सोमवार, एप्रिल 21, 2025
Home Blog Page 1581

गडचिरोली जिल्ह्याची विकासाची गती वाढविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम करा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

गडचिरोली दि.18 : विविधतेने नटलेल्या गडचिरोली जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. या जिल्ह्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी प्रत्येकाने‘मिशन मोड’वर काम करावे,असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले. विविधतेने नटलेला व विविध भाषा असणारा गडचिरोली जिल्हा हा‘मिनी भारत’असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

गडचिरोली जिल्ह्यातील सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्पाचे उद्घाटन व विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी राज्यपाल गडचिरोली येथे आले होते. नियोजन भवन येथे स्थानिक पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर,राज्यपालांचे सचिव संतोष कुमार,जिल्हाधिकारी शेखर सिंह,मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव,पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड,प्रकल्प अधिकारी,डॉ. इंदुराणी जाखड,जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडलावार,गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे इ. पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले गडचिरोली जिल्हा विकासाच्या दृष्टीने आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट आहे. आरोग्य,शिक्षण,दळणवळण,उद्योग या क्षेत्रात गतीने सुधारणा करण्याची गरज आहे. जिल्ह्यात निसर्ग संपत्ती मोठ्या प्रमाणात असून त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे.

बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यातील अडचणींबाबत त्यांनी राज्यपाल महोदयांना अवगत केले. यावेळी जिल्ह्यातील नक्षलवाद,पुलांचे बांधकाम,सिंचन सोयी सुविधा,उदयोग याबाबत चर्चा केली.

बैठकीआधी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नवजात शिशु विभाग,प्रसूतिपूर्व तपासणी कक्ष,शस्त्रक्रियागृह,अतिदक्षता विभागांना भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूढे यांनी रूग्णालया विषयी माहिती सादर केली.

कार्यक्रमामध्ये गडचिरोली येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल व त्यांनी केलेल्या विविध उत्कृष्ट जनजागृती कामाबद्दल गौरविण्यात आले. वसतिगृहाचे गृहपाल रवींद्र गजभिये यांचा मानचिन्ह देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आढावा बैठकीचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर यांनी केले तर राज्यपाल महोदय यांचे आभार अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी मानले. जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचे यावेळी सादरीकरण केले.

रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले निवेदन

नागपूर, दि. 18 : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे, परिषदेचे अध्यक्ष आचार्य महंत श्रीगोपीराज बाबाजी शास्त्री, महंत पाचराऊत बाबा, पुरुषोत्तम ठाकरे, अमरावती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, महंत प्रसन्न शास्त्री, प्रविण बिजवे, महंत नायंबास बाबा, महंत साळकर बाबा आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, रिद्धपूर ही महानुभव पंथियांची काशी म्हणून ओळखले जाते. मराठीचा पहिला गद्यग्रंथ लीळाचरित्र रिद्धपूर येथे लिहिला गेला. आद्य मराठी कवयित्री महदंबेचे धवळे हे काव्य याठिकाणी लिहिले गेले.  या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणी मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रेल्वे स्थानक व्हावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

वृक्षसंपदेच्या वैविध्याने समृद्ध नागनगरी (विशेष वृत्त)

नागपूर, दि. 18 :  नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्य अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही हे वैविध्य औत्सुक्यपूर्ण ठरत आहे. नागपूरचे विधिमंडळ जेथे आहे; तो परिसर सिव्हिल लाईन्स म्हणून ओळखला जातो. हा परिसरही वृक्षराजीने संपन्न आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यासही मदत होत आहे. उन्हाळ्यात तापमानवाढीचे नवे आलेख निर्माण होत असताना नागपूर शहरवासियांनी, विद्यार्थ्यांनी एक चळवळ म्हणून वृक्षलागवड केली आहे, त्यामुळे नागपूर एक हिरवेगार शहर दिसून येत आहे. सिमेंटच्या रस्त्यावरील ही झाडेही रस्ता करताना कापली जाऊ नयेत किंवा मरू नयेत यासाठी विशेष काळजी घेतली आहे. यामध्ये इमारती आणि कार्यालयांच्या भोवतींच्या झाडे, बागबगीचे झाडांची संख्या वेगळीच आहे.

लेक गार्डन’, ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलाव, नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन, नागपूरचे फुफ्फुस मानले जाणारे सेमिनरी हिल, फुटाळा तलाव, चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, गोरेवाडा तलाव अशा विविध वृक्षराजींनी संपन्न असलेल्या ठिकाणांनी नागपूरचे सौंदर्य वाढविले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा झाडी, रूंद सिमेंटच्या रस्त्याचे विभाजन करणाऱ्या जागेतही झाडे आणि इमारतींचे परिसरही हिरव्या गर्द झाडांनी व्यापलेले अशी ओळख नागपूरच्या सिव्हील लाईनची आहे. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्यांसाठी हा परिसर निश्चितच नयनरम्य आणि स्वप्नवत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर असलेल्या नागपूरच्या वैशिष्ट्यात भर घालते येथील वृक्षसंपदा. हे शहर केवळ हिरवाईने नटलेले नसून वृक्षसंपदेचे वैविध्यही त्याने जोपासली आहे. त्यामुळेच नागपूरच्या सौंदर्यात ही वृक्षवल्ली निश्चितच भर घालत आहे. अधिवेशनानिमित्त येणाऱ्यांमार्फत संपूर्ण राज्यभर या हिरवाईचा वसा पोहोचविण्यासाठी यावेळी विधिमंडळ परिसरातही वृक्षलागवडीचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावले आहेत.

‘सुखोई’त बसण्याचे धाडस दाखवून प्रतिभाताईंनी देशापुढे आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा नागरी सत्कार 

नागपूर,दि.18:राष्ट्रपती म्हणून सर्व सुख-सोयी पायाशी लोळण घेत असताना आवाजाच्या वेगापेक्षा वेगवान असणाऱ्या’सुखोईतून प्रवास करायला धाडस लागते. ते धाडस प्रतिभाताईंनी दाखवून महिलांपुढेच नाही तर देशापुढे आदर्श निर्माण केला, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय नागपूर केंद्राच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, खासदार प्रफुल्ल पटेल, खा. कृपाल तुमाने, माजी मुख्यमंत्री सर्वश्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार सर्वश्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे, दीपक केसरकर व संयोजक गिरीश गांधी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कन्या राष्ट्रपती होणार असतील तर त्यांच्या आड शिवसेना येणार नाही आणि कुणालाही येऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. अशी भूमिका जाहीर केल्यावर तेव्हाही शिवसेनेवर दबाव होता. मात्र कितीही मतभिन्नता असली तरी राज्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भावनेतून प्रतिभाताईंचे समर्थन केल्याचे त्यांनी सांगितले. 1962 मध्ये प्रतिभाताई पहिल्यांदा विधानसभा सदस्य झाल्या, तेव्हा शरद पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी मी केवळ दोन वर्षांचा होतो. मला अनुभवसंपन्न व्यक्तींचा सहवास आणि आशीर्वाद लाभला. प्रतिभाताईंचा सत्कार करण्याची मुख्यमंत्री म्हणून आपणास संधी मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्यमंत्री नसतो तरीही या कार्यक्रमाला आलो असतो, कारण प्रतिभाताईंशी माझ्या आजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. मध्यंतरी भेटी झाल्या नाहीत तरी ते नाते घट्टपणे जपले गेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिभाताई राष्ट्रपती असताना त्यांनी स्वतः उपवासाच्या महाराष्ट्रीयन पदार्थांची रेसिपी सांगून उपवासाचे पदार्थ बनवून घेतले होते आणि राष्ट्रपती भवनात ते आग्रहाने खाऊ घातलेत, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

भैरोसिंह शेखावत यांच्या जनसंपर्कासमोर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदासाठी लढा देऊ शकतील असे सोनिया गांधींना सांगितलं आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताईंना मिळाला अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. प्रतिभाताईंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी कोणतीही चर्चा करण्याचे कारण नाही, असे सांगून महाराष्ट्राच्या कन्या असलेल्या प्रतिभाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेल्या दोन व्यक्ती प्रतिभाताई आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशस्वी झाल्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी मुख्यमंत्री असताना प्रतिभाताईंचा मृदू स्वभाव मला कधीच जाणवला नाही त्यांनी अतिशय आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्यांची भूमिका पार पाडली अशी आठवण श्री. पवार यांनी सांगितली. देशातील सर्व राज्याच्या कृषिमंत्र्यांची बैठक घेऊन शेतीसमोरील अडचणी आणि उपायांची टिपणे तयार करून प्रधानमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पाठवणाऱ्या त्या देशातील पहिल्याच राष्ट्रपती होत्या. रशियाच्या अतिशय वेगवान अशा सुखोई विमानात सैन्याचा पोशाख घालून प्रवास करणाऱ्याही प्रतिभाताई पहिल्याच महिला राष्ट्रपती ठरल्या असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना प्रतिभाताई म्हणाल्या, लेकीबाळीचे कौतुक आणि सत्कार करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि ही संस्कृती बाळासाहेबांनी दाखविली. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून व्यस्त असतानाही या कार्यक्रमाला वेळ काढून आलेत, हे बाळासाहेबांचे संस्कार असल्याचे त्या म्हणाल्या. भारताचा व्यापार आणि उद्योग वाढविण्यासाठी राष्ट्रपती असताना परदेश दौऱ्यावर पहिल्यांदा व्यापारविषयक शिष्टमंडळ नेण्याचे काम केले. तेव्हा टीका झाली पण देशातील एसआयए., असोचेम, आणि फिक्की सारख्या संस्थांनी हे योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताचा व्यापार आणि उद्योगवृद्धी  झाल्याचेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

भारताची आंतरिक ताकद मोठी असून महात्मा गांधींच्या नैतिक तत्वावर आणि मानवी मूल्यांवर आधारित आहे. तसेच संविधान ही देशाची गीता असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढा, पंडीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद  यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान व त्याग केला. या देशाच्या पायाचे हे आधारस्तंभ आहेत. या ना आधारस्तंभांना विसरून कसे चालेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवाद, सार्वभौमत्व आणि संविधान दिलेल्यांना विसरून चालणार नाही. राष्ट्रभक्ती आणि विद्वत्ता असणाऱ्या आंबेडकरांशिवाय संविधान लिहिण्याचे काम कोणी करू शकणार नाही, असा विश्वास महात्मा गांधींना होता. त्यांचे मतभेद असले तरी मनभेद नव्हते.

संविधानाची शपथ घेताना संविधानाप्रति खरी श्रद्धा राखील व त्याप्रति प्रामाणिक राहील, असे म्हणत असताना आपण निधर्मी राज्य नाकारतो. संविधानातच स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे.

राष्ट्रपती असताना त्या पदाचा मान आणि गौरव वाढविण्याचे काम करता आले, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती तिन्ही सैन्याचा प्रमुख असतो. म्हणून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी वयाच्या 74 व्या वर्षी सैन्याचा पोशाख चढवून सुखोइत प्रवास करण्याचे धाडस करता आले, याचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिल देशमुख यांनी केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार कृपाल तुमाने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी तर आभार गिरीश गांधी यांनी मानले . कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खासदार, आमदार व नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख

नवीदिल्ली, 17 : केंद्र शासनानेमहाराष्ट्राचेसुपुत्रले.जनरलमनोजमुकुंदनरवणेयांचीभारतीयसैन्यदलाचे नवेलष्करप्रमुखम्हणूननिवडकेलीआहे.विद्यमानलष्करप्रमुखबिपीनरावतयेत्या31डिसेंबररोजीसेवानिवृत्तहोतअसूनले.जनरलनरवणेहेत्यांचापदभारस्वीकारतील.

श्री.नरवणेयांच्यारुपानेमराठीमाणूसदेशाच्यालष्कराच्यासर्वोच्चपदीविराजमानहोणारआहे.यापदावरीलतेदुसरेमराठीअधिकारीअसतील.यापूर्वीजनरलअरूणकुमारवैद्ययामराठीअधिकाऱ्याला1983ते1986याकालावधीतदेशाच्यालष्करप्रमुखपदाचाबहुमानमिळालाआहे.

केंद्रसरकारवसंरक्षणमंत्रालयातीलउच्चपदस्थसमितीनेसेवाज्येष्ठतेनुसारश्री.नरवणेयांचीदेशाचेआगामीलष्करप्रमुखम्हणूननिवडकेलीआहे.मूळपुण्याचेअसलेलेश्री.नरवणेसध्याभारतीयलष्कराचे उपप्रमुखअसूनविद्यमानलष्करप्रमुखजनरलबिपीनरावतयेत्या31डिसेंबरलानिवृत्तहोतअसल्याने    लष्करप्रमुखम्हणूनत्यांनाबढतीदेण्यातयेतआहे.

ले.जनरलमनोजनरवणेयांच्याविषयी

ले.जनरलनरवणेयांनीयाचवर्षीसप्टेंबरमहिन्यातव्हाइसचीफऑफआर्मीस्टाफपदाचीजबाबदारीस्वीकारलीहोती.त्याआधी तेसैन्याच्यापूर्वेकडच्याभागाचीजबाबदारीसांभाळतहोते.भारताच्याचीनशीसंलग्नसुमारे4,000कि.मी.लांबसीमेच्यारक्षणाचीजबाबदारीनरवणेयांनीसमर्थपणेसांभाळलीआहे.

श्री.नरवणेयांचेवडीलमुकुंदनरवणेहेहवाईदलातीलनिवृत्तअधिकारीआहेत.त्यांच्याआईसुधायाप्रसिद्धलेखिकाआणिआकाशवाणीच्यानिवेदकहोत्या.ले.जनरलनरवणेयांचेशालेयशिक्षणपुण्यातील’ज्ञानप्रबोधिनी’तझालेआहे.चित्रकलेचीआवडजोपासतअसतानाचत्यांनालष्करीसेवेचेवेधलागले.महाविद्यालयीनशिक्षणानंतरराष्ट्रीयसंरक्षणप्रबोधिनीतप्रशिक्षणपूर्णकरूनतेजून1980मध्येते’7सीखलाइटइन्फंट्री’मधूनलष्करातदाखलझाले.

जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादीकारवायांचाबीमोडकरण्यासाठीकार्यरतराष्ट्रीयरायफल्सचेत्यांनीनेतृत्वकेले.आसामरायफलचेउत्तर-पूर्वविभागाचे’इन्स्पेक्टरजनरल’,स्ट्राइककोअरचेदिल्लीक्षेत्रातील’जनरलऑफिसरइनकमांडिंग’,लष्करप्रशिक्षणविभागाचेप्रमुख,महूस्थितलष्करयुद्धशास्त्रमहाविद्यालयातप्रशिक्षकअशाअनेकपदांचीधुरात्यांनीयशस्वीपणेसांभाळलीआहे.श्री.नरवणेयांनीसोपविण्यातआलेलीप्रत्येकजबाबदारीचोखपणेपूर्णपाडतआपलेकौशल्य,वेगळेपणत्यांनीसिद्धकेले.याकामगिरीचीवेळोवेळीदखलघेण्यातआली.

0000

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.269/  दिनांक17.12.2019

आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे 14 हजार 600 कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत पाटील

नागपूर दि. 17 :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2 हजार 100 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6 हजार 600 कोटी रुपयांपैकी 2 हजार 100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 7 हजार 400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7 हजार 200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.

अजय जाधव .. 17..12.2019 0000

आपदा पीड़ित किसान और बाढ़ पीड़ितों की मदद के लिए

केंद्र सरकार की ओर 14 हजार 600 करोड़ की मांग

अर्थमंत्री जयंत पाटिल

नागपुर : राज्य में हुई बेमौसम बारिश के कारण नुकसान हुए किसानों की मदद के लिए राज्य सरकार की ओर से  6 हजार 600 करोड़ रुपये मंजूर किए है, इसमें से 2100 करोड़  रूपये वितरित किए गए है. बेमौसम बारिश से हुए नुकसान पर मदद के लिए और  बाढ़ पीड़ितों की मदद के लिए राज्य सरकार ने केंद्र सरकार की ओर 14 हजार 600 करोड़ रुपयों की मांग की है, ऐसी जानकारी वित्त मंत्री जयंत पाटिल ने आज विधानसभा में दी.

            नुकसान से पीड़ित किसानों और बाढ़ पीड़ितों को मदद की मांग विपक्ष द्वारा की गई थी. इसे उत्तर देते हुए वित्तमंत्री बोल रहे थे. उन्होंने कब की,  राज्य सरकार की ओर से मदद का वितरण शुरू है. मंजूर किए गए 6600 करोड़ रुपयों में से  2100 करोड़ रुपये जिलाधिकारियों के मार्फत वितरित किए गए है. बाकी रकम जमा करने की कार्यवाही शुरू है.

            राज्य सरकार ने बाढ़ पीड़ितों की मदद के लिए  7400 करोड़ रूपये तथा बेमौसम बारिश से नुकसान हुए किसानों की मदद के लिए 7200 करोड़ रुपये ऐसी कुल 14 हजार 600 करोड़ रुपयों की मांग केंद्र सरकार से की है. राज्य के आपदा पीड़ित किसानों को राज्य सरकार दुर्लक्षित नहीं करेगी, ऐसा वित्त मंत्री पाटिल ने इस समय कहा. 

००००

Demand for 14, 600crores to the central government

for afflicted farmers and flood-hit people in the state

– Finance Minister JayantPatil

Nagpur 17.Dec.19: “Around Rs. 6,600 crore has been sanctioned by the state government to help farmers affected by the untimely rains in the state, out of which Rs. 2100 crore has been disbursed. The state government has demanded Rs14,600 crore to the central government to help the flood victims and farmers who faced heavy loss due to untimely rain” stated Finance Minister JayantPatil. 

He was speaking in the Legislative Assembly while responding to opposition parties when they demanded financial assistance for farmers.

Mr. Patil further informed that allocation of assistance through the state government was underway. Out of the approved Rs6600 crore, Rs2100 crore had been disbursed through the Collector. The process of depositing the remained balance was in progress.

“The state government has demanded Rs7400 crore for the help of flood-hit people and Rs14,600 crore for the help of the farmers affected by the untimely rains. The state government will give strong support and help to afflicted farmers in the state” promised Finance Minister.

0000

‘महाराष्ट्र अहेड’सह ‘लोकराज्य’च्या हिंदी, गुजराथी, ऊर्दू आवृत्तींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर,दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘महाराष्ट्र अहेड’सह ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2019 च्या हिंदी,गुजराथी आणि ऊर्दू आवृत्तींचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  हस्ते रामगिरी  येथे करण्यात आले. यावेळी विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह,संचालक ( वृत्त व माहिती) सुरेश वांदिले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा शपथविधी कार्यक्रम,मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय आणि  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 विधानसभा सदस्यांचा थोडक्यात परिचय या मासिकात करून देण्यात आला आहे. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या विशेष लेखांनी अंक सजले आहेत. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर विशेष लेखही समाविष्ट करण्यात आला आहे. हे अंक सर्वत्र उपलब्ध आहेत. 0000

महाराष्ट्र अहेडसहित लोकराज्यकी हिंदी, गुजराती, उर्दू

संस्करणों का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के हाथों प्रकाशन

नागपुर, दि. 17: सूचना और जनसंपर्क महानिदेशालय द्वारा प्रकाशित महाराष्ट्र अहेडसहित लोकराज्य मासिक पत्रिका के नवंबर-दिसंबर 2019 के हिंदी, गुजराती और उर्दू संस्करण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के हाथों रामदगिरी में प्रकाशित किए गए। इस अवसर पर विभाग के सचिव और महानिदेशक, बृजेश सिंह, संचालक (समाचार एवं सूचना) सुरेश वंदिले उपस्थित थे।

 मुख्यमंत्री श्री. ठाकरे की शपथविधी कार्यक्रम, मुख्यमंत्री सहित मंत्रिमंडल के सभी सदस्यों का परिचय और हाल के विधानसभा चुनावों में जीतने वाले 288 विधानसभा सदस्यों का संक्षिप्त परिचय इस मासिक पत्रिका में प्रकाशित किया गया है। इसके अतिरिक्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस के विभिन्न पहलुओं पर प्रकाश डालने वाले विशेष लेखों को सजाया गया है। गुरुनानक के 550वें जन्मदिन पर एक विशेष लेख भी शामिल किया गया है। यह अंक हर जगह उपलब्ध हैं।

००००

CM Uddhav Thackeray launches ‘Maharashtra Ahead’

and Hindi, Gujarati and Urdu editions of ‘Lokrajya’

Nagpur, date.17th: ‘Maharashtra Ahead’ and ‘Lokrajya’ magazines are published by the Directorate General of Information and Public Information.  CM Uddhav Thackeray at Ramgiri unveiled ‘Maharashtra Ahead’ and Hindi, Gujarati, and Urdu editions of ‘Lokrajya’- issue November- December 2019. Secretary of the department and Director General Brijesh Singh, Director (News & Information) Suresh Wandile were present at that time.

The magazine includes articles on CM Shri. Thackeray’s oath ceremony, introduction of Chief Minister, all state cabinet members, and the short introduction of 288 MLA won in recent state assembly elections. The magazine also includes various articles that shed light on various aspects of Bharat RatnaDr.BabasahebAmbedkar, on the occasion of his Mahaparinirvan Day. A special article about Guru Nanak on his birth anniversary is included in the issue. These issues are available everywhere.

0000

दुर्मिळ लोकराज्य अंक प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

नागपूर,दि. 17 : नागपूर विधानभवन परिसरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘लोकराज्य’चे दुर्मिळ विशेषांक पाहून समाधान व्यक्त करतानाच या प्रदर्शनाच्या आयोजनाचे कौतुकही श्री. ठाकरे यांनी केले. ‘लोकराज्य’चे अंक संग्रही ठेवण्यासारखे आहेत, असे प्रशंसोद्गारही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी काढले.खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

विधानभवन परिसरातील ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शन स्टॉलला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी यांच्यावरील विशेषांकासह नुकताच प्रकाशित झालेला सर्व नवनिर्वाचित आमदारांचा परिचय असलेल्या ‘लोकराज्य’च्या अंकाला वाचकांची मोठी मागणी आहे. प्रदर्शनातील जुने आणि दुर्मिळ अंक विशेष आकर्षण ठरत आहेत. अधिवेशन संपेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

शून्य मैल दगडाची वेगळी गोष्ट! (विशेष वृत्त)

नागपूर,दि 17 : महाराष्ट्राची उपराजधानी,संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने.अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे.  1907 मधील हा दगड नागपूरचे भौगोलिक स्थान ठळक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या  शून्य मैलाच्या शेजारीच असलेला जीटीएस दगड हा तत्कालीन विशाल त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही उभा आहे. ब्रिटिशकालीन सर्वेक्षणावेळी संपूर्ण देशभरात असे साधारणत: 80 शून्य मैलाचे दगड उभारले गेले असले तरी देशाचा मध्य म्हणून नागपूरच्या शून्य मैलाच्या दगडाचे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे.

देश चालविण्यासाठी महसूल गोळा करणे आवश्यक असते. त्यामुळे महसूल गोळा करण्यास सुविधा निर्माण व्हावी यासाठी आणि स्थल व उंच-सखलपणा दाखवणारे नकाशे अचूक सर्वेक्षण करून बनवण्याच्या मुख्य उद्देशाने जीटीएस हा प्रकल्प राबविण्यास  19 व्या शतकाच्या प्रारंभीच सुरुवात झाली. कालांतराने इस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटीश राजवटीत ते सर्वेक्षण पूर्ण झाले. सध्या नागपुरात झिरो माईल्स च्या शेजारी असलेल्या जीटीएस या दगडावरही त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची फुटामध्ये 1020.171 अशी कोरण्यात आली आहे. आपल्या साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे आणि त्यातून आपले राज्य बळकट करणे हा जरी ब्रिटिशांचा या सर्वेक्षणामागे उद्देश असला;तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. या सर्वेक्षणाच्या माध्यमातूनच त्यांनी एव्हरेस्ट,कांचनगंगा,के.टू यांसारख्या शिखरांची उंची निश्चित केली होती.

नागपूरमध्ये असलेल्या शून्य मैलाच्या दगडाच्या माध्यमातूनही त्याच्या चारही बाजूला असलेल्या कवठा,हैदराबाद,चंदा,राजपूर,जबलपूर,सीओनी,छिंदवाडा,बैतुल शहरांची अंतरे दर्शविली आहेत.  सध्या  हा दगड आपल्या ऐतिहासिक खुणा घेऊन उभा आहे.  या ठिकाणी असलेले चार घोड्यांचे शिल्प या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालते.

पालघर जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 17 : पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान;तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 18 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्‌टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 24 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसल्यास 30 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी 1 जानेवारी 2020 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

पालघर जिल्हा परिषदेंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

·      नामनिर्देशनपत्र सादर करणे-18 ते 23 डिसेंबर 2019

·      नामनिर्देशनपत्रांची छाननी-24 डिसेंबर 2019

·      अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे-30 डिसेंबर 2019

·      अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे-1 जानेवारी 2020

·      मतदानाचा दिनांक-7 जानेवारी 2020

·      मतमोजणीचा दिनांक-8 जानेवारी 2020

ताज्या बातम्या

जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार असल्याने हा आनंदाचा क्षण सर्वासमवेत अनुभवता येणार आहे. नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण...

धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियाजित वेळेत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज...

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

0
अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चासत्र ठेवणार ! मुंबई दि. २०: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४...

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २० : पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!

0
आपल्या वसुंधरेसाठी नऊ दिवस समर्पित भावनेने काम करा मुंबई, दि. २० : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते...