रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1584

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करणार

नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वित्तमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्व.उपक्रम वगळून) डॉ.नितीन राऊत, आमदार अशोक चव्हाण, दिवाकर रावते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर मध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रथमच आलो आहे. राज्याच्या उपराजधानीत उद्यापासून सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशनापासून मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सुरु होत आहे. राज्यातल्या माता-भगिनींच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद हे आमचं पाठबळ असून त्या शक्तीच्या जोरावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.

अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने पावले टाकीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार असून त्यांच्या प्रश्नांना कृतीतून उत्तरे देऊ असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशन, नागपूर-2019

प्रस्तावित विधेयकांची यादी

प्रस्तावित विधेयके

(1)     महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत महाराष्ट्र (समाजाला उपयुक्त) सेवा इनामे रद्द करण्याबाबत महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ वुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत आणि महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल व वन विभाग) (इनाम जमिनींवरल गुंठेवारी नियमाधीन करताना आकारण्यात येणारी नजराण्याची व द्रव्यदंडाची रक्कम कमी करण्याबाबत) (अध्यादेश क्रमांक 16/2019 चे रूपांतर)

(2)  महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) अध्यादेश, 2019 (ग्राम विकास विभाग)  (अधिनियमातील अनर्हतेबाबतच्या तरतुदी नगर पंचायतीच्या सदस्यांना देखील लागू होण्याकरिता सुधारणा) (अध्यादेश क्रमांक 17/2019 चे रूपांतर)

(3)  महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (पीठासीन अधिकाऱ्यांची पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्यांची कर्तव्ये चार महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीकरिता देण्याची तरतूद) (अध्यादेश क्रमांक 21/2019 चे रूपांतर)

(4) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अध्यादेश, 2019, (ग्राम विकास विभाग) (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय, समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे.) (ग्राम विकास विभाग) (अध्यादेश क्रमांक 22/2019 चे रूपांतर)

(5) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, 2019, (महसूल व वन विभाग) (गौण खनिजे बेकायदेशीर पणे काढल्यास व त्यांची वाहतूक करण्याकरिता वापरलेली यंत्रसामग्री व साधन सामग्री सरकार जमा करण्याचे अधिकार सर्व महसुली अधिकाऱ्यांना प्रदान करणे ) (अध्यादेश क्रमांक 24/2019 चे रूपांतर)

(6)  महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2019

(7)   महाराष्ट्रमहानगरपालिका(सुधारणा) विधेयक 2019 (महानगरपालिकांमध्ये एकसदस्यीय प्रणाली पुन्हा चालू करणे) (नगरविकास विभाग)

(8)  सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्र. – महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०१९

—–000—–

अजय जाधव/विसंअ/15.12.19 0000

Aspirations of people would be fulfilled

Farmers of the state will be debt free and also relieved from worries

– Chief Minister Uddhav Thackeray

Nagpur, December 15 :- ‘The present government is in power due to blessings of people and their support and it will try to fulfill all the expectations and aspirations of the people. The farmers of the state will not only be free from debt but they will also get respite from worries and this journey has begun’, stated Chief Minister Mr Uddhav Thackeray, here today.

He was addressing a Press Conference at Ramgiri on the eve of the beginning of the winter session of the state legislature. Finance Minister Mr Jayant Patil, revenue minister Balasaheb Thorat, Home minister Mr. Eknath Shinde, minister of industries Subhash Desai, rural development Minister Chhagan Bhujbal, Public Works Department (excluding public undertaking) Dr Nitin Raut, MLA Ashok Chavan, Diwakar Raute and other dignitaries were present on the occasion.

Speaking further, the Chief Minister Mr Thackeray said, ‘I am visiting Nagpur the first time after taking charge as chief minister and I am going to start my tenure from this second capital of the state from tomorrow onwards with the winter session.’ He also said that the blessings and compliments of mothers and sisters of the state are a great support for us and on the basis of this energy, we are going to fulfill the expectations of the common people.

 He further said that through the medium of the session, the government will try to give justice to the people of entire state and the farmers will not only be relieved from the debt but they will also shed their worries and we have begun a journey in this direction. He said that we are going to fulfill the promises given to the  people and the questions will be practical solved. No progressive works have been stayed in the state, clarified Mr Thackeray.

संदर्भ आधीच पोहोचले… 10 डिसेंबरपासून विधिमंडळ ग्रंथालयाचे काम सुरू

नागपूर,दि. 15 :  विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे राज्याच्या प्रश्नांबाबत सदस्यांना आपली मते मांडण्याचे हक्काचे आणि कायदेशीर व्यासपीठ. सदस्यांना आपले मत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी संदर्भ मिळविण्यात मदत होते ती विधिमंडळ ग्रंथालयाची. त्यामुळे सोमवार (दि.१६ डिसेंबर) पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते ती येथे सुरू होणाऱ्या ग्रंथालयाच्या कामकाजापासून. १०डिसेंबरपासूनच येथील ग्रंथालयाचे काम सुरू झाले आहे.

विधिमंडळाचे कामकाज हे नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. विधिमंडळात पहिल्यांदाच आलेल्या नव्या सदस्यांना यापूर्वी विधिमंडळाचे कामकाज कसे चालले,कोणत्या विषयावर अध्यक्ष,सभापतींनी काय निर्देश दिले आदी माहिती मिळविण्याचे हक्काचे स्थान म्हणजे हे ग्रंथालय आहे. मुंबईतील ग्रंथालयात लाखांहून अधिक पुस्तके आहेत. कायदे करणे हे विधिमंडळाचे महत्त्वाचे काम असल्याने कायदा या विषयाला वाहिलेलीच बहुतांश पुस्तके येथे आहेत. नागपूरच्या अधिवेशनावेळी ही सर्व पुस्तके आणणे आणि परत मुंबईला घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे आवश्यक ती पुस्तके आणली जातात. विशेषतः राज्याच्या स्थापनेपासूनची विधिमंडळाची कार्यवाही उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे आपल्या पूर्वसुरींनी राज्याचा एखादा प्रश्न कसा मांडला,त्यावर काय उत्तर देण्यात आले हे विधिमंडळ सदस्यांना कळण्यास मदत होते. विधिमंडळात उच्चारलेला आणि कामकाजात घेतलेला प्रत्येक शब्द टिपला जातो आणि तो ग्रंथालयामार्फत उपलब्ध करून दिला जातो. हे ग्रंथालय केवळ विधिमंडळ सदस्यांसाठीच नाही तर विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी,पत्रकार आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून विधिमंडळ ग्रंथालयाचे कामकाजातील योगदान नक्कीच मोलाचे आहे.

००००

विधिमंडळाच्या सभापती, अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर,दि. 15 : विधानपरिषद सभापती रामराजेनाईकनिंबाळकर,विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज‘सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला.

प्रारंभीशिबीरप्रमुख महेश पवार व सहशिबीरप्रमुख नेहा पुरव यांनी स्वागत केले.विधिमंडळ अधिवेशनासाठी सहा दिवसांचा अवधी मिळाला असला तरी या काळात अधिकाधिक कामकाज चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी यावेळीसांगितले.तसेच यंदा अधिवेशनाचा वेळ कमी असला तरी पुढील वर्षापासून नागपूर कराराप्रमाणे पूर्णवेळ अधिवेशन चालले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे अध्यक्ष श्री. पटोले यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी अधिवेशनातील वेळेचा सदुपयोग करण्यावर आमचा भर आहे, असे श्रीमती गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ‘सुयोग’ ची केली पाहणी

नागपूर,दि. 15 : माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यांनी आज सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली.

सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व सह शिबीर प्रमुख म्हणून नेहा पुरव यांची निवड करण्यात आली. त्यांचे स्वागत श्री. सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन केले व सुयोग येथे संगणक कक्षाची अद्ययावत सुविधा उभारण्यात आली असून त्याचे उद्घाटन श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. सुयोग येथे प्रशस्त सभागृह,  जॉगिंग पार्क, आकर्षक लँडस्केपिंग, सुसज्ज भोजनकक्ष आदी सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची पाहणी श्री. सिंह यांनी केली.

कॅबिनेट मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील श्री. जयंत पाटील व श्री. छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.

हे बदल पुढीलप्रमाणे आहेत. जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री. जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते श्री. छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.

0000

श्री जयंत पाटील और श्री छगन भुजबल के पास स्थित कुछ विभागों में बदलाव

मुंबई, दि.14 : मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ने अपने मंत्रिमंडल के श्री जयंत पाटील और श्री छगन भुजबल के पास स्थित कुछ विभागों में बदलाव किया है। इसे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने अनुमति प्रदान कर दी है।

यह बदलाव इस प्रकार हैं। जल संसाधन व लाभ क्षेत्र विकास विभाग श्री जयंत पाटील को दिया गया है। इसीतरह अन्न व नागरी आपूर्ति, अल्पसंख्यक विकास व कल्याण यह विभाग श्री छगन भुजबल को दे दिया गया है। 0000

Changes in ministry of Jayant Patil and Chhagan Bhujbal

Mumbai, 14.DEC.19:Chief Minister, Uddhav Thackeray has done some changes in ministry of his cabinet members Jayant Patil and Chhagan Bhujbal and it has been approved by Governor Bhagat Singh Koshari.

Water Resources & Sector Development Department has been given to Jayant Patil while Chhagan Bhujbal will shoulder the responsibility of Food and Civil Supplies and Minority Development and Welfare Ministry.

आयकर राजपत्रित महासंघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत

मुंबई, दि.14 : आयकर राजपत्रित महासंघ मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख अकरा हजाराचा धनादेश मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे,  आयकर राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष टी. एम. सुरेंद्रन, महासचिव दीपक गुप्ता, सचिव अनिल देढे, अजित नाईक, सलील अहिरे, सहाय्यक आयकर आयुक्त रवी शंकर उपस्थित होते.

0000

आयकर राजपत्रित महासंघ की ओर से मुख्यमंत्री सहायता निधि के लिए मदद

मुंबई, दि. 14: आयकर राजपत्रित महासंघ, मुंबई, की ओर से मुख्यमंत्री सहायता निधि के लिए पांच लाख ग्यारह हजार रुपए का धनादेश मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे के सुपूर्द किया गया।

इस अवसर पर मुख्यमंत्री के प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, आयकर राजपत्रित महासंघ के अध्यक्ष टी. एम. सुरेंद्रन, महासचिव दीपक गुप्ता, सचिव अनिल देढे, अजित नाईक, सलील अहिरे और सहायक आयकर आयुक्त रवि शंकर उपस्थित थे । 0000

Income Tax Gazetted Federation given donation for Chief Minister’s Relief Fund

Mumbai, 14.DEC.19: Income Tax Gazette Federation, Mumbai handed over a check of        Rs 5.11 lakh to Chief Minister, Uddhav Thackeray for Chief Minister’s Assistance Fund.

Principal Secretary to the Chief Minister Bhushan Gagrani, Vikas Kharge, Chairman of the Income Tax Gazette Federation. T. M. Surendran, General Secretary Deepak Gupta, Secretary Anil Dedhe, Ajit Naik, Salil Ahire, Assistant Income Tax Commissioner Ravi Shankar were prominently present on this occassion.

मंत्रिमंडळ निर्णय : दि.१४.१२.२०१९

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 5298 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करणार

तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याकरिता नेमणूक

मुंबई, दि. 14 : अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव सेवा समाप्त होणाऱ्या व यापुर्वी सेवा समाप्त करण्यात आलेल्या अंदाजे 5298 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना मानवतावादी दृष्टीकोनातून तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरिता नेमणूक देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.

सर्व प्रशासकीय विभागांनी खुद्द व त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या खालील कर्मचारी/अधिकाऱ्यांची संवर्गनिहाय संख्या निश्चित करावी व त्यानंतर त्यांच्या सेवा अधिसंख्य पदांवर वर्ग करून त्यांची पदे दि. 31 डिसेंबर, 2019 पर्यंत रिक्त करणाच्या सूचना देखील करण्यात आल्या.

सर्व प्रशासकीय विभागांनी खुद्द व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील वरील प्रमाणे रिक्त होणारी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र   धारक  उमेदवारांमधून   सेवाप्रवेश    नियमानुसार विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून पदे भरण्याची कार्यवाही करावी, असेही ठरले .

अधिकारी व कर्मचारी यांना अधिसंख्य पदांवर तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरिता नेमणूक दिल्यानंतर त्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी स्वतंत्र मंत्री गटाची स्थापना करण्यात येण्याचे देखील ठरले.

0000

जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत एकवाक्यता आणण्यासाठी अधिनियमात 22 सुधारणा

केंद्रीय वस्तू व सेवा कर तसेच राज्य वस्तू व सेवा कर यांची दुहेरी आकारणी राज्यांतर्गत व्यवहारांवर होते. 01 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. एकाच व्यवहारावर दुहेरी कर आकारणी (CGST आणि SGST)  होत असल्याने, या दोन्ही कायद्यांमध्ये एकवाक्यता असणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 मध्ये एकूण 22 सुधारणा करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017 व एकत्रित वस्तू व सेवाकर कायदा 2017यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने राज्य वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये तत्सम सुधारणा करणे आवश्यक होते.

करदात्यांसाठी आपसमेळ योजना, राष्ट्रीय आगाऊ अधिनिर्णय अपिल प्राधिकरण स्थापन करणे, करदात्यांसाठी सुलभ प्रक्रिया व अडचणींची सोडवणूक करून दिलासा देणे, कायद्याचे सुसूत्रीकरण करणे व तांत्रिक दुरुस्त्या अशा स्वरुपाचे प्रस्ताव या सुधारणा अधिनियमामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत.

0000

Cabinet Decisions : 14-12-19

Create maximum number of posts for 5298 officers and employees who have not submitted caste validity certificate

Temporary appointment for 11 months

Mumbai, Dec.14: The Cabinet today decided to create a maximum number of posts for about 5298 officers and employees for 11 months, who are terminated or were earlier terminated due to non-submission of ST caste validity certificates.

All administrative departments should determine the cadre-wise number of employees and officers under the Scheduled Tribe category under them and the government / semi-government offices under them, and classify their posts rankwise till December 31, 2019.

It has been also decided that all the administrative departments should  fill the  ST vacancies in the offices under the concerned departments and chalk out a time-bound programme for filling up the caste validity certificate of the candidates by adopting the prescribed procedure accordingly.

It  has also been decided to set up an independent ministerial group to recommend to the government after conducting a detailed study on the service and retirement benefits of the officers and staff, after their temporary appointment for the relevant posts for 11 months.

0000

For uniform GST law enforcement, 22 amendments in the Act 

The Central Goods and Services Tax as well as the State Goods and Services Tax are double levied in the State. On August 01, 2019, the Central Goods and Services Tax Act had been amended. The Cabinet today approved a total of 22 amendments in the Maharashtra Goods and Services Tax (Amendment) Act, 2019, as there is a need for uniformity in both the laws, since double taxation (CGST and SGST)  is taking place on the same transaction.

The Central Goods and Services Tax Act, 2017 and the Consolidated Goods and Services Tax Act 2017 have been amended. Accordingly, Maharashtra State had to make similar amendments to the State Goods and Services Tax Act.

The amendments include the proposals for mutual schemes for taxpayers, setting up a national appellate authority for advance ruling, facilitating process for taxpayers and solving their problems, formulating simple laws and technical corrections.

महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रशिक्षणासाठी पुढे येण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

 माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ संकेतस्थळाचे लोकार्पण 

मुंबई, दि. 14: राज्यात विविध विकास महामंडळे आहेत, त्यात महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी प्रशिक्षणासाठी पुढे शासन त्यांना मदत करण्यास तयार आहे असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे आयोजित कार्यक्रमात माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅनचा लोकार्पण सोहळा तसेच महामंडळाच्या संकेतस्थळ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आदित्य ठाकरे होते. मंचावर माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योति ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, माविमच्या अशासकीय सदस्य शलाका साळवी, संचालक रितू तावडे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सामाजिक उपक्रमास शासनाचे कायम पाठबळ असेल. राज्यातील विविध महामंडळे महिला सबलीकरणाचे काम करत असतात त्यांच्यात समन्वय असणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादीत करुन त्यांनी माविमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकरी तसेच ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांसाठी माविमने भरीव कार्य करावे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारण्यासाठी जे – जे काही करता येईल ते करू. प्लॅस्टिक बंदीमध्ये चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्या या महामंडळाने तयार करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 10 रुपयांची थाळी, सॅनिटरी नॅपकिन अशा विविध योजना राबविण्यासाठी माविमचे सहकार्य घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योति ठाकरे यांनी केले. दरम्यान महामंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. अद्ययावत आधुनिक स्वरुपाच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅनचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. माविमच्या आजपर्यंतच्या उपक्रमांचा आढावा स्लाईड शोच्या माध्यमातून घेण्यात आला. माविमच्या माध्यमातून झालेल्या उत्कर्षाची यशकथा धारावी येथील श्रीमती सफिना रफिक अस्तार यांनी यावेळी मांडली. महामंडळातर्फे प्रकाशित विविध माहितीपुस्तके, वार्षिक अहवालांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. श्रीमती श्रद्धा जोशी यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा

मुंबई, दि. 14 : मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यासंदर्भात आज मुंबई पोलीस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात मुंबईकरांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून मुख्यमंत्री यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून ‘सुरक्षित मुंबई’साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

कंट्रोल रूमची पाहणी

आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली. यावेळी पोलीस आयुक्त श्री. बर्वे यांनी सुरक्षा यंत्रणेची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. 24 तास कार्यरत असणाऱ्या या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोनचा वापर आदींबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागझिरा अभयारण्यातील क्षी, निसर्गचित्रांसह ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस रवाना

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्रामध्ये फार मोठे पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

भंडारा, गोंदीया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून त्यांनी या सुशोभित एक्सप्रेसला रवाना केले. विविध रेल्वे एक्सप्रेसवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची अशीच जाहिरात करुन देशभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एक्सप्रेसवर नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गचित्रांसह एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही झळकली आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद – सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारला आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, एमटीडीसीच्या या उपक्रमातून दख्खनची राणी आता वेगळ्या स्वरुपात जनतेसमोर येत आहे. पर्यटनस्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची ही फारच चांगली संकल्पना आहे. पर्यटक आले तर त्यांच्यामार्फत स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो. राज्यात बोधलकसा, नागझिरा सारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत. एमटीडीसीने अशा पर्यटनस्थळांना प्रकाशझोतात आणण्यासाठी राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यापुढील काळात राज्यातील इतरही पर्यटनस्थळांची माहिती रेल्वे, एसटी आदींच्या माध्यमातून प्रसारित करुन राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद – सिंगल यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रात समुद्र किनारे, गड-किल्ले, प्राचिन गुंफा, व्याघ्र प्रकल्प, जंगले, थंड हवेची ठिकाणे, बॉलीवूड अशा विविध प्रकारातील पर्यटनस्थळे आहेत. अशा प्रकारचे पर्यटन वैविध्य असलेले महाराष्ट्र हे देशातील प्रमुख राज्य आहे. याबरोबरच क्रुझ पर्यटन, ॲडव्हेंचर टुरीजम, मेडीकल टुरीजम, एक्सपिरिएन्शल टुरीजम, कृषी तथा ग्रामपर्यटन आदींनाही राज्यात चालना देण्यात येत आहे. राज्यातील पर्यटन वैभवाची व्यापक प्रसिद्धी करुन जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, विदर्भातील नागझिरा अभयारण्य आणि त्यात वसलेल्या एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटन निवास परिसरात अद्भूत निसर्गसौंदर्य आहे. पर्यटक निवासाच्या बाजूला मोठा जलाशय असून सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे. अभयारण्याच्या परिसरात बाराही महिने लाल डोक्याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरीत पक्षी इत्यादी दुर्मिळ पक्षांचा वावर असतो. परिसरात पळस व मोह वृक्ष फुलण्याच्या सुमारास खूप नेत्रसुखद दृष्य असते. आता या परिसरातील पक्षांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन रेल्वेच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची माहिती मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. या माध्यमातून नागझिरा अभयारण्य तसेच विदर्भाकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डेक्कन क्वीन ही रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून तिच्या 17 बोगींवर ही चित्रे लावण्यात आली आहेत. आज या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही चित्रे आकर्षणबिंदू ठरली होती. लहान मुलांसह उपस्थित प्रवासी नागझिरा अभयारण्यातील विविध पक्षी, प्राणी आणि निसर्गचित्रांची माहिती घेत होते. महाराष्ट्रात पर्यटन‍ विकास महामंडळाची (एमटीडीसी) विविध ठिकाणी 23 पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा या ठिकाणी महामंडळाचे अत्याधुनिक सोयी – सुविधांनीयुक्त प्रशस्त पर्यटक निवास (रिसॉर्ट) आहे.

कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार आदित्य ठाकरे, दीपक केसरकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, पर्यटन संचालक दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २० : पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!

0
आपल्या वसुंधरेसाठी नऊ दिवस समर्पित भावनेने काम करा मुंबई, दि. २० : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते...

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

0
सातारा, दि.२०: पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौऱ्यावर होते. यावेळी...

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

0
नागपूर, दि २० : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या; मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

0
नागपूर, दि. २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित...