बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 1810

साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

             

    

नवी दिल्ली,2 :  महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात295कोटी13लाख2हजार500रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण1हजार221कोटी65लाख89हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना295कोटी13लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण258कोटी3लाख47हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 37कोटी  9लाख55हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण1हजार10कोटी42लाख  8  हजार400रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 211कोटी23लाख81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२५९/  दिनांक2/12/2019    

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’

नवी दिल्ली, दि.2 :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’दिले आहे.यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने‘पर्यावरण अभ्यास संस्था,डेन्मार्क’या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला.एकूण4उत्कृष्ट मानकांच्या33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट13समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो.लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते.याच समुद्र किनाऱ्याची‘पर्यावरण अभ्यास संस्था,डेन्मार्क’ने एकूण4उत्कृष्ट मानकांच्या  33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली.

पर्यावरण शिक्षण आणि माहिती,आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता,पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ही  माहिती दिली.

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२६०/  दिनांक2/12/2019    

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबई, दि. : देशविदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देशविदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरिझम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरिझम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरु करता येईल का याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात एखादे योग्य ठिकाण शोधून तिथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन थीम बेस्डसंग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सिंधुदुर्गमधील सबमरिन पर्यटन प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

रायगडाचा सर्वांगीण विकास

रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या ६०६ कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे. या निधीतून रायगड किल्ला आणि परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल. यातून देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करुन त्यांना शिवरायांचा इतिहास दाखविण्याबरोबरच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.०२.१२.२०१९

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि. 1 : 14 व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना फाल्गुनराव पटोले यांची निवड करण्यात आली आहे.

किसन कथोरे यांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, डॉ.तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे यांनी श्री. पटोले यांच्या नावाला अनुमोदन दिले.

००००

विधानसभा अध्यक्ष पद पर नाना पटोले का निर्विरोध चयन

मुंबई; १ : नाना फाल्गुनराव पटोले को 14 वीं विधानसभा के अध्यक्ष के रूप में चुना गया है।  किसन कथोरे द्वारा अपना नाम वापस लिये जाने से यह चयन निर्विरोध हुआ। मंत्री श्री एकनाथ शिंदे, सदस्य श्री हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे ने श्री पटोले के नाम का अनुमोदन किया।

००००

Nana Patole Elected Unopposed as Speaker of the Assembly

Mumbai ; 1 : Nana Patole has been elected as the Speaker of 14th Maharashtra Legislative Assembly. He was elected unopposed after Kisan Kathore withdrew his nomination. Minister Eknath Shinde, Member Shri Hassan Mushrif, Tanaji Sawant, Dattatray Bharne approved Shree Patole’s name.

००००

विधानसभेचा गौरव राखण्याचा प्रयत्न करेन- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नवनिर्वाचित अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई, दि. 1 : संसदीय लोकशाहीत विधानसभेची गौरवास्पद परंपरा आहे. या परंपरेचा गौरव राखण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत सांगितले.

अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सभागृहाने केलेल्या अभिनंदनाला उत्तर देताना श्री. पटोले बोलत होते. 14 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

श्री.पटोले म्हणाले, येथे Discuss, Debate, Dialogue & Do Not Disturb या चार D वर आधारित कामकाज करत असताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यातील वंचित घटकांना न्याय देण्याची माझी भूमिका राहील, शेतकरी तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला सभागृहाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न राहील.

कोणावरही अन्याय होऊ देऊ नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याची विधानसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च स्थानी आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका अध्यक्षांनी घ्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. श्री. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या श्री.पटोले यांचा स्वभाव हा बंडखोर आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपलं मत मांडत असताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा नेता आहे. त्यांनी समाजातील विविध घटकांच्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही सांभाळून घेत योग्यवेळी समज देवून कामकाज चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

विरोधी पक्षाकडूनही सहकार्याची अपेक्षा- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकहितांच्या बाबींवर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडले जात असताना अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. श्री.पटोले यांनी दोन्ही बाजूला काम केलेले असल्याने दोन्ही बाजूच्या आशा आणि अपेक्षा त्यांना माहिती आहे. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला फायदा होईल. आतापर्यंत या पदावर काम केलेल्या सर्व अध्यक्षांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. या पदाची गरिमा ते राखतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सदस्य सर्वश्री अजित पवार, अशोक चव्हाण, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, हितेंद्र ठाकूर, अबु आझमी, बच्चू कडू, श्रीमती मनीषा चौधरी, जितेंद्र आव्हाड, संजय कुटे, आशिष जयस्वाल आणि ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अभिनंदनपर भाषण केले.

0000

नवनिर्वाचित अध्यक्ष का मुख्यमंत्री ने किया स्वागत

विधानसभा का गौरव बनाए रखने के लिए प्रयास करूंगा– विधानसभा अध्यक्ष नाना पटोले 

मुंबई दि. 1 : संसदीय लोकशाही में विधानसभा की गौरवास्पद परंपरा रही है। इस परंपरा को बनाए रखने में मैं पूरी तरह से प्रयास करूंगा, यह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ने आज विधानसभा में कहा। अध्यक्ष के रूप में चयन होने के बाद सभागृह में हुए अभिनंदन पर अपनी भावना व्यक्त करते हुए वे बोल रहे थे। 14 वें  विधानसभा के अध्यक्ष पद पर उनका निर्विरोध चयन होने पर उन्होंने कृतज्ञता व्यक्त की।

श्री. पटोले ने कहा कि यहाँ पर Discuss, Debate, Dialogue & Do Not Disturb इन चार D पर आधारित कामकाज करते हुए आप सभी का सहयोग आवश्यक है। राज्य के वंचित वर्गों को न्याय देने में मेरी भूमिका रहेगी। किसान एवं राज्य के प्रत्येक वर्ग को सभागृह के माध्यम से न्याय देने के लिए मैं हमेशा प्रयासरत रहूँगा।

किसी पर भी अन्याय न हो– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य की विधानसभा यह लोकशाही में उच्चतम स्थान पर है। विधानसभा अध्यक्ष के रुप में  काम करते समय किसी पर भी अन्याय न हो, इस तरह की भूमिका अध्यक्ष की होगी, यह आशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज यहाँ पर व्यक्त की।  श्री. नाना पटोले की विधानसभा अध्यक्ष के रूप में नियुक्ति होने पर मुख्यमंत्री ने उनका अभिनंदन किया।

मुख्यमंत्री श्री.ठाकरे ने कहा कि भंडारा जिले में एक किसान परिवार से आए श्री.पटोले का स्वभाव  बंडखोर और अन्याय पर आवाज उठानेवाला है। अपना विचार रखते हुए किसी की भी पर्वा न करते हुए बहुत साहस एवं धैर्य से आगे बढ़नेवाले नेता में वे है। उन्होंने समाज के विविध वर्गों के अधिकार एवं उनके हक के लिए समय-समय पर आवाज उठाया है। विधानसभा अध्यक्ष के रुप में सत्ताधारी और विरोधी पक्ष दोनों को भी संभालते हुए उचित समय पर मार्गदर्शन करते हुए कामकाज चलाने का ज़िम्मेदारी उन पर होगी।

अध्यक्ष  से सहयोग की अपेक्षा– विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस 

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि जनहित को लेकर अपनी बात रखते हुए अध्यक्ष की ओर सहयोग की अपेक्षा करूंगा । श्री. पटोले ने दोनों तरफ काम किया है, इसलिए दोनों तरफ की आशा और अपेक्षा उन्हें पता है और उनके अनुभव का सभागृह को फायदा होगा। अब तक इस पद पर काम किए हुए सभी अध्यक्षों ने उत्तम कार्य किया है। वे इस पद गरिमा को बनाए रखेंगे, यह विश्वास उन्होंने इस दौरान व्यक्त किया।

विधानसभा अध्यक्ष के चयन के बाद  मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटिल, बालासाहेब थोरात, सदस्य सर्वश्री अजित पवार, अशोक चव्हाण, पूर्व अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबल, हितेंद्र ठाकूर, अबु आझमी, बच्चू कडू, श्रीमती मनिषा चौधरी, जितेंद्र आव्हाड, संजय कुटे, आशिष जयस्वाल और ॲड श्रीमती यशोमती ठाकूर ने अभिनंदन पर भाषण किया।

0000

तालिका अध्यक्षांची यादी जाहीर

मुंबई, दि. 1 : विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर, सदस्य सर्वश्री शंभूराज देसाई, नवाब मलिक आणि कालिदास कोळंबकर यांच्या नियुक्तीची घोषणा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

0000

तालिका अध्यक्षों की सूची जारी

मुंबई, दि. 1 : विधानसभा तालिका अध्यक्ष के रूप में एडवोकेट श्रीमती यशोमती ठाकुर, सदस्य सर्वश्री शंभूराज देसाई, नवाब मलिक तथा कालिदास कोळंबकर की नियुक्ति की  घोषणा प्रो-टेम अध्यक्ष दिलीप वळसे-पाटिल ने की.

००००

List of Talika Speakers Released

Mumbai 1: The appointment of Advocate Smt. Yashomati Thakur, Members Sarvashri Shambhuraj Desai, Nawab Malik and Kalidas Kolambkar as the Talika Speaker of the Legislative Assembly was announced by Pro-tem Speaker Dilip Valase-Patil.

सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड 

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.

निवडीनंतर श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोध हा शब्दच मला मान्य नाही. त्यामुळे यापुढील काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया.

विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेतेपदी श्री. फडणवीस यांची निवड करण्यात येत असल्याचे घोषीत केले. सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह उपस्थित मंत्री आणि सदस्यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.

निवडीनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदी निवडीबद्दल मी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करतो. श्री. फडणवीस हे मागील अनेक वर्षांपासून माझे मित्र आहेत. आता मी सत्तेत आणि ते विरोधात असले तरी मैत्रीत फरक पडणार नाही.

विधानसभेत निवडून आलेल्या सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व सदस्यांचे‘जनहितहेच एकमेव उद्दिष्ट असते. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटातील सदस्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, सर्वांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळे विरोध आहे कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापुढील काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया, असेही श्री. ठाकरे पुढे म्हणाले.

 मला राज्यातील शेतकऱ्याला फक्त कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचे आहे. याकामी विरोधी पक्षाचीही मदत लागेल. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे केवळ विरुद्धार्थी शब्द न राहता सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी कार्य करु. याकामी विरोधी पक्षनेत्यांची निश्चितच साथ लाभेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, श्री. फडणवीस हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना 2003 मध्ये विधीमंडळाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाला विरोधी पक्षनेता म्हणून विराजमान होण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. जनतेसाठी काम करण्याची तळमळ ही विरोधी पक्षनेत्याकडे असते. ही परंपरा श्री. फडणवीस पुढील काळात चालवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन- देवेंद्र फडणवीस

अभिनंदनच्या प्रस्तावाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो. श्री. ठाकरे यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी ज्या योजना आखतील, जे काही निर्णय घेतील, त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून नेहमीच सहकार्य करू. सभागृहात नेहमीच नियम व संविधानानुसार कामकाज केले जाईल. जनतेच्या हक्कासाठी सर्व संसदीय आयुधाचा वापर केला जाईल. विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांची फार मोठी परंपरा आहे. या पदावरील प्रत्येक नेत्याने आपापल्या परीने समाजासाठी प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. या पदाची उंची आणखी वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर मंत्री सर्वश्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील,  किशोर जोरगेवार, आशिष शेलार, रवींद्र वायकर, धनंजय मुंडे, बच्चू कडू, हितेंद्र ठाकूर आदींची भाषणे झाली. सर्वांनी निवडीबद्दल श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.

राज्याची आर्थिक स्थिती दर्शविणारा अहवाल जनतेसमोर मांडणार- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पारदर्शक, निर्णयाभिमुख प्रशासन देण्याची राज्यपालांची ग्वाही

मुंबई, दि. 1: राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती दर्शविणारा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जनतेसमोर मांडणार असल्याचे व ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तिला शिस्त आणण्यासाठी वचनबद्ध राहणार असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज संयुक्त सभागृहात झालेल्या अभिभाषणात सांगितले.

आज विधानमंडळाच्या संयुक्त सभागृहात राज्यपालांचे मराठीत अभिभाषण झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- ‍निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, विधानमंडळ सदस्य उपस्थित होते.

शासन राज्यातील जनतेला स्वच्छ, पारदर्शक आणि निर्णयाभिमुख प्रशासन देईल, अशी ग्वाही राज्यपालांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, राज्यात ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे 34 जिल्ह्यातील 349 तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. राज्यपालांनी ग्रामीण पत क्षेत्राची दुरावस्था दूर करण्याची गरज आपल्या अभिभाषणादरम्यान व्यक्त केली. शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीने, मराठवाडा, विदर्भातील  दुष्काळग्रस्त भागामध्ये शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने शासन उपाययोजना हाती घेणार असल्याचेही ते म्हणाले.

खाजगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी 80 टक्के आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले की,  राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया ही सुरु करण्यात येणार आहे. महिलांना समान संधी आणि त्यांची सुरक्षितता याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण मोफत देण्याचा शासनाचा आटोकाट प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

 राज्यपालांच्या अभिभाषणातील इतर ठळक मुद्दे

  • दहा रुपये इतक्या वाजवी दरात जेवणाची थाळी पुरवण्यासाठी शासन प्रभावी उपाययोजना करणार.
  • स्थानिक सुशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी  शासन नवे धोरण तयार करील.
  • राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी स्वतंत्र तरतूद. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्याधर्तीवर एक नवीन योजना शासन सुरु करील.
  • रोगनिदान चाचण्या करण्याकरिता तालुकास्तरावर “एक रुपया क्लिनिक” ही योजना सुरु करणार.
  • राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने अतिविशेषोपचार रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये शासन स्थापन करील.
  • राज्यातील सर्व नागरिकांकरिता आरोग्य विमा छत्र पुरवण्यासाठी विविध आरोग्य विमा कार्यक्रमांचे एकत्रीकरण.
  • राज्यात अधिकाधिक उद्योग स्थापन व्हावेत यासाठी आर्थिक व आर्थिकेतर सवलती देऊन उद्योग स्थापन करण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल.
  • राज्यातील सर्व पोलीस ठाणी, राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार नोंदणी पोर्टलशी जोडण्यात येतील.
  • सायबर गुन्हे अन्वेषणामधील पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.
  • बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे शासन विशेष लक्ष देऊन ते प्रश्न सोडवील.
  • वंचित समाजासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व रोजगार या मुलभूत गरजांची पुर्तता करण्याचे शासनाचे ध्येय.
  • राज्यातील संरक्षित गडकिल्ल्यांचे शासन जतन आणि संवर्धन करील.
  • मुंबई येथे मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणार तर ऐरोली, नवी मुंबई येथे मराठी भाषा उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय.
  • महान लेखक गायक, संगीतकार पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगुळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने  गायन, लेखन अभिनय, एकपात्री विनोदी स्पर्धा इ. कार्यशाळांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन.
  • ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक सुरक्षा जाळे वाढवण्यासाठी उपाययोजना करणार.
  • अन्न व औषधीद्रव्ये विनियमांचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध कठोर कारवाई.
  • प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शासन या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करील.
  • राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक किनारी प्रक्षेत्र व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी करणार.
  • शासन किनारपट्टीत अवैज्ञानिक व अशाश्वत  मच्छीमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करून पारंपरिक मच्छिमारांना न्याय देणार.
  • महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा नव्या पिढीला परिचय व्हावा यासाठी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन.
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या संबंधात दावा केलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक जनतेच्या  हक्कांचे आणि विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याचा राज्यपालाचा अभिभाषणाद्वारे पुनरुच्चार.
  • सुशिक्षित बेरोजगार युवकांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी शासनाचा प्रयत्न.
  • नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये व प्रमुख शहरात कालबद्धरितीने वसतिगृहे बांधणार.
  • अंगणवाडी सेविका व आशा कार्यकत्यांच्या सेवासुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न.
  • राज्यात आठ लाख स्वंयसहाय्यता बचतगट.  स्वयंसहाय्यता बचतगटाच्या बळकीकरणासाठी शासन प्रयत्न करणार. शासकीय खरेदी प्रक्रियेत बचतगटांना प्राधान्य.
  • राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना हाती घेणार.
  • मानव विकास कार्यक्रमांतर्गत तुलनात्मकदृष्ट‌या मागास गटांना विशेष निधी पुरवून शासन आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका क्षेत्रावर अधिक भर देणार.
  • पात्र झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत निवारा पुरवण्यासाठी शासन जलदगतीने कार्यवाही करणार.

विधानपरिषदेच्या कामकाजास वंदे मातरम् ने सुरुवात

मुंबई, दि.1 : विधानपरिषदेच्या कामकाजास आज दुपारी वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली. यावेळी सभागृहात विविध विभागांचे अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

सदस्य सर्वश्री विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्य चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेले असल्याचे नमूद केले. तसेच चंद्रकांत रघुवंशी, अमरिशभाई पटेल, राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहास अवगत केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात करुन दिला नवीन मंत्र्यांचा परिचय

मुंबई दि.1 : विधानपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत या नवनिर्वाचित मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

मंत्री सुभाष देसाई यांनी नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांचा परिचय सभागृहाला करुन दिला.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

0
आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य...

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, दिवसभरात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...