गुरूवार, जुलै 24, 2025
Home Blog Page 1809

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई, दि. 7 : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.

बैठकीमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत  प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सादरीकरण केले. यामध्ये सर्व ग्रामपंचायती फायबर ऑप्टिक नेटवर्कने जोडण्याचा भारतनेट टप्पा 2, आपले सरकार सेवा केंद्रे, नागरी महानेट प्रकल्प, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आदी प्रकल्पांविषयी माहिती दिली. महाराष्ट्राची ब्लॉकचेन तंत्रज्ञानासाठी सज्जतेच्या दृष्टीने गतीने कार्यवाही सुरू असून देशात सर्वप्रथम आपले राज्य ब्लॉकचेनसाठी सज्ज असल्याची घोषणा करण्याचा मानस आहे, असेही ते म्हणाले.

शासकीय डेटा सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन

दरम्यान यावेळी श्री. ठाकरे यांच्या हस्ते सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (एसओसी) चे उद्घाटन झाले. राज्य शासनाच्या‘स्टेट डेटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळांवरील डेटा ठेवलेला असतो. हा डेटा तसेच क्लाऊडवरील शासनाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य प्रणालीद्वारे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे सेंटर स्थापन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

यावेळी प्रधान सचिव भूषण गगराणी, महाआयटीचे महाव्यवस्थापक अजित पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिव स्वाती म्हसे-पाटील, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.7.12.2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ. आंबेडकर यांच्या बीआयटी चाळ येथील निवासस्थानी भेट

मुंबई, दि. 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या खोलीस पटोले, ठाकरे यांची भेट   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळच्या’बीआयटीचाळीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50, 51 मध्ये राहत असत. याठिकाणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली. डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे  ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे. त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, खासदार राहूल शेवाळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि उपस्थित होते. ०००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर के परळ स्थित निवास को राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित करेंगे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळ  के दामोदर हॉल के पास बीआईटी चाल स्थित इमारत के दूसरे मंजिल पर रहते थे। वह 1912 से 1934 तक 22 साल यहा रहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि दादर में घोषणा की, कि उनके निवासस्थान को एक राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित किया जाएगा। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के 63वें  महापरिनिर्वाण दिवस पर, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पचक्र अर्पित कर अभिवादन किया। इस मौके पर विधान परिषद की उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटिल, सुभाष देसाई, बालासाहेब थोरात, सांसद राहुल शेवाले, विधायक जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबई की मेयर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि उपस्थित थे।

0000

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई दि6 :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल म्हणाले, आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा प्रयत्न करुया. बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश त्यांना आज अभिवादन करीत आहे. मीसुद्धा त्यांना विनम्र अभिवादन करीत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. सामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  परळ दामोदर हॉलजवळील, बीआयटी चाळ येथे 22 वर्षे वास्तव्य होते. ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. ००००

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस पर

राज्यपाल,विधानसभा अध्यक्ष,मुख्यमंत्री का अभिवादन

मुंबई दि6:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के63वें  महापरिनिर्वाण दिवस पर,राज्यपाल भगत सिंह कोश्यारी,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पचक्र अर्पित कर अभिवादन किया।

इस मौके पर राज्यपाल ने कहा,आइए हम सब मिलकर बाबासाहेब के सपनों का भारत बनाने की कोशिश करें। बाबासाहेब के विचार कई पीढ़ियों के लिए प्रेरणादायक है। उन्होंने संविधान के माध्यम से देश को एकजुट रखने का प्रयास किया। पूरा देश आज उनका अभिवादन कर रहा है। राज्यपाल ने अपनी भावनाओं को शब्दों में व्यक्त किया कि मैं विनम्रतापूर्वक उनका अभिवादन कर रहा हूं।

मुख्यमंत्री ठाकरे ने कहा,बाबासाहेब का जीवन एक जलती हुई आग था। उन्होंने आम लोगों को इंसान के रूप में जीने का अधिकार दिलाने के लिए लड़ाई लड़ी। डॉ. बाबासाहेब आंबेडकर22साल तक परळ  दामोदर हॉल के पास बीआईटी चाल में रहे। उन्होंने कहा कि उनके निवास को राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित किया जाएगा।

इस दौरान विधान परिषद के  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,मंत्री जयंत पाटिल,सुभाष देसाई,बालासाहेब थोरात,विधायक आदित्य ठाकरे,मुंबई की मेयर किशोरी  पेडणेकर,महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि मौजूद थे।

राज्यपाल श्री. कोश्यारी,विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले,मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने दादर के श्रीमती कमला मेहता अंधशाला में नेत्रहीन छात्रों को उपहार सामग्री सौंपी। इसके साथ ही डॉ. आंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर आयोजित एक फोटो प्रदर्शनी का दौरा किया।

0000

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात आदरांजली

मुंबई, दि. 6 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन येथील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेच्या उपासभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ‍विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, माजी सदस्य तुकाराम बिडकर, राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भगत, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव सायली कांबळी आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००

Tributes paid to the Great Dr. Babasaheb Ambedkar in the Vidhan Bhavan

Mumbai, 6th: Chairman of Legislative Council Ram Raje Naik-Nimbalkar and Assembly Speaker Nana Patole offered a garland to the photo of the great Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and paid their tributes on his 63rd Mahaparinirvan Day.

Deputy-Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe, Leader of Opposition in Legislative Assembly Devendra Fadnavis, Legislative Assembly Member Mangal Prabhat Lodha, Rahul Narvekar, former Member Tukaram Bidkar, Raj Purohit, Secretary of the Legislature Rajendra Bhagat, Deputy Secretary Vilas Athawale, Secretary of the Chairman Mahendra Kaj, Hour Secretary, and other office-bearers and employees paid their tributes by offering flowers to the photo of Dr. Ambedkar.

0000

दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र शनिवार दि.7 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

मुंबई, दि. 6, राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी-विक्रीची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही  सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  अशा परिस्थितीत सुटट्यांमुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्यास ग्राहक आणि शेतकरी यांची गैरसोय होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांना कांदा, बटाटा, टोमॅटो सुट्टीच्या दिवशीही बाजार समितामध्ये घेऊन येता यावे यासाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरू राहणार आहेत. 

ज्या जिल्ह्यामंध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतमालाचे उत्पादन आणि आवक जास्त आहे अशा जिल्हयातील सर्व बाजार समित्यांनी आणि विशेषतः नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे व मुंबई या जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शासकीय, सार्वजनिक आणि बाजार समित्यांच्या साप्ताहिक सुटट्यांच्या दिवशीही बाजार आवारे चालू ठेवावीत आणि शेतमाल उत्पादक शेतकरी/ व्यापारी आणि ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे पणन संचालनालयाच्या वतीने बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

‘टिस’च्या अहवालानंतर गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. 6 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, (टिस) यांच्याकडून गोवारी समाजाच्या संशोधनात्मक अभ्यासाचे काम सुरु असून त्याचा अहवाल पुढील तीन महिन्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर शासन स्तरावर त्यावर योग्य ती कार्यवाही होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले. विधानसभा अध्यक्ष यांना प्राप्त झालेल्या गोवारी समाजाच्या निवेदनानंतर या संदर्भात समाजाला न्याय मिळावा, यासाठी बैठक आयोजित केली होती. 

गोवारी समाजाच्या अनुसूचित जमातीच्या हक्क अधिकाराच्या मागण्यांबाबत विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात आयोजित बैठकीत श्री. पटोले बोलत होते.

श्री. पटोले म्हणाले, राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीतील गोंडगोवारी या नोंदीऐवजी गोवारी अशी दुरुस्ती करुन गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याबाबत शासनाकडे विविध स्तरातून मागणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गोवारी समाजाबाबत सखोल संशोधन करुन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुढील तीन महिन्यात अहवाल देणार आहे. त्यावर शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लड्डा तसेच आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे संयोजक दामोदर नेवारे आणि सदस्य व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/दि.6.12.2019

केरळ विधान मंडळाच्या पर्यावरण समितीने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

मुंबई,दि. 6 : केरळ विधान मंडळाच्या पर्यावरण समितीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवनात भेट घेऊन पर्यावरणासंदर्भात चर्चा केली. यावेळी समितीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार मुल्याकरा रत्नाकरन व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदी,कोस्टल भागातील पर्यावरण समस्या,पूर परिस्थितीनंतरची पर्यावरण समस्या,जैव वैद्यकीय कचरा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.त्याचप्रमाणे केरळमधील पर्यटन क्षेत्र व त्याठिकाणी असलेली पर्यावरण समस्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. सदरील समिती महाराष्ट्रात मुंबई,औरंगाबाद,वर्धा तसेच गुजरात व राजस्थान राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षांनी दिली.

विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्रातील विधानमंडळाच्या कामकाजाची व विविध समित्यांची माहिती उपस्थितांना दिली. या समितीमध्ये आमदार सर्वश्री के.बाबू,ओ.आर.केलू,पी.टी.ए.रहीम तसेच अधिकारी वर्गाचा समावेश आहे. सुरुवातीस विधासनभा अध्यक्षांनी समिती अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्रात सर्वांचे स्वागत केले. या बैठकीस विधिमंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

000

डॉ.पी.डी.पाटोदकर/वि.सं.अ./6.12.19

‘लोकराज्य’च्या नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ अंकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2019 अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे करण्यात आले. या अंकाचे अतिथी संपादक मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.

या अंकामध्ये मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा शपथविधी कार्यक्रम,मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय आणि  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 विधानसभा सदस्यांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे विशेष लेखांनी हा अंक सजला आहे. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर विशेष लेखही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे,मुख्य संपादक ब्रिजेश सिंह,प्रबंध संपादक अजय अंबेकर,संपादक सुरेश वांदिले,सहसंपादक कीर्ती पांडे आदी उपस्थित होते.

ग्रंथालयांना समान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 6 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नूतनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावरून उपलब्ध (download) करून या योजनेअंतर्गत अर्ज करावा असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

सन 2019-20 साठी 5 वेगवेगळया असमान निधी योजना आहेत.

1.ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसाम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य

 2.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी र्थसहाय्य

3.राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा

4.प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य

5.बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य अशा पाच प्रमुख असमान निधी योजना आहेत.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचेwww.rrrlf.nic.in  हे संकेतस्थळ पाहावे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमुद पद्धतीत)आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहोचतील अशा  बेताने पाठविणे आवश्यक असल्याचे ग्रंथालय संचालक यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision -...

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

0
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  ‘विद्यार्थी सहाय्यता...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात लोकांमध्ये प्रभवीपणे पोहचवावा –...

0
सातारा दि.२३  : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात प्रभवीपणे पोहचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व जिल्हास्तरीय समित्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा...

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात...

0
सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही...