सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 972

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन

मुंबई, दि. २३: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री.शाह यांचे श्रीकृष्णमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, दि. २३: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.

केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशीष शेलार, विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

०००

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे दर्शन

मुंबई, दि. २३ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन घेत विधिवत पूजा केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वर्षा निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई, दि. २३: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी श्री. शाह यांचे औक्षण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आदी  उपस्थित होते.

०००

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. २३ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री विनोद तावडे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक,राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि.२२: गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला-संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्याचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाचा दर्जा आणि कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन पाहता हा महोत्सव ५० वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करून पर्यटन विभागातर्फे महोत्सवाला यापुढेही सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही श्री.महाजन यांनी यावेळी दिली.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, खासदार पद्मश्री हेमा मालिनी, रजनी पाटील, श्रीरंग बारणे, आमदार नाना पटोले, रवींद्र धंगेकर, पुणे फेस्टिव्हलचे  उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल,  मुख्य समन्वयक अभय छाजेड, उल्हास पवार, रमेश बागवे, मीरा कलमाडी आदी उपस्थित होते.

पर्यटनमंत्री श्री.महाजन म्हणाले,  सुरेश कलमाडी आणि या महोत्सवाचे घट्ट नाते आहे. ३५ वर्ष असा कार्यक्रम सुरू ठेवणे कठीण कार्य आहे. पण सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक या महोत्सवात सातत्य ठेवले. महोत्सवातील कार्यक्रम पाहता पुणे संस्कृतीचे माहेरघर असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. पुणे फेस्टिव्हलला भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती असेही श्री.महाजन म्हणाले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पुणे फेस्टिव्हलची देशभरात ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’ अशी ओळख निर्माण झाली आहे. १९८९ पासून हा उत्सव सातत्याने सुरू आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक सुंदर व्हावा यासाठी सुरेश कलमाडी यांनी खूप कष्ट घेतले, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात येऊन नृत्य सादर करणे ही गौरवाची बाब आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांचा सन्मान होत आहे, अशा शब्दांत खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खासदार श्रीमती पाटील, श्री. बारणे, आमदार पटोले, पद्मविभूषणडॉ. के.एल. संचेती, उद्योगपती संजय घोडवत यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

श्री.कलमाडी यांनी स्वागतपर भाषणात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे नाव देशात जावे या उद्देशाने पुणे फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य केले, असेही ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांना जीवनगौरव पुरस्काराने आणि उद्योगपती संजय घोडावत यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शतकपूर्ती वर्ष साजरे करणाऱ्या खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट आणि सदाशिवपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचादेखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ५० कलाकारांनी केलेल्या शंखनादाने झाली. पद्मश्री हेमा मालिनी आणि सहकलाकारांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. नंदिनी राव गुजर यांनी तुलसीदास रचित गणेश स्तुती सादर केली. सानिया पाटणकर यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी सुखदा खांडकेकर आणि सहकाऱ्यांनी  ‘नृत्य सीता’ हा रामायणातील सीता हरणानंतराचा प्रसंग नृत्य नाटिकेच्या माध्यमातून सादर केला.

नृत्यविष्काराच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. शर्वरी जमेनीस आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘हिस्टोरीकल  एम्पायर्स ऑफ इंडिया’ या नृत्याविष्काराला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रीयन मंडळ पुणेच्या खेळाडूंनी आर्टिस्टिक योगाच्या माध्यमातून भारतीय योग परंपरेचे अप्रतिम सादरीकरण  केले. हेमा मालिनी यांच्या चित्रपट कारकीर्दीवर आधारित नृत्य सादरीकरणही यावेळी करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप लावणी फ्यूजनने झाला.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या दळणवळण व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक : 22 (जिमाका वृत्तसेवा): चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलास 50 मी चे 5 स्पॅन देण्याबाबत तसेच श्री रेणुका देवी मंदिराजवळ सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) बनविणे, राहूड घाटात व भावडबारी घाटात नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व सुधारणा करणे याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. यावेळी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील देवळा तालुक्यातील महत्त्वाचा असलेला एनएच ७५२ जी सटाणा-देवळा-मंगरूळ रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या भू संपादित होणाऱ्या जमिनीच्या अडचणीं संदर्भात व साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी गडावर जाणारा नाशिक दिंडोरी वणी रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा व रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील वाहनधारक व  स्थानिक जनतेला चाचडगाव टोलनाक्यावरून सवलत मिळावी यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग 848 हा दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यातून गुजरातला जाणाऱ्या रस्त्यावरील कोटंबी व सावळघाटासह अनेक कामे प्रलंबित असल्याने अपघाताचे प्रमाण वाढू नये. तसेच टोल  परिसरातील २० किलो मीटरच्या स्थानिक वाहनधारकांना सवलतीच्या दरात मासिक पास देण्यामागची व नियमित शेतमाल ने- आण करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना टोलमध्ये सवलत देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली असून त्यासाठी केंद्रीय मंत्री  श्री. गडकरी यांनी देखील याबाबत सकारात्मक विचार करू, असे यावेळी सांगितले.

प्रस्तावित असलेला सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड रस्त्यासाठी भूसंपादन व शेतकऱ्यांना त्याबाबतचा योग्य मोबदला मिळण्याबाबतदेखील केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे सविस्तर चर्चा करून निवेदन दिल्याचे राज्यमंत्री डॉ.पवार यांनी सांगितले.

जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित

मुंबई, दि. २२ : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा पिके घेण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयातील जलसंचय बाष्पीभवनामुळे कमी झाल्याने, बुडित क्षेत्रातील जमिनी मोकळ्या/उघड्या होणार आहेत. या जमिनीमधील ओलावा आणि अत्यावश्यक परिस्थितीत जलाशयाद्वारे उपलब्ध होणारी सिंचन व्यवस्था विचारात घेऊन अशा जमिनीवर मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरणी करून चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. यास्तव जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील मोठे प्रकल्प, / मध्यम प्रकल्प / लघु प्रकल्पांच्या जलाशयातील गाळपेरा जमीन फक्त चारा पिकांच्या लागवडीखाली आणण्यासाठी गाळपेरा जमिनीचे वाटप कार्यपद्धतीचे अवलंबन करून ही जमीन फक्त चारा पिकांसाठी वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणाकरिता समिती गठित

गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणाकरिता लाभार्थी निवड, समन्वय आणि सनियंत्रणासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंचन अधीक्षक अभियंता, मृद व जलसंधारण कार्यकारी अभियंता, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे या समितीचे सदस्य, तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही वेळेस टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. कमी झालेले पर्जन्यमान अथवा भविष्यात पुरेसा पाऊस न झाल्यास जमिनीत असलेली ओल  कालौघात कमी होईल, यास्तव आगामी काळात उद्भवणाऱ्या चारा टंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी व उपलब्ध ओलीचा फायदा घेण्यासाठी चारा पिकांची लागवड करण्याची हीच योग्य वेळ आहे. मूरघास हा चारा प्रकार इतर चाऱ्यांपेक्षा जास्त पौष्टिक असून, मूरघासाच्या वापरामुळे पशुंची उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमतेत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय मुरघासाची हवाबंद स्थितीत साठवणूक केल्यास त्याचा वापर दीर्घ काळासाठी होतो व दीर्घ काळानंतरही हिरवा चारा उपलब्ध झाल्यामुळे दूध उत्पादनावर फारसा परिणाम न होता चारा टंचाईवर प्रभावीरित्या मात करणे शक्य होईल यास्तव वाटप करण्यात येणाऱ्या गाळाच्या जमिनीत मका व ज्वारी यासारख्या मूरघासासाठी उपयुक्त असलेल्या चारा पिकांची लागवड करण्यात यावी.

चारा बियाणे वाटपासाठी केंद्र/राज्य शासनाच्या योजनांद्वारे उपलब्ध होणारा निधी तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरण व पशुखाद्य कार्यक्रम शेतकऱ्याच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप या योजनेअंतर्गत मका व ज्वारी या वैरण पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील. भविष्यात टंचाईसदृश्य काळात चारा टंचाई उदभवू नये यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांनी जलस्त्रोतांचे व चारा निर्मिती स्रोतांचे मॅपिंग करुन तंत्रशुध्द पध्दतीने चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात यावे. तसेच, जिल्हानिहाय / प्रकल्पनिहाय उपलब्ध गाळपेर क्षेत्र, चारा पिकाखाली घेण्यात आलेले क्षेत्र, चाऱ्याचे होणारे अंदाजित उत्पन्न याची आकडेवारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी पशुसंवर्धन आयुक्तांना द्यावी, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

शानदार नृत्याविष्काराने प्रादेशिक सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात;  गायन, ओडिसी नृत्य आणि लोकवाद्यांच्या सुरांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे दि.२२:  कथ्थक कलाकार  नंदकिशोर कपोते, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता , दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक प्रोफेसर सुरेश शर्मा, ओडिसी नृत्यांगना पार्वती दत्ता, सुगंधा दाते, सीमा कालबेलिया लोककलाकार गाजी खान यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती सभागृह येथे आयोजित  प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.  या नृत्याविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. नृत्य पथकाने मंगलाचरणातील शिव स्तुतीच्या सादरीकरणाच्या माध्यमातून भगवान शंकराला वंदन केले.  पार्वती दत्ता यांच्या एकल नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दशावतार, रामायण, पल्लवी आणि मोक्षाचे अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

सारेगामा लिटिल चॅम्पस्  २०१९ च्या विजेत्या सुगंधा दाते यांनी मराठी अभंग आणि हिंदी चित्रपट गीते सादर केली.

प्रेक्षक लोकझंकार च्या तालावर नाचले

आठ राज्यातील लोककलाकारांच्या लोकझंकाराच्या सादरीकरणाने रसिकांना लोकसंगीताचा तालावर ठेका धरायला भाग पाडले.  झंकारमधील लोकगायन, वाद्य, नृत्याच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली. लोककलाकारांनी सादर केलेले पारंपरिक कालबेलिया नृत्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले.  या सर्पमित्र नृत्याच्या प्रत्येक अविष्काराने, तालाने आणि सुरांनी एक वेगळेच वातावरण निर्माण केले.  यासोबतच घुम-चक्कर या सादरीकरणानेही प्रेक्षकांची मने जिंकली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्मी पब्लिक स्कूलच्या ५० विद्यार्थी यानी  गोंड, वारली आणि मण्डाणा च्या नामवंत कलाकारांकडून प्रशिक्षण घेऊन चित्राविष्कार सादर केला.

शनिवारी मधुरा दातार यांची  संगीत मैफल

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथील कला शाखेचे विद्यार्थी कथ्थक नृत्य सादर करतील.  तसेच प्रसिद्ध गायिका मधुरा दातार गीते सादर करणार आहेत. पुण्यातील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कलाकारांच्या कलागुणांना दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

घरपट्टे मिळण्यापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरदि. 22 : अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर वास्तव्य असलेल्या कुटुंबाना घरपट्टे देऊन नियमानुकूल करणेहे शासनाचे धोरण आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत घरपट्टे वाटपाचा श्रीगणेशा  मूल येथून करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या असून  कोणताही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाहीअशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली

मूल तहसील कार्यालय व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पात्र नागरिकांना घरांचे पट्टे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामतहसीलदार डॉ. रविंद्र होळीन.प. मुख्याधिकारी यशवंत पवारसंध्या गुरनुलेमाजी न.प.अध्यक्ष रत्नमाला भोयरप्रभाकर भोयरनंदू रणदिवेचंद्रकांत आष्टनकरमहेंद्र करताडेअनिल साखरकरमिलिंद खोब्रागडे,ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते. 

पट्टे हे महसूलच्या जमिनीवरच देता येतात. वनरेल्वेसंरक्षण विभागाच्या जमिनीवरील पट्टे देता येत नाहीअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेशासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जमिनीचा पट्टा नावावर असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आवास योजनेचा आढावा घेतला असताअनेकांकडे घरपट्टेच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यात मिशन मोडवर योग्य व पात्र व्यक्तिंना घरपट्टे वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात रमाई आवास योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी व घरकुलांची संख्या जास्त आहे. शबरी आवास योजनेअंतर्गत निकषाच्या तरतुदीनुसार पूर्तता करीत असेल त्यांना घरकुल देण्यात येईल. आतापर्यंत ओबीसी प्रवर्गाकरीता घरकुल कमी होते. आता मात्र नमो आवास योजनेंतर्गत राज्यात 3 वर्षात 10 हजार घरे बांधण्यात येणार आहेअसे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मूल येथे विकासाची गंगा : मूल येथे भव्यदिव्य नाट्यगृह बांधण्यात आले असून या भागात रस्तेस्टेडीयमजीमउद्यानवीज पुरवठा व्यवस्थापिण्याच्या पाण्याची व्यवस्थातहसील कार्यालयपंचायत समिती कार्यालयविद्यार्थ्यांसाठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी अभ्यासिका आदी विकासकामे करण्यात आली आहे. या भागात विकासाची जवळपास 200 कामे पूर्ण करण्यात आली आहे. अपूर्ण असलेली कामेसुध्दा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मूल येथे 100 बेडेड ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त करण्यात येईल.

अधिकारी व पदाधिका-यांनी योजना जनतेपर्यंत पोहचवाव्या : राज्य सरकार जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. यासाठी शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच पदाधिका-यांनी विशेष लक्ष द्यावे. शासन जनेतसाठी काम करीत असतांना अधिका-यांनी विनाकारण अडवणूक करू नयेअशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

या कुटुंबाला मिळाले घरांचे पट्टे : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गजानन  शेडमाके व अंजली शेडमाकेबेबी कोकोडेशांता जेंगठेरविंद्र जेंगठे व रेखा जेंगठेआनंद मोहुर्ले व श्वेता मोहुर्लेशंभु मडावी व मालन मडावीशामराव वडलकोंडावार व ताराबाई वडलकोंडावारहरीदास मेश्राम व गिता मेश्राम यांना घरपट्टे प्रमाणपत्र देण्यात आले.

000000

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...