रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1590

केरळ विधान मंडळाच्या पर्यावरण समितीने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

मुंबई,दि. 6 : केरळ विधान मंडळाच्या पर्यावरण समितीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवनात भेट घेऊन पर्यावरणासंदर्भात चर्चा केली. यावेळी समितीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार मुल्याकरा रत्नाकरन व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदी,कोस्टल भागातील पर्यावरण समस्या,पूर परिस्थितीनंतरची पर्यावरण समस्या,जैव वैद्यकीय कचरा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.त्याचप्रमाणे केरळमधील पर्यटन क्षेत्र व त्याठिकाणी असलेली पर्यावरण समस्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. सदरील समिती महाराष्ट्रात मुंबई,औरंगाबाद,वर्धा तसेच गुजरात व राजस्थान राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षांनी दिली.

विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्रातील विधानमंडळाच्या कामकाजाची व विविध समित्यांची माहिती उपस्थितांना दिली. या समितीमध्ये आमदार सर्वश्री के.बाबू,ओ.आर.केलू,पी.टी.ए.रहीम तसेच अधिकारी वर्गाचा समावेश आहे. सुरुवातीस विधासनभा अध्यक्षांनी समिती अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्रात सर्वांचे स्वागत केले. या बैठकीस विधिमंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

000

डॉ.पी.डी.पाटोदकर/वि.सं.अ./6.12.19

‘लोकराज्य’च्या नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ अंकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2019 अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे करण्यात आले. या अंकाचे अतिथी संपादक मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत.

या अंकामध्ये मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा शपथविधी कार्यक्रम,मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय आणि  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 विधानसभा सदस्यांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे विशेष लेखांनी हा अंक सजला आहे. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर विशेष लेखही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे,मुख्य संपादक ब्रिजेश सिंह,प्रबंध संपादक अजय अंबेकर,संपादक सुरेश वांदिले,सहसंपादक कीर्ती पांडे आदी उपस्थित होते.

ग्रंथालयांना समान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 6 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नूतनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावरून उपलब्ध (download) करून या योजनेअंतर्गत अर्ज करावा असे आवाहन ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

सन 2019-20 साठी 5 वेगवेगळया असमान निधी योजना आहेत.

1.ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसाम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य

 2.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी र्थसहाय्य

3.राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा

4.प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य

5.बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य अशा पाच प्रमुख असमान निधी योजना आहेत.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचेwww.rrrlf.nic.in  हे संकेतस्थळ पाहावे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव (विहित नमुद पद्धतीत)आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 20 डिसेंबर 2019 पर्यंत पोहोचतील अशा  बेताने पाठविणे आवश्यक असल्याचे ग्रंथालय संचालक यांनी कळविले आहे.

२७९ फुलपाखरांच्या प्रजातींचे वन विभागाने केले मराठीत ‘बारसे’

मुंबई,दि.:‘नीलवंत’हे नाव तुम्हास ठाऊक आहे का?निलवंत हे ब्ल्युमॉरमॉन या राज्य फुलपाखराच्या प्रजातीला दिलेले मराठी नाव असून हे नामकरण महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

देशात आढळून येणाऱ्या१५००आणि महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या२७९ फुलपाखरांची नावे इंग्रजीत आहेत. ही नावे मराठीत का असू नयेत असा विचार करून श्री. बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलपाखरांच्या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले. यातूनच त्रिमंडळ,तरंग,मनमौजी,यामिनी,रुईकर,रत्नमाला,तलवार,पुच्छ,गडद सरदार,भटक्या,मयुरेश,नायक  यासारखी आकर्षक मराठी नावे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींना देण्यात आली. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.

मराठी नावांमध्ये फुलपाखराचे रुप दडलेले असले पाहिजे,ते लोकांना आपले वाटले पाहिजे. या सगळ्या बाबींचा त्यात विचार करण्यात आला. मग पाच प्रकारात फुलपाखरांची नावे मराठीत आणण्यात आली. यात फुलपाखराचा रंग,रुप,पंख याचा विचार झाला. त्यातून त्रिमंडल,तरंगसारखी नावे पुढे आली. नामकरण करण्यासाठी फुलपाखरांच्या सवयी,त्यांचे पंख उघडण्याची,मिटण्याची लकब,बसण्याची पद्धत याचा विचार करण्यात आला. त्यातून “मनमौजी” सारखे नाव ठेवले गेले.  फुलपाखरांना मराठी नाव देण्यासाठी ज्या वनस्पतींचा त्यांना खाद्य म्हणून उपयोग होतो त्यातून यामिनी,रुईकर ही नावे पुढे आली. गवतावर बसणाऱ्या फुलपाखराचे नाव तृणासूर करण्यात आले. फुलपाखरांच्या अधिवासाचाही यात विचार करून त्यातून “रत्नमाला” हे नाव ठेवण्यात आले.

निलवंती,तलवार,पुच्छख, गडद सरदार,भटक्या,मयुरेश,नायक यासारखी नावे फुलपाखरांच्या दिसण्यावरून ठेवण्यात आली. यामफ्लाय फुलपाखरांची खाद्य वनस्पती आहे म्हणून त्याचे नाव “यामिनी” ठेवण्यात आले. ग्रास डेमन या फुलपाखराचे नाव “तृणासूर” असे भाषांतरीत झाले. ब्‌ल्यूओकलिफ नावाच्या फुलपाखराचे “नीलपर्ण” नावाने बारसे झाले.

जैवविविधता बोर्डाच्या मंडळींनी फक्त फुलपाखराचेच मराठीत नामकरण केले असे नाही तर त्यांनी त्यांचे कुळ ही मराठीत आणले. म्हणजेच निम्फालिडी या फुलपाखरू कुळाचे नाव कुंचलपाद असे झाले. हेस्पिरिडीचे “चपळ” कुळ झाले तर लायसनेडीचे “नीळकुळ” झाले. अशाच पद्धतीने पुच्छ,मुग्धपंखी,कुळ अस्तित्त्वात आले आहे. राज्यातील फुलपाखरे आणि त्यांची मराठी नावे याची माहिती देणारे पुस्तक उत्तम छायाचित्रांसह वन विभागाने नुकतेच प्रकाशित केले आहे.

000

२७९ तितली प्रजातियों की वन विभाग ने मराठी में बनाई “बारसे”

मुंबई दि. 5: “क्या आप नीलवंत नाम को जानते हैं?” नीलवंत, तितली की प्रजाति को दिया जाने वाला मराठी नाम है, जो कि  ब्ल्युमॉरमॉन का एक राज्य है, जिसका नाम महाराष्ट्र राज्य जैव विविधता बोर्ड के  अध्यक्ष विलास बर्डेकर  और उनके सहयोगियों के नाम पर रखा गया है।

देश में पाई जाने वाली 1500 तितलियों के नाम और महाराष्ट्र में पाई जाने वाली 279 तितलियों के नाम अंग्रेजी में हैं। यह सोचकर कि ये नाम मराठी में क्यों नहीं होने चाहिए, श्री. बर्डेकर और उनके सहयोगियों ने तितली के अंग्रेजी नाम का मराठी में अनुवाद किया।  इससे त्रिमंडळ, तरंग, मनमौजी, यामिनी, रुईकर, रत्नमाला, तलवार, पुच्छ, गडद सरदार, भटक्या, मयुरेश, नायक जैसे आकर्षक मराठी नाम तितलियों की विभिन्न प्रजातियों को दिए गए थे। यह देश में इस तरह का पहला प्रयोग है।

तितलियों को मराठी नामों के रूप में संलग्न किया जाना चाहिए, उन्हें लोगों को महसूस कराना चाहिए इन सभी बातों पर विचार किया गया। फिर पांच किस्मों में तितलियों के नाम मराठी में पेश किए गए।  इसने तितलियों के रंग, रूप, पंख को ध्यान में रखा।  इससे त्रिकोण, तरंग जैसे नाम आए। नामकरण के लिए तितलियों के आदतें, उनके पंख खोलने, उन्मूलन, बैठने के पैटर्न पर विचार किया गया। इससे “मौमोजी” जैसा नाम दिया गया। तितली को मराठी नाम देने के लिए यामिनी, रुइकर नाम उन पौधों से आया है जो भोजन के रूप में उपयोग करते हैं। घास पर बैठने वाली तितली का नाम तृणासूर रखा गया। तितलियों के निवास स्थान को ध्यान में रखते हुए, इसे “रत्नमाला” नाम दिया गया।

तितलियों की उपस्थिति से नीलवंती, तलवार, पुच्छख्‍गडद सरदार, भटक्या, मयुरेश, नायक जैसे नाम रखे गए। यामफ्लाय एक तितली खाद्य संयंत्र है, इसलिए इसका नाम “यामिनी” रखा गया है।  ग्रास डेमन, इस तितली का नाम तृणासूर” के रूप में अनुवादित किया गया।  ब्‌ल्यूओकलिफ तितलियों को नीलपर्ण” के नाम पर रखा गया।

जैव विविधता बोर्ड ने न केवल तितली का नाम मराठी में रखा, बल्कि उनके कबीले को मराठी में भी लाए। अर्थात,  निम्फालिडी तितली के कबीले का नाम कुंचलपाद हुआ। हेस्पिरिडीचे का “चपळ” कबीला बन गया, जबकि  लायसनेडी का “नीळकुळ” हो गया। इसी तरह से पुच्छ, मुग्धपंखी, कबीले अस्तित्व में आया है। वन विभाग ने हाल ही में राज्य में तितलियों और उनके मराठी नामों का विवरण देते हुए एक पुस्तक प्रकाशित की है।

०००००

Forest Department baptized 279 butterfly species

Mumbai, date 5th:  “Do you know the name Nilwant?” Nilwant is the Marathi name given to the Bluemarmon species of state butterfly.  President of Maharashtra State Biodiversity Board Vilas Bardekar and his colleagues gave this Marathi name.

The names of the 1500 butterflies found in the country and the 279 butterflies found in Maharashtra are in English. Thinking why these names should not be in Marathi, Shri. Bardekar and his colleagues baptized butterfly with Marathi names. Trimandal, Tarang, Manmouji, Yamini, Ruikar, Ratnamala, Talwar, Puccha, Gadad Sardar, Bhatkya, Mayuresh, and Nayak, etc. attractive Marathi names were given to different species of butterflies. This is the first of its kind of experiment in the country.

Marathi names should be symbolic to butterfly, people should find themselves close with the names, etc. things were considered while renaming butterflies. Then the names of the butterflies were introduced into Marathi in five categories. The colour, appearance, and shape of wings were taken into consideration while naming Butterflies in Marathi. Names such as Trimandal and Tarang were given with the same thought. Habits of butterflies, opening and closing style of their wings, seating patterns, etc., aspects were considered while naming. With this thought, Manmouji’ name was given. The names like Yamini, Ruikar came from the plants that are used to feed the butterfly. The butterfly hopping on the grass was named ‘Trinasur’. Considering the habitat of butterflies, it was named “Ratnamala.

Names like Nilanwati, Talwar, Puccha, Gadad Sardar, Bhatkya, Mayuresh, Nayak, etc. names were given from the appearance of butterflies. Yamfly is a butterfly’s food plant; hence, it is named as “Yamini. Grass daemon butterfly is renamed in Marathi as “Trinasur. Blue Oakleaf butterfly is named as Nilparn.

The Biodiversity Board not only named butterflies in Marathi but they also named their species in Marathi.  Nymphalid butterfly species is named as Kunchalpad; Hesperiidae as Chapal and Lichenidae as Nilkul. Puccha, Mugdhpankhi, and Kul were named in the same way.  This is how the tail, fascinated, clan has come into being. The Forest Department has recently published a book with photographs detailing the butterflies in the state and their Marathi names.

००० 

‘मिशन इंद्रधनुष’ मोहिमेचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश

78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरणाचे नियोजन 

मुंबई, दि. 5 : राज्यात मिशन इंद्रधनुष विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 25 जिल्हे आणि 20 महानगरपालिका क्षेत्रातील 78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना, सामाजिक नेत्यांना सोबत घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले.

या लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा,चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पालघर-वसई-विरार, रायगड-पनवेल, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, वर्धा, वाशिम, नाशिक-मालेगाव, ठाणे-कल्याण डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, बृहन्मुंबई या जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे.

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांमध्ये आठवडाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेकरिता निवडलेल्या जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके आणि गर्भवती महिलांची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेला लसीकरणाचे उद्दिष्ट दिले असून त्याच्या 100टक्के पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, लसीकरण झालेल्या ठिकाणी अचानक भेटी देऊन लसीकरणाची खात्री करावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

ज्या भागात ऊसतोड अथवा अन्य कामांसाठी स्थलांतर झाले आहे. अशा स्थलांतरीत बालक आणि महिलांची यादी आरोग्य विभागाला द्यावी जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून त्याठिकाणी जाऊन लसीकरण पूर्ण केले जाईल. काही भागात लसीकरणाला विरोध आहे तेथे समुदायाला विश्वासात घेऊन तसेच समाजातील मान्यवरांची मदत घेऊन लसीकरण करुन घेण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय मुखर्जी, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य आयुक्त अनुपकूमार यादव, एकात्मिक बालविकास प्रकल्प संचालक श्रीमती इंद्रा मालो जैन, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते.

००००

मिशन इंद्रधनुष मुहिम को 100 प्रतिशत उद्देश्य हो प्राप्त

78 हजार 64 बच्चों और 11 हजार 977 गर्भवती महिलाओं के लिए टीकाकरण की योजना मुख्य सचिव अजय मेहता

मुंबई, दि. 5: राज्य में मिशन इंद्रधनुष विशेष अभियान का दूसरा चरण शुरू हो गया है और 25 जिलों और 20 महानगरपालिका क्षेत्रों में 78 हजार 64 बच्चे और 11 हजार 977 गर्भवती महिलाओं का टीकाकरण किया जाएगा। अभियान के 100% उद्देश्य को प्राप्त करने के लिए, जिला कलेक्टर, नगर आयुक्त और जिला कार्यकारी परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारियों को ध्यान देना चाहिए। वहीं, मुख्य सचिव अजय मेहता ने निर्देश दिया कि समाज के विभिन्न वर्गों और सामाजिक नेताओं को साथ लेकर अभियान को सफल बनाया जाना चाहिए। यह टीकाकरण अभियान की समीक्षा के लिए मुख्य सचिव की अध्यक्षता वाली संचालन समिति की बैठक में बोल रहे थे। मुख्य सचिव ने वीडियो कांफ्रेंसिंग के जरिए जिलाधिकारी से बातचीत की।

अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, चंद्रपुर, गोंदिया, हिंगोली, जलगाँव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पालघर-वसई-विरार, रायगढ़-पनवेल, रत्नागिरी, सतारा, वर्धा, सोलापुर,  वाशिम, नासिक-मालेगाँव, ठाणे-कल्याण डोंबिवली, मीरा-भयंदर, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, बृहन्मुंबई इन जिलों और महानगरपालिका क्षेत्रों में चल रहे अभियान में 0 से 2 वर्ष तक के बच्चों और गर्भवती महिलाओं को टीका लगाया जाएगा।

अभियान चार सप्ताह – दिसंबर, जनवरी, फरवरी और मार्च के लिए आयोजित किया जाएगा।  अभियान के लिए चयनित जिलों का सर्वेक्षण किया गया है, और टीकाकरण से वंचित बच्चों और गर्भवती महिलाओं की संख्या पर आंकड़े निर्धारित किए गए हैं।  मुख्य सचिव ने निर्देश दिया कि प्रत्येक जिले और नगरपालिका को टीके के 100% एकत्र करने के उद्देश्य से टीका लगाया जाना चाहिए, यह सुनिश्चित करने के लिए कि टीकाकरण वाले स्थान पर अचानक दौरा करके जिला कलेक्टरों को टीकाकरण सुनिश्चित किया जाना चाहिए।

ऐसे क्षेत्र जहां लोग सिंचाई या अन्य काम के लिए पलायन कर गए हैं।  ऐसे प्रवासी बच्चों और महिलाओं की सूची स्वास्थ्य विभाग को दी जानी चाहिए ताकि वे उस जगह से गुजर सकें और टीकाकरण पूरा कर सकें।  मुख्य सचिव ने यह भी कहा कि कुछ क्षेत्रों में टीकाकरण का विरोध किया जाता है वहां समुदाय के गणमान्य लोगों की मदद से समुदाय को विश्वास में लेकर जिला अधिकारियों को कुछ क्षेत्रों में टीकाकरण कराने का प्रयास करना चाहिए।

इस बैठक में स्वास्थ्य विभाग के प्रमुख सचिव डॉ. प्रदीप व्यास, गृह विभाग के प्रधान सचिव, अमिताभ गुप्ता,  वैद्यकीय शिक्षण विभाग के प्रमुख सचिव संजय मुखर्जी, ग्रामीण विकास विभाग के सचिव, असीम गुप्ता, सूचना एवं जनसंपर्क विभाग के सचिव, बृजेश सिंह, स्वास्थ्य आयुक्त अनूप कुमार यादव, एकीकृत बाल विकास परियोजना की निदेशक श्रीमती इंद्रा मालो जैन, स्वास्थ्य निदेशक डॉ. अर्चना पाटिल, डाॅ. साधना तायडे उपस्थित थीं।

००००

Mission Rainbow should be 100% successful

Vaccination  planned for 78 thousand 64 children and 11 thousand 977 pregnant women

– Chief Secretary Ajay Mehta

Mumbai, The. 5: The second phase of Mission Rainbow Special Campaign has begun in the state and 78 thousand 64 children and 11 thousand 977 pregnant women from 25 districts and 20 municipalities will be vaccinated. Chief Secretary Ajay Mehta directed that the District Collector, Municipal Commissioner and Chief Executive officers of Zilla Parishad should take a special interest in the cause to achieve the 100% objective of the campaign.  He also said that this mission should be made successful in taking the help of various social units and social leaders.

A meeting of the Sukanu committee was held under the Presidency of Chief Secretary to review the vaccination campaign. He spoke at the meeting. The Chief Secretary interacted with the District Collector through video conferencing.

This vaccination campaign is being implemented in district and municipality area of Ahmednagar, Aurangabad, Akola, Amravati, Beed, Buldhana, Chandrapur, Gondia, Hingoli, Jalgaon, Jalna, Latur, Nandurbar, Osmanabad, Parbhani, Palghar-Vasai-Virar, Raigad Panvel, Ratnagiri, Satara, Solapur, Sindh, Nashik-Malegaon, Thane-Kalyan Dombivali, Mira-Bhayander, Bhiwandi, Navi Mumbai, Ulhasnagar and Brihan Mumbai.  Children in the 0-2 age group and pregnant women will be vaccinated under this campaign.

The campaign will continue for a week in four months – December, January, February, and March. The selected districts have been surveyed for the campaign and statistics on the number of children and pregnant women deprived of vaccination have been determined. Every district and municipality has been given a vaccination aim to achieve and the Chief Secretary directed that District Collectors should monitor the campaign and visit the campaign location unannounced for its 100% success.

Areas- where the people have migrated for sugarcane cutting or other work, a list of such immigrated children and women, should be provided to the health department so that they can go to the place and complete the vaccination. The Chief Secretary also said that the District Collector should try to achieve vaccination targets by taking the help of eminent personalities in the society and winning the trust of the society where there is opposition to vaccination. 

Principal Secretary of Health Department Dr. Pradeep Vyas, Principal Secretary of Home Department Amitabh Gupta, Principal Secretary of Medical Education Department Sanjay Mukherjee, Secretary of Rural Development Department Asim Gupta, Secretary of Information and Public Relations Department Brijesh Singh, Health Commissioner Anupkumar Yadav and Director of Integrated Child Development Project Smt. Indra Malo Jain, Health Director Archana Patil, Dr. Sadhana Taide were present in the meeting.

०००० 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उद्योग संचालनालयाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7. 30 वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

देशाच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान, कामगार मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य त्याचबरोबर औरंगाबादमध्ये झालेली तीन दिवसीय जागतिक बौध्द धम्म परिषदेची माहिती डॉ. कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज होण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ

अहमदनगर, दि. ५ : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा एकदा त्या संपन्न वारशानुसार अनुकरण करण्याची गरज आहे. कृषी, विज्ञान क्षेत्रात पुन्हा भरारी घेऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी नव्या पिढीने सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी कृषि पदवीधरांनी दृढ निश्चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.दिलीप पवार याचबरोबर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रकाश गजभिये,  तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनिता पाटील, डॉ.पंकजकुमार महाले, दत्तात्रय पानसरे, विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव पी.टी. सुर्यवंशी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आपल्या भारताचा इतिहास हा खूप समृद्ध आहे. भारतातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद यांनी जगात भारताचा गौरव वाढविला. आज सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. योगाची संकल्पना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमुल्य अशी भेट आहे. गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या भारत देशाला अजून पुढे न्यायचे असेल तर आपल्या सर्वांना नाविन्यपूर्ण असे संशोधन करावे लागेल. हा देश शेतकऱ्यांचा आणि कृषि पदवीधरांचा आहे. कृषि पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ५२ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३०८ विद्यार्थ्यांना पद्व्युत्तर पदवी व ४७०७ विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण ५०६७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. सन २०१८-१९ मध्ये बी.एस्सी. (कृषि) पदवीत प्रथम आलेल्या मोहीनी अशोक जगताप, बी.एस्सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेल्या गायत्री पांडुरंग चव्हाण, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजीत राजेंद्र जाधव यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे आठ वाण, एक कृषि यंत्र व औजारे आणि एकूण  तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकऱ्यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत. विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध पिकांचे 263 वाण, 36 कृषि यंत्रे व अवजारे आणि 1518 तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत अद्ययावत कृषि हवामान व जल व्यवस्थापन हा रु. 19.90 कोटीचा प्रकल्प सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीकरीता मंजूर केलेला असून त्या अंतर्गत पदव्युत्तर आचार्य पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पदवीप्रदान समारंभापूर्वी विद्यापीठात आगमन झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट देऊन विविध बाबींची माहिती घेतली.

दरम्यान, सकाळी मुंबईहून कृषी विद्यापीठाच्या हेलीपॅडवर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी त्यांचे स्वागत केले.

समारंभाला विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, माजी कुलगुरू डॉ.किसनराव लवांडे, डॉ.वेंकट मायंदे, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कृषि संचालक कैलास कोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषी भूषण सुरसिंग पवार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बापुसाहेब भाकरे आणि डॉ.आनंद सोळंके यांनी केले.

३४ ग्रामपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान

मुंबई, दि. 5 (रा.नि.आ.) : राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री.मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2, आणि सातारा- 3. एकूण- 34.

महाराष्ट्राला दोन ‘फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार’

नवी दिल्ली, दि. 5 : चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार – 2019 चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

या समारंभात देशभरातील एकूण 35 परिचारिका, परिचारिका सहाय्यक आणि महिला आरोग्य सहायकांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. केरळ मधील कोझीकोड येथील परिचारिका लिनी साजीश यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला, त्यांच्या पतीने हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक आशा गजरे यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिचारिका छाया पाटील या गेल्या 29 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये 17 वर्ष सेवा दिली तर 10 वर्ष त्या शहरी भागातील आरोग्य सेवेते कार्यरत होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलप्रभावीत भागांमध्ये पायी तर कधी सायकलवर प्रवास करून त्यांनी लसीकरण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. श्रीमती पाटील यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रम, मलेरिया लसीकरण, रूग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी प्रोत्साहन देणे आदी केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेवून उल्लेखनीय काम केले आहे. वर्ष 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या लसीकरण अभियानात श्रीमती पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. तसेच, 1991-92 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात श्रीमती पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर प्राथमिक केंद्रातील आरोग्य सहाय्यक आशा गजरे या गेल्या 33 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सर्वाधिक 28 वर्ष शहरी भागात तर 5 वर्षे आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रदान केली. श्रीमती गजरे यांनी कुष्ठरोग नियत्रंण कार्यक्रम, क्षयरोग, मनोविकार, संसर्गजन्य रोग, लसीकरण आदी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी कौशल्य विकासासाठी विविध प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी एमएमआर (गालगुंड, गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रमाद्वारे) शून्य टक्क्यांवर आणला तर नवजात बालकांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणले. श्रीमती गजरे यांचे आरोग्य सेवेप्रती समर्पण व उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्टार्टअपस्‌ना पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्टचा उपक्रम

मुंबई, दि. 5 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहकार्याने ‘मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअपस्’ ने 17 डिसेंबर, 2019 रोजी पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे ‘हायवे टू अ हंड्रेड युनिकॉर्न’ हा उपक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात स्टार्टअप असणारे उद्योजक आणि व्यावसायिक सहभागी होऊ शकतील. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना अज़्यूर, मशीन लर्निंग व अर्टिफिशियल इंटेलिजेंस याबाबत मार्गदर्शन मिळेल. युनिकॉर्न बनण्यासाठी इच्छुक असलेल्या स्टार्टअपना https://aka.ms/H2100-pune वेबसाईटवर अर्ज करता येतील.

नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्टार्टअपना मदत करण्याकरिता मायक्रोसॉफ्टने ‘हायवे टू अ हंड्रेड युनिकॉर्न’ ही कार्यक्रम मालिका सुरु केली आहे. यामुळे स्टार्टअपसना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील स्टार्टअपनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी केले आहे. महाराष्ट्र हे देशात स्टार्टअपबाबत आघाडीवर आहे.

मायक्रोसॉफ्टचा हा उपक्रम राज्यातील स्टार्टअपना चांगली संधी असल्याचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्ट उपक्रमाच्या भारताच्या प्रमुख श्रीमती लतिका पै यांनी या उपक्रमाद्वारे नवनिर्मिती करणाऱ्या स्टार्टअप उपक्रमाद्वारे भारतात पहिल्यांदाच संवाद साधला जात असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...