शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1593

जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई, दि. 2 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दि. 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत झालेल्या निवडणुकीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपीलमध्ये निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना जातवैधता प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरीता जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई या कार्यालयाकडे जातीच्या दाव्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र समिती मुंबई उपनगर यांनी केले आहे.

महापरिनिर्वाणदिनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण

मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाणदिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या समाज जीवनावर प्रकाश टाकणारा’डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ‘ (Dr.Babasaheb Ambedkar -The Untold Truth) या चित्रपटाचे प्रसारण दूरदर्शन केंद्रातर्फे सह्याद्री वाहिनीवर करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण ६ डिसेंबर रोजी दुपारी १.३०वाजता करण्यात येणार असल्याची माहिती दूरदर्शनचे सहायक संचालक संदीप सूद यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी ८ डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताहाचे आयोजन

मुंबई, दि. 2 : माता व बालमृत्यू दरात घट होण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ राज्यातील 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांनी घेतला असून त्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरीता दि. 8 डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

        

अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी जावे लागते. प्रसुतीनंतरही त्यांना मजुरी करावी लागते. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेता दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांसाठी  प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत शासनाने अधिसूचित केलेल्या आरोग्य संस्थेत नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेला तीन टप्प्यांमध्ये एकूण5 हजार रुपयांची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा केली जाते.

राज्यात आतापर्यंत12 लाख 87 हजार 84 एवढे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरिता आजपासून ते दि. 8 डिसेंबर 2019 पर्यंत विशेष सप्ताह आयोजित केला असून आरोग्यदायी राष्ट्र उभारण्याच्या दिशेने सुरक्षित जननी, विकसित धारिणीहे  ब्रीद वाक्य घेऊन लाभार्थ्यांची नोंदणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका यांच्याकडे आवश्यक ते कागदपत्र देऊन नोंदणी करायची आहे, असे आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी सांगितले.

लाभार्थीचे तसेच तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक अथवा टपाल कार्यालयातील खात्याचा तपशील, माता बालसंगोपन कार्ड आणि बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

००००

अजय जाधव/वि.सं.अ./2.12.19

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७ डिसेंबरला मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई, दि. 2 : पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या आठ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 डिसेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 11 डिसेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री. मदान यांनी सांगितले, या निवडणुकांकरिता 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 7 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 11 डिसेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 16 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यादेखील त्याच दिवशी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

०-०-०

(Jagdish More, SEC)

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘फास्टॅग’ या विषयावर एम. के. वाठोरे यांची मुलाखत

दिलखुलास कार्यक्रमात बुधवारी, गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमात  डिजिटल व्यवहारांना चालना देणारी फास्टॅग पद्धतीया विषयावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक एम. के. वाठोरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ३डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी७.३०वाजता प्रक्षेपित होईल. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.४ आणि गुरुवार दि. ५डिसेंबर 2019 रोजी सकाळी७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी प्राधिकरणाचे सुरू असलेले प्रकल्प, रस्ते बांधणीमध्ये पीपीपी मॉडेल, केंद्र सरकारचे वन नेशन वन टॅग धोरण, पंधरा डिसेंबरपासून  टोल फास्टॅग द्वारे स्वीकारला जाणार असून, फास्टॅग नेमके काय, फास्टॅगची कार्यपद्धती, फास्टॅग कोठे मिळेल आणि काय कागदपत्रे लागतील, फास्टॅग चे नेमके फायदे, फास्टॅग रिचार्ज कसे करायचे आदी विषयांची माहिती श्री. वाठोरे यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

             

    

नवी दिल्ली,2 :  महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात295कोटी13लाख2हजार500रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण1हजार221कोटी65लाख89हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना295कोटी13लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण258कोटी3लाख47हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 37कोटी  9लाख55हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण1हजार10कोटी42लाख  8  हजार400रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 211कोटी23लाख81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२५९/  दिनांक2/12/2019    

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’

नवी दिल्ली, दि.2 :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’दिले आहे.यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने‘पर्यावरण अभ्यास संस्था,डेन्मार्क’या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला.एकूण4उत्कृष्ट मानकांच्या33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट13समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो.लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते.याच समुद्र किनाऱ्याची‘पर्यावरण अभ्यास संस्था,डेन्मार्क’ने एकूण4उत्कृष्ट मानकांच्या  33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली.

पर्यावरण शिक्षण आणि माहिती,आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता,पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ही  माहिती दिली.

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२६०/  दिनांक2/12/2019    

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबई, दि. : देशविदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देशविदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरिझम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरिझम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरु करता येईल का याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात एखादे योग्य ठिकाण शोधून तिथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन थीम बेस्डसंग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सिंधुदुर्गमधील सबमरिन पर्यटन प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

रायगडाचा सर्वांगीण विकास

रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या ६०६ कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे. या निधीतून रायगड किल्ला आणि परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल. यातून देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करुन त्यांना शिवरायांचा इतिहास दाखविण्याबरोबरच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.०२.१२.२०१९

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि. 1 : 14 व्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना फाल्गुनराव पटोले यांची निवड करण्यात आली आहे.

किसन कथोरे यांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, डॉ.तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे यांनी श्री. पटोले यांच्या नावाला अनुमोदन दिले.

००००

विधानसभा अध्यक्ष पद पर नाना पटोले का निर्विरोध चयन

मुंबई; १ : नाना फाल्गुनराव पटोले को 14 वीं विधानसभा के अध्यक्ष के रूप में चुना गया है।  किसन कथोरे द्वारा अपना नाम वापस लिये जाने से यह चयन निर्विरोध हुआ। मंत्री श्री एकनाथ शिंदे, सदस्य श्री हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, दत्तात्रय भरणे ने श्री पटोले के नाम का अनुमोदन किया।

००००

Nana Patole Elected Unopposed as Speaker of the Assembly

Mumbai ; 1 : Nana Patole has been elected as the Speaker of 14th Maharashtra Legislative Assembly. He was elected unopposed after Kisan Kathore withdrew his nomination. Minister Eknath Shinde, Member Shri Hassan Mushrif, Tanaji Sawant, Dattatray Bharne approved Shree Patole’s name.

००००

विधानसभेचा गौरव राखण्याचा प्रयत्न करेन- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नवनिर्वाचित अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई, दि. 1 : संसदीय लोकशाहीत विधानसभेची गौरवास्पद परंपरा आहे. या परंपरेचा गौरव राखण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत सांगितले.

अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सभागृहाने केलेल्या अभिनंदनाला उत्तर देताना श्री. पटोले बोलत होते. 14 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

श्री.पटोले म्हणाले, येथे Discuss, Debate, Dialogue & Do Not Disturb या चार D वर आधारित कामकाज करत असताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यातील वंचित घटकांना न्याय देण्याची माझी भूमिका राहील, शेतकरी तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला सभागृहाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न राहील.

कोणावरही अन्याय होऊ देऊ नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याची विधानसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च स्थानी आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका अध्यक्षांनी घ्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. श्री. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या श्री.पटोले यांचा स्वभाव हा बंडखोर आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपलं मत मांडत असताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा नेता आहे. त्यांनी समाजातील विविध घटकांच्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही सांभाळून घेत योग्यवेळी समज देवून कामकाज चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

विरोधी पक्षाकडूनही सहकार्याची अपेक्षा- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकहितांच्या बाबींवर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडले जात असताना अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. श्री.पटोले यांनी दोन्ही बाजूला काम केलेले असल्याने दोन्ही बाजूच्या आशा आणि अपेक्षा त्यांना माहिती आहे. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला फायदा होईल. आतापर्यंत या पदावर काम केलेल्या सर्व अध्यक्षांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. या पदाची गरिमा ते राखतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सदस्य सर्वश्री अजित पवार, अशोक चव्हाण, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, हितेंद्र ठाकूर, अबु आझमी, बच्चू कडू, श्रीमती मनीषा चौधरी, जितेंद्र आव्हाड, संजय कुटे, आशिष जयस्वाल आणि ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अभिनंदनपर भाषण केले.

0000

नवनिर्वाचित अध्यक्ष का मुख्यमंत्री ने किया स्वागत

विधानसभा का गौरव बनाए रखने के लिए प्रयास करूंगा– विधानसभा अध्यक्ष नाना पटोले 

मुंबई दि. 1 : संसदीय लोकशाही में विधानसभा की गौरवास्पद परंपरा रही है। इस परंपरा को बनाए रखने में मैं पूरी तरह से प्रयास करूंगा, यह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ने आज विधानसभा में कहा। अध्यक्ष के रूप में चयन होने के बाद सभागृह में हुए अभिनंदन पर अपनी भावना व्यक्त करते हुए वे बोल रहे थे। 14 वें  विधानसभा के अध्यक्ष पद पर उनका निर्विरोध चयन होने पर उन्होंने कृतज्ञता व्यक्त की।

श्री. पटोले ने कहा कि यहाँ पर Discuss, Debate, Dialogue & Do Not Disturb इन चार D पर आधारित कामकाज करते हुए आप सभी का सहयोग आवश्यक है। राज्य के वंचित वर्गों को न्याय देने में मेरी भूमिका रहेगी। किसान एवं राज्य के प्रत्येक वर्ग को सभागृह के माध्यम से न्याय देने के लिए मैं हमेशा प्रयासरत रहूँगा।

किसी पर भी अन्याय न हो– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य की विधानसभा यह लोकशाही में उच्चतम स्थान पर है। विधानसभा अध्यक्ष के रुप में  काम करते समय किसी पर भी अन्याय न हो, इस तरह की भूमिका अध्यक्ष की होगी, यह आशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज यहाँ पर व्यक्त की।  श्री. नाना पटोले की विधानसभा अध्यक्ष के रूप में नियुक्ति होने पर मुख्यमंत्री ने उनका अभिनंदन किया।

मुख्यमंत्री श्री.ठाकरे ने कहा कि भंडारा जिले में एक किसान परिवार से आए श्री.पटोले का स्वभाव  बंडखोर और अन्याय पर आवाज उठानेवाला है। अपना विचार रखते हुए किसी की भी पर्वा न करते हुए बहुत साहस एवं धैर्य से आगे बढ़नेवाले नेता में वे है। उन्होंने समाज के विविध वर्गों के अधिकार एवं उनके हक के लिए समय-समय पर आवाज उठाया है। विधानसभा अध्यक्ष के रुप में सत्ताधारी और विरोधी पक्ष दोनों को भी संभालते हुए उचित समय पर मार्गदर्शन करते हुए कामकाज चलाने का ज़िम्मेदारी उन पर होगी।

अध्यक्ष  से सहयोग की अपेक्षा– विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस 

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि जनहित को लेकर अपनी बात रखते हुए अध्यक्ष की ओर सहयोग की अपेक्षा करूंगा । श्री. पटोले ने दोनों तरफ काम किया है, इसलिए दोनों तरफ की आशा और अपेक्षा उन्हें पता है और उनके अनुभव का सभागृह को फायदा होगा। अब तक इस पद पर काम किए हुए सभी अध्यक्षों ने उत्तम कार्य किया है। वे इस पद गरिमा को बनाए रखेंगे, यह विश्वास उन्होंने इस दौरान व्यक्त किया।

विधानसभा अध्यक्ष के चयन के बाद  मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटिल, बालासाहेब थोरात, सदस्य सर्वश्री अजित पवार, अशोक चव्हाण, पूर्व अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबल, हितेंद्र ठाकूर, अबु आझमी, बच्चू कडू, श्रीमती मनिषा चौधरी, जितेंद्र आव्हाड, संजय कुटे, आशिष जयस्वाल और ॲड श्रीमती यशोमती ठाकूर ने अभिनंदन पर भाषण किया।

0000

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...