सोमवार, एप्रिल 21, 2025
Home Blog Page 1583

विधानपरिषद तालिका सभापतीपदी पाच जणांची नियुक्ती

नागपूर, दि. 16 :विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी पाच जणांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केली.

तालिका सभापतीपदी विधानपरिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया, प्रकाश गजभिये, रामदास आंबटकर, अनंत गाडगीळ, श्रीकांत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा सभापती श्री. नाईक निंबाळकर यांनी केली.

विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी सुभाष देसाई; विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड

नागपूर, दि. 16 :विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाली असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केली.

सभागृह नेतेपदी श्री. देसाई व विरोधी पक्षनेतेपदी श्री. दरेकर यांची निवड झाल्याबद्दल सभापती श्री. नाईक निंबाळकर यांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री. दरेकर यांना विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर नेऊन बसविले.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल श्री. दरेकर यांचे अभिनंदन करताना सभागृह नेते श्री. देसाई म्हणाले की, श्री. दरेकर यांनी सामाजिक, क्रीडा क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. मुंबईतील सहकार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची मदत होईल.

श्री. दरेकर अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना म्हणाले की, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पदाला मोठी परंपरा आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हे पद सांभाळले आहे. सभागृहाचे कामकाज शांततेत जास्तीत जास्त काळ चालावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. सभागृहात होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून कष्टकरी, कामगार व वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.

यावेळी वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील, विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई गिरकर, भाई जगताप, किरण पावसकर, ॲड. अनिल परब, जयंत पाटील, सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर आदींनीही अभिनंदनपर भाषण केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/16.12.2019

शिवाजीराव पाटील यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेला नेता – सभापती रामराजे नाईक निंबाळकर

नागपूर, दि. 16 : प्राथमिक शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांच्या निधनामुळे शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत. अशा शब्दांत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.विधानपरिषदेत सभागृह नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माजी आमदार दिवंगत श्री.पाटील यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.

श्री.नाईक निंबाळकर म्हणाले, राज्यभर शिक्षकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करणारे श्री.पाटील हे खऱ्या अर्थाने आक्रमक नेते होते. सांगली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांशी त्यांचा संबंध होता. प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी महत्त्‍वपूर्ण योगदान दिले.

श्री.देसाई यांनी आपल्या शोकप्रस्तावात सांगितले, सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात शिवाजीराव पाटील यांनी अतुलनीय काम केले. ते सांगली विकास मंडळाचे अध्यक्ष होते. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

वित्तमंत्री जयंत पाटील म्हणाले, श्री.पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यांना लाखो शिक्षक उपस्थित असत. शिक्षकांच्या प्रश्नासाठी आग्रही असणारा नेता म्हणून त्यांचा संघर्ष प्राथमिक शिक्षक कायमस्वरुपी लक्षात ठेवतील.

या शोकप्रस्तावावर सदस्य सर्वश्री सदाभाऊ खोत, विनायक मेटे, कपिल पाटील, पृथ्वीराज देशमुख, सुरेश धस आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

छत्तीसगड विधानसभेच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

नागपूर, दि.16 :छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष मनोज सिंह मंडावी यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रामगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी छत्तीसगढ येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना दिले. 

साकोली-वडसा महामार्गाच्या कामाला गती द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर, दि. 16 :साकोली ते वडसादरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. साकोली ते लाखांदूर दरम्यान महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. या मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रविवारी रवि भवन येथील कुटीर क्र. 17 येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एम. जयस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, भंडारा येथील उपविभागीय अभियंता संजीव जगताप यांची उपस्थिती होती.

श्री. पटोले म्हणाले, साकोली ते वडसादरम्यान सुरू असलेल्या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे, मात्र या कामाला अपेक्षित गती नाही. या कामासाठी जागोजागी करण्यात आलेल्या खोदकामामुळे वाहनधारकांना अडथळे निर्माण होत असल्याने या रस्त्यावर अपघातही वाढले आहेत. त्यामुळे या मार्गाचे काम अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी या कामावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या  अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी इतर मार्गांच्या कामांचाही आढावा घेतला.

सहयोग नगर येथील मैदानाचा प्रश्न निकाली काढा

नागपूर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनला लीजवर देण्यात आलेले शहरातील सहयोग नगर येथील मैदान नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे. याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिका यांनी नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शितल तेली-उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राजभवन येथे आगमन

नागपूर, दि.16 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे 16 डिसेंबर रोजी नागपूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने राजभवन येथे आगमन झाले. यावेळी पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजून राज्यपालांना मानवंदना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख आणि कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांचे राजभवन येथील पारिवारिक प्रबंधक रमेश येवले प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपाल यांचा शनिवार, दिनांक 21 डिसेंबर पर्यंत राजभवन येथे मुक्काम आहे.

****

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच योजनांमध्ये कालानुरूप सुधारणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

                                 

नागपूर, दि. 16 :राज्यात अवेळी झालेल्या पावसाने बाधित शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 5 हजार 300 कोटी रुपयांची मदत वितरित होत आहे. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह विविध योजनांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुधारणा करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले.

विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी घेतला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, श्रीमती सुलभाताई खोडके, बच्चू कडू, रवी राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, विविध नैसर्गिक संकटे समोर आली तरी परिस्थितीचा सामना करत आपल्याला पुढे जावे लागेल. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये नव्या उपाययोजनांचा समावेश करावा लागेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नव्या योजनांची भर घालण्यात येईल. विदर्भासाठी वेगळ्या उपाययोजनांचा विचार करून जनतेला न्याय देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अवेळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विम्याचा आधार असतो. मात्र, कंपन्याकडून शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळण्यास समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पिक विमा धोरणात सुधारणा करण्यात येतील. शेतकऱ्यांना हक्काचा लाभ मिळाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे आणि पावसाची आकडेवारी ग्राह्य मानण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कर्जमाफीची रक्कम जिल्हा बँकेसह विविध बँकांकडून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अवेळी पावसाने बाधित झालेल्या जाहीर क्षेत्रात वरुड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश नसल्याची बाब समोर आल्यानंतर ही बाब जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे श्री. मेहता यांनी सांगितले. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाला आळा घालण्यासाठी सामूहिक कुंपण योजना राबविण्याचा विचार करण्यात येईल. तसेच वन्यप्राण्यांमुळे  होणाऱ्या अपघातानंतर मदतीच्या निकषांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याचा समावेश करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात पोकरा योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यांना सामूहिक योजनांची जोड देण्यात येईल. सामूहिक शेततळ्याची योजना व्यापकपणे राबविण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना रब्बीसाठीही पाणी मिळेल. यामुळे पावसामध्ये खंड पडला तरी शेतकऱ्यांच्या हाती निश्चित उत्पन्न येण्यास मदत होईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 256. 42 कि. मी. लांबीचे 41 रस्ते पूर्ण करण्यात आले. 362.15 कि. मी. लांबीच्या रस्त्यांची 90 कामे प्रगतीत आहेत. तथापि, ग्रामीण रस्त्यांमध्ये व्यापक सुधारणांसाठी निधी वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाची सुमारे 47 पदे रिक्त आहेत. ती भरण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात  कृषी अधिकारी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यात मृद व जलसंधारणाच्या 105 योजना पूर्ण होऊन 28 हजार 594 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. या कामांना गती देण्यासाठी काही निकषांत बदल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. पवार यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामांचे सादरीकरण केले. ते म्हणाले, जिल्ह्यात 2019 मध्ये खरीपाचे क्षेत्र 6 लाख 82 हजार हेक्टर व प्रत्यक्ष पडलेला पाऊस 778.84 मि. मि. होता. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसाचे एकूण प्रमाण 67.92 मि. मि. एवढे आहे. अवेळी पावसाने 3 लाख 73 हजार 550 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 3 लाख 75 हजार 398 आहे. ऑक्टोबरमधील अवेळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाल्याने 91 हजार 278 शेतक-यांना 72 कोटी 26 लाख अनुदान वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे, जिल्ह्याला 230 कोटी 62 लाख रू. अनुदान प्राप्त असून, त्याचे वाटप होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात जलशक्ती अभियानात चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यात 3 हजार 653 छतावरील पाणी संकलन योजना पूर्ण झाल्या. रोहयोमध्ये जलसंधारण प्रकारातील 24 हजार 495 कामे हाती घेण्यात आली. त्यातील 16 हजार 678 कामे पूर्ण झाली. त्याचप्रमाणे, 7 हजार 847 सिंचन विहीरींपैकी 4 हजार 828 विहीरी पूर्ण झाल्या. ‘मग्रारोहयो’ची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध विभागप्रमुख आढावा बैठकीला उपस्थित होते. 00000

Chronological improvement in development plans will be done only after taking people’s representatives into confidence – Chief Minister Uddhav Thackeray

Chief Minister reviews the development works in Amravati district

Nagpur, The. 16: “Aid of Rs. 5,300 crore is being distributed to compensate the affected farmers due to untimely rains in the state. To tackle the natural calamities some improvement will be done in present scheme of water conservation along with other various influential schemes. But implementation of all these schemes will be take place after taking People’s representatives into confidence” said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking in a meeting organized to take review of various development works of Amravati District at the Ministerial Council Hall in Legislative Assembly.

Chief Minister further said that despite various natural disasters, we have to face the situation and move on. For this, existing plans would have to incorporate new solutions. For this, new schemes would be added by taking the representatives of the people into confidence. The state government would give justice to the people by considering different measures for Vidarbha.

“Farmers have crop insurance support in case of loss arise due to untimely rains. However, farmers do not get satisfactory response from insurance companies to get crop insurance benefits. Therefore, crop insurance policies will be revised and improved. The government’s role is to ensure that farmers get the benefit of their rights. The farmers have been advised to accept the Panchnama (survey) and rain statistics by the government system for immediate benefit. Besides, efforts will be made to take the amount of loan waiver to the beneficiaries from various banks including the District Banks informed Chief Minister.

“Warud and Morshi taluka will not be included in list of affected sector due untimely rain. But when this matter came in front government tried to provide help according to rule after discussion with Collector. It will be considered to implement a collective fence plan to prevent the loss occur due to wild animals. The criteria of assistance would be to include Rohi (Blue bull) animal after the accident caused by wild animals” said Mr. Ajoy Mehta.

He further stated that individual beneficiary schemes are implemented through the PoCRA scheme in the saline area of the district. They would be given a combination of collective plans. The scheme of mass farming would be implemented widely, so that the farmers can get water for Rabbi Crop too. This would help farmers get a fixed income even in condition of irregular rain. Under the Chief Minister’s Gram Sadak Yojana, 41 long roads of 256. 42 km were completed. Around 90 works of 362.15 km of lengthy roads are in progress. However, funds would be raised for comprehensive reforms in rural roads.

“About 47 posts in Agriculture Department are vacant. The process of filing these posts is underway. Agricultural officers will be made available in each taluka. With the completion of 105 schemes of soil and water conservation in the district, 28, 594 TCM water reservoirs were created. Some criteria will be changed to speed up these work” informed Mr. Mehta.

Collector, Sanjay Pawar presented various development works in the district. He said that in 2019, the area of Kharif in the district was 6.82 lakhs hectares and the actual rainfall was 778.84 mm. The total rainfall during the months of October and November is 67.92 mm. Due to unseasonal rains, 3,73,550 hectare area was damaged, while the number of affected farmers is 3,75, 398. About Rs 230.62 crore subsidy is being received and distribution of the aid is going on for 91,278 farmers who faced loss in agriculture due to untimely rain in October.

In the district, 3, 653 rooftop water collection schemes were completed in Chandpur Bazar, Achalpur, Morshi and Warud talukas under the Jalshakti Abhiyan.  Through EGS, 24,495 works of water conservation were undertaken. Of these, 16,678 works were completed. Similarly, out of 7,847 irrigation wells, work of 4,828 wells were completed.The district received a national award for the effective implementation of ‘Maharashtra Rural Employment Guarantee Scheme’.

MLAs Yashomati Thakur, Sulbhatai Khodke, Bachchu Kadu, Ravi Rana, Devendra Bhuiar, Rajkumar Patel, Pratap Adasad, Balwant Wankhede, Chief Secretary Ajay Mehta, Divisional Commissioner Piyush Singh, Collector Sanjay Pawar, Chief Executive Officer Amol Yedge and the heads of various departments of the district attended the review meeting.

यवतमाळ जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी प्राधान्याने निधी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक

नागपूर दि. 16 : यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून  दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विधिमंडळ सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार सर्वश्री वजाहत मिर्झा, ख्वाजा बेग, निलय नाईक, विधानसभेचे आमदार सर्वश्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. संदीप धुर्वे, डॉ. अशोक उईके, नामदेव ससाणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, किशोर तिवारी आदी उपस्थित होते.

यवतमाळ हा कृषिक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जिल्हा आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यात येतील. अधिवेशन काळात विदर्भातील जिल्ह्यांच्या आढावा बैठकांचे नियोजन करण्यात येते, स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय होण्यासाठी राज्यातील इतरही भागात जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्यात येतील. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदतीचा निधी जिल्ह्यांना पोहोचला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 102 कोटींचे वाटप झाले असून द्वितीय टप्प्यातील 222 कोटींची मदत वाटपाची कार्यवाही तालुका स्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक विकासाचा निधी उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व उपाययोजना, जलसंधारणाच्या प्रकल्पांची प्रगती, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतीतील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची सद्यस्थिती, जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाचा आढावा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपाचा विज पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, मुख्यमंत्री पेयजल योजना आदींबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादरीकरण केले. यावेळी आमदारांनी सिंचन, रस्ते, अपूर्ण प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी, अल्पसंख्यांकाबाबतचा निधी, शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करणे, खनिज विकास निधी, पैनगंगा अभ्यायारण्यातील 40 गावांतील रस्त्यांचा प्रश्न, वसंतराव नाईक स्मृती स्थळासाठी निधी, पावरग्रीडसाठी जमीन भुसंपादन, माळपठारावरील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी तोडगा काढणे आदी समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

बैठकीला मुख्य सचिवांसह विविध विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. 00000

Funds will be given with priority

for incomplete irrigation projects in the district

– Chief Minister Uddhav Thckeray

Review meeting about developmental works in Yavatmal district

Nagpur, December 16 : Chief Minister Mr Uddhav Thackeray assured that funds will be made available with priority for completing the incomplete irrigation projects that supply water to the farm of the farmers in the Yavatmal district.

He was speaking in a meeting organized for taking stock of the Yavatmal district in the legislature hall. MLC Wajahat Mirza, Khwaja  Baig, Nilay Naik, MLA Sanjay Rathod, Indranil Naik, Madan Yerawar, Dr Sandeep Dhurve, Dr Ashok Uikey, Namdev Sasane, Sanjiv Reddy Bodkurwar, Kishor Tiwari and others were present on the occasion.

Chief Minister Thackeray further said that Yavatmal is the district of the father of Agricultural Revolution Vasantrao Naik. He said that the problems of this region will be resolved with the help of all. The review meetings are organized for the districts of Vidarbha during the legislative session and similarly such sort of meetings will be organized for other districts for taking stock of the development works. The Chief Minister also said that the financial assistance for the farmers affected by unseasonal rains has reached the district. In Yavatmal district 102rupees have been distributed in the first phase and the process for distribution of another 222 crore rupees in the second phase has begun at Taluka level.

Mr Thackeray also assured that the minority development funds will also be made available for this district. Presentation on the topics like loss due to unseasonal rain and measures to overcome it, the progress of water resources projects, the situation and repairing of roads under Zilla Parishad jurisdiction, present situation of Chief Minister gram Sadak Yojana, review of incomplete irrigation projects in the district, rehabilitation of the project affected people, electricity supply to Agricultural pumps, Prime Minister Awas Yojana, swachh Maharashtra campaign, Chief Minister peyjal Yojana was made by the Chief executive officer and care taker district magistrate Jalaj Sharma.

The members of Legislative assembly and Council presented various problems of the district including that of irrigation, roads, incomplete projects, funds for Pradhan Mantri Awas Yojana, funds for minorities, continuous power supply for farmers, mineral development funds, problem of 40villages under the PenGanga sanctuary, funds for Vasantrao Naik Memorial, acquisition of land for power grid, water problems in the plateau region etc. They demanded permanent solution for all these problems faced by the districts since long. The meeting was also attended by chief secretary and principal secretaries, senior officers of various departments.

0000

राजधानीत २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ‘महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाज’शताब्दी महोत्सव

तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सर्वात जुनी मराठी संस्था म्हणून लौकिक असलेल्या महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाच्या शताब्दी वर्षानिमित्त २१ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची संस्कृती,परंपरा जपण्यासाठी व राज्यातील उत्सव साजरे करण्यासाठी मराठी माणसांनी मिळून राजधानी दिल्लीत १९१९ मध्ये‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’या संस्थेची स्थापना केली. सांस्कृतिक,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या संस्थेचे यावर्षी शताब्दी वर्ष असून यानिमित्ताने शताब्दी महोत्सवात तीन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २१ डिसेंबर २०१९ ला पहाडगंज स्थित महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता मुग्धा वैशंपायन आणि धनंजय म्हसकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दिल्ली स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

महोत्सवात दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबरला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता गोव्यातील मोले येथील पाईकदेव भोलानाथ संस्था निर्मित‘संगीत करवीर सौदामिनी’नाटकाचे सादरीकरण होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

महोत्सवाच्या समारोपीय दिवशी २३ डिसेंबरला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता‘मैफल सुरांची आणि गप्पांची’हाप्रसिद्धअभिनेते प्रशांत दामले यांच्या गप्पांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित विशेष स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण व संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे.

संस्थेविषयी…

१९१९ मध्ये स्थापन झालेल्या‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’या संस्थेने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. व्यवसाय व नोकरीनिमित्त दिल्लीत निवासी मराठी माणसांना आपल्या पाल्यांना मराठीतून शिक्षण देता यावे म्हणून संस्थेने‘महाराष्ट्रीय शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थेची’स्थापना करून पहाडगंज भागात १९२९ मध्ये नूतन मराठी प्राथमिक शाळेची स्थापना केली. आज वरिष्ठ माध्यमिक शाळेत याचे रुपांतर झाले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रसिद्धकलाकार उत्तरा बावकर,प्रसिद्धउद्योजक अशोक शिंदे आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांचा समावेश आहे.

विविध कामांनिमित्त तसेच पर्यटनासाठी दिल्लीत येणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची रास्त दरात निवासी व्यवस्था व्हावी या उद्देशाने संस्थेने पहाडगंज भागात‘दिल्ली महाराष्ट्रीय समाज ट्रस्ट’ची स्थापना करून बृह्नमहाराष्ट्र हे अतिथीगृह उभारले.

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात उद्या ‘कांदळवन संरक्षण व संवर्धन’या विषयावर मुलाखत

मुंबई,दि.16 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’कार्यक्रमात‘कांदळवन संरक्षण व संवर्धन’या विषयावर कांदळवन कक्षाचे अपर मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.17डिसेंबर रोजी संध्याकाळी7.30वाजता प्रक्षेपित होणार आहे.

कांदळवनाचे महत्त्व,महाराष्ट्रातील कांदळवनाचे क्षेत्र आणि त्याची व्याप्ती,खाजगी क्षेत्रातील कांदळवन,कांदळवन कक्षामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना,रंगीत मासे उत्पादनाबरोबर उपजीविकेचे साधन म्हणून कांदळवनांची उपयुक्तता,गेल्या तीन वर्षात राज्यात कांदळवनात लावण्यात आलेली रोपे,भारतीय वनसर्वेक्षण अहवाल2017नुसार राज्यातील कांदळवन स्थिती आणि कांदळवन पार्कया विषयांची माहिती एन. वासुदेवन यांनी‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात दिली आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

ताज्या बातम्या

जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार असल्याने हा आनंदाचा क्षण सर्वासमवेत अनुभवता येणार आहे. नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण...

धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियाजित वेळेत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज...

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

0
अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चासत्र ठेवणार ! मुंबई दि. २०: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४...

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २० : पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!

0
आपल्या वसुंधरेसाठी नऊ दिवस समर्पित भावनेने काम करा मुंबई, दि. २० : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते...