शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1595

मा.मंत्री श्री.एकनाथ संभाजी शिंदे यांचा परिचय

नाव               :   श्री.एकनाथसंभाजीशिंदे

जन्म                     :     6मार्च, 1964

जन्मठिकाण          :     दरेगांव,तालुकाजावळी,जिल्हासातारा.

शिक्षण                 :     एच.एस.सी.

ज्ञातभाषा                     :     मराठी,हिंदीवइंग्रजी

वैवाहिकमाहिती    :     विवाहित,पत्नीश्रीमतीलता

अपत्ये                   :     एकूण1 (एकमुलगा)

व्यवसाय                :     उद्योग/सामाजिककार्य

पक्ष                       :     शिवसेना

मतदारसंघ             :     147-कोपरी-पाचपाखाडी,जिल्हाठाणे

इतरमाहिती           :     संपूर्णठाणेशहरवजिल्ह्यातसामाजिककार्याचेजाळेनिर्माणकेले;ठाणेशहरातओपनआर्टगॅलरी,सचिनतेंडुलकरमिनीस्टेडिअम,इंटरर्निटीसुविधाभूखंडावरबाळासाहेबठाकरेयांचेस्मारक,शहीदहेंमतकरकरेक्रीडासंकुल,जॉगिंगपार्क,  सेंट्रललायब्ररीसुरूकेली;आदिवासीप्रभागमोखाडा,तलासरीवजव्हारयेथीलआश्रमशाळेतवआरोग्यकेंद्रातसकसआहारवआरोग्यतपासणी शिबीरांचे आयोजनकरूनरूग्णांनाविनामूल्यऔषधवाटपकेले;पालघर,बोईसरवसफाळेपरिसरातशिवसेनेतर्फेएस.एस.सीविद्यार्थ्यांसाठीव्याख्यानमालेचेआयोजन;गरीबविद्यार्थ्यांनाशालोपयोगीसाहित्यांचेवाटप;पूरग्रस्तांनाजीवनावश्यकवस्तुंचेवाटप;वृक्षारोपण,आरोग्यतपासणीशिबीरांचेआयोजन;अध्यक्ष,ठाणेजिल्हाबॅडमिंटनअसोसिएशन;उपाध्यक्ष,महाराष्ट्रराज्यॲथलेटिक्ससंघटना;पूरग्रस्तांनामदत;ठाणेशहराच्यासर्वांगीणविकासासाठीवआधुनिकीकरणासाठीविशेषयोगदान;शिवसेनाशाखाप्रमुख,वागळेइस्टेट,किसननगरनं.2,शिवसेनाठाणेजिल्हाप्रमुख;पक्षाच्यासर्वआंदोलनातसक्रियसहभाग,दोनवेळानगरसेवक,तीनवर्षेस्थायीसमितीसदस्य,चारवर्षेसभागृहनेता,ठाणेमहानगरपालिका; 2004-2009, 2009-2014सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; 12नोव्हेंबर2014ते5डिसेंबर2014विरोधीपक्षनेता,महाराष्ट्रविधानसभा;2014-2019 सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;डिसेंबर, 2014तेऑक्टोबर, 2019सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रम)खात्याचेमंत्री, ऑक्टोबर2019मध्येविधानसभेवरफेरनिवड.

(संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)

000000

मा.मंत्री श्री. सुभाष राजाराम देसाई यांचा परिचय

नाव               :   श्री.सुभाषराजारामदेसाई

जन्म                     :     12जुलै, 1942

जन्मठिकाण          :     मालगुंड,तालुकारत्नागिरी,जिल्हारत्नागिरी

शिक्षण                 :     एस.एस.सी.,पत्रकारितापदविका

ज्ञातभाषा                     :     मराठी,हिंदी,इंग्रजीवगुजराती

वैवाहिकमाहिती    :     विवाहित,पत्नीश्रीमतीसुषमा

अपत्ये                   :     एकूण3 (तीनमुलगे)

व्यवसाय                :     उद्योग

पक्ष                       :     शिवसेना

मतदारसंघ             :     महाराष्ट्रविधानसभासदस्याद्वारा

निर्वाचित

इतरमाहिती           :     1982संस्थापक, ‘प्रबोधनगोरेगाव’विश्वस्तसंस्था; 1973आंतरशालेयक्रीडामहोत्सववआंतरमहाविद्यालयीनवक्तृत्वस्पर्धाचेआयोजन; 1973शिवसेनारुग्णवाहिकासेवागोरेगावयेथेसुरुकेली; 1977प्रमुखकार्यवाह,मुंबईउपनगरमराठीसाहित्यसंमेलन; 1989विश्वस्त,प्रबोधनप्रकाशन;प्रकाशक, ‘दैनिकसामना’,साप्ताहिक’मार्मिकव’दोपहारकासामना’; 1991प्रबोधनक्रीडाभवनाचीउभारणी; 1992मुख्यसंयोजक,कोकणरेल्वेपरिषद,खेड,जिल्हारत्नागिरी; 1999प्रबोधनजॉगर्सपार्कचीउभारणी; 2000मुख्यसंयोजक,मुंबईफेस्टीवलवहिंदुस्थानीशास्त्रीयसंगीतउत्सव;2001मुख्यसंयोजक, ‘हर्बलवल्ड’औषधीवनस्पतींचेप्रदर्शनवचर्चासत्राचेआयोजन; 2002मध्येउल्लेखनीयसार्वजनिककार्याबद्दलसंभाजीप्रतिष्ठानतर्फेधर्मवीरपुरस्कारप्राप्त; 2003सहाराविमानतळावरअश्वारूढशिवप्रतिमेचीस्थापना; 2004प्रबोधनरक्तपेढीसुरुकेली; 1966शिवसेनेच्यास्थापनेपासूनशिवसैनिकम्हणूनकार्य; 1984शिवसेनानेता; 1985प्रमुखसंयोजक,शिवसेनेचेदुसरेमहाराष्ट्रव्यापीअधिवेशन(महाड); 1986-90शिवसेनाजळगावजिल्हासंपर्कप्रमुख; 1989पासूनसरचिटणीस,शिवसेना; 1995अध्यक्ष,उर्वरितमहाराष्ट्रवैधानिकविकासमंडळ; 1990मध्येविधानसभेवरनिवड; 1994हिंदुत्वाच्याआधारेप्रचारकेलायाआक्षेपावरुनन्यायालयानेसदरविधानसभेवरीलनिवडअवैधठरविली; 2004-09, 2009-14सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; 2015-16सदस्य,महाराष्ट्रविधानपरिषद; 5डिसेंबर, 2014पासूनमहाराष्ट्रराज्याचेउद्योगमंत्री;जुलै2016मध्येमहाराष्ट्रविधानपरिषदेवरफेरनिवड.

(संदर्भ:महाराष्ट्रविधानपरिषदसदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)

000000

मा.मंत्री श्री. जयंत राजाराम पाटील यांचा परिचय

नाव               :   श्री.जयंत राजाराम पाटील

जन्म                     :     16फेब्रुवारी1962

जन्मठिकाण          :     सांगली.

शिक्षण                 :     बी.ई. (सिव्हील)

ज्ञातभाषा                     :     मराठी,हिंदीवइंग्रजी.

वैवाहिकमाहिती    :     विवाहित,पत्नीश्रीमतीशैलजा

अपत्ये                   :     एकूण2 (दोनमुलगे)

व्यवसाय                :     शेती

पक्ष                       :     राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष.

मतदारसंघ             :     283-इस्लामपूर,जिल्हा-सांगली

इतरमाहिती           :     चेअरमन,राजारामबापूसहकारीसाखरकारखानालि;उपाध्यक्ष,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस;चेअरमन,कासेगावशिक्षणसंस्था;चेअरमन,डेक्कनशुगरटेक्नॉलॉजिस्टअसोसिएशन;अध्यक्ष,महाराष्ट्रराज्यसाखरकारखानासंघ;संचालक,वसंतदादाशुगरइस्टिट्युट,पुणे;सदस्य,अखिलभारतीयसाखरसंघ,संचालक,महाराष्ट्रराज्यसहकारीबँक,सहकारीबँका,पतसंस्था,सहकारीसूतगिरणी,सहकारीग्राहकभांडार,शेतीपदवीधरसंघ;कुक्कुटपालनसह.सोसायटीइत्यादीसंस्थास्थापनाकरूनजनसामान्यांचेजीवनमानउंचवण्यासाठीवभागाचासर्वांगीणविकासकरण्यासाठीअथकपरिश्रमघेतले;सदस्य,कार्यकारीमंडळशिवाजीविद्यापीठ,सांगलीजिल्हाव्यसनमुक्तीसमितीवराजारामबापूज्ञानप्रबोधनी;कौन्सिलमेंबर,इंजिनिअरिंगअँडपॉलिटेक्निककॉलेज,राजारामनगर;सर्वसंस्थाचेकामसंगणकाच्यामाध्यमातूनकरण्यामध्येअग्रेसर;मे1999पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्य; 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;नोव्हेंबर1999तेडिसेंबर2008अर्थवनियोजनखात्याचेमंत्री; 1999पूर्वीविस्कटलेलीराज्याचीघडीयोग्यमार्गावरआणण्यासाठीअर्थमंत्रीम्हणूनप्रदीर्घकाळयोगदानदिले;डिसेंबर 2008 मध्ये काही काळासाठी गृह खात्याचा कार्यभार;नोव्हेंबर2009तेऑक्टोबर2014ग्रामविकासखात्याचेमंत्री;प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

(संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)

00000

मा.मंत्री श्री. छगन चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

नाव              :   श्री.छगनचंद्रकांतभुजबळ

जन्म                     :     15ऑक्टोबर1947.

जन्मठिकाण          :     नाशिक.

शिक्षण                 :     एल.एम.ई.(आय).

ज्ञातभाषा                     :     मराठी,हिंदीवइंग्रजी.

वैवाहिकमाहिती    :     विवाहित,पत्नीश्रीमतीमीना.

अपत्ये                   :     एकूण1 (एकमुलगा).

व्यवसाय                :     शेती.

पक्ष                       :     राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष.

मतदारसंघ             :     119-येवला,जिल्हानाशिक.

इतरमाहिती           :     संस्थापकअध्यक्ष,मुंबईएज्युकेशनलट्रस्ट,बांद्रा,मुंबईमाजीविश्वस्त,व्ही.जे.टी.आय.संस्था,मंबई;संस्थापक,महात्माफुलेसमतापरिषद,यासंस्थेमार्फतउपेक्षितपददलित,मागासवर्गीयांनान्यायमिळवूनदेण्याचाप्रयत्नतसेच,महात्माफुलेडॉ.बाबासाहेबआंबेडकर,शाहुमहाराजयांच्याविचारांचावआदर्शाचाप्रचारवप्रसारःमाजीविश्वस्त,मुंबईपोर्टट्रस्ट: 1985 “देवत”व1990″नवराबायको’यामराठीचित्रपटांचीनिर्मिती; 1973सदस्य, 1973-84विरोधीपक्षनेते, 1985व1991महापौर,मुंबईमहानगरपालिकाः1991अध्यक्ष,ऑलइंडियाकौन्सिलऑफमेयर्स; 1991पर्यंतशिवसेनेत, 1991नंतरकाँग्रेसपक्षातकार्यरत,जून1999पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्यसंस्थापकसदस्यवजून1999तेनोव्हेंबर1999महाराष्ट्राचेपहिलेप्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादीकाँग्रेसपक्षः1985-90, 1990-95, 2004-2009, 2009-2014, 2014-19सदस्य,महाराष्ट्रविधानसभा.

1996-2002व2002-2004सदस्य,महाराष्ट्रविधानपरिषद;डिसेंबर1991तेमार्च1993महसूलखात्याचेमंत्री;मार्च1993तेमार्च1995गृहनिर्माण,गलिच्छवस्तीसुधार,घरदुरुस्तीआणिपुनर्बाधणीखात्याचेमंत्री; 1996 – 1999विरोधीपक्षनेते,महाराष्ट्रविधानपरिषद;ऑक्टोबर1999तेजानेवारी2003महाराष्ट्रराज्याचेउपमुख्यमंत्रीवगृहआणिपर्यटनमंत्री,जानेवारी2003तेडिसेंबर2003उपमुख्यमंत्रीवगृहमंत्री;नोव्हेंबर2004तेऑक्टोबर2009सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रमवगळून)याखात्यांचेमंत्रीःनोव्हेंबर2009तेनोव्हेंबर2010दुसऱ्यांदाउपमुख्यमंत्रीवसार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रमवगळून)खात्याचेमंत्री;नोव्हेंबर2010तेसप्टेंबर2014सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रमवगळून)मंत्री;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

(संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)

00000

मा.मंत्री श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब थोरात यांचा परिचय

नाव       : श्री.विजयऊर्फबाळासाहेबभाऊसाहेबथोरात

जन्म           :  7फेब्रुवारी, 1953

जन्मठिकाण   :    जोर्वे,तालुका-संगमनेर,जिल्हाअहमदनगर.

शिक्षण               :    बी.ए.एल.एल.बी.

ज्ञातभाषा             :    मराठी,हिंदीवइंग्रजी.

वैवाहिकमाहिती   :    विवाहित,पत्नीश्रीमतीकांचन.

अपत्ये                 :    एकूण4 (एकमुलगावतीनमुली)

व्यवसाय              :    शेती.

पक्ष                     :    भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय).

मतदारसंघ           :    217-संगमनेर,जिल्हाअहमदनगर.

इतरमाहिती         :    विद्यार्थीजीवनातपुणेयेथेफर्ग्युसनवविधीमहाविद्यालयातअसतानापाणीपंचायतचळवळीतसहभाग; 1980विडीकामगारवशेतकऱ्यांच्याप्रश्नांच्याआंदोलनातसक्रीयसहभागनऊदिवसकारावास;डॉ.बाबासाहेबआंबेडकरमराठवाडाविद्यापीठनामांतरचळवळीतसक्रीयसहभाग;विश्वस्त,सह्याद्रीबहुजनविद्याप्रसारकसंस्था,अमृतवाहिनीशेतीवशिक्षणसंस्था,संगमनेर: 1980संस्थापक,अमृतवाहिनीव्यावसायिकसहकारीदूधसंस्था;1980संचालकव1988-93चेअरमन,संगमनेरतालुकादुधउत्पादकसहकारीसंघ,घुलेवाडी;संगमनेरतालूक्यातदुधउत्पादनवाढीसाठीसातत्यानेप्रयत्न,संगमनेरतालुक्याच्याशेक्षणिकविकासातसहभाग,भंडारदराधरणामध्येअसलेल्यापाण्याचेशेतीसाठीफेरवाटपव्हावेयासाठीकेलेल्याआंदोलनाचेनेतृत्ववफेरवाटपकरूनघेण्यातयशस्वी,निळवंडेधरणाचेकामेपूर्णव्हावेयासाठीचळवळउभीकेली; 1989संचालकव1993 – 2001चेअरमन,भाऊसाहेबथोरातसहकारीसाखरकारखाना,संगमनेर;1989अध्यक्ष,राज्यविडीकामगारकिमानवेतनसमिती,अहवालशासनाससादरकरूनमहागाईनिर्देशांकाप्रमाणेवेतनवाढीचीशिफारसकेली;दुष्काळग्रस्तांसाठीमदतकार्य;निळवंडेधरणाचेकामपूर्णव्हावेयासाठीचळवळउभीकेली;संस्थापकवअध्यक्ष,संगमनेरतालुकासहकारीपतसंस्थाफेडरेशन;1993-99संचालक,नॅशनलहेवीइजिनिअरींगसहकारीसंस्था.संचालक,ऑलइंडियाडिस्टलरीअसोसिएशननवीदिल्ली;1998-2000सरचिटणीस,महाराष्ट्रप्रदेशकाँग्रेसकमिटी;उत्कृष्टसामाजिककार्याबद्दल2008मध्येदेशभक्तकिसनवीरसामाजिकसंस्थेच्या“समाजकृतज्ञता”पुरस्कार, 2014मध्येयशवंतप्रतिष्ठानपुणेयांच्याकडुन”यशवंत-वेणू”पुरस्कारव2015मध्येमाधवरावलिमयेफाऊंडेशनचा”कार्यक्षमआमदार”पुरस्कारानेसन्मानीत; 1985-90, 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-14, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा.

विधीमंडळाच्यारोजगारहमी,आश्वासन,सार्वजनिकउपक्रमवपंचायतराजसमित्यांचेसदस्यम्हणूनकामकेले;ऑक्टोबर, 1999तेजुलै, 2004पाटबंधारे(कृष्णाखोरेवकोकणपाटबंधारेमहामंडळेवगळून),लाभक्षेत्रविकासखात्याचेराज्यमंत्री;नोव्हेंबर, 2004तेऑक्टोबर, 2009जलसंधारणआणिखारजमीनखात्याचेमंत्री;नोव्हेंबर, 2009तेनोव्हेंबर, 2010कृषीजलसंधारण,रोजगारहमीयोजनाआणिशालेयशिक्षण(अतिरिक्तकार्यभार)खात्याचेमंत्री;नोव्हेंबर, 2010तेसप्टेंबर, 2014महसूलखारजमिनीखात्याचेमंत्री;राज्यभरशेततळ्यांचीनिर्मिती,सुवर्णजयंतीराजस्वअभियानसरूकेले,खंडकरीशेतकऱ्यांनाजमिनीचेवाटप;महसूलखात्याचाकारभारऑनलाईनकरण्यातपुढाकार;राज्यातीलशेतजमिनीचेनव्यानेमोजणीकरण्याचानिर्णयघेतला;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

(संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)

000000

मा.मंत्री डॉ.नितीन काशिनाथ राऊत यांचा परिचय

नाव               :   डॉ.नितीनकाशिनाथराऊत

जन्म                     :     9ऑक्टोबर1952.

जन्मठिकाण          :     नागपूर,जिल्हानागपूर.

शिक्षण                 :     एमए.,एफ.बी.एम.,सी.पी.एल.,

एम.एफ.ए.(नाट्य)पीएच.डी.

ज्ञातभाषा              :     मराठी,हिंदीवइंग्रजी

वैवाहिकमाहिती    :     विवाहित,पत्नीश्रीमती सुमेधा

अपत्ये                   :     एकूण2 (एकमुलगा व एक मुलगी)

व्यवसाय                :     उद्योग/व्यापार.

पक्ष                       :     भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)

मतदारसंघ             :     57-नागपूर(उत्तर)

इतरमाहिती           :     अध्यक्ष,पिपल्सप्रोग्रेसिव्हसोसायटी,नागपूर,आजीवसदस्य,नागपूरफ्लाईंगक्लबलि.;सदस्य,डी.यु.डी.ए.;विश्वस्त,नागपूरसुधारप्रन्यास,सदस्य,गृहविभागकामकाजस्थायीसमिती;अध्यक्ष,राज्यपरिवहनसल्लागारसमिती,अध्यक्ष,इंदिरागांधीवैद्यकीयमहाविद्यालयसल्लागारसमितीअध्यक्ष,अखिलभारतीयअनुसूचितजाती/जमातीशिकाऊविमानचालकसंघटना,सल्लागार,महाराष्ट्रराज्यवनपालववनरक्षकसंघटनाववेस्टर्नकोलफिल्डस्लि.अनुसूचितजाती/जामातीकर्मचारीकल्याणसंघटना,पददलितांच्याउद्धारासाठीसंकल्पसंस्थासुरूकेली,यासंस्थेमार्फतसमाजातीलदुर्बलघटकांच्याकल्याणाचेकार्य;जातीयदंगली,पूरग्रस्तवनैसर्गिकआपदग्रस्तांसाठीमदत,दरवर्षीधम्मचक्रप्रवर्तनदिनाच्यासोहळ्यासाठीनागपूरयेथेदीक्षाभूमीलाभेटदेणाऱ्यालाखोभाविकांनामूलभूतसेवासुविधापुरविण्यासाठीसक्रियसहाय्य, 1987मोफतअन्नदानकार्यक्रमाचेआयोजनकरुनलाखोभाविकांनाअन्नदानकेले;पिण्याच्यापाण्याचीमोफतसोय,प्रसाधनगृहे,स्नानगृहेउभीकेली, 2.5लाखलोकांच्याविश्रांतीसाठीमंडपाचीसोयकेली;मोफतआरोग्यतपासणीशिबिरांचेआयोजन;पर्यावरण,दारुबंदी,व्यसनमुक्ती,व्यवसायिकशिक्षण,युवकांनामार्गदर्शन,महिलावबालकल्याण,विज्ञान-तंत्रज्ञानाच्याप्रगतीसाठीमोफतप्रदर्शनवजनजागृतीशिबिरांचेआयोजन, 1988डॉ.बाबासाहेबआंबेडकरांच्यापुण्यतिथीनिमित्तराष्ट्रीयएकतावएकात्मतायासाठी’संकल्परन’चेआयोजन; 1989राष्ट्रीयएकात्मतेसाठीनागपूरतेरायपूरभीमज्योतयात्रेचेआयोजन1991डॉ.बाबासाहेबआंबेडकरांच्या100व्याजयंतीनिमित्तनागपूरयेथीलकस्तूरचंदपार्कयेथेभव्यरॅलीचेआयोजन,मराठवाडानामांतरआंदोलनातसक्रियसहभाग;नागपूरविद्यापीठामधीलअनुसूचितजातीवजमातीयांचाअनुशेषभरूनकाढण्यासाठीप्रयत्न,महाराष्ट्रराज्यातीलकनिष्ठमहाविद्यालयीनशिक्षकांच्यामागण्यांसाठीच्याआंदोलनातसहभागवसेवेतीलसुरक्षिततावसुधारितवेतनश्रेणीमिळवूनदेण्यासाठीप्रयत्न,अनुसूचितजाती/जमातीच्याविद्यार्थ्यांनाव्यवसायिकवखाजगीविमानचालनअनुज्ञाप्तीतसेचशिष्यवृत्तीमिळावीयासाठीच्याआंदोलनाचेनेतृत्व; 1989चंद्रपूरयेथेदलितसाहित्यसंमेलनातसहभागवविविधविषयांवरव्याख्यानेदिली; 1991विदर्भसाहित्यसंमेलनातसहभाग; 2002नागपूरयेथेअस्मितादर्शरजतमहोत्सववसाहित्यसंमेलनाचेआयोजनः1990नागपूरजिल्ह्यातीलमकर-धोकडायेथीलजातीयदंगलीतीलदंगलग्रस्तांनासर्वतोपरीमदत; 1991मोवाडवनागपूरयेथीलपूरग्रस्तांनामदतकार्यव15दिवसअन्नदानकेले;स्वतंत्रविदर्भाचेसमर्थक,विदर्भाचाअनुशेषभरूनकाढण्यासाठीप्रयत्नशील, 19एप्रिल2000संविधानबचाओरॅलीचेआयोजन,शासकीयवनिमशासकीयकार्यालयातीलमागासवर्गीयअनुशेषभरण्यासाठीप्रयत्न;भारतसरकारच्याराष्ट्रीयआयोगाच्याधर्तीवरमहाराष्ट्रराज्यअनुसूचितजाती/जमातीआयोगस्थापन्यासाठीप्रयत्न, 1962मधीलसंसदवराज्यविधानसभेत,अनुसूचितजातीसाठींच्याराखीवजागांच्यासंख्येइतकीवाढकरण्याचीराज्यशासनाचीशिफारसमिळविण्यासाठीप्रयत्न; 1970पासूनराजकीयक्षेत्रातकार्य; 2001सदस्य,अखिलभारतीयराष्ट्रीयकाँग्रेस;सरचिटणीस,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस;सरचिटणीस,नागपूरजिल्हा(शहर)युवककाँग्रेस;स्व.इंदिरागांधीच्याअटकेच्यावेळीत्यांच्यासमर्थनार्थजेलभरोआंदोलनातसक्रियसहभाग; 1991पासूनलोकसभानिवडणुकामध्येउत्तरनागपूरविधानसभाक्षेत्राचेप्रभारी;  कोलकत्ता,बंगलोरवनवीदिल्लीयेथेआयोजितकरण्यातआलेल्याअखिलभारतीयकाँग्रेसकमिटीच्याखुल्याअधिवेशनातसहभाग; 1999-2004, 2004-2009, 2009-2014सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;विधानमंडळाच्याअनुसूचितजातीकल्याणसमितीचेसदस्य;आरक्षणअधिनियमासाठीगठितकेलेल्यासमितीचेसदस्य,वनोत्पादनाच्याचोरीसंबंधीच्यासंयुक्तसमितीचेसदस्य;विधानमंडळाच्यारोजगारस्वयंरोजगारसमितीचेसदस्य;मोरवाडायेथीलपूरग्रस्तभागामध्येकेलेल्याउल्लेखनीयकार्याबद्दलवनराईसंस्थेमार्फतपुरस्कारानेसन्मानित,रत्नागिरीयेथेआरक्षणविधेयकासाठीसन्मानीत,डिसेंबर2008तेनोव्हेंबर2009गृह,तुरुंग,राज्यउत्पादनशुल्कवकामगारखात्याचेराज्यमंत्री,ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

(संदर्भ: 12  वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)

0000

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात

सहा कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई, दि. 28 : राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमवेत एकनाथ संभाजी शिंदे, सुभाष राजाराम देसाई, जयंत राजाराम पाटील, छगन चंद्रकांत भुजबळ, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, नितीन काशिनाथ राऊत यांनी राज्यपालांकडून मंत्रीपदासाठी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

आजच्या शपथविधी कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार शरद पवार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. कमलनाथ, माजी मुख्यमंत्री सर्वश्री देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,तामिळनाडूचे माजी उप मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, देशभरातून विशेष निमंत्रित करण्यात आलेले सर्व क्षेत्रातील सन्माननीय अतिथी उपस्थित होते.

शपथविधीची क्षणचित्रे

  • आजच्या शपथविधी कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदान गर्दीने फुलले होते.
  • महाराष्ट्र गीत आणि शिव पोवाड्याने शिवाजी पार्क मैदानातील वातावरण चैतन्यदायी झाले होते.
  • शपथविधी सोहळ्यासाठी शेतकरी आणि वारकरी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांची उपस्थितीही लक्ष वेधून घेत होती.
  • सांगली येथील संजय सावंत आणि रुपाली सावंत या वारकरी दाम्पत्याने मंचावर येऊन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला निर्णय रायगड संवर्धनासाठी २० कोटी रुपये

मुंबई, दि. 28 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निर्णय दिला तो रायगड संवर्धन आणि परिसर विकासासाठी 20 कोटी रुपये निधी वितरणाचा.

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रलंबित होता. श्री.ठाकरे यांनी रायगड किल्ल्याच्या विकासकामांची नस्ती मागवली. त्यांनी विशेष बाब म्हणून निधी वितरणाच्या प्रस्तावास मान्यता देऊन त्यासंदर्भातील नस्तीवर पहिली स्वाक्षरी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा राज्याचा समृद्ध वारसा असून त्याचे जतन करणे व पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करणे आवश्यक असून राज्य शासन त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 28 : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठोस मदत करण्यासाठी आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीस मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉ.नितीन राऊत उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत वास्तववादी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारताना महाराष्ट्राला देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य करायचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांना आपले वाटेल या दिशेने प्रयत्न असतील.

सर्वांना अभिमान वाटावा अशा रायगड संवर्धनाच्या 20 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रथम मंजूरी देण्याचे भाग्य मिळाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधानसभेच्या २८६ आमदारांचा शपथविधी संपन्न

मुंबई,दि.27 :विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी14व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या288पैकी उपस्थित285सदस्यांना (दु.1वा.पर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली. श्री. कोळंबकर यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.

        

14व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ’वंदे मातरम्’ने तर समारोप राष्ट्रगीताने झाला.

0000

सचिन गाढवे/ श्रद्धा मेश्राम/ वि.सं.अ./ दि.27.11.2019   00000

286 विधायकों की शपथविधि पूर्ण

मुंबई,दि. 27 : विधानसभा के  हंगामी  अध्यक्ष,कालिदास  कोळंबकर  ने 14वीं विधानसभा में चुने गए 288 सदस्यों में से उपस्थित 285 सदस्यों को (दो. 1 बजे तक) सदस्यता की शपथ दिलाई। श्री.  कोळंबकर ने कल ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के समक्ष अध्यक्ष के रूप में शपथ ली है। सुधीर मुनगंटीवार और देवेंद्र  भुयार की अनुपस्थिति के कारण,आज उनका शपथविधि नहीं हो सका।

14 वीं विधानसभा के निर्वाचित सदस्यों को शपथ दिलाने के लिए  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने आज विधानसभा की बैठक बुलाई थी। बैठक वंदे मातरम के साथ शुरू हुई और राष्ट्रगान के साथ समाप्त हुई।

०००००  

ताज्या बातम्या

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणा व शौर्याचे प्रतिक - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगर, दि.18 एप्रिल, (विमाका) : महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त होते...

आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन

0
वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह भीमालपेन जन्मोत्सव यात्रेला उपस्थिती नागपूर, दि 18 : कुवारा भिवसन देवस्थान पंचकमेटी, भिवगड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही...

सुराबर्डीत होणार भव्य गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय; ३० मे पूर्वी सर्व प्रक्रियेची पूर्तता करा...

0
जून महिन्यात होणार कामाला सुरुवात  नागपूर, दि 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आदिवासी समाजाची संस्कृती जगासमोर यावी यासाठी सुराबर्डी येथे...

भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व परिसरात अध्यासन इमारतीचे भूमीपूजन कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज...

रुग्णांना दर्जेदार सेवा द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर दि : 18 (जिमाका ) राज्य शासन धर्मदाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते. या धर्मदाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व सौजन्यपूर्वक सेवा...