बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 1891

राष्ट्रपती भवनात मराठी चित्रमुद्रा

डॉ.उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर

नवी दिल्ली, 16 : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपती भवनात प्रथमच देशातील ज्येष्ठ व नामवंत आणि तरूण चित्रकारांचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या चित्रकारांच्या कलाकृती कायमस्वरूपी राष्ट्रपतीभवनात लावण्यात येणार आहेत. असा उपक्रम राबविण्याचा मान डॉ. पाचारणेंना मिळाला असून त्यांच्या रूपाने मराठीची चित्रमुद्राच राष्ट्रपतीभवनात उमटली आहे. 

      

राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पाचारणे यांनी अकादमीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राष्ट्रपती भवनात बहुतांश परदेशी चित्रकारांचीच चित्रे असल्याचे निदर्शनास आल्यावर या भव्य वास्तूत देशातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांचाही समावेश व्हावा या चिंतनातून डॉ. पाचारणे यांनी अकादमीच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस केला. त्याचीच फलश्रुती म्हणजे देशातील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार आणि तरूण चित्रकारांच्या निवासी शिबिराचे या वास्तुतील आयोजन होय.

          

10 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधीत आयोजित या शिबिरामध्ये देशातील ज्येष्ठ व नामवंत 12 चित्रकार आणि 3 तरूण चित्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकार हा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध असून त्यांच्या दीर्घ साधनेतून राष्ट्रपती भवनाच्या वास्तूत श्रेष्ठ कलाकृती आकाराला येत आहेत. प्रत्येक चित्रकार या शिबिरादरम्यान आपल्या दोन कलाकृती तयार करीत आहे.

महाराष्ट्रातील तीन चित्रकारांचा समावेश

     

राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या माध्यमातून प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक प्रसंग असून महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ आणि दोन तरुण असे तीन चित्रकार या शिबिरात सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती भवनातील निसर्गरम्य वातावरणात चित्र काढण्याचा वेगळाच आनंद असल्याचे मुबंई येथील ज्येष्ठ व नामवंत  चित्रकार सुहास बहुलकर यांनी सांगितले. चित्रकारांच्या पहिल्यावहिल्या निवासी शिबिरात सहभागी होणे हा बहुमान असल्याचेही ते म्हणाले. श्री. बहुलकर यांनी भिंतीवरील चित्रशैली आणि त्यात पोतांचा लीलया वापर करून या ठिकाणी दोन कलाकृती साकारल्या आहेत. त्यात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा , वाडे , पूर्वज आणि त्याच्यावर उमटलेल्या नियतीच्या पाऊलखुणा या सगळयांची वर्तमानासोबत सांगड घातली आहे.

          

तुळजापूर येथील सिद्धार्थ शिंगाडे आणि अहमदनगर येथील प्रणिता बोरा हे तरूण चित्रकारही या ऐतिहासिक शिबिरात सहभागी झाले आहेत. सिद्धार्थ शिंगाडे यांनी साकारलेल्या पहिल्या कलाकृतीत भगवान शंकर आणि त्यांचे वाहन आराम करीत असल्याचे दर्शविले असून यात निळया रंगाची उत्तम छटा दाखवत  निसर्गरम्य पहाटेचे सौंदर्यही खुलविले आहे. श्री. शिंगाडे यांच्या दुसऱ्या कलाकृतीत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र रेखाटले आहे ज्यात खेळणी विकणारे दांपत्य, गायी चरायला नेणारा मुलगा, मंदिर, स्त्री आदी प्रतिमा साकारल्या आहेत. प्रणिता बोरा यांनी उत्तम रंगसंगतीचा उपयोग करून  राधा-कृष्ण आणि मीरा यांच्या विविध प्रतिमा कौशल्यपूर्ण पद्धतीने आपल्या कलाकृतीत मांडल्या आहेत.

राष्ट्रपती कोविंद साधणार चित्रकारांशी संवाद

राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे 17 नोव्हेंबर रोजी स्वत: या निवासी शिबिराचे अवलोकन करणार असून सहभागी चित्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. या शिबिरादरम्यान चित्रकारांनी चितारलेल्या कलाकृती कायमस्वरूपी राष्ट्रपती भवनात प्रदर्शित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनाची शोभा या कलाकृतींच्या माध्यमातून वाढणार आहे. राष्ट्रपती भवनास भेट देणारे देश-विदेशातील विशेष अतिथी तसेच सामान्य जनतेलाही या कलाकृती बघायला मिळणार आहेत.

           

शिबिरात सहभागी कलाकारांमध्ये अंजली इला मेनन, अन्वर खान, अर्पिता सिंग, चंद्रा भट्टाचार्यजी,  चिन्मय रॉय, गणेश हालोई, क्रिशेन खन्ना,लालुप्रसाद शॉ, परमजित सिंग, सनत कर, संजय भट्टाचार्य आणि सुहास बहुलकर या  ज्येष्ठ व नामवंत चित्रकारांसह विम्मी इंद्रा , प्रणिता बोरा आणि सिध्दार्थ शिंगाडे या तरूण चित्रकारांचा समावेश आहे.

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा

मुंबई, दि. १६ : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज आर्थिक मदतीची घोषणा केली. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती / बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज जाहीर केला.

या मदतीचे वितरण तातडीने करण्यात यावे अशा सूचनाही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी राज्य प्रशासनाला दिल्या आहेत.

००००००

Maharashtra Governor Announces Financial Relief to Farmers

Mumbai, 16th November : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today (16 Nov) took stock of the damage to crops caused by unseasonal rains during October – November 2019 and announced the financial relief to the affected farmers.

A relief of Rs.8,000/- per hectare up to 2 hectare for agricultural Kharif crops and a relief of Rs.18,000/- per hectare up to 2 hectares for horticulture/ perennial crops was announced today .

In addition to above relief package, the Governor further announced  exemption of land revenue to the affected area and exemption of examination fee of school and colleges to the wards of farmers whose crops suffered damages.

The Governor also directed the state administration to disburse relief immediately.

000

क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.15 :भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

 

यावेळी मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजेश निवतकर, सामान्य प्रशासन विभागाच्या श्रीमती अंशू सिन्हा, उप सचिव ज.जी. वळवी, आदिवासी विकास विभागाचे अवर सचिव रविंद्र आवटे, कक्ष अधिकारी पांडुरंग राऊत, गजानन देशमुख यांनीही बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ०००००

बिरसा मुंडा की जयंती पर मंत्रालय में अभिवादन

मुंबई, दि. 15 : भगवान बिरसा मुंडा की जयंती पर आज मंत्रालय के मुख्य सचिव अजोय मेहता के हाथों उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर अभिवादन किया गया।

इस मौके पर मुख्य सचिव कार्यालय के सहसचिव राजेश निवतकर, सामान्य प्रशासन विभाग की श्रीमती अंशू सिन्हा, उप सचिव ज.जी. वळवी, आदिवासी विकास विभाग के अवर सचिव रविंद्र आवटे, कक्ष अधिकारी पांडूरंग राऊत, गजानन देशमुख ने भी बिरसा मुंडा की प्रतिमा को गुलाब के फूल अर्पण कर अभिवादन किया. इस दौरान मंत्रालय के अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे।

००००

Tribute paid in the Mantralaya on the birth anniversary of Birsa Munda

Mumbai, date 15th: Chief Secretary Ajoy Mehta offered garland to the photo of  Bhagwan Birsa Munda and offered his tribute on the occasion of Bhagwan Birsa Mundada birth anniversary.

Deputy Secretary of  Chief Secretary Office Rajesh Nivatkar, Smt. Anshu Sinha from General Administration Department, Deputy Secretary J.J. Dalvi, Under Secretary of Tribal Development Department Ravindra Awate, Unit Officer Pandurang Raut, Gajanan Deshmukh also paid their tribute to Birsa Munda by offering rose flower to the photo of Birsa Munda. Officers and employees of Mantralaya were present at the programe.

0000

आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

आपला महाराष्ट्रया वार्तापत्रात दर आठवड्यात राज्यातील विविध भागांत घडलेल्या घटना, घडामोडी, शासनाचे महत्त्वाचे निर्णय यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली,  अहमदनगर, अकोला,  अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्ग,  उस्मानाबाद, सातारा, सोलापूर,यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून हे वार्तापत्र प्रसारित  केले जाणार आहे.

१९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान राज्यात ‘कौमी एकता सप्ताह’

मुंबई, दि. 15 : केंद्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यात१९ ते २५ नोव्हेंबर दरम्यानकौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या काळात अनुक्रमे राष्ट्रीय एकात्मता दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, ध्वजदिन तसेच दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन आणि जोपासना दिवस साजरे होणार असून त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

१९नोव्हेंबर रोजी शासनाच्या विविध कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर आठवडाभर दुर्बल घटकातील व्यक्तींना इंदिरा आवास योजना आणि घरांचे वाटप, भूमिहीन मजुरांना जमिनीचे वाटप, गरिबांना कायदेविषयक सहाय्य देणे, चर्चा संमेलने, मिरवणुका आणि सभा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कौमी एकता सप्ताहामध्ये“सांप्रदायिक सद्भावना मोहीम निधी संकलन सप्ताह”साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शासनाने केले आहे. हे शासन परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे पूर्णत: वितरण

मुंबई, ता. 15 : मुंबई/ठाणे Îशधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5‍ परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार 581 शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत. त्यापैकी 18 लाख 68 हजार 724‍  शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाले आहे. यंत्रणेतील 4 हजार 269 अधिकृत  शिधावाटप दुकानांमध्ये ई-पॉस  मशीन  बसविण्यात  आले असून या मशीनद्वारेच शिधापत्रिकाधारकांना  वितरण केले जाते. ऑफलाइन पद्धतीने अन्नधान्याचे वितरण होत नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या होत असून प्रत्येक शिधापत्रिकाधारकाची बायोमेट्रिक ओळख पटवून ‍वितरण होत आहे. यामुळे मागील एक वर्षात 450 कोटी रूपयांच्या अन्नधान्याची बचत झाली आहे. सप्टेंबर 2019 पासून मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र केरोसिन मुक्त झाले आहे. पाच परिमंडळांचे मंजूर  नियतन सप्टेंबर 2019 मध्ये 31 हजार 540, आक्टोबरमध्ये 36 हजार 65, भारतीय खाद्य निगममधून सप्टेंबर मध्ये 31 हजार 540, ऑक्टोबरमध्ये 36 हजार 65 साठा उचल केला आहे. सप्टेंबर मध्ये 32 हजार 965 तर ऑक्टोबर 2019 मध्ये 32 हजार 640 अधिकृत शिधावाटप दुकानांमधून ऑनलाइन विक्री झाली आहे

बायोमेट्रिक नोंद आवश्यक

शिधापत्रिकाधारक यांनी अधिकृत शिधावाटप दुकानात हजर राहून बायोमेट्रीक नोंद करणे आवश्यक आहे. अशी नोंद करीत नाही तोपर्यंत त्यांना अन्नधान्याचे वाटप केले जात नाही. कोणत्या लाभार्थ्याने कोणत्या महिन्यात किती अन्नधान्याची उचल केली याबाबत पूर्ण माहितीmahaepos.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना; ३० नोव्हेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करुन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची दिनांक 30 नोव्हेंबर 2019 ही अंतिम मुदत आहे.

या योजनेअंतर्गत मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 9 वी, 10वी, 11वी आणि 12वी यातील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जेणेकरुन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल यादृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे, शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनाने आणली आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेल्या तसेच मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसे या योजनेसाठी पात्र ठरतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400001 या पत्त्यावर सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे. या योजनेसाठीच्या अर्जाचा नमुना शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 15 : अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अल्पसंख्याक विकास विभागाच्या अनुदान योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या योजनेसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. हे प्रस्ताव २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता मागविण्यात आले आहेत.

७ ऑक्टोबर, २०१५ रोजी अल्पसंख्याक विकास विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांच्याकडे पाठवावेत. पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रस्ताव पाठवण्यासाठीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर,२०१९आहे.

योजनेसंदर्भातील अधिक तपशील अथवा विहित अर्जाचा नमुनाhttps://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी ८ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 15 : अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

०-०-०

(Jagdish More, SEC)

लोकनायक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी राज्यपालांनी केले अभिवादन

मुंबई, दि. 15 : क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या१४४व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता तसेच राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार उपस्थित होते.

आदिवासी व ग्राम विकास विभागातर्फे सादरीकरण

आदिवासी विकास विभाग तसेच ग्रामविकास विभागातर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज आदिवासी विकास योजनांसंदर्भात विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.

राज्याच्या एकूणलोकसंख्येच्या ९.३५ टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातीची असून अनुसूचित क्षेत्रात आदिवासी उपयोजना राबविली जाते. आदिवासी विकासासाठी उपलब्ध नियतव्ययापैकी मोठा खर्च आदिवासी शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी केला जात असल्याची माहिती प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली. राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्याच्या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी थेट दिला जातो. गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील पेसा ग्रामपंचायतींना एकूण ८७७.४३कोटी रु निधी देण्यात आला. या निधीतून ग्रामपंचायती आपल्याला आवश्यक त्या योजना सुरु करू शकतात, अशी माहिती असीम कुमार गुप्ता यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाची राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने प्रशंसा केली असल्याचे मनिषा वर्मा यांनी सांगितले.  

ताज्या बातम्या

विद्यार्थी स्कूल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करा

0
मुंबई, दि. २० : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना...

मराठी भाषा विभागामार्फत ‘अभिजात मराठी, माझ्या अपेक्षा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा

0
मुंबई, दि. २० : केंद्र सरकारच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय...

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी

0
मुंबई, दि. २० : गणेशोत्सवासाठी मुर्तींचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता...

मरोळ येथे उभारण्यात येणारे मच्छी मार्केट सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असावे – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. २० : मुंबईतील मरोळ येथे उभारण्यात येत असलेले मच्छी मार्केट सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज असावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...

सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
पुणे, दि.२०: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम...