रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1585

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ

मुंबई, दि. 13 : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्यानागझिराअभयारण्यातीलपक्षी आणिनिसर्गाची चित्रेआता मुंबई-पुणेडेक्कन क्वीनएक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही एक्सप्रेसवर झळकणार आहेत. उद्या शनिवारी (14 डिसेंबर)सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक12 वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून तेहिरवीझेंडीदाखवूनया सुशोभित एक्सप्रेसलारवाना करणार आहेत.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारत आहे.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, या एक्सप्रेसच्याबाह्य भागावरही निसर्गचित्रे लावूननागझिराअभयारण्य व बोधलकसा पर्यटकनिवासाची प्रसिद्धी करण्यात येणारआहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून तिच्या 17 बोगींवर ही चित्रे लावण्यात येणार आहेत.

श्री. काळे म्हणाले की,महाराष्ट्रात पर्यटन‍ विकास महामंडळाची (एमटीडीसी)विविधठिकाणी23 पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा या ठिकाणी महामंडळाचे अत्याधुनिकसोयी -सुविधांनीयुक्त प्रशस्त पर्यटक निवास (रिसॉर्ट) आहे. या पर्यटक निवासाच्या बाजूला मोठा जलाशय आहे व सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे. अभयारण्याच्या परिसरात बाराही महिने लाल डोक्याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर),विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरित पक्षी आदी दुर्मिळ पक्ष्यांचा वावर असतो.परिसरात पळस व मोह वृक्ष फुलण्याच्या सुमारास खूप नेत्रसुखद दृष्य असते.आता यापरिसरातील पक्षांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन रेल्वेच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची प्रसिद्धी करण्यात येणारआहे.या माध्यमातून पर्यटकांनानागझिराअभयारण्य तसेच विदर्भाकडे आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय जलपुरस्कार-२०१९ साठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन करणेबाबत जनजागृती करण्यात येते. जलसंवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, कंपनी यांना राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 पासून देण्यात येतो. यावर्षीही पात्र संस्थांनी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत विहित नमुण्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाचे  उप सचिव र.ग.पराते यांनी केले आहे.

यावर्षी दुसरा राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 देण्यात येणार आहे. यासाठी उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, शाळा, मोठे – मध्यम व लघु उद्योग, जल नियमन प्राधिकरण, जलयोद्धा, अशासकीय संघटना, पाणीवापर संस्था, दूरदर्शन कार्यक्रम, हिंदी, मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रे असे एकूण 15 क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी परिपूर्ण नामांकन प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर, 2019 रोजी पर्यंत https//mygov.inया वेबसाईटवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे tsmsml-cgwb@nic.in या ई-मेलवर केवळ ऑनलाईन सादर करावेत व याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनाकरिता 022-22023096 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतले किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळाचे दर्शन

पुणे, दि. 12 : सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन,दलित,आदिवासी,शोषित,शेतकरी,शेतमजूर,महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल,असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर’शिवकुंज’सभागृहातील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला,त्यानंतर ते बोलत होते. यावेळी सौ. रश्मी ठाकरे,आमदार आदित्य ठाकरे,आमदार अतुल बेनके,  माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील,माजी आमदार शरद सोनवणे,  जुन्नरच्या उपनगराध्यक्ष अलका फुलपगार,जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,मुख्यमंत्री झाल्यानंतर  मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. या शिवजन्मभूमीत राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य रयतेला दिलासा देणारे,त्यांना न्याय देणारे कामच या ठिकाणी केले जाणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी असून सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवूया,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिवजन्म स्थळी दर्शनाला जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जमिनीवरील माती उचलून कपाळी लावली.

     

यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित होते. ००००

मुख्यमंत्री ने शिवनेरी किला स्थित शिव जन्मस्थान का लिया दर्शन

शिवछत्रपति के मार्ग पर आगे बढ़ेगा महाराष्ट्र

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे,दि. 12: छत्रपति शिवाजी महाराज इन्होने आम लोगों के कल्याण के लिए स्वराज्य की स्थापना की। गरीब,दलित,आदिवासी,शोषित,किसान,खेत मजदूर और महिलाओं के कल्याण की प्रेरणा  छत्रपति शिवाजी महाराज इनके कार्यों के माध्यम से मिली है, जो हम उनके दिखाए गए मार्गपर ही महाराष्ट्र की कमान संभालेंगे,यह विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने किला शिवनेरी (ता. जुन्नर) में छत्रपति शिवाजी महाराज के जन्मस्थान के दर्शन कर अभिवादन किया। फिर उन्होंने “शिवकुंज” हॉल में राजमाता जीजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज की पूर्ण प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की,जिसके बाद वे बोल रहे थे। इस मौके पर सौ. रश्मि ठाकरे,विधायक आदित्य ठाकरे,विधायक अतुल बेनके,पूर्व सांसद शिवाजीराव आढळराव-पाटिल,पूर्व विधायक शरद सोनवणे,जुन्नर के उप नगराध्यक्ष अलका फुलपगार,जिला परिषद सदस्य अंकुश आमले,जिला कलेक्टर नवल किशोर राम,जिला पुलिस अधीक्षक संदीप पाटिल उपस्थित थे।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा,मुख्यमंत्री बनने के बाद मुंबई के बाहर पहली बार छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद लेने के लिए यहां आए हैं। इस शिव जन्मभूमि में राजमाता जीजाऊ और शिवछत्रपति का आशीर्वाद लेकर उनको अपेक्षित ऐसा राज्य निर्माण करने का प्रयास करेंगे,जिसकी आम लोगों को उम्मीद है। आम लोगों को मदद और उन्हें न्याय दिलाने का काम किया जाएगा। महाराष्ट्र का मुख्यमंत्री एक बड़ी जिम्मेदारी हैं  यह कह कर उन्होंने अपील करते कहा के,‘आइए हम ऐसा महाराष्ट्र निर्माण करते हैं, जिसका सभी को गर्व होगा’। शिवछत्रपति के जन्मस्थान के दर्शन को लेते समय,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवछत्रपति के जन्म भूमी की पवित्र मिट्टी उठाकर अपने माथे पर लगायी।

इस अवसर पर विभिन्न संगठनों के पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित थे।

००००

CM visited Chhatrapati Shivaji Maharaja’s birthplace at Shivneri

Maharashtra can lead only following Shiv Chhatrapati’s path

– Chief Minister Uddhav Thackeray

Pune. Date.12th: Chhatrapati Shivaji Maharaj established Swaraj (self-rule) for the welfare of common people. We got the inspiration from Shiv Chhatrapati to work for deprived, tribal, exploited, farmers, farm laborers, and women.  We will work for Maharashtra following his path, expressed Uddhav Thackeray today.

CM Uddhav Thackeray visited the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj at Shivenri fort (taluka- Junnar) and paid his salutation. He offered a garland to the statue of Rajmata Jijau and Chhatrapati Shivaji Maharaj in the ‘Shivkunj’ hall. He spoke at that time.  Mrs. Rashmi Thackeray, MLA Aditya Thackeray, MLA Atul Benke, former MP Shivajirao Adhalrao- Patil, former MLA Sharad Sonvane, Deputy-Mayor of Junnar Alka Fulpagar, ZP member Ankush Amle, District Collector Naval Kishor Ram, District Police Superintendent Sandip Patil was present at that time.

CM Uddhav Thackeray said that he has the first time travelling out of Mumbai after becoming CM, to take blessings of Chhatrapati Shivaji Maharaj. After taking blessings of Rajmata Jijau and Shiv Chhatrapati, he also said that he would try to bring common people’s rule as expected to Shiv Chhatrapati. Justice will be given to common people and they will be assured. Being Maharashtra’s Chief Minister is a big responsibility and he appealed all to shape a Maharashtra together that everyone will be proud of.

While visiting the birthplace of Shivaji Maharaj, CM Uddhav Thackeray took the soil and put it to his forehead.

Office-bearers of various organizations and followers of Shivaji Maharaj were present at that time.

0000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आई एकवीरेचे दर्शन

पुणे दि.12 : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पुत्र आ. आदित्य ठाकरे होते.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे आपले कुलदैवत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आले.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणेमावळचे आमदार सुनील शेळके, माजी महापौर अनंत तरे, मदन भोई, नवनाथ देशमुख, विलासराव कुटे, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधुसूदन बर्गे व इतर उपस्थित होते. दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. ००००

CM Uddhav Thackeray with the family

paid a visit to Goddess Ekvira Temple

Pune, date.12th: CM Uddhav Thackeray with his family visited the family deity temple of Goddess Ekvira at Vehergaon Karla. His wife Mrs. Rashmi Thackeray and son MLA Aditya Thackeray accompanied him. CM Shri. Thackeray visited the family deity temple the first time after becoming CM.

Maval’s MLA Sunil Shelke, former Mayor Anant Tare, Madan Bhoi, Navnath Deshmukh, Vilasrao Kute, Special Police Inspector General of Kolhapur Suhas Varke, Upper District Collector Sahebrao Gaikwad, Provincial Officer Sandesh Shirke, Tehsildar Madhusudan Barge, and others were present at that time.  CM Shri. Thackeray was honored with reverence by the temple trust.

0000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने

परिवार सहित किया आई एकवीरा के दर्शन

पुणे,दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने परिवार सहित वेहेरगाव कार्ला में अपनी कुलदेवी आई एकवीरा के दर्शन किया। उनके साथ उनकी पत्नी सौ. रश्मी ठाकरे,पुत्र आ. आदित्य ठाकरे थे। मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने के बाद पहली बार,श्री ठाकरे अपनी कुलदेवी के दर्शन करने आए।

इस मौके पर मावल के खासदार श्रीरंग बारणे, विधायक सुनील शेलके,पूर्व मेयर अनंत तरे,मदन भोई,नवनाथ देशमुख,विलासराव कुटे,कोल्हापुर क्षेत्र के विशेष पुलिस महानिरीक्षक सुहास वारके,अतिरिक्त जिलाधिकारी साहेबराव गायकवाड,प्रांतीय अधिकारी संध्या शिर्के,तहसीलदार मधुसूदन बर्गे व अन्य उपस्थित थे। दर्शन के बाद मुख्यमंत्री श्री. ठाकरे का धर्मस्थल की ओर से सत्कार किया गया।

००००

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘जैवविविधता जतन व संवर्धन’ या विषयावर मुलाखत

मुंबई,दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’व  ‘दिलखुलास’कार्यक्रमात’जैवविविधता जतन व संवर्धन’या विषयावर महाराष्ट्र राज्य  जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर  यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.  ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.13 डिसेंबर रोजी  संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे.  तसेच राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून’दिलखुलास’कार्यक्रमात व’न्यूज ऑन एअर’या ॲपवरही  ही मुलाखत शुक्रवार दि.13  डिसेंबर व सोमवार दि. 16  डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होईल. संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना व उद्देश,बदलत्या तापमानाचे जैवविविधतेवर होणारे परिणाम,महाराष्ट्रातील जंगलांचे आणि प्राण्यांचे प्रकार,जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेला महाराष्ट्र,जैवविविधता बोर्डाने केलेली लक्षवेधी कामगिरी,राज्यातील फुलपाखरांचे मराठी नामकरण,महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ राबवित असलेले उपक्रम व योजना,जैवविविधतेमध्ये नोंदवहीचं महत्त्व,जैवविविधतेचा पोवाडा या विषयांची सविस्तर माहिती डॉ. विलास बर्डेकर  यांनी’जय महाराष्ट्र’व  ‘दिलखुलास’  कार्यक्रमात दिली आहे.

महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्राला १९५ कोटींचा निधी

                

नवी दिल्ली,12 :महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला195कोटी54लाख30हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.  

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणाऱ्या निर्भया फंड,वनस्टॉप सेंटर,महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना निधी वितरित करण्यात आला आहे.महाराष्ट्राला या योजनांतर्गत एकूण195कोटी54लाख30हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.   

 निर्भया फंडअंतर्गत राज्याला149कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने‘निर्भया फंड’तयार करण्यात आला असून देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना याअंतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे.महाराष्ट्राला‘निर्भया फंड’अंतर्गत एकूण149कोटी40लाख6हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.याच कार्यक्रमांतर्गत राज्याच्या विधी व न्याय विभागाला31कोटी5लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 वनस्टॉपसेंटरउभारण्यासाठी14कोटी

अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी देशभर‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असे सेंटर उभारण्यासाठी14कोटी46लाख54हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ संपर्क करता यावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या‘महिला हेल्पलाईनचे’सार्वत्रिकरण करण्यासाठी महाराष्ट्राला62लाख70हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री  स्मृती इराणी  यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

00000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.267/  दिनांक12.12.2019

मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास -मंत्री सुभाष देसाई

42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

मुंबई, दि.12 : मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते, यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

गोरेगाव येथील प्रबोधन क्रीडा भवन येथे 42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंत्री सुभाष देसाई यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रबोधन क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष नितिन शिंदे यांच्यासह सुनिल वेलणकर, रमेश इसवलकर, गोविंद गावडे, पद्माकर सावंत उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, 42 वर्षांपूर्वी या महोत्सवाची सुरुवात छोट्याशा रोपट्याने केली आज याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. मी या महोत्सवाचा संस्थापक असून या महोत्सवाच्या स्पर्धेच्या माध्यमातून विविध शाळेतील स्पर्धकांनी राष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार प्राप्त केले आहेत. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळामध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये स्वत:सह देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

42 व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत 191 शाळांच्या एकूण 3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. हा क्रीडा महोत्सव 12 ते 15 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, बुद्ध‍िबळ, कराटे, धनुर्विद्या यासह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी स्पर्धक, शिक्षक, मार्गदर्शक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस बॅण्ड पथकासह विविध संघाच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार वायरन वास यांनी केले.

0000

राजू धोत्रे/12.12.2019

आययूएमएस प्रणालीमध्ये सर्व विद्यापीठांनी सकारात्मक सहभाग घेण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई,दि.12: राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम’ (IUMS)मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व विद्यापीठांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज भवन,मुंबई येथे केले. राज्यातील सर्व विद्यापीठांचा आढावा घेण्यासाठी  आयोजित  कुलगुरूंच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पी.व्ही. आर श्रीनिवास,उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञानचे व्यवस्थापकीय संचालक अजित पाटील उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले,महाराष्ट्र राज्य हे अनेक बाबतीत अग्रेसर असणारे राज्य आहे. विद्यापीठाअंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी  एकात्मिक अशा या प्रणालीचा वापर सुरु करणारे देशातील  पहिले राज्य होण्याचा या निमित्ताने प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे. या प्रणालीच्या वापरासंदर्भात काही सूचना असल्यास कळवाव्यात. प्रत्येक विद्यापीठाची गरज लक्षात घेऊन प्रणालीमध्ये त्या अनुषंगाने सुधारणा कराव्यात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित कुलगुरुंच्या शंकांचे समाधान माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. श्रीनिवास यांनी  केले,ते म्हणाले  या प्रणालीचा वापर केल्यास माहिती दुसरीकडे जाण्याची भीती बाळगू नये. सर्व विद्यापीठांची कार्यपद्धती वेगेवेगेळी आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यापीठातील कामांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम’वापरण्यास सुरुवात केली तरी प्रत्येक विद्यापीठाची स्वायत्तता कायम राहणार आहे.

       

उच्च व तंत्रज्ञान विभागाचे सचिव सौरभ विजय म्हणाले,अशी प्रणाली तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विद्यापीठांच्या हिताची अशी ही प्रणाली आहे. यात14विद्यापीठे, 4हजार600महाविद्यालये26लाख विद्यार्थी  आणि80हजार शिक्षकांचा समावेश असेल. जानेवारी2020पर्यंत प्रशिक्षण देण्यात येईल तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या प्रणालीद्वारे कामकाज सुरु करता येईल.

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने सांस्कृतिक नृत्य गायन स्पर्धेसह गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल अशा किताबासह विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले.

यावेळी विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/12.12.19

१ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा विभागामार्फत‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शासकीय,निम-शासकीय कार्यालय,महामंडळे तसेच राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये,मंडळे, सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका,सर्व शैक्षणिक संस्था,विद्यापीठे,महाविद्यालये आदी सर्व संस्थांमध्ये‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’साजरा करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे तसेच त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींचा सक्रीय सहभाग असावा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे फलक सर्व कार्यालयांनी लावावेत असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘व्हर्जिन’समूहाच्या रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली सदिच्छा भेट

वाहतूक क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान युक्त प्रकल्पांची चर्चा

मुंबई,दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्रेट ब्रिटनमधील’व्हर्जिन’उद्योग समूहाचे प्रमुख सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत पुणे-मुंबई दरम्यान प्रस्तावित’हायपर-लूप’या प्रवासी वाहतुकीसाठीच्या वेगवान तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासंदर्भात तसेच हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडीत चर्चा करण्यात आली. श्री.ब्रॅन्सन यांनी त्यांच्या समूहाच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. भारतात विशेषतः महाराष्ट्रात त्यांच्या उद्योग समूहाला उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात स्वारस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतवणूक आणि रोजगार संधीची माहिती दिली.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,आमदार आदित्य ठाकरे तसेच’व्हर्जिन’समूहाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या उद्योग समूहाच्या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

००००

संतोष तोडकर/मुख्यमंत्री सचिवालय/12.12.19

ताज्या बातम्या

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

0
सातारा, दि.२०: पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौऱ्यावर होते. यावेळी...

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

0
नागपूर, दि २० : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या; मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

0
नागपूर, दि. २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण

0
नागपूर, दि. २० : नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री...

पिंक ई-रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २० : महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांद्वारे...