बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 1893

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ ॲपवरही ऐका ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र

मुंबई, दि.  8 : प्रसारभारतीच्या  न्यूज ऑन एअरया ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  दि. 9 नोव्हेंबर रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक,जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रांवरून हे विशेष वार्तापत्र  प्रसारित केले जाईल.                                                            

महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान

सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक

नवी दिल्ली, दि.8 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्ससाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राला आज प्रथम क्रमांकाच्या‘प्रभासाक्षी’सोशल मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशातील आघाडीचे  हिंदी न्यूज पोर्टल‘प्रभासाक्षी’च्या वतीने  समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणाऱ्या देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो.यावर्षी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   

येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आयोजित‘प्रभासाक्षी’च्या18व्या वर्धापनदिन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे आरोग्य व  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग,माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय,खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे,जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.      

यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत’प्रभासाक्षी’द्वारे सर्वेक्षण करण्यात आले.यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या अपडेट्सचेही सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाज माध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली.मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणित)ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले.ट्विटरद्वारे1952पासून ते2014पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविध्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच या कालावधीतील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले.त्यासाठी इन्फोग्राफिक्स,व्हिडिओ आदिंचा प्रभावी वापर करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही  ट्विटर हँडलवरुन दररोज महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत.ट्विटरसोबतच कार्यालयाचे फेसबुक पेजेस(तीन),ब्लॉग,यूट्यूब चॅनेल,वॉट्सॲप ग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते.समाजमाध्यमांद्वारे अचूक,योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी  घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री.ब्रिजेश सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळी‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजिटल मीडिया पर बढती भूमिका’विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.यात वरिष्ठ पत्रकार तथा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे माजी महासंचालक के.जी.सुरेश,उत्तर प्रदेशचे आरोग्य व  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग,माजी खासदार   ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय,खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांनी विचार मांडले.

******

                                                    

रितेश भुयार/वृ.वि.क्र. 244 /दि.08.11.2019

चीनमधील जिआन्ग्सू आणि महाराष्ट्र राज्यात भगिनी-राज्य करार करण्याची शिफारस

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत त्यांग गुकाई यांनी घेतली

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट मुंबई, दि. 8 : चीनमधील शांघाय व मुंबई या दोन शहरांमध्ये भगिनी-शहर करार झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि जिआन्ग्सू प्रांत यांमध्ये देखील भगिनी राज्य करार झाल्यास उभय राज्यांमधील व्यापार व सांस्कृतिक संबंध अधिक वृद्धिंगत होतील,असा विश्वास चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत त्यांग गुकाई यांनी आज व्यक्त केला.

त्यांग गुकाई यांनी शुक्रवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

त्यांग गुकाई यांच्या सूचनेचे स्वागत करताना भारत आणि चीनमधील संबंध राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत भेटीनंतर तसेच त्यांच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेसोबत झालेल्या चर्चेनंतर अधिक मजबूत झाले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

००००

Chinese Consul General seeks Sister State Agreement with Maharashtra

Mumbai Dated 8th:The Consul General of the Republic of China Tang Guocai today called for forging Sister State agreement between Maharashtra and the Chinese Province of Jiangsu. 

Stating that the city of Mumbai already has a Sister city agreement with Shanghai which was earlier part of the Jiangsu Province, he said such partnership between Maharashtra and Jiangsu will further strengthen business and cultural relations between the two important regions.

The Chinese Consul General was speaking to the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai during a courtesy call on Friday (8th Nov).

          

Welcoming the suggestion, the Governor said the visit by the Chinese President Xi Jinping to India and his meeting with Prime Minister Narendra Modi has further strengthened the relations between the two great nations.

0000

सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते पु.ल.कला महोत्सवाचे उदघाटन

मुंबई,दि.8 -पु.ल.देशपांडेमहाराष्ट्रकलाअकादमीच्यावतीनेआयोजितआठदिवसीयपुलोत्सवाचेउद्घाटनसुप्रसिद्धअभिनेत्रीमुक्ताबर्वेयांच्याहस्तेआजरविंद्रनाट्यमंदिरयेथेझाले.सर्वांचेलाडकेसाहित्यिकपु.ल.देशपांडेयांच्यापुलोत्सवातविविधांगीकार्यक्रमांचीमेजवानीरसिकांनाअनुभवायचीसंधीदिल्याबद्दलमुक्ताबर्वेयांनीअकादमीचेकौतुककेले,तसेचरसिकांनीयामहोत्सवालाभरभरुनप्रतिसादद्यावा,असेआवाहनहीकेले.

उद्घाटनप्रसंगीदिग्दर्शकमिलिंदलेले,लावणीनृत्यांगनामेधाघाडगे,सांस्कृतिककार्यविभागाचेउपसचिवविलासथोरातवअनिसशेख,अवरसचिवप्रसादमहाजन,पु.ल.देशपांडेमहाराष्ट्रकलाअकादमीचेप्रकल्पसंचालकबिभीषणचवरेहेउपस्थितहोते.त्रितालयाअनोख्यासांगितिककार्यक्रमानेयामहोत्सवाचीसुरुवातझाली.उद्घाटनानंतरनवीनसंचातीलकुसुममनोहरलेलेहेनाटकसादरकरण्यातआले.

15नोव्हेंबरपर्यंतचालणाऱ्यायामहोत्सवातनवीनसंचातीलहिमालयाचीसावली,संगीतकार-गायकसलीलकुलकर्णीयांचासंगीतमयकार्यक्रम,ज्येष्ठअभिनेतेशरदपोंक्षेवअन्यमान्यवरांकडूनपु.लं.च्यालेखांचेअभिवाचन,पारंपरिकलोककला,ज्येष्ठसाहित्यिकअरुणाढेरेयांच्यासाहित्यावरआधारितकार्यक्रम,हस्तकलाकार्यशाळादर्जेदारमराठीचित्रपटअशीविविधांगीकार्यक्रमांचीभरगच्चसांस्कृतिकमेजवानीमिळणारआहे.

राज्यभरातूनअनेकमान्यवरतसेचनवोदितकलाकारमहोत्सवातसहभागीहोणारअसूननाट्य,नृत्य,काव्य,साहित्य,लोककला,हस्तकला,चित्रपटअशाअनेककलाप्रकारांचासमावेशमहोत्सवातकरण्यातआलाआहे.दिनांक14नोव्हेंबरहाबालदिनसंपूर्णपणेबालकांसाठीराखूनठेवण्यातआलाअसूनविस्मृतीतगेलेलेखेळपुन्हाएकदाखेळण्याचीसंधीमुलांनामिळणारआहे.पु.ल.देशपांडेमहाराष्ट्रकलाअकादमीचेप्रकल्पसंचालक,बिभीषणचवरेयांनीसर्वरसिकप्रेक्षकांनायासांस्कृतिककार्यक्रमांचाआस्वादघेण्याचेआवाहनकेलेआहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनात ‘अभया’ नाट्याचा प्रयोग

मुंबई, दि. 7 : बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील‘पोक्सोकायद्याबाबत जनजागृती करणाऱ्या अभयाया नाट्यप्रयोगाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कौतुकाची थाप दिली.

अभयाची प्रमुख भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या चिन्मयी स्वामीचे तसेच लेखिका व दिग्दर्शिका मीना नाईक यांचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले.

कळसूत्रीनिर्मित अभयाया एकल महिला नाट्याचा ४०वा प्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी झाला.

नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता व अभिनेत्री श्रेया बुगडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मनवा नाईक यांनी‘अभयानाटकामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला राजभवनचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

००००

Governor applauds the play ‘Abhaya’

Mumbai, 7th Nov :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today appaluded the one-woman play ‘Abhaya’ at Raj Bhavan, Mumbai. The play written and directed by Meena Naik narrates story of a 16 year old girl Abhaya who gets sexually abused by a stranger on the street. The play creates awareness about the Protection of Children from Sexual Offences Act (POCSO). The Governor complimented the Director and the lead actress Chinmayee Swami for the play. Eminent director – producer Vijaya Mehta, actress Shreya Bugade and the staff and officers of Raj Bhavan were present.

००००

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारीला

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे.  

इ.1 ली ते इ. 5 वी व इ. 6 ते इ. 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या htpps://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे.

परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.08/11/2019 पासून सुरु होत असून दि. 28/11/2019 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2019 वेळापत्रक

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
1 ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 08/11/2019 ते 28/11/2019
2 प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे 04/01/2020 ते 19/01/2020
3 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-Iदिनांक व वेळ 19/01/2020 वेळ स.10.30 ते दु.13.00
4 शिक्षक पात्रता परीक्षा-IIदिनांक व वेळ 19/01/2020 वेळ दु.14.00 ते सायं.16.30

000

राज्यपालांच्या हस्ते ‘ये है मुंबई मेरी जान’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई दि. 7 : मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला या शहराने काम व ओळख दिली आहे,त्यामुळे या शहरावर सगळ्यांचेच प्रेम असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कुलवंत सिंग लिखित’ये है मुंबई मेरी जानपुस्तकाचे प्रकाशन हॉटेल ताज येथे करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सरदार कुलवंत सिंग कोहली यांच्या पत्नी बिजी कोहली, निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. पी. एस. पसरिचा, दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, ‘ये है मुंबई मेरी जान‘या पुस्तकाचे शब्दांकन करणारे नितीन आरेकर आदी उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशनानंतर राज्यपाल म्हणाले, दिवंगत सिंग यांनी आपल्या पुस्तकात मुंबईचा इतिहास, मुंबईचे स्पिरीट, मुंबईचे वर्णन उत्तम पद्धतीने मांडले असून आता मराठीत हे पुस्तक आल्यामुळे मुंबईचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पु.ल. कला महोत्सवाचे आयोजन; आठ दिवस सांस्कृतिक मेजवानी

मुंबई, दि. 7 : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दिनांक 8 ते 15 नोव्हेंबर 2019 या दरम्यान विविध कला आविष्कारांचा समावेश असलेल्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.  नवीन संचातील “कुसुम मनोहर लेले” “हिमालयाची सावली”,  संगीतकार-गायक सलील कुलकर्णी यांचा संगीतमय कार्यक्रम, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे व अन्य मान्यवरांकडून पु.लं.च्या लेखांचे अभिवाचन, पारंपरिक लोककला, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम, हस्तकला कार्यशाळा दर्जेदार मराठी चित्रपट अशी विविधांगी सांस्कृतिक मेजवानी या आठ दिवसीय महोत्सवामध्ये अनुभवायला मिळणार आहे.

राज्यभरातून अनेक मान्यवर तसेच नवोदित कलाकार महोत्सवात सहभागी होणार असून नाट्य, नृत्य, काव्य, साहित्य, लोककला, हस्तकला, चित्रपट अनेक कलाप्रकारांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे.दिनांक 14 नोव्हेंबर बालदिन संपूर्णपणे बालकांसाठी राखून ठेवण्यात आला असून विस्मृतीत गेलेले खेळ पुन्हा एकदा खेळण्याची संधी मुलांना मिळणार आहे.

महोत्सवाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:-

¿ÖãÛÎú¾ÖÖ¸ü

08-11-2019

5ते6.30 त्रिताल- (एकअनोखीसांगीतिक¯Ö¾ÖÔÞÖß)                                      सादरकर्ते-पृथ्वीइनोव्हेशन्स ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
7.30ते8.30 उद्घाटन ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30ते10.30 मराठीनाटक-  कुसुममनोहरलेले   कलाकार-शशांककेतकर,पल्लवीपाटील,संग्रामसमेळ ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
¿Ö×®Ö¾ÖÖ¸ü

09-11-2019

2ते3.30 अभिज्ञानशाकुंतलम(मराठीनाटक) 

सादरकर्ते-धनश्रीलेले,डॉ.प्रसाद  भिडे

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
3.30ते4.30 तेजोनिधी(स्वामीविवेकानंदांच्याविचारांवरआधारितनृत्यनाट्य)सादरकर्ते-डॉ.स्वातीदैठणकरवसहकलाकार ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
4.30ते5.30 आनंदयात्रीपु.ल.(पुलंच्याआनंदोत्सवीलेखनाचेअभिवाचन)सादरकर्ते-लिओनार्दोआर्टॲकॅडमी,सोलापूर ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
5.30ते6.30 गुंतलेलेपाश- (गजलांचाकार्यक्रम)सादकर्ते-आप्पाठाकूर,डॉ.मृण्मयीभजक ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
6.30ते8.30 दिंडी(रंगकर्मीअरुणकाकडेस्मरणयात्रा)                                सहभाग-प्रभाकरकोलते ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
8.30ते10.30 मराठीचित्रपट-  संततुकाराम ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
¸ü×¾Ö¾ÖÖ¸ü

10-11-2019

1.00  ते3.00 पैपैशाचीगोष्ट(मराठीनाटक)

सादरकर्ते-  तालीम,मुंबई.कलाकार-ईलाभाटे

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
3.00ते4.00 पंढरीचेभूत(भरतनाट्यमनृत्याविष्कार)                           सादरकर्ते-अपेक्षाघाटकरवसहकलाकार ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.00ते5.30 गुगलीफाय(मराठीनाटक)        

सादरकर्ते-मनश्रीआर्टस्

¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
5.30ते7.00 जागरपारंपारिककलेचा     

सादरकर्ते-»ÖÖêÛú¿ÖÖÆü߸üरत्नमाळीवसहकारी

कलांगण
7.00ते8.00 कथांमागच्याकथा(गप्पागोष्टी)

सादरकर्ते-डॉ.राजेंद्रमानेवजगदिशपवार

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
8.30ते10.00 मराठीचित्रपट-  मीदारुसोडली ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
ÃÖÖê´Ö¾ÖÖ¸ü

11-11-2019

1.00ते3.00 सांगड(मराठीबोलीभाषेचीकाव्यात्मकसांगड)                 सादरकर्ते-  सामर्थ्यथिएटर्स,नवीमुंबई नॅनो×£Ö‹™ü¸ü
3.00ते5.30 गलतीसेमिस्टेक-(मराठीनाटक)

सादरकर्ते-आरंभप्रोडक्शनहाऊस

¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
5.30ते6.30 लाली-(मराठीएकांकिका)      

सादरकर्ते-कामाक्षीक्रिएटिव्ह

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
6.30ते8.30 इर्षाद,सादरकर्ते-रसिकसाहित्य ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30ते10.30 मराठीचित्रपट-  अर्धांगी ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
´ÖÓÝÖôû¾ÖÖ¸ü

12-11-2019

2.00ते4.00 माझ्याजन्माचीचित्तरकथा  (शांताबाईकृष्णाजीकांबळेयांच्याआत्मवृत्तावरआधारितनाट्यप्रयोग

सादरकर्ते-अकॅडमीऑफथिएटरआर्टस्

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.30ते6.30  मीशून्य(¿Ö²¤üÖÓ“ÖÖसुरेलप्रवास)

सादरकर्ते-रेश्माÛúÖ¸üÜÖÖ®ÖßÃÖवकेतनपटवर्धन

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
6.30ते7.30 वर्धमान(शास्त्रीयनृत्य-बॅले)

सादरकर्ते-कलासक्तट्रस्टपुणे

¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30ते10.30 बाकीबाबआणिमी(बा.भ.बोरकरांच्याकवितांचासंगीतमयकार्यक्रम)                                   सादरकर्ते-सलीलकुलकर्णीवसहकारी ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
²Öã¬Ö¾ÖÖ¸ü

13-11-2019

12.30ते2.30 काजव्यांच्यागावात ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
2.30ते4.00 समजुतीच्याकाठाशी(अरुणाढेरेयांच्यासाहित्याचीअनोखीमैफल)सादरकर्ते-डॉ.वंदनाबोकीलÛãúलकर्णी ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.00ते6.30 रंगेलफडलावणीचा          

सादरकर्ते-मेघाघाडगे,चंदनशिवेकरवइतर

¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
6.30ते8.30 कवीजातोतेव्हा(कवीग्रेसयांच्यावरीलललितबंधावरआधारितनाट्यअभिवाचन)

सादरकर्ते-जागरवगंगोत्रीग्रीनबिल्ड

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
8.30ते10.30 सर्वात्मकासर्वेश्वरा(संगीतमयकार्यक्रमृ)                                   सादरकर्ते-मुंबईमराठीसाहित्यसंघगिरगाव ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
ÝÖã¹ý¾ÖÖ¸ü

14-11-2019

11.00ते12.30 कलार्पण(नृत्यनाट्यसंगीताचाकलाविष्कार)                            सादरकर्ते-कल्पांगणसांस्कृतिककेंद्र,मुंबई ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
12.30ते3.00 हस्तकलाकार्यशाळा             

सादरकर्ते-सम्यककलांशप्रतिष्ठान

ॲनिमेशन
3.00ते4.00 सायकलआणिमी             

सादरकर्ते-गंधारकुलकर्णी

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
4.00ते6.30 चलाबालपणरंगवूया(पारंपारिकखेळ)                                           सादरकर्ते-मितीक्रिएशन कलांगण
6.30ते8.30 सहजजाताजाता( ´Öæल्यशिक्षण-गप्पा-गाणी)                             सादरकर्ते-षड्जपंचम ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30ते10.30 मराठीचित्रपट-  सं£Öवाहतेकृष्णामाई ×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
¿ÖãÛÎú¾ÖÖ¸ü

15-11-2019

11.30ते1.30 लेझीमखेळणारीपोरं

सादरकर्ते-अकॅडमीऑफथिएटरआर्टस्

¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
1.30ते3.30 नाचतनाचतगावे(जेष्ठसंगीतकारसुधीरफडकेयांनीसंगीतबद्धकेलेल्याד֡֯֙üÝÖߟÖÖÓ“Ößदृक-श्राव्यमैफल)                                                    सादरकर्ते-वैखरीसाऊंडऑफआर्टस्,मुंबई नॅनो×£Ö‹™ü¸ü
3.30ते5.30 पु.ल.एकसंचित(अभिवाचन)

सादरकर्ते-शरद¯ÖÖëõÖê,  गिरीशकुलकर्णी

×´Ö®Öß ×£Ö‹™ü¸ü
5.30ते7.30 जाखडी(पारंपारिकलोककला)

सादरकर्ते-श्रीकलाइंटरटेनमेंट

कलांगण
7.30ते8.30 समारोप ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü
8.30ते10.30 हिमालयाचीसावली(मराठीनाटक)कलाकार-शरद¯ÖÖëõÖê,शृजाप्रभुदेसाई,विघ्नेशजोशी,जयंतघाटे ¸ü¾Öà¦ü ®ÖÖ™üµÖ ´ÖÓפü¸ü

महोत्सवाचा समारोप समारंभ दिनांक15 नोव्हेंबर रोजी सायं. 7.30 वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार असून रात्री 8.30 वाजता नवीन संचातील “हिमालयाची सावली” या नाटकाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार असून महोत्सवाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन पु.ल.देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक श्री.विभिषण चवरे यांनी केले आहे.

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावर मुलाखत

 

मुंबई,दि. ०७ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘जय महाराष्ट्र  दिलखुलासकार्यक्रमात सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट चे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र  बोरलेपवार यांची चित्रकला व महाराष्ट्रया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७. ३० वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत दिलखुलासकार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून   शुक्रवार दि.८, सोमवार दि.११, मंगळवार दि.१२ व  बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.दिलखुलासहा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअरया ॲपवरही शुक्रवार दि.८, सोमवार दि.११, मंगळवार दि.१२ व  बुधवार दि.१३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत ऐकता येईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

     

सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची वाटचाल, या संस्थेने घडविलेले कलाकार, एक कलाकार व त्याला निर्माण होणारी या क्षेत्रातील गोडी, कलेची जोपासना कशी करावी, तसेच आपले  करिअर व आवड अर्थातच कलेची सांगड कशी घालावी या प्रश्नांना अधिव्याख्याता  प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र  बोरलेपवार यांनी या कार्यक्रमात सविस्तर उत्तरे जय महाराष्ट्रआणि  दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहेत.

००००

गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सव- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे येत्या पौर्णिमेला दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या जवळ असलेले निसर्गरम्य पर्यटक निवास बोदलकसा  येथे पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वन्यजीव अभ्यासक व ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांच्यासोबत यावेळी रानगप्पांचा कार्यक्रम  होणार आहे.       

साहित्य क्षेत्रातील नामांकित तसेच नवोदित कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. पौर्णिमा महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये निसर्ग तसेच वन्यजीवांविषयी गोडी निर्माण करणे हा महामंडळाचा मानस आहे तसेच महोत्सवाच्या माध्यमातून आपली पारंपरिक कला,संस्कृती,साहित्य याची ओळख पर्यटकांना करून देण्यात येणार आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रत्येकी एका पर्यटक निवासात पर्यटकांसाठी मोफत सांस्कृतिक,साहित्यिक चर्चांचे आयोजन करण्यात येत असून पर्यटक हे निवासाच्या परिसरातच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. आगामी कालावधीत मारुती चितमपल्ली,ना.धो.महानोर,फादर फ्रान्सिस दिब्रेटो या साहित्यिकांची मांदियाळी पर्यटकांना विविध पर्यटक निवासात विनामूल्य अनुभवण्यास मिळणार आहे.

हा महोत्सव जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी,वनसंरक्षक व क्षेत्र संचालक रामानुज आणि उप वनसंरक्षक एस.युवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाच्या अधिक माहिती करिता श्री.विजय शेरकी,निवास व्यवस्थापक बोदलकसा,पर्यटक निवास  बोदलकसा( मोबाईल नंबर ७४-९८-०७-२३-०९) तसेच श्रीमती पूजा कांबळे,माहिती सहायक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,वेस्ट हायकोर्ट रोड,ग्रामीण तहसील कार्यालय सिव्हिल  लाईन्स,  नागपूर दूरध्वनी क्रमांक २५३३३२५ येथे संपर्क साधावा.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी प्रख्यात कवी संदीप खरे यांच्या मुख्य उपस्थितीत पर्यटक निवास कुणकेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे,यांच्या उपस्थितीत पौर्णिमा महोत्सवाचे उदघाटन झाले होते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत डिसेंबर २०१८पासून पोर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या पौर्णिमा महोत्सवाची संकल्पना व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची असून  पौर्णिमा महोत्सवाची माहिती महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे मुख्य लेखाधिकारी,मुंबई तथा विभागीय पर्यटन प्रमुख विदर्भ विभाग यांनी दिलेली आहे.

ताज्या बातम्या

‘लोकराज्य’ ऑगस्ट २०२५

0
‘लोकराज्य’ ऑगस्ट २०२५

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन

0
नांदेड दि. १९ : राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव,...

मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

0
“जिथे मुलींचा आवाज ऐकला जातो, तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते…” उपक्रमाचा उगम ग्रामीण भागातील मुलींच्या समस्या अनेकदा घरात, समाजात किंवा ग्रामपंचायतीच्या सभेत हरवून जातात. त्यांच्या अडचणी...

राज्यातील बहुतांश भागात २० ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार 

0
मुंबई शहरात २० ऑगस्टच्या दुपार पर्यंत काही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता, तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता.  मुंबई, दि:...

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १९ : - राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी...