बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 1811

विधानसभेत दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे आदरांजली

मुंबई, दि. 1 : विधानसभेचे माजी सदस्य यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडून आदरांजली अर्पण केली.

माजी विधानसभा सदस्य सर्वश्री भिकाजी जिजाबा खताळ, गोविंदराव शिवराम चौधरी, प्रभाकर सुंदरराव मोरे, केशवराव नारायणराव उर्फ बाबासाहेब पाटील-धाबेकर, डॉ.शंकरराव रघुनाथ राख व माजी मंत्री तुकाराम सखाराम दिघोळे, मारुती देवराम तथा दादासाहेब शेळके, नवनीतराय भोगीलाल शहा, विठ्ठलराव बापुराव खादीवाले, सूर्यभान सुकदेव गडाख, जयंत ईश्वर सोहनी, प्रभाकर बाबुराव मामुलकर, हरिष उकंडराव मोरे, जगन्नाथ अच्छन्ना शेट्टी, रामदास गंगारामजी सोनोने, शिवशंकरप्पा विश्वनाथ उटगे, सखाराम विठोबा अहेर, शमीम अहमद शेख, पुरुषोत्तम गुलाबराव मानकर, श्रीमती वहारीबाई दिंगबरराव पाडवी, श्रीमती सुमनबाई शिवाजीराव पाटील, लिलाबाई रतिलाल मर्चंट यांच्या दुख:द निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला होता.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोकभावना व्यक्त करुन आदरांजली अपर्ण केली.

विधानमंडळाचे विशेष अधिवेशन संस्थगित; हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये

 

मुंबई, दि. 1 : मुंबईतील विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबर 2019 पासून नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.

विधानपरिषद व विधानसभेचे आजचे कामकाज राष्ट्रगीताने संपले आणि सभागृह संस्थगित करण्यात आले.

अनिल गोंडाणे यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची मोठी हानी- सुभाष देसाई

मुंबई, दि. 1 : माजी विधानपरिषद सदस्य अनिल गोंडाणे यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात मंत्री सुभाष देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आज विधानपरिषदेत दिवंगत अनिल गोंडाणे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

श्री. देसाई यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. या शोकप्रस्तावावर  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई गिरकर, प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, शरद रणपिसे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

उद्या सायंकाळी चार वाजता विधानपरिषदेची बैठक

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक उद्या दि. 1 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 4.00 वाजता भरविण्यात येणार आहे. विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत. याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून सकाळी 11.00 वाजता कामकाज सुरू होणार आहे, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव यांनी कळविले आहे.

समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया – विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

विश्वासदर्शक ठराव १६९मतांनी संमत

मुंबई दि.३० : मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून  महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले. 

मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव १६९मतांनी संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज झाले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे, त्याबद्दल मी आभार मानतो.  तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडिलांचे स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्याची  शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

देशात अनेक राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून हे दैवत या मातीत जन्माला आले आहे.  हे राज्य साधू-संतांचे,वीरांचे आणि समाजसुधारकांचे आहे. मी मैदानातला माणूस असून वैधानिक वातावरणात आलो आहे, ते महाराष्ट्र घडविण्यासाठी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान,सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले.  ठरावाच्या विरोधात मतदानासाठी  सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हता.  सदस्य श्री.अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य सर्वश्री जयंत पाटील,नवाब मलिक,सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले.  विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील,छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात,एकनाथ शिंदे,सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण,अबू आझमी,हितेंद्र ठाकूर,बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. 

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,जयंत पाटील,छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात,डॉ.नितीन राऊत या सदस्यांना परिचय करून दिला.

गदिमा, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांना ‘अलौकिक त्रिमूर्ती’च्या माध्यमातून स्वरांजली!

मुंबई, दि. 30 : गदिमा, पु. ल.आणि बाबूजी या तिन्ही सारस्वतांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अक्षरसाहित्य आणि गाण्यांवर आधारित अलौकिक त्रिमूर्तीया विशेष कार्यक्रमाद्वारे शब्दसुमनांजली आणि स्वरांजली   वाहण्यात आली.  सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाच्या वतीने  प्रभादेवी  येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

       

यावेळी  ग.दि.माडगूळकरांचे  सुपुत्र प्रख्यात लेखक आनंद माडगूळकर, बाबूजींचे सुपुत्र प्रख्यात गायकसंगीतकार  श्रीधर फडके , सांस्कृतिक कार्य  विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य  विभाग उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य  विभाग संचालक विभीषण चवरे,  सांस्कृतिक कार्य  विभाग सह संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होते.  अभिनेते ऋषिकेश जोशी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाची संहिता, संशोधन आणि आखणी केली.

महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारे अष्टपैलू लेखक  पु. ल. देशपांडे आणि मराठी माणसाच्या हृदयावर आपल्या सुरांनी आपले नाव कोरणारे बाबूजीम्हणजेच लाडके संगीतकार सुधीर फडके या त्रयीने आपल्या प्रतिभेने महाराष्ट्रात आपले युग निर्माण केले आणि कित्येक दशके मराठी मनावर कायम अधिराज्य गाजवले. ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी मिळून मराठी चित्रसृष्टीत आपले एक युग निर्माण केले. या दोघांची अनेक अजरामर गीते अलौकिक त्रिमूर्तीया कार्यक्रमात यावेळी सादर करण्यात आली . या कार्यक्रमामध्ये नचिकेत लेले  यांनी “कानडा राजा पंढरीचा”,”तुझे गीत गाण्यासाठी “, “निजरूप  दाखवा हो ” , “स्वये श्री रामप्रभू” आणि “माझे जीवन गाणे”ही गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या बरोबरच हृषिकेश रानडे याने “एक धागा सुखाचा ”, “झाला महार पंढरीनाथ”, “ने मजसी ने परत मातृभूमीला”, “घन घन माला”, ” वेदमंत्राहून आम्हा” हे गाणे सादर केले.बाबूजींची काही अजरामर गाणी या कार्यक्रमात सादर केली.तसेच “विकत घेतला  श्याम”, “माझा होशील का”,”एकाच या जन्मी  जणू “, “जाळीमंदी पिकली करवंद “आणि  “त्या तिथे पलीकडे”हे चित्रगीत भावगीत गायनात स्वत:चा अनोखा ठसा उमटवलेल्या मालती पांडे  यांची नात म्हणजेच प्रियांका बर्वे हिने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. केतकी भावे जोशी यांनी “या सुखांनो या “, “जिवलगा कधी रे येशील तू “, “नाच रे मोरा “आणि उसाला लागलं कोल्हा”, ही गाणी आपल्या खास शैलीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

      

साक्षात पु.ल साकारण्यासाठी प्रसिध्द असलेले आनंद इंगळे आणि संजय मोने  यांनी “पु.लं. आणि बबडू” हा अभिनय सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच मी ब्रह्मचारी असतो तर, असा मी असामी, बिगरी ते म्याट्रिक, गदिमांच्या दिलदारपणाचा प्रसंग पुलकित गदिमा, माझे खाद्यजीवन अभिवाचन केले. कार्यक्रमामध्ये यावेळी ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी, किस्से चित्रफितीच्या माध्यमातून  त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजेच श्रीधर फडके,  आनंद  माडगूळकर, दिनेश ठाकूर, अभिनेते रमेश देव, अभिनेत्री  सीमा देव, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ  ध्वनिमुद्रक रवींद्र साठे, या मान्यवरांनी  जागवल्या.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवारी उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

मुंबई,दि.30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि.2,मंगळवार दि.3  डिसेंबर2019रोजी सकाळी7.25  ते7. 40या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान,कामगारमंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य त्याचबरोबरऔरंगाबादमध्ये झालेल्या तीन दिवसीय जागतिक बैाध्द धम्म परिषदेचा उद्देश,या बौध्द परिषदेची फलनिष्पत्ती आदी विषयांची माहिती डॉ. कांबळे यांनी‘दिलखुलास’या कार्यक्रमातून दिली आहे.

तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने जनसेवक हरपला – मुख्यमंत्री

मुंबई दि.30- माजी  राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने संवेदनशील जनसेवक हरपला  आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, माजी राज्यमंत्री दिघोळे यांनी 1985  ते 1999 या कालावधीत तीन वेळेस आमदार म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडले. युती सरकारच्या काळात ऊर्जा आणि ग्रामविकास खात्याचे  राज्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. त्यांनी नाशिक येथील व्ही.एन. नाईक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि  सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे शैक्षणिक, राजकीय, सहकार  आणि  सामाजिक क्षेत्रातील कार्य नेहमीच स्मरणात राहील.

अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.30 :जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सांताक्रूझ-कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका हे पद भरण्यात येणार आहे. महिलांसाठी असलेले हे पद कंत्राटी पद्धतीचे असून या पदासाठी23डिसेंबर2019पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता व इतर अटी पुढीलप्रमाणे आहेत.1.अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य), 2.शिक्षण- एस.एस.सी. पास, 3.एमएससीआयटी उत्तीर्ण व टंकलेखन (टायपिंग) येणाऱ्यास प्राधान्य, 4.वयोमर्यादा-30ते50वर्षे, 5.मानधन रु.17,823/-दरमहा एवढा देण्यात येणार आहे.

अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक23डिसेंबर2019असून मुलाखतीची तारीख– 24डिसेंबर2019  अशी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कमांडर मिनल मधू पाटील यांनी केले आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ता – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,मुंबई उपनगर, 9वा माळा प्रशासकीय इमारत,शासकीय वसाहत,बांद्रा पूर्व,मुंबई -400 051,दूरध्वनी– 26552172

भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 30 :  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन,समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.

‘लीडरशिप,पोलिटिक्स गव्हर्नन्स’हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या अभ्यासक्रमाचे संचालक देवेंद्र पै तसेच विविध राज्यातील विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

0000

Student-Delegates from Indian Institute of Democratic Leadership meet Governor

Mumbai, Dt. 30 :A group of student delegates from the Indian Institute of Democratic Leaderhip met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Saturday (30th Nov).

The delegates had an informal discussion with the Governor on issues of good governance and social service.

The students are undergoing a one year Post graduate programme in Leadership, Politics and Governance at the Indian Institute of Democratic Leadership, an initiative of the Rambhau Mhalgi Prabodhini.

0000

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

0
आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य...

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, दिवसभरात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...