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता मतदान प्रक्रियेबाबत बातमी प्रसिद्ध झाली. दिनांक 21 / 10 / 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता उमेदवार प्रतिनिधी दीपक रघुनाथ पवार (एनसीपी) व दिलीप आनंदराव वाघ (एनसीपी) हे अभिरुप मतदानावेळी उपस्थित होते, अभिरूप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. किंबहुना सकाळी 7.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असताना कोणत्याही मतदारांनी असा आक्षेप घेतला नाही. दीपक रघुनाथ पवार यांनी दुपारी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र 15 भरुन देणेबाबत सांगितले तथापी त्यांनी तसे करण्यास नकार दिला. तद्नंतर सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.

सदर तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच अशी कोणतीही घटना घडलेली नाही. असे कीर्ती नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी 257-कोरेगांव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, कोरेगांव यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....

विधानसभा लक्षवेधी 

0
डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई - मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १: डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन...