रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1588

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. 9 : राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

          

सार्वजनिक बांधकाम विभागातील मनुष्यबळ विभागामार्फत सुरू असलेल्या राज्य व प्रमुख जिल्हा मार्गांची कामे, मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन टनेल मार्ग, हायब्रीड ॲन्युइटी योजना, शासकीय इमारती, मंत्रालयाचे आधुनिकीकरण, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे वर्सोवा सी लिंक, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हरित इमारत प्रकल्प आदी विविध प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

          

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, राज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते असे सुमारे तीन लाख किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते. या रस्त्यांचा दर्जा वाढावा, ते दीर्घकाळ टिकावेत, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर रस्ते विकासात करण्यात यावा. सध्या नवीन तंत्रज्ञान वापरून एक हजार किमी रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मृदा सुदृढीकरण तंत्रज्ञान वापरून 2500 किमी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच जर्मन तंत्रज्ञान वापरून 3 हजार किमी रस्त्यांच्या पृष्ठभागाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तर कोकण व पश्चिम घाटातील 2500 किमी रस्त्यांचे पोरस बिटूमन मिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच डांबरीकरणाचा स्तर मजबूत करण्यासाठी विविध कंपन्यांच्या रसायन द्रव्याचा वापर करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

रस्त्यांच्या कामासाठी जागतिक बँकेकडून सुलभ कर्ज उपलब्ध होते का, याबद्दलही प्रस्ताव सादर करावेत. शासकीय निवासी इमारतींच्या दुरुस्तीवर भर देण्यात यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सादरीकरण केले. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, आमदार अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकामे) अजित सगणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/9.12.19 ०००००

Make the roads in the state pothole-free

CM Uddhav Thackeray instructed to use

Modern technology in road construction

Mumbai, date9th: Chief Minister Uddhav Thackeray said that roads in the state should be made potholes free. He instructed to use modern technology instead of traditional ways in new road construction.  A review meeting of PWD was held in Mantralaya under the presidency of Chief Minister Shri. Thackeray.

State and major district road constructions, new tunnel construction on Mumbai- Pune highway, hybrid annuity scheme, government buildings, renovation of Mantralaya, Nagpur- Mumbai Samruddhi highway, Bandra-Versova Sea Link, Chhatrapati Shivaji Maharaj Memorial in Arabian Sea, Green building project, etc. various projects undertaken by the human resource unit of PWD Department were reviewed in this meeting.

Chief Minister Shri. Thackeray said that the state has three lakh kilometers’ roads including national highway, state ways, main district roads, other district roads, and rural roads.  Traditional techniques are used to repair these roads. New techniques should be used in road development to improve the quality and its durability.  Road construction of one thousand km length is planned using new technology. 2500km roads will be repaired using Orion reinforcement technology. Surface reinforcement of three thousand kilometers will be done by using German technology. 2500km roads in Konkan and West Ghat will be damber constructed using porous bitumen mix technique. He also told that the chemicals of various companies would be used to strengthen the level of damber.

Chief Minister also told to give importance to repairing government residential buildings. He instructed to submit proposals regarding easy loans by World Bank for road construction.

Upper Chief Secretary of the Department Manoj Sounik gave the presentation. Minister Eknath Shinde, Subhash Desai, MLA Anil Parab, Chief Secretary Ajoy Mehta, Secretary (road) C.P. Joshi, Secretary (construction) Ajit Sagne, Managing Director of Maharashtra State Road Development Board  Radheshyam Mapelwar etc. office-bearers were present.

0000

राज्य में सड़कों को गड्ढा मुक्त करो

सड़क निर्माण में आधुनिक तकनीक

उपयोग करने का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने दिया सुझाव

मुंबई,दि.9: राज्य में सड़कें गड्ढों से मुक्त होनी चाहिए और नई सड़कों के काम में तेजी लाने के दौरान पारंपरिक तरीकों के बजाय आधुनिक तकनीक का उपयोग करना चाहिए,ऐसा सुझाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने दिया। लोकनिर्माण विभाग की समीक्षा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे की अध्यक्षता में मंत्रालय में हुई।

इस दौरान सार्वजनिक निर्माण विभाग में जनशक्ति विभाग के माध्यम से राज्य और प्रमुख जिला सड़कों का कार्य,जनशक्ति विभाग,मुंबई-पुणे राजमार्ग पर नई सुरंग मार्ग,हाइब्रिड वार्षिकी योजना,सरकारी भवनों,मंत्रालय के आधुनिकीकरण,नागपुर-मुंबई समृद्धि राजमार्ग,बांद्रा वर्सोवा सी लिंक,अरब सागर के छत्रपति शिवाजी महाराज स्मारक,ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट सहित विभिन्न परियोजनाओं की समीक्षा की गई।

मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि राज्य में लगभग तीन लाख किमी सड़कें हैं जैसे राष्ट्रीय राजमार्ग,राज्य सड़कें,प्रमुख जिला सड़कें,अन्य जिला सड़कें,ग्रामीण सड़कें। इन सड़कों के रखरखाव के लिए पारंपरिक पद्धति का उपयोग किया जाता है। इन सड़कों की गुणवत्ता में सुधार करने के लिए,सड़क विकास में नई तकनीकों का उपयोग किया जाना चाहिए ताकि वे टिकाऊ हो सकें। वर्तमान में,नई तकनीक का उपयोग करके एक हजार किमी सड़क का निर्माण करने की योजना है। ओरियन सुदृढीकरण प्रौद्योगिकी का उपयोग करके 2500 किमी सड़कों की मरम्मत की जाएगी। साथ ही,जर्मन तकनीक का उपयोग करके 3,000 किमी सड़क की सतह को मजबूत किया जाएगा। इसी तरह कोंकण और पश्चिम घाट में 2500 किमी सड़कों को पोरस बिटुमेन मिक्स विधि द्वारा डांबरीकरण किया जाएगा। उन्होंने यह भी बताया कि डामर के स्तर को मजबूत करने के लिए विभिन्न कंपनियों के रसायनों का उपयोग किया जाएगा।

सड़क कार्यों के लिए विश्व बैंक से आसान ऋण प्रदान करने के लिए भी प्रस्ताव किया जाना चाहिए। उन्होंने कहा कि सरकारी आवासीय भवनों की मरम्मत पर जोर दिया जाना चाहिए।

इस दौरान विभाग के अपर मुख्य सचिव मनोज सोनिक ने प्रस्तुति दी।  मंत्री एकनाथ शिंदे,मंत्री सुभाष देसाई,विधायक अनिल परब,मुख्य सचिव अजोय मेहता,सचिव (सड़क) सी.पी. जोशी,सचिव (निर्माण) अजीत सगणे,महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम के प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार सहित विभाग के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

००००

आदिवासी जिल्ह्यातील मुलांना न्यूमोनियाच्या लसीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 9 : आरोग्याच्या महत्त्वाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वस्त करतानाच पाच आदिवासी जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मंत्रालयात आरोग्य विभागाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

आरोग्य विभागाच्या सुरु असलेल्या योजनांना अधिकचा निधी देतानाच आरोग्य संस्थांची बांधकामे मुदतीत पूर्ण करण्याकरिता निधीची कमतरता जाणवू देणार नाही. जनतेला दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सादरीकरणादरम्यान प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी आदिवासी भागात जिथे पाऊस जास्त पडतो, अशा ठिकाणची मुले न्यूमोनिया होऊन दगावण्याची शक्यता जास्त असते. त्यांना लसीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच पालघर, नंदुरबार, अमरावती, नाशिक आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लस देण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निर्देश दिले. त्यामुळे या पाच जिल्ह्यातील तपासणी केलेल्या सुमारे 1 लाख 40 हजार मुलांना लस दिली जाणार आहे.

पायाभूत सुविधांसाठी ज्या प्रकारे प्राधान्याने निधी दिला जातो, तशाच प्रकारे आरोग्यासाठीही निधी देणार असून आदिवासी भागात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी दर्जेदार अशी निवास व मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिली पाहिजे, आदिवासी भागात नियुक्ती केलेल्या डॉक्टरांच्या नियुक्तीच्या आदेशामध्ये बदलीच्या दिनांकाचाही उल्लेख करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम सुरु आहे त्यांना लागणारा व आरोग्य योजनांसाठी लागणारा निधी, नव्या योजनांसाठीचा निधी असे नियोजन करुन त्याचा आराखडा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामीण भागात आरोग्यसेवेसाठी काम करणाऱ्या आशा कार्यकर्ती या ग्रामीण आरोग्याचा कणा आहेत. असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. ज्या आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिसकरिता रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे, तिथे तिसरी शिफ्ट सुरु करावी. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/9.12.19

प्रशासनाचा गाढा अनुभव असलेले विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून रुजू

मुंबई दि.9 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला.  1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता. 2014 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून देखील काम पाहिले होते.

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे असलेले विकास खारगे यांचा जन्म17 मार्च 1968 चा असून त्यांचे शालेय शिक्षण इचलकरंजीच्या शाहू नगरपरिषद शाळेत तसेच व्यंकटराव माध्यमिक शाळेत तसेच कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले.  पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून त्यांनी बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) ही पदवी संपादन केली.  तसेच युकेच्या युनर्व्हिसिटी ऑफ ससेक्समधून एम.ए. (गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट) पूर्ण केले. 

प्रशासनाचा गाढा अनुभव

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे सहायक जिल्हाधिकारी, नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच यवतमाळ आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामगिरी केली.  मुंबई येथे विक्रीकर सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेचे संचालक, कुटुंब कल्याण आयुक्त, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे संचालक, राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त तसेच वन विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर ते होते.

अनेक पुरस्कार

विकास खारगे यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांना नुकताच नववा अर्थ केअर ॲवॉर्ड मिळाला आहे.  याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे कार्यालय राज्यातील पहिले पेपरलेस ई-ऑफिस केल्याबद्दल राजीव गांधी प्रशासकीय सुधारणा पुरस्कार, औरंगाबाद जिल्ह्यात धार्मिक सलोखा राखल्याबद्दल महात्मा गांधी शांतता पुरस्कार, त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात साक्षरता कार्यक्रम प्रभावीरित्या राबविल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते सत्येन मित्रा राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

प्रमुख योगदान

विकास खारगे यांनी शासनाच्या वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून केलेल्या कामगिरीचे देशपातळीवरुन कौतुक झाले आहे.  50 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड झाली. 

कुटुंब कल्याण आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील लिंगदर883 वरुन 934 इतका वाढला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 108 क्रमांक रुग्णवाहिका सुरु करण्यात आली असून आजमितीस 972 रुग्णवाहिका रुग्णांवर उपचार करीत  आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणून त्यांनी हाताने तसेच वीजेवर चालणारे पंप तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे पंप कालांतराने सौरऊर्जेवर देखील चालण्याची व्यवस्था करण्यात आली. बालमजुरी निर्मूलनाच्या कार्यक्रमात औरंगाबादचे जिल्हाधिकारी असताना 4 हजार बालमजुरांची सुटका करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग

विकास खारगे यांनी अनेक आंतरराष्ट्रीय बैठका आणि परिषदामध्ये सहभाग घेतला आहे.  यामध्ये थायलंड, स्वीडन, यूके, ब्राझिल, दक्षिण कोरिया, बांग्ला देश, मलेशिया, स्पेन, सिंगापूर, केनिया, चीन, अमेरिका, दुबई, पोलंड आणि इस्त्रायल अशा देशांचा समावेश आहे. 

त्यांनी पंचायत राज सिस्टिम-ए न्यू रोल नावाचे पुस्तक लिहिले असून’यशदा‘ने ते प्रकाशित केले आहे.

विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान देण्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न

पुणे,दि. 8 : भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळावा पदवीदान समारंभश्री.नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंहकोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर,  कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते.

उपराष्ट्रपतीश्री.नायडू म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंग, भाषा, देश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा “वसुधैव कुटुंबकम्”चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, ही गौरवाची बाब आहे.

पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. नायडू यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रसिद्धगीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

यावेळी जावेद अख्तर, डॉ. टेसी थॉमस यांची भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले तर आभार विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी मानले.

कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपतीश्री.नायडूयांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक उपस्थित होते. 0000

सिम्बायोसिस विश्वविद्यालय का 16 वां पदवीदान समारोह संपन्न

छात्रों ने देश के निर्माण में योगदान देना चाहिए- उपराष्ट्रपति एम. व्यंकैया नायडू

पुणे, दि. 8 : भारत कई दशकों से वैश्विक ज्ञान का केंद्र रहा है। यह देश तक्षशिला से नालंदा इस तरह के एक बड़े शैक्षणिक परंपरा की विरासत से लाभप्राप्त है। इस विरासत को संभालते हुए छात्रों ने देश के निर्माण के लिए अपने बौद्धिक संपदा का उपयोग करने का आवाहन उपराष्ट्रपति एम. व्यंकैया नायडू ने आज यहाँ पर किया।

लवले स्थित सिम्बायोसिस अंतरराष्ट्रीय अभिमत (Deemed University) विश्वविद्यालय का 16 वां पदवीदान समारोह उपराष्ट्रपति एम. व्यंकैया की उपस्थिति में संपन्न हुआ, इस अवसर पर वे बोल रहे थे। समारोह में राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबल, विश्वविद्यालय के कुलपति शां. ब. मुजूमदार,  कुलपति रजनी गुप्ते,  प्रतिकुलपति तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर,  कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित थे।

उपराष्ट्रपति एम. व्यंकैया नायडू ने कहा कि शिक्षा प्राप्त करने के लिए जात, लिंग, भाषा, देश इस तरह के कोई भी बंधन नहीं रहते। शिक्षा से विश्वभर में अवसर प्राप्त हो सकते है। शिक्षा यह प्रत्येक को अपनी ज़िम्मेदारी का एहसास कराती है। अपने देश का तक्षशिला से नालंदा ऐसा उज्ज्वल शैक्षणिक इतिहास है। पूरा एशिया खंड के छात्र शिक्षा के लिए भारत में आते थे। यह वसुधैव कुटुंबकम् का इतिहास सिम्बायोसिस विश्वविद्यालय आगे बढ़ा रहा है। विश्वभर के विविध देशों के छात्र यहाँ पर शिक्षा प्राप्त करने के लिए आते है, यह बात गौरवास्पद है।

उपराष्ट्रपति ने आगे कहा कि पुणे शहर यह महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी है। साथ ही न्यायमूर्ती रानडे,  गोपाल कृष्ण गोखले, गोपाल गणेश आगरकर, लोकमान्य तिलक, वासुदेव बलवंत फडके ऐसे लोकोत्तर पुरुषों का इतिहास इस शहर को मिला है। इस शहर से महात्मा गांधी और डॉ. बाबासाहेब आंबेडकर का ऋणानुबंध होने की बात भी श्री. नायडू ने कहीं।

समारोह में विश्वविद्यालय के गुणवत्ताधारक छात्रों को उपराष्ट्रपति के हाथों पदवी प्रदान की गई। उपराष्ट्रपति के हाथों प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस को मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान की गई।

समारोह में जावेद अख्तर, डॉ. टेसी थॉमस का भी भाषण हुआ। समारोह का प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार ने किया और विश्वविद्यालय  के प्र. कुलपति  तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर ने उपस्थितों के प्रति आभार व्यक्त किया।

कार्यक्रम के पश्चात उपराष्ट्रपति के हाथों विश्वविद्यालय के परिसर में वृक्षारोपण किया गया। इस दौरान विविध क्षेत्रों के मान्यवर, छात्रों के परिजन, शिक्षक एवं छात्र उपस्थित थे।

0000 

16 th convocation ceremony of Symbiosis University concluded

Students should contribute in construction of the nation -Vice President M Venkaiah Naidu

Pune, December 8:- India is the centre for knowledge since decades. We have the educational heritage from Takshashila to Nalanda. The students should use their intellectual property to preserve the heritage of the nation and utilize it in construction of the nation, appealed Vice President of India M Venkaiah Naidu.

He was speaking during the 16th convocation ceremony of Symbiosis International deemed University in Lavale. Governor Mr Bhagat Singh Koshyari, Minister Chhagan Bhujbal, Chancellor of University S B Mujumdar, Vice- Chancellor Rajni Gupta, Pro-Vice Chancellor and Principal Director Vidya Yeravdekar, Registrar MG Shejul were also present during the ceremony.

Speaking further Vice president Venkaiah Naidu said there are no barriers of cast, gender, language and nation for seeking knowledge. He said that due to education, the doors of opportunities in the entire world are opened. Education makes one aware of responsibilities. Our nation has rich heritage of education right since Takshashila to Nalanda. Students from the entire Asian continent visit India for education. The legacy of Vasudhaiva Kutumbakam is been taken ahead by the Symbiosis University. Students from various parts of the world come here for pursuing quality education and this is a matter of pride, he added.

The vice president further said that Pune is the cultural capital of Maharashtra. Great personalities like justice Ranade, Gopal Krishna Gokhale, Gopal Ganesh Agarkar, Lokmanya Tilak, Vasudev Balwant Phadke had close relation with Pune. Mahatma Gandhi and Dr Babasaheb Ambedkar were also associated with Pune. 

The meritorious students of the university were conferred degrees at the hands of the Vice-president. Famous writer Javed Akhtar and scientist Dr Tessy Thomas were bestowed on honorary doctorate during the program. Javed Akhtar and Dr. Tessy Thomas also spoke on the occasion. Introductory speech of the program was delivered by Dr S B Mujumdar. Pro Vice-Chancellor and principal Director Vidya Yeravdekar proposed the vote of thanks. The vice president planted trees in the premises of the University after the program. Prominent personalities from various fields, teachers and students were present in large number.

0000

संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई, दि. 8 : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी आज येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज.जी. वळवी तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी संत जगनाडे महाराज यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे दि. 7 : राजभवन येथे राज्य  सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.

यावेळी लेफ्टनंट कर्नल  श्री. आर. आर. जाधव,  शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या पत्नी श्रीमती उमा कुणाल गोसावी, मुलगी उमंग कुणाल गोसावी,  नाईक श्री. नंदकुमार चावरे,  सुभेदार श्री. संजयकुमार मोहिते,  एनसीसी अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे,  एनसीसी  विद्यार्थी  अमंग रुपेली,  संकेत कदम, विजयश्री सुरदे,  प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते. ००००

PM Narendra Modi inaugurated Armed Forces Flag Day Fund Collection

Pune, date.7th:  PM Narendra Modi inaugurated Armed Forces Flag Day fund collection organised by the State Ex- Servicemen Welfare Department at Raj Bhavan. PM Modi interacted with the martyr soldier Kunal Gosavi wife and daughter Umang.

Lieutenant Colonel Shrimant R.R. Jadhav, martyr soldier Kunal Gosavi’ wife Uma Kunal Gosavi, daughter Umang Kunal Gosavi, Naik Shri. Nandkumar Chaware, Subhedar Shri. Sanjaykumar Mohite, NCC officer Shri. Balasaheb Shinde, NCC students Amang Rupeli, Sanket Kadam, Vijayshri Surade, Priti Jagdale were present at the event.

००००

सैनिकांसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे देशकार्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ध्वजदिन निधी संकलन करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई दि.7 : आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन2019 निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्त्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा राज्यपाल महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅजेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून  निधी संकलित करण्यात आला.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले, आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान आहे. आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल महोदयांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सतीश जोंधळे, व्हाईस ॲडमिरल अजित कुमार, मेजर जनरल राज सिन्हा, ग्रुप कॅप्टन एस.एन.बावरे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक के.लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. बोरीकर यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनाकरिता देण्यात आलेले उद्दिष्ट100 टक्के पूर्ण केल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जोंधळे यांनी सैन्य दलाप्रति आदरभावना दर्शविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्वांनी अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन केले.

000

वर्षा आंधळे / विसंअ/दि.7.12.2019 ०००००

ध्वजदिन निधि संकलन कर्ताओं को किया सम्मानित

जवानों के लिए ध्वजदिन निधि संकलन करना देशकार्य है

– राज्यपाल कोश्यारी

मुंबई दि. 7 : अपने देश की सीमा की रक्षा करने के लिए जवान हमेशा कार्यरत रहते है। इन जवानों की मदद के लिए ध्वजदिन निधि संकलन करना यह एक बड़ा देश कार्य है। इसलिए हम सभी  ने इसमें अधिकाधिक भाग लेने का आवाहन राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी ने किया है।

पूर्व सैनिक कल्याण विभाग की ओर से सह्याद्री अतिथिगृह में सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधि संकलन अभियान का शुभारंभ किया गया। इस दौरान सशस्त्र सेना ध्वज दिन संकलन में महत्वपूर्ण सहभाग देनेवालों का राज्यपाल महोदय और उपस्थित मान्यवरों के हाथों स्मृतिचिन्ह देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों को सशस्त्र सेना दिन के बॅचेस लगाए गए और ध्वजदिन निधि में सहभागी से  निधि संकलित किया गया। कार्यक्रम में राज्यपाल श्री. कोश्यारी ने कहा कि जवानों के परिवारों के लिए हम सभी ने निधि संकलन करना यह समाज में बड़ा योगदान है। आज इन्हीं जवानों के बलबूते पर हम सभी सुरक्षित है। इसलिए इन जवानों के परिवार का ध्यान का रखना भी हमारी ज़िम्मेदारी है।

उन्होंने कहा कि सशस्त्र सेना ध्वजदिन के अवसर पर संकलित किया गया निधि सैनिक, पूर्व सैनिक, सैनिक की विधवा और उनके बच्चों की पढ़ाई के लिए खर्च किया जाता है। इसलिए अधिकाधिक नागरिकों ने ध्वजदिन पर निधि संकलन कार्यक्रम में शामिल होना चाहिए, यह आवाहन राज्यपाल महोदय ने इस अवसर पर किया।

कार्यक्रम में सामान्य प्रशासन विभाग की प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई उपनगर जिले के जिलाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई जिले के जिलाधिकारी सतीश जोंधले, वाईस एडमिरल अजित कुमार, मेजर जनरल राज सिन्हा, ग्रुप कैप्टन एस. एन. बावरे, सैनिक कल्याण विभाग के संचालक के. लक्ष्मीनारायण मिश्रा प्रमुखता से उपस्थित थे।

कार्यक्रम के प्रास्ताविक में समय मुंबई उपनगर जिलाधिकारी श्री. बोरीकर ने बताया कि मुंबई शहर और मुंबई उपनगर जिले ने ध्वजदिन निधि संकलन के लिए दिया गया लक्ष्य 100 प्रतिशत पुरा किया है। कार्यक्रम के अंतिम में मुंबई शहर जिले के जिलाधिकारी श्री. जोंधले ने सैन्य सेना के प्रति आदरभाव व्यक्त करने के लिए यह उपक्रम चलाया जाता है यह बताते हुए अधिक से अधिक लोगों ने इसमें भाग लेने का आवाहन किया।

000

वर्षाआंधले/विसंअ/दि.7.12.2019 ०००

People collecting contributions facilitated

for the Flag Day fund contribution

Collecting Flag Day fund contributions for the soldiers is a service to the nation

Governor Koshyari

Mumbai, date.7th:  Soldiers are always active to protect our country. Collecting Flag Day contribution for these soldiers a big service in favour of the nation. Hence everyone should participate and try to contribute more, appealed the Governor Shri. Bhagat Singh Koshyari.

Armed Forces Flag Day 2019 Fund Collection Mission was started today at Sahyadri Guest House by the Department of Ex- Servicemen Welfare. Governor and other present eminent persons facilitated people who had given an important contribution in Armed Forces Flag Day Fund Collection with a with a memento.  Present eminent were given badges of Armed Forces Flag Day and funds were collected from the contributors.

The Governor Shri. Koshyari said, it is a big contribution for the society to collect funds for soldiers and their families. We can live safely because of these soldiers only and it’s our responsibility to take care of their families. Funds collected is given  to the soldiers, ex-soldiers,  widows of soldiers and for the education of their children. Therefore more and more citizens should contribute in fund collection, appealed the Governor.

Principal Secretary of General Administration Department Valsa Nair- Singh, Konkan Divisional Commissioner Shivaji Daund , District Collector of Mumbai Suburban Milind Borkar, Mumbai District Collector Satish Jondhale, Vice Admiral Ajit Kumar, Major General Raj Sinha, Group Captain S.N. Baware, Director of Ex- Servicemen Welfare Department K. Lakshmi Narayan Mishra were present at the event.

Mumbai Suburban District Collector Shri. Borkar told in the introduction that Mumbai city and Mumbai suburban district has achieved its 100% Flag Day fund collection target. Mumbai District Collector Shri. Jondhale told at the end of programme that the initiative a respect towards the army and appealed all to contribute more.

००००

जाळे फाडा, पण दुर्मिळ सागरी प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडा – जाळ्याच्या नुकसानीपोटी २५ हजार रुपयांचे अनुदान

  

मुंबई दि. ७ : मासेमारी करताना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सागरी प्राण्यांना जाळे कापून समुद्रात सोडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ हजार रुपयांचे अनुदान वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत दिले जाते. आतापर्यंत २२ प्रकरणांमध्ये ४ लाख ३६ हजार ७५० रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी १० जणांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे तर उर्वरित १२ जणांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने जर मासेमारी करताना दुर्मिळ सागरी प्राणी जाळ्यात अडकले तर त्यांना जाळे फाडून समुद्रात सोडण्याचे व फाडलेल्या जाळ्यापोटी २५ हजार रुपयांचे अनुदान मिळवण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.  याचाच परिणाम म्हणून मागील सहा महिन्यात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये १३ ऑलिव्ह रिडले कासव, ५ ग्रीन सी कासव, ४ व्हेल शार्क( देव मुखी/बहिरी) या प्रजातींना जीवदान मिळाले आहे.

समुद्रात मासेमारी करत असताना बऱ्याचवेळा संरक्षित दुर्मिळ प्रजाती मच्छिमारांच्या जाळ्यात अडकतात. हे जाळे तातडीने कापले तरच संबंधित प्राणी वाचू शकतात. जाळे कापल्यामुळे मच्छिमारांना मोठे नुकसान सहन करावे लागते.  हे नुकसान भरून निघावे व दुर्मिळ प्रजातींच्या जतन आणि संवर्धनात वेग यावा यासाठी राज्याच्या वन विभागाने मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या सहकार्याने अशा घटना झाल्यास २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मच्छिमारांना ही नुकसानभरपाई प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, वन विभाग यांच्यामार्फत अटी व शर्तींच्या अधीन राहून दिली जाते.

वन विभागाने मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने सागरतटीय जिल्ह्यात मच्छिमारांचे प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र समुद्र किनारपट्टीजवळ लेदर बॅक कासव आढळल्याची शेवटची नोंद १९९५ साली करण्यात आली होती. काही प्रमाणात ही प्रजाती अंदमान बेटावर आढळते.  कांदळवन प्रतिष्ठानच्या सुरु असलेल्या या जनजागृतीमुळे मच्छिमार अशी कासवे जाळ्यात अडकले तर ते पुन्हा समुद्रात सोडून देत असल्याचे कांदळवन कक्षाचे निरिक्षण आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रीवर्धन येथील भरडखोल येथे एका मच्छिमाराच्या जाळ्यात लेदरबॅक समुद्री कासव सापडले होते, त्यांनी जाळे कापून या कासवाची सुटका केली आणि त्याला सुखरूप समुद्रात सोडून दिले.

राज्याच्या ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) यांनी  विविध प्राण्यांना धोकादायक प्रजातींच्या लाल यादीत समाविष्ट करून समुद्री प्राण्यांच्या संवर्धन स्थितीचे मूल्यांकन केले आहे.  यामध्ये समुद्री सस्तन प्राणी (डॉल्फिन, व्हेल), शार्क मासे, सागरी कासव आदींना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या परिशिष्ट १ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे.

0000

डॉ.सुरेखा मुळे/वि.सं.अ./7.12.2019

कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांना विनंती

मुंबई दि.7: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार“छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ”असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांना केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे.  त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.  

अशाच रितीने केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष व दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम व ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीने बदल करण्याचा मानस देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. उदाहरणादाखल केवळ जोतिबा फुले असे न म्हणता महात्मा जोतिराव फुले, संभाजी ऐवजी छत्रपती संभाजी महाराज असे नामविस्तार करून या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा, या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही सुरु करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

—–०—–

रत्नागिरीचा चैतन्य परब आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात दुसरा

आकाशवाणीच्याविशेषसमारंभातहोणारसत्कार

नवीदिल्ली,दि. 7 :रत्नागिरीच्याचैतन्यपरबयाबालकलाकारानेआकाशवाणीच्याशास्त्रीयगायन(ख्यालगायन)स्पर्धेतदेशातूनदुसराक्रमांकपटकाविलाआहे. 17डिसेंबररोजी दिल्लीयेथेआकाशवाणीच्या विशेषसमारंभातचैतन्यलापुरस्कारप्रदानकरण्यातयेणारआहे.

आकाशवाणीच्या वतीनेदरवर्षीसंगीताच्याविविधप्रकारातस्पर्धाघेतल्याजातात.युवाकलाकारालाप्रोत्साहनआणिराष्ट्रीयमंचउपलब्धव्हावायाउद्देशानेयास्पर्धांचेदेश पातळीवरआयोजनकेलेजाते.हीस्पर्धाप्राथमिकआणिअंतिमफेरीअशादोनटप्प्यातघेतलीजाते.आकाशवाणीरत्नागिरीकेंद्रातझालेलीप्राथमिकफेरीयशस्वीपारपडूनचैतन्यची दिल्लीतीलअंतिमफेरीसाठीनिवडझालीहोती.

याअंतिमफेरीसाठीकोलकाता,दिल्ली,मुंबई,पुणेआदीकेंद्रातूनस्पर्धकदाखलझालेहोते.तज्ज्ञपरीक्षकमंडळानेशास्त्रीयसंगीत(ख्यालगायन)मुलांच्यागटातदिल्लीच्यापुलकितशर्मायाचीप्रथमतररत्नागिरीच्याचैतन्यपरबची द्वितीयक्रमांकासाठीनिवडकेली.

चैतन्यहारत्नागिरीतीलअभ्यंकरकुलकर्णीकनिष्ठमहाविद्यालयातअकरावीतशिकतआहे.चैतन्यनेसंगीताचेसुरूवातीचेशिक्षणत्याचीआई विनयापरबयांच्याकडेघेतले.गेलीचारवर्षेतोकिराणाघराण्याचेआघाडीचेगायकपं.जयतीर्थमेवुंडीयांच्याकडेशास्त्रीयगायनाचीतालीमघेतआहे.चैतन्यनेसहाव्यावर्षीअखिलभारतीयगांधर्वमंडळाच्यागायनाचीपहिलीपरीक्षादिली.तसेचत्यानेमंडळाचीहार्मोनियममधीलमध्यमाप्रथमहीपरीक्षाहीउत्तीर्णकेलीआहे.चैतन्यसध्यागायनाचीउपांत्यविशारदहीपरीक्षादेतआहे.  

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.264/  दिनांक  ०७.१२.२०१९

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...