शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1594

अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.30 :जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सांताक्रूझ-कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरुपात अतिरिक्त सहाय्यक अधीक्षिका हे पद भरण्यात येणार आहे. महिलांसाठी असलेले हे पद कंत्राटी पद्धतीचे असून या पदासाठी23डिसेंबर2019पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता व इतर अटी पुढीलप्रमाणे आहेत.1.अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य), 2.शिक्षण- एस.एस.सी. पास, 3.एमएससीआयटी उत्तीर्ण व टंकलेखन (टायपिंग) येणाऱ्यास प्राधान्य, 4.वयोमर्यादा-30ते50वर्षे, 5.मानधन रु.17,823/-दरमहा एवढा देण्यात येणार आहे.

अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक23डिसेंबर2019असून मुलाखतीची तारीख– 24डिसेंबर2019  अशी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कमांडर मिनल मधू पाटील यांनी केले आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ता – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,मुंबई उपनगर, 9वा माळा प्रशासकीय इमारत,शासकीय वसाहत,बांद्रा पूर्व,मुंबई -400 051,दूरध्वनी– 26552172

भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 30 :  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन,समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.

‘लीडरशिप,पोलिटिक्स गव्हर्नन्स’हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या अभ्यासक्रमाचे संचालक देवेंद्र पै तसेच विविध राज्यातील विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

0000

Student-Delegates from Indian Institute of Democratic Leadership meet Governor

Mumbai, Dt. 30 :A group of student delegates from the Indian Institute of Democratic Leaderhip met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Saturday (30th Nov).

The delegates had an informal discussion with the Governor on issues of good governance and social service.

The students are undergoing a one year Post graduate programme in Leadership, Politics and Governance at the Indian Institute of Democratic Leadership, an initiative of the Rambhau Mhalgi Prabodhini.

0000

कुटुंबसंस्था टिकविण्यामध्ये आईची भूमिका महत्त्वाची : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 30 : कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी तसेच मुलांमध्ये संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी आईची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. शांतीपूर्ण समाज निर्मितीसाठी कुटुंब आनंदी असणे गरजेचे आहे,असेही त्यांनी सांगितले. 

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मातृ परिषदेच्या सांगता समारोहाला उपस्थित राहण्यासाठी मुंबई भेटीवर आलेल्या महिला प्रतिनिधींनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांसह बल्गारीया,जॉर्जिया,जर्मनी,इराण,कझाकस्थान,नेपाल व उझबेकिस्तान या देशांसह भारतातील महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.  ००००

Role of Mother crucial in keeping family together: Governor

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today said that the role of mother is most critical in keeping the institution of family intact and in imparting moral and ethical values to children.  Stating that Indian culture has given higest importance to mother, he said, a happy family is a prerequisite for a peaceful society.

The Governor was interacting with a group of women delegates from various countries at Raj Bhavan, Mumbai on Saturday (30th Nov).

The women delegates were in Mumbai to attend the valedictory session of the Conference on Global Mothers hosted by SNDT Women’s University.

Vice Chancellor of SNDT Women’s University Dr Shashikala Wanjari, delegates from Bulgaria, Georgia, Germany, Iran, Kazakhstan, Nepal, Uzbekistan and India were present.

0000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन

मुंबई, दि.29 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नव्या मंत्रिमंडळातील मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आदींसह खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते, डॉ.दीपक सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आदित्य ठाकरे व त्यांचे मावस बंधू वरूण सरदेसाई, आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, शशिकांत खेडेकर, संजय राठोड, विजय शिवतारे, माजी आमदार सर्वश्री जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे, प्रकाश शेंडगे, सरदार तारासिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ००००

CM Uddhav Thackeray paid respect to personages’ portraits

Mumbai, 29 Nov 2019: Chief Minister (CM) Uddhav Thackeray and other cabinet ministers paid floral tribute to the portrait of Chhatrapati Shivaji Maharaj, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and RajaMata Jijau at Mantralaya today.

New Cabinet Ministers include Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat, Nitin Raut etc. along with MP Vinayak Raut, Anil Desai, Former Minister Diwakar Raote, Dr. Deepak Sawant, Former MP Chandrakant Khaire, MLA  Aaditya Thackeray with his sibling  Varun Sardesai, MLA Abdul Sattar, Sanjay Shirsat, Shashikant Khedekar, Sanjay Rathore, Vijay Shivtare, Former MLA Shri Jaiprakash Mundada, Subhash Sabne, Prakash Shendage, Sardar Tarasingh and many other officer-bearers and party-workers were present in large numbers.

0000

‘हे माझं सरकार’ अशी भावना जनतेच्या मनात निर्माण व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सचिवांशी संवाद

मुंबई, दि. 29 : हे माझं सरकार अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण व्हावी असे काम करा. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयात राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या कार्यालय प्रवेशासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन फुलांनी सजविण्यात आले होते. प्रवेशाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदींनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.

यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विविध विभागांच्या सचिवांशी संवादही साधला.‘राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाची जोड मिळाल्यास प्रगती होते. त्यामुळे जनतेच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. ०००

जनता के मन मेंयह हम सबकी सरकारकी भावना

निर्माण होनचाहिए – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंत्रालय में पदभार स्वीकार किया, सचिवों से साधा संवाद

मुंबई, दि. 29 : यह हम सबकी सरकारइस तरह की भावना आम लोगों के मन में निर्माण हो सके, इस तरह से काम किया जाए, लोगों का भरोसा जीतने और उसे संपादित करने के लिए प्रयास किए जाने की आशा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ने आज यहाँ पर व्यक्त की। मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने मंत्रालय में राज्य के 29 वे मुख्यमंत्री के रूप में पदभार स्वीकार किया। इसके बाद हुई बैठक में विविध विभागों के सचिवों से संवाद साधते हुए वे बोल रहे थे।

मुख्यमंत्री श्री. ठाकरे के कार्यालयीन प्रवेश के लिए मंत्रालय के छठे मंजिल पर स्थित मुख्यमंत्री सदन फूलों से सजाया गया था, प्रवेश के अवसर पर मुख्यमंत्री श्री. ठाकरे के विधान परिषद के उपसभापति डॉ. नीलमताई गोऱ्हे एवं मुख्यमंत्री कार्यालय के महिला अधिकारियों ने उनका औक्षवंत (औक्षण) कर स्वागत किया।

इस दौरान मुख्यमंत्री श्री. ठाकरे के साथ मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबल, बालासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, विधायक आदित्य ठाकरे समेत सांसद विनायक राऊत, विधायक दिवाकर रावते आदि मान्यवर उपस्थित थे। श्रीमंत शाहू छत्रपति समेत विविध क्षेत्रों के  मान्यवरों ने मुख्यमंत्री श्री. ठाकरे को पुष्पगुच्छ देते हुए उन्हें शुभकामनाएँ दी।

इसके अलावा प्रशासन की ओर से मुख्यमंत्री श्री. ठाकरे के राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदि ने भी उनका  स्वागत किया।

इसके बाद हुई बैठक में मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने  विविध विभागों के सचिवों से संवाद साधा। बैठक में उन्होने कहा कि‘राज्य के विकास को गति देने के लिए प्रशासन का साथ होना चाहिए, यह साथ मिलने पर विकास होगा। इसलिए लोगों के दिलों में जो सपना है, उसे पूरा करने तथा परिवर्तन के लिए प्रयासरत रहने का आवाहन भी मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने इस दौरान किया।

००००

जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या-सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि.२९ : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशातअग्रेसर करण्यासाठी विकास कामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेने दिलेल्या करातून विकासकामांसाठी निधी प्राप्त होत असतो.  निधीचा योग्य प्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे.  सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल.  सरकार माझे आहेअशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. 

जनतेने विश्वासाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकासकामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा.

जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.  शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकास साधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे.  त्यादृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अधिकारी आपल्या जबाबदारीचे सक्षमपणे निर्वहन करतील आणि प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ००००

CM Uddhav Thackeray holds Secretary’s meeting,

directs them not to waste a single paisa of public exchequer

Mumbai, Nov 29: Chief Minister Uddhav Thackeray Friday advised the senior administrative officers to utilize each paisa of the people while carrying out development works to make Maharashtra a leader state in the country and to justify the faith people of the state reposed in this government.

He was interacting with the senior administrative officers after assuming the responsibility of the Chief Minister of the State. Chief Secretary Ajoy Mehta, Principal Secretary of CMO Bhushan Gagarani and secretaries of various departments were present on this occasion.

CM Thackeray said that the funds for development works are made available from the tax paid by the people. It is necessary to give impetus to development by optimum utilization of the funds allocated. We can earn the public faith by working with service attitude. It is our responsibility to make people feel allegiance to the government.

People have entrusted this responsibility of Chief Minister with great faith. The State has received the first chief minister born in Mumbai and therefore we need to work with a dream to make Mumbai and the state leader in development in the state.

We need to look towards increasing taxpayers’ income while making funds available for development works. In addition to that priority of development works should be fixed to bring better days in the life of farmers and workers.

The officers should concentrate on transparent and clean administration as this is necessary to create respect and attachment of people with the government. Speed and direction of development works are also equally important. From this point of view the senior administrative officers have to play an important role which they will do and the government would succeed in achieving its target, the CM confidently hoped.

0000

चंदगड, हातकणंगले व ढाणकी नगरपंचायतींसाठी २९ डिसेंबरला मतदान

विविध नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

मुंबई, दि. 29 : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 30 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.

नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका: मोर्शी, धरणगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी.

नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या जागांचा तपशील: गडहिंग्लज- हद्दवाढ क्षेत्रासाठी, मलकापूर- 7, वाई- 8, खानापूर- 7, बार्शी- 5, मनमाड- 1, भुसावळ- 4, भडगाव- 3, नवापूर- 6अ आणि 7, परंडा- 7, कळंब- 8, उमरेड- 11, भिवापूर- 4, सिंधी (रेल्वे)- 8, मोहाडी- 4, 9 आणि 12, साकोली- 6, कोरपणा- 16, भामरागड- 5 आणि 16.

०-०-०

(Jagdish More, SEC)

दिलखुलास कार्यक्रमात शनिवारी ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

आपला महाराष्ट्रया वार्तापत्रात दर आठवड्यात राज्यातील विविध भागात घडलेल्या घटना, घडामोडी, शासनाचे महत्त्वाचे निर्णय यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली,  अहमदनगर, अकोला,  अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्ग,  उस्मानाबाद, सातारा, सोलापूर,यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून हे वार्तापत्र प्रसारित  केले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. 29 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहूनहुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री आदित्य ठाकरे, रविंद्र वायकर, ॲड.अनिल परब, संजय राठोड, माजी मंत्री दिवाकर रावते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही पुष्प वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

0000

सह्याद्री वाहिनीवर उद्या ‘संविधान दिन’ कार्यक्रमाचा वृत्तान्त

मुंबई, दि. २९ : सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभाग तसेच डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  संशोधन व  प्रशिक्षण  संस्था ( बार्टी) पुणे यांच्या मार्फत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा प्रारंभ संविधान दिनाचे औचित्य साधून   करण्यात आला. या कार्यक्रमाचा वृत्तान्त  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शनिवार दि.३०  नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता  प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे  यांनी या वृत्तान्ताचे वाचन केले आहे.

राज्यात २६ नोव्हेंबर २०१९ ते  २६ नोव्हेंबर २०२० या वर्षाच्या कालावधीत‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीमराज्यात राबविण्यात येणार असून पुढील वर्षभर शासनाच्या  सर्व विभागांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे  पार पडलेल्या  कार्यक्रमप्रसंगी  मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधिज्ञ डी.एन. संदानशीव, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर उपस्थित होते. या जागरुकता मोहीम शुभारंभ कार्यक्रमाचा वृत्तान्त दूरदर्शनवर या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.

००००

ताज्या बातम्या

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी...

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा दि. 19: कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

0
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,...

सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम

0
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार, 20 एप्रिल,...

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
बीड, दि. 19 :  बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93...