छत्रपती संभाजीनगर, दि. 11 (जिमाका): पुस्तक वाचनाचा फायदा माणसाला जीवनभरात नक्की होत असतो. समाजमन घडविण्या-या ग्रंथाच्या या महोत्सवाचे रुपांतर आनंद सोहळ्यात व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 7 ते 14 एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात पहिल्यांदाच 11 ते 14 एप्रिल दरम्यान इतिहास वस्तू संग्रहालयाच्या हिरवळीवर उभारलेल्या भव्य मंडपात ग्रंथ महोत्सव घेण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्याच्या हस्ते शुक्रवारी (दि.11) करण्यात आले. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे, डॉ.योगिता पाटिल, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ.वैशाली खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, अशोक पटवर्धन यांची ही मंचावर उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगीश्री.शिरसाट म्हणाले, विद्यापीठात पहिल्यांदाच मोठया प्रमाणावर ग्रंथ महोत्सव होत आहे. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत असून या प्रदर्शनात आलेल्या प्रत्येकाने किमान एक पुस्तक विकत घेऊन वाचन करावे.
महोत्सवात देशभरातून 20 नामांकित प्रकाशक सहभागी झाल्याचे प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रा.प्रराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, रोजदांरी कर्मचारी, विद्यार्थी व वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.इतिहास वस्तू संग्रहालयच्या हिरवळीवर 14 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे.
वसतिगृहासाठी २५ कोटी देऊ : पालकमंत्री
विद्यापीठात आल्याचा मला मनस्वी आनंद असून वसतीगृहासाठी २५ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येईल, असे आश्वासन श्री.शिरसाट यांनी दिले. विद्यापीठास आवश्यक ते सहकार्य राज्य शासनाकडून करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
‘नॅशनल बुक ट्रस्ट’ च्या वतीने पुढील वर्षी राष्ट्रीय दर्जाचे पुस्तक प्रदर्शन घेऊ, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी अध्यक्षीय समारोपात घोषित केले.
वीस प्रकाशंकाचा सहभाग
या ग्रंथ महोत्सवात देशभरातून २० प्रकाशक सहभागी झाले. यामध्ये ऑक्सफर्ड हाऊस, वायकिंग बुक, बुक एन्क्लेव्ह, अॅपेक्स पब्लिकेशन (सर्व जयपूर), करंट पब्लिकेशन (आग्रा), युनिव्हर्सल पब्लिक सिंग, एन.एम मेडिकल बुक्स, वक्रतुंड बुक्स, कवडवाल बुक्स, न्य एस इंटरनॅशनल (मबई), प्रशांत बुक्स, विज्ञान बुक्स राजकमल, आहुजा, टेक्निस् बुक्स (नवी दिल्ली) सुमन बुक्स, कैलास पब्लिकेशन (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.