रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1589

महिला लोकशाही दिनासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

मुंबई दि. ७ : मुंबई शहर जिल्ह्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांना तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

महिलांच्या तक्रारी अथवा अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी दु. २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांना तक्रार अर्ज दाखल करावयाचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन दोन प्रतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवारी एन. वासुदेवन यांची मुलाखत

मुंबई, दि.7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात अपर प्रधान मुख्य वन सरंक्षक, कांदळवन कक्ष श्री. एन. वासुदेवन यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 9 आणि मंगळवार दि. 10 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रातील कांदळवनाचे क्षेत्र आणि त्याची व्याप्ती, महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील कांदळवनाच्या प्रजाती, देशात आणि महाराष्ट्रात कांदळवनाचे पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्व, कांदळवन संवर्धनासाठी शासन उचलत असलेली पावले, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2017 नुसार राज्यातील कांदळवनस्थिती, कांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने सागरतटीय जिल्ह्यातील नागरिकांना केलेले  आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. वासुदेवन यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार

मुंबई, दि. 7 :  महाराष्ट्रकर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री स्वत: या संदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशीदेखील चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत, आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, अनिल परब आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तातडीने सीमाप्रश्नी मंत्रालयात बैठक बोलावून एकीकरण समितीला निमंत्रण दिले, यावरून याप्रश्नी महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली इच्छा असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावे. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रितीने जाण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सीमाप्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढा सुरू आहे. हा खटला जलद गतीने संपविण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी या खटल्यातील वकिलांची तातडीने संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसेच खटल्याच्या पुढील सुनावणीस ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडावी, यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल.

यावेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, ड.शिवाजीजाधव, ड.संतोषकाकडे, श्री. दिनेश ओऊळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी आमदार अरविंद पाटील, दिगंबर पाटील, बेळगाव तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर, प्रकाश शिढोळकर यांच्यासह एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 00000

कानूनन लड़ाई को मिलेगी गति

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न में

दो मंत्री समन्वय रखेंगे – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न को लेकर उच्चतम न्यायालय चल रहे मामले को गति देने के लिए राज्य सरकार की ओर से सभी संबंधित वकिलों की तत्काल बैठक लेने और सर्वश्री एकनाथ शिंदे और छगन भुजबल की समन्वयक मंत्री के रूप में नियुक्ति करने के निर्देश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ने यहाँ पर दिए। मुख्यमंत्री स्वयं इस संदर्भ में वरिष्ठ विधिज्ञ हरिश सालेवे से भी चर्चा करेंगे।

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न को लेकर आज मंत्रालय में मुख्यमंत्री श्री. ठाकरे की अध्यक्षता में बैठक हुई। इस बैठक में मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटिल, छगन भुजबल, नितीन राऊत, विधायक सर्वश्री हसन मुश्रीफ, राजेश पाटिल, अनिल परब आदि उपस्थित थे।

मुख्यमंत्री पद स्वीकारने के बाद तत्काल सीमाप्रश्न को लेकर मंत्रालय में बैठक लेकर एकीकरण समिति को निमंत्रण दिया गया, इस पर इस समस्या को लेकर महाराष्ट्र का पक्ष अधिक मजबूत करने की इच्छा होने की बात  मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहीं। साथ ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न के हल के लिए कोई भी राजनैतिक मतभेद न रखते हुए सभी ने एकसाथ आए। सीमा क्षेत्र के गाँव महाराष्ट्र में आने के लिए कानूनन लड़ाई में राज्य का पक्ष प्रभावपूर्ण तरीके से रखने के लिए कालबद्ध पद्धति से प्रक्रिया के करने की सूचना मुख्यमंत्री ने इस दौरान दी।

सीमा प्रश्न संबंधी उच्चतम न्यायालय में शुरू मामले की सद्यस्थिति का जायजा लेकर मुख्यमंत्री ने कहा कि सीमाप्रश्न पर उच्चतम न्यायालय में वर्तमान में कानूनन लड़ाई शुरू है। यह मामला तेजी से खत्म करने के लिए राज्य सरकार की ओर से सर्वतोपरी प्रयास किए जाएंगे। इसके लिए इस मामले के वकिलों की जल्द संयुक्त बैठक ली जाएगी। साथ ही मामले की आगे की सुनवाई के लिए वरिष्ठ विधीज्ञ हरिष सालेवे पक्ष रखे, इसके लिए उन्हें विनती की जाएगी।

इस दौरान राज्य के महाधिवक्ता श्री. आशुतोष कुंभकोणी, सामान्य प्रशासन विभाग के सचिव अंशू सिन्हा, एड. शिवाजी जाधव, एड. संतोष काकडे, श्री. दिनेश ओऊलकर, महाराष्ट्र एकीकरण समिति के पूर्व विधायक  श्री. मनोहर किणेकर, पूर्व विधायक श्री. अरविंद पाटिल, श्री. दिगंबर पाटिल, बेलगाव तरूण भारत के संपादक श्री. किरण ठाकूर, श्री. प्रकाश शिढोलकर समेत एकीकरण समिति के पदाधिकारी उपस्थित थे।

—–000—–

नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./7.12.2019

00000

The legal battle to be speeded up

Two ministers to coordinate for Maharashtra- Karnataka border dispute

–          Chief Minister

Mumbai, date 7th: Chief Minister Shri. Udhhav Thackeray directed to hold a State Government’s meeting of all lawyers related to the case of Maharashtra- Karnataka Border dispute so that the case under prosecution in the Supreme Court can be speeded up. He also directed to appoint Sarvshi Eknath Shinde and Chhagan Bhujbal as coordination minister. Chief Minister will personally discuss the case with senior jurist Harish Salve.

A meeting was held in Mantralaya today under the presidency of Chief Minister Shri. Thackeray regarding Maharashtra- Karnataka border dispute. Minister Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Nitin Raut, MLA Sarvshri Hasan Mushreef, Rajesh Patil, Anil Parab was present.

As soon as Chief Minster took the charge, he immediately called for a meeting regarding border dispute and invited Ekikaran (unison) committee. Chief Minister Shri. Thackeray said that he wishes to strengthen Maharashtra’s case in this dispute. He also said that all should come together keeping political differences aside to solve Maharashtra- Karnataka border dispute. Chief Minister also directed to follow the timeline to strengthen the state’s side in the legal battle that is fought to include borderline villages in Maharashtra.

Chief Minister reviewed the border dispute case under prosecution in the Supreme Court. He said that the border dispute case is under prosecution in the Supreme Court.  State Government will try its best to proceed with the case in a possible short time. A joint meeting of all lawyers related to this case will be held. Senior lawyer Harish Salve will be requested to state the case in the next hearing.

Advocate General Shri. Ashutosh Kumbhkoni, Secretary of General Administration Department Anshu Sinha, Adv. Shivaji Jadhav, Adv. Santosh Kakade, Shri. Dinesh Ovulkar, former MLA, and Maharashtra Ekikarana Committee’s Shri. Manohar Kinekar, former MLA Shri. Arvind Patil, Shri. Digambar Patil, Belgaum Tarun Bharat’s Editor Shri. Kiran Thakur, Shri. Prakash Shidholkar and office-bearers of Maharashtra Ekikarana Committee were present at the meeting.

0000

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई, दि. 7 : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.

बैठकीमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत  प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सादरीकरण केले. यामध्ये सर्व ग्रामपंचायती फायबर ऑप्टिक नेटवर्कने जोडण्याचा भारतनेट टप्पा 2, आपले सरकार सेवा केंद्रे, नागरी महानेट प्रकल्प, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आदी प्रकल्पांविषयी माहिती दिली. महाराष्ट्राची ब्लॉकचेन तंत्रज्ञानासाठी सज्जतेच्या दृष्टीने गतीने कार्यवाही सुरू असून देशात सर्वप्रथम आपले राज्य ब्लॉकचेनसाठी सज्ज असल्याची घोषणा करण्याचा मानस आहे, असेही ते म्हणाले.

शासकीय डेटा सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन

दरम्यान यावेळी श्री. ठाकरे यांच्या हस्ते सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (एसओसी) चे उद्घाटन झाले. राज्य शासनाच्या‘स्टेट डेटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये सर्व शासकीय संकेतस्थळांवरील डेटा ठेवलेला असतो. हा डेटा तसेच क्लाऊडवरील शासनाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही बाह्य प्रणालीद्वारे सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी हे सेंटर स्थापन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

यावेळी प्रधान सचिव भूषण गगराणी, महाआयटीचे महाव्यवस्थापक अजित पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिव स्वाती म्हसे-पाटील, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.7.12.2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ. आंबेडकर यांच्या बीआयटी चाळ येथील निवासस्थानी भेट

मुंबई, दि. 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या खोलीस पटोले, ठाकरे यांची भेट   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळच्या’बीआयटीचाळीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50, 51 मध्ये राहत असत. याठिकाणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली. डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे  ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे. त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, खासदार राहूल शेवाळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि उपस्थित होते. ०००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर के परळ स्थित निवास को राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित करेंगे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. 6: डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळ  के दामोदर हॉल के पास बीआईटी चाल स्थित इमारत के दूसरे मंजिल पर रहते थे। वह 1912 से 1934 तक 22 साल यहा रहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि दादर में घोषणा की, कि उनके निवासस्थान को एक राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित किया जाएगा। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के 63वें  महापरिनिर्वाण दिवस पर, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पचक्र अर्पित कर अभिवादन किया। इस मौके पर विधान परिषद की उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटिल, सुभाष देसाई, बालासाहेब थोरात, सांसद राहुल शेवाले, विधायक जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबई की मेयर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि उपस्थित थे।

0000

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई दि6 :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल म्हणाले, आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा प्रयत्न करुया. बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश त्यांना आज अभिवादन करीत आहे. मीसुद्धा त्यांना विनम्र अभिवादन करीत आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. सामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  परळ दामोदर हॉलजवळील, बीआयटी चाळ येथे 22 वर्षे वास्तव्य होते. ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. ००००

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस पर

राज्यपाल,विधानसभा अध्यक्ष,मुख्यमंत्री का अभिवादन

मुंबई दि6:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के63वें  महापरिनिर्वाण दिवस पर,राज्यपाल भगत सिंह कोश्यारी,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चैत्यभूमि में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पचक्र अर्पित कर अभिवादन किया।

इस मौके पर राज्यपाल ने कहा,आइए हम सब मिलकर बाबासाहेब के सपनों का भारत बनाने की कोशिश करें। बाबासाहेब के विचार कई पीढ़ियों के लिए प्रेरणादायक है। उन्होंने संविधान के माध्यम से देश को एकजुट रखने का प्रयास किया। पूरा देश आज उनका अभिवादन कर रहा है। राज्यपाल ने अपनी भावनाओं को शब्दों में व्यक्त किया कि मैं विनम्रतापूर्वक उनका अभिवादन कर रहा हूं।

मुख्यमंत्री ठाकरे ने कहा,बाबासाहेब का जीवन एक जलती हुई आग था। उन्होंने आम लोगों को इंसान के रूप में जीने का अधिकार दिलाने के लिए लड़ाई लड़ी। डॉ. बाबासाहेब आंबेडकर22साल तक परळ  दामोदर हॉल के पास बीआईटी चाल में रहे। उन्होंने कहा कि उनके निवास को राष्ट्रीय स्मारक के रूप में विकसित किया जाएगा।

इस दौरान विधान परिषद के  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,मंत्री जयंत पाटिल,सुभाष देसाई,बालासाहेब थोरात,विधायक आदित्य ठाकरे,मुंबई की मेयर किशोरी  पेडणेकर,महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि मौजूद थे।

राज्यपाल श्री. कोश्यारी,विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले,मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने दादर के श्रीमती कमला मेहता अंधशाला में नेत्रहीन छात्रों को उपहार सामग्री सौंपी। इसके साथ ही डॉ. आंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर आयोजित एक फोटो प्रदर्शनी का दौरा किया।

0000

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात आदरांजली

मुंबई, दि. 6 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन येथील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेच्या उपासभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ‍विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, माजी सदस्य तुकाराम बिडकर, राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भगत, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव सायली कांबळी आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००

Tributes paid to the Great Dr. Babasaheb Ambedkar in the Vidhan Bhavan

Mumbai, 6th: Chairman of Legislative Council Ram Raje Naik-Nimbalkar and Assembly Speaker Nana Patole offered a garland to the photo of the great Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and paid their tributes on his 63rd Mahaparinirvan Day.

Deputy-Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe, Leader of Opposition in Legislative Assembly Devendra Fadnavis, Legislative Assembly Member Mangal Prabhat Lodha, Rahul Narvekar, former Member Tukaram Bidkar, Raj Purohit, Secretary of the Legislature Rajendra Bhagat, Deputy Secretary Vilas Athawale, Secretary of the Chairman Mahendra Kaj, Hour Secretary, and other office-bearers and employees paid their tributes by offering flowers to the photo of Dr. Ambedkar.

0000

दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र शनिवार दि.7 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

मुंबई, दि. 6, राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी-विक्रीची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही  सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  अशा परिस्थितीत सुटट्यांमुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्यास ग्राहक आणि शेतकरी यांची गैरसोय होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांना कांदा, बटाटा, टोमॅटो सुट्टीच्या दिवशीही बाजार समितामध्ये घेऊन येता यावे यासाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरू राहणार आहेत. 

ज्या जिल्ह्यामंध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतमालाचे उत्पादन आणि आवक जास्त आहे अशा जिल्हयातील सर्व बाजार समित्यांनी आणि विशेषतः नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे व मुंबई या जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शासकीय, सार्वजनिक आणि बाजार समित्यांच्या साप्ताहिक सुटट्यांच्या दिवशीही बाजार आवारे चालू ठेवावीत आणि शेतमाल उत्पादक शेतकरी/ व्यापारी आणि ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे पणन संचालनालयाच्या वतीने बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

‘टिस’च्या अहवालानंतर गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. 6 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, (टिस) यांच्याकडून गोवारी समाजाच्या संशोधनात्मक अभ्यासाचे काम सुरु असून त्याचा अहवाल पुढील तीन महिन्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर शासन स्तरावर त्यावर योग्य ती कार्यवाही होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले. विधानसभा अध्यक्ष यांना प्राप्त झालेल्या गोवारी समाजाच्या निवेदनानंतर या संदर्भात समाजाला न्याय मिळावा, यासाठी बैठक आयोजित केली होती. 

गोवारी समाजाच्या अनुसूचित जमातीच्या हक्क अधिकाराच्या मागण्यांबाबत विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात आयोजित बैठकीत श्री. पटोले बोलत होते.

श्री. पटोले म्हणाले, राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीतील गोंडगोवारी या नोंदीऐवजी गोवारी अशी दुरुस्ती करुन गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याबाबत शासनाकडे विविध स्तरातून मागणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गोवारी समाजाबाबत सखोल संशोधन करुन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुढील तीन महिन्यात अहवाल देणार आहे. त्यावर शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लड्डा तसेच आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे संयोजक दामोदर नेवारे आणि सदस्य व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/दि.6.12.2019

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...