शनिवार, एप्रिल 12, 2025
Home Blog Page 1596

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. 4 : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन 6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, सर्व पंचनामे दि. 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती आल्यास 8 नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण झाले पाहिजे. पंचनामे करताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठे आहेत तेथील कर्मचाऱ्यांचीही त्यासाठी मदत घ्यावी, असे स्पष्ट करतानाच सर्व पंचनामे विभागीय आयुक्तांनी अंतिम करून ते कृषी आयुक्तांकडे पाठवावेत. पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांनीही आवश्यक ती मदत करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

पाऊस झाल्याने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी लगबग करतील त्यासाठी बी-बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. बियाणे, खतांची टंचाई असल्यास शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर आदी यावेळी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/4.11.2019

तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

अकोला जिल्ह्यातील पीक नुकसान पाहणीनंतर बैठकीतील माहिती

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणेने संवेदनशील काम करावे

पिकविमा मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार

रब्बीसाठी बियाण्याची उपलब्धता करणार

अकोला, दि. 3 : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदशीलपणे कार्य करावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, यासाठी शेतपिकांचे तीन दिवसांत (सहा नोव्हेंबर पर्यंत) पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हैसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पिकपाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपिकिशन बाजोरीया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, नितीन देशमुख, बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,पोलीस अधीक्षक अमोघ गावकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचनाम्याची कामे तातडीने हाती घ्यावीत. पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे कामे करावीत. पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषि विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा.

यावेळी झालेल्या नुकसानीची व्याप्ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना पीक विमा आधार ठरणार आहे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना एकत्रित सूचना देण्यात याव्यात. पीक विम्याचा लाभ देताना कंपन्यांनी विम्याच्या पावतीचा आग्रह करू नये. पीक विम्याच्या मदतीसाठी करावे लागणारे अर्ज गावातच भरून घ्यावे. पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पोहोचू शकल्या नसल्यास शासकीय यंत्रणांनी केलेले पंचनामे त्यांनी ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे. नुकसानीचा फोटोही मदतीसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हाताशी आलेले संपूर्ण पीक गेल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन दिलासा देण्याचे काम करावे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहू. शेतकऱ्यांना कोणत्याही वसुलीला सामोरे जावे लागू नये, याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना कराव्यात. शेतकऱ्यांना सुलभपणे मदत मिळावी, त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हेल्पलाईन सुरू करावी. शेतपिकांच्या नुकसानीची व्याप्ती ही सार्वत्रिक आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक मदत राहणार आहे. योग्य व्यक्तींना या मदतीचा लाभ पोहोचावा, यासाठी यंत्रणेने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कार्य करावे. नुकसानीची मदत मिळण्यासाठी पंचनामा करणाऱ्या यंत्रणांनी अपवादही सोडू नये. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणेने हे आपले काम आहे, असे समजून मिशन मोडमध्ये कार्य करावे.

शेतकऱ्यांना ज्या मार्गांनी मदत करणे शक्य आहे, त्या सर्व मार्गांनी मदत करण्यात येईल. खरीप पिकांमधून कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यातील पावसामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता झाली आहे. यामुळे शेतकरी आता रब्बी पिकाकडे वळतील. त्यांना हरभरा, गहू यासारख्या पिकांच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी जिल्ह्याच्या माहितीचे सादरीकरण केले.

०००००

तीन दिनों में पंचनामा पूर्ण करने के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए निर्देश

किसानों की मदद के लिए व्यवस्था को संवेदनशील होना चाहिए   

फसल बीमा मिलने के लिए हर संभव प्रयास करेंगे

रबी के लिए बीज उपलब्ध करवाएँगे  

अकोला, दि. 3 – अक्टूबर में बेमौसम बारिश ने कपास, सोयाबीन और ज्वार की फसलों को पूरी तरह से नुकसान पहुंचाया है।  किसानों के हाथों में  फसल आते-आते रह जाने से , किसानों में निराशा छा गयी है।  इसलिए, किसानों को फिर से खड़ा करने के लिए, सरकारी व्यवस्था को पंचनामा करने के लिए संवेदनशीलता से काम करना चाहिए।  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज निर्देश दिये कि आगामी तीन दिनों में  (6 नवंबर तक) पंचनामा पूर्ण किये जाएँ जिससे कि किसानों को मदद मिल सके।

मुख्यमंत्री श्री फडणवीस ने प्रत्यक्ष  रूप से म्हैसपुर फाटा, लाखनवाड़ा, कापशी, चिखलगाँव का दौरा किया और जिलाधिकारी कार्यालय के नियोजन सभागृह में एक बैठक ली।  इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटिल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विश्वविद्यालय के कुलगुरू डॉ. विलास भाले, विधायक श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, नितिन देशमुख, बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिलाधिकारी जितेंद्र पापळकर,पुलिस अधीक्षक अमोघ गावकर आदि उपस्थित थे।

मुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा कि अक्टूबर में हुई बारिश के कारण लगभग 100 प्रतिशत फसल का नुकसान हुआ है।   किसानों के हाथ से कपास, सोयाबीन और तूर की फसल पूरी तरह चली गयी हैं। इसलिए किसानों की मदद के लिए दस हजार करोड़ का प्रावधान किया गया है। सरकारी तंत्र  की स्थिति की गंभीरता को देखते हुए तुरंत पंचनामा का काम करना चाहिए।  पंचनामा की स्थिति से निपटने  के लिए, पूरे सरकारी तंत्र को संवेदनशील होकर काम करना चाहिए। यदि पंचनामा के काम के लिए आवश्यक हो, तो अन्य विभागों और कृषि विश्वविद्यालय की जनशक्ति का उपयोग किया जाए।

इस बार हुए नुकसान की व्याप्ति सबसे बड़ी है।  इसलिए, प्रदान की जाने वाली सहायता भी बहुत बड़ी होगी। किसानों को पुनः सशक्त बनाने के लिए  सूखे की अवधि के दौरान की  सभी सहायता इस बारिश के मौसम के दौरान भी सभी किसानों को प्रदान की जाएगी।  नुकसान की अवधि के दौरान किसानों के लिए फसल बीमा को आधार माना जाएगा।  किसानों को फसल बीमा के संबंध में एक साथ जानकारी  दी जाए। फसल बीमा का लाभ देते समय कंपनियों को बीमा की रसीद पर जोर नहीं देना चाहिए।  फसल बीमा की मदद के लिए आवश्यक आवेदन पत्र  गाँव में ही भरे जाने चाहिए।  फसल बीमा कंपनी के प्रतिनिधियों को सूचना दी गई है कि हुए नुकसान का पंचनामा करने न पहुँच  पाने की स्थिति  में सरकारी तंत्र  द्वारा किये गये पंचनामा को स्वीकार किया जाए। फसल बीमा की सहायता मिलने के लिए सरकारी  तंत्र  को समन्वय का काम करना चाहिए। हुई  क्षति की तस्वीर भी मदद के लिए सबूत के रूप में माना जाएगा।

हाथ में आयी हुई संपूर्ण फसल चले जाने से किसानों में निराशा छा गई है।  किसानों की सहायता के लिए, अधिकारियों और कर्मचारियों को अपने अधिकार क्षेत्र  से बाहर जाकर  काम करना चाहिए। किसानों की मदद के लिए ईमानदारी से काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों के पीछे हम खड़े हैं। विभागीय आयुक्त, तथा जिलाधिकारी संबंधित   तंत्र को सूचित करें कि किसानों को किसी भी वसूली का सामना न करना पड़े।  हेल्पलाइन स्थापित की जानी चाहिए ताकि किसानों को आसानी से सहायता मिल सके और एक ही स्थान पर सभी जानकारी प्राप्त हो सके। किसानों को हुआ नुकसान सर्वव्यापी  है।  अब तक की सबसे बड़ी मदद दी जा रही है। सरकारी तंत्र  को अधिकार क्षेत्र से बाहर जाकर काम करना चाहिए ताकि सही व्यक्ति को सहायता का लाभ मिल सके। हुए नुकसान की भरपाई हो सके इसके लिए पंचनामा  करने वाले तंत्र को कोई अपवाद नहीं छोड़ना चाहिए।  किसानों की मदद करने के लिए सरकारी तंत्र  को इसे अपना काम  समझ कर मिशन मोड में काम करना चाहिए।

किसानों की हर संभव मदद की जाएगी।  खरीफ फसलों से कोई भी आय किसानों के हाथ में नहीं आने वाली है।  इससे किसानों को फिर से खड़े करने की जरूरत है।  पिछले महीने हुई बारिश के प्रचुर उपलब्धता है इसी कारण, किसान अब रबी फसलों की ओर रुख करेंगे।  मुख्यमंत्री ने इस अवसर पर सूचना दी कि किसान चना और गेहूँ  जैसी फसल उगा सकें इसके लिए   बीज उपलब्ध कराए जाएँ ।

जिलाधिकारी श्री  पापलकर ने जिले की जानकारी प्रस्तुत की।

Complete the spot assessment work in 3 days Chief Minister Devendra Fadnavis

Administration should be sensitive for helping farmers

All out efforts will be taken for Crop Insurance

Seeds for RaBi crops will be made available

Akola, November 3:- The unseasonal rains in the month of October has completely damaged cotton, soybean and Jowar crops as a result the farmers are depressed. It is essential to help them stand again and the government machinery should work sensitively for carrying out the spot assessment ‘Panchnamas’. All the assessment should be done within the next three days, till 6th of November so that farmers can be given financial assistance with immediate effect. These directions were given by Chief Minister Mr Devendra Fadnavis here, today.

The Chief Minister today visited Mhaispur phata, Lakhanwada and other villages for spot inspection of the crops. Later, he conducted a meeting in the hall of District Magistrate office. Union Minister of state Sanjay Dhotre, Guardian minister Dr Ranjit Patil, vice-chancellor of Dr Punjabrao Deshmukh Agricultural University Dr Vilas Bhale, Legislature Shrikant Deshpande, GopiKishan Bajoria, Randhir Savarkar, Prakash Bharsakhle, Govardhan Sharma, Nitin Deshmukh, Baliram Shiraskar, Mayor Vijay Agrawal, principal secretary Bhushan Gagrani, Divisional Commissioner Piyush Singh, district magistrate Jitendra Papalkar, Superintendent of Police Amogh Gaonkar and others were present on the occasion.

The chief minister further said that in the unseasonal rain that lashed the district in October, 100 percent of the crops had been damaged. The crops of cotton, Soybean and Tur (Pigeon’s pea) had to face total loss, so in order to give succor to the farmers, provision of 10,000 crore Rupees has been made. The government machinery should take into account the seriousness of the situation and carry on the Panchnamas with immediate effect. For carrying out spot assessment administration should be more sensitive. He said that if necessary more human resource can be made available from Agricultural University and other departments.

      Mr Fadnavis futher said that the loss to the crops in present situation is too large so the financial assistance that will be provided to the farmers will also be huge. He said that the funds that were to be given to farmers during drought, will now be provided to them as they are facing the wet drought situation. He also said that the crop insurance will be a good support to the farmers and peasants in this period of loss.

Mr Fadnavis said that the farmers should be given collective instructions about crop insurance, adding that while giving the benefit of crop insurance, there should be no demand of the receipts of insurance. He also said that the forms required for disbursing the crop insurance should be itself filled in the village.

Mr Fadnavis also said that if the representatives of crop insurance companies are not able to reach the spot, the Panchnama report made by government machinery should be taken into consideration. He also said that the administration should work in coordination with other agencies and the photos related to the damage of crops should also be considered for disbursement of financial assistance.

He said that the farmers are distressed and disappointed as the crops which were near completion, had been totally damaged. He also appealed to the officers and employees to go beyond their jurisdiction to help the farmers, adding that the government will be standing by all those officers and employees who will be working for helping the ryots.

 He also said that the Divisional Commissioner and district magistrate are asked to instruct the responsible administrators to ensure that no reimbursement is being taken from the farmers in this situation of loss.

Mr. Fadnavis suggested to start helpline so that the farmers will not have to face hardships and all the information required will be available at one place. He also said that the loss of crop is widespread and for that the financial assistance will be the maximum, in this present situation. He also asked the officers and employees to work very hard and ensure that the eligible farmers are being provided financial assistance. Mr Fadnavis appealed to the administration to work in ‘Mission mode’ for completion of Pancharamas and helping the farmers. He said that the farmers will be helped by all possible means and no stone will be left unturned.

He said that it is impossible that farmers will get any income out of the Kharif crops so now it is the right time to help them for getting revived. He said that because of good rainfall in last month, the farmers will now be going for the Rabi crops. He also directed the administration to seriously ensure that the seeds of gram, wheat and other Rabi corps are made available for them so that they can sow them for Rabi crops.

District Magistrate Mr. Papalkar presented the information of the district on the occasion.

अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी

अकोला,दि. 3 : ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, सर्वश्री आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.

आपल्या या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी लाखनवाडा येथील संजय त्र्यंबक अघडते यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्या चार एकर शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. अघडते यांच्या शेतात सोयाबीनची नुकसानग्रस्त गंजीही मुख्यमंत्र्यांनी पाहिली. समोरच असलेल्या केशव नामदेव गावंडे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ज्वारीच्या कणसांना पावसामुळे कोंब फुटले आहेत. तसेच मनोहर गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पावसामुळे खराब झालेले आढळून आले.  यावेळी श्री.फडणवीस यांनी शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कापशी रोड येथील गोपाल राऊत यांच्या शेताला भेट दिली.

गोपाल राऊत यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक त्यांनी कापणी करुन तयार केले होते. त्यांच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गंजी लावून ठेवली होती. परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोयाबीनच्या तयार दाण्याना कोंब फुटले व पत्रा शेड गळून पावसाचे पाणी गेल्यामुळे सर्व सोयाबीन खराब झाले आहे.

चिखलगाव येथील कृष्णकांत नारायणराव तिवारी यांच्या कापूस व विनोद नामदेव थोरात यांच्या सोयाबीनच्या पिकाची मुख्यमंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली. परतीच्या प्रवासात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी म्हैसपूर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले.

मुख्यमंत्री ने क्षतिग्रस्त खेती का किया निरीक्षण

अकोला : अक्टूबर के महीने में हुई बैमौसम बारिश ने अकोला जिले की फसलों को गंभीर रूप से नुकसान पहुंचाया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज क्षतिग्रस्त क्षेत्र का निरीक्षण किया। किसानों के खेतों में जाकर, मुख्यमंत्री ने किसानों को आश्वस्त किया। केंद्रीय मानव संसाधन, सूचना और प्रौद्योगिकी राज्य मंत्री संजय धोत्रे, पालक मंत्री डॉ. रणजीत पाटिल, विधायक गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकले, महापौर विजय अग्रवाल, जिलाधिकारी जितेंद्र पापलकर एवं अन्य उपस्थित थे।

अपने इस निरीक्षण दौरे में , मुख्यमंत्री फडणवीस ने लाखनवाड़ा में संजय त्र्यंबक अघडते के खेत का दौरा किया। उनके चार एकड़ कपास के खेतों को नुकसान पहुंचा है। अघडते के खेत में उन्होंने क्षतिग्रस्त सोयाबीन को देखा। इसके सामने ही केशव नामदेव गावंडे के खेत में खड़ी ज्वार के दाने बारिश की वजह से अंकुरित हो गये हैं। इसी तरह, मनोहर गावंडे के खेत में सोयाबीन बारिश के कारण खराब हो गया है। इस अवसर पर श्री फड़नवीस ने किसानों से पूछताछ की और उन्हें मदद का आश्वासन दिया।

इसके बाद मुख्यमंत्री फडणवीस ने कापशी रोड पर गोपाल राउत के खेत का दौरा किया। गोपाल राउत ने अपने खेत से सोयाबीन की कटाई की थी। उन्होंने अपने खेत में स्थित टीन के शेड में फसल के ढेर लगाए थे। लगातार बेमौसम बारिश के कारण, सोयाबीन की फलियों में दाने उग आए और टिन शेड गल जाने के कारण बारिश के पानी से पूरी सोयाबीन फसल खराब हो गयी।

मुख्यमंत्री ने चिखलगांव में कृष्णकांत नारायणराव तिवारी की कपास की फसल और विनोद नामदेव थोरात की सोयाबीन की फसल का निरीक्षण किया। अपने वापसी दौरे में मुख्यमंत्री फडणवीस म्हैसपुर फाटा पर इकट्ठा हुए किसानों से मिले और उनकी बात सुनी तथा उन्हें आश्वस्त किया।

०००

Chief minister Fadnavis inspects the damaged crops in Akola

Akola, November 3:- The crops in Akola district had faced tremendous loss due to unseasonal rains that lashed the district in the month of October. Chief Minister Devendra Fadnavis today took a review of the damage crops in the district. He visited various farms and met farmers giving them solace.

Union minister of state for human resources and information technology minister Mr Sanjay Dhotre, Guardian minister Dr Ranjit Patil, Legislature Govardhan Sharma, Randhir Savarkar, Prakash Bharsakale, Mayor Vijay Agrawal, district magistrate Jitendra Papalkar were also present during the inspection.

The Chief Minister Mr Fadnavis visited the farm of Sanjay Trimbak Aghadte in Lakhanwada village. He reviewed the loss of cotton crops in his four acres of land and also took a stock of the loss to Soybean crop. Opposite to his farm, the CM also visited Keshav Namdev Gawande’s farm where the Jowar crops were sprouted  due to the unseasonal rains that caused havoc in the district.

Mr Fadnavisalso saw the damaged crops of Soyabean in Manohar Gawande’s farm. The chief minister had interaction  with them and assured them of providing financial assistance at the earliest. Later, the Chief Minister visited the farm of Gopal Raut on Kapshi road. Raut had harvested the soybean crops and stored it in a shed in his farm which was also damaged because of dripping of the rain water from the tin shed.

He also took stock of the destroyed soybean crops which were left useless. Mr Fadnavis visited the crops of Krishnakant Narayan Tiwari at Chikhalgaon and Kapashi. He took a stock of the damaged soybean crops of Vinod Namdev Thorat. While returning, the Chief Minister also met the farmers near Mhaispur fata and gave a patience hearing to their grievances. He assured them of sufficient financial assistance at the earliest.

महा चक्रीवादळामुळे उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, दि. 3 : भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा (MAHA) चक्रीवादळामुळे दि. 6 नोव्हेंबर 2019 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील या सूचनेत कळविण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे व कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन

पासबान-ए-अदब या संस्थेतर्फे आयोजित अनुभूती कवी संमेलन

मुंबई, दि.3: पासबान-ए-अदब या संस्थेतर्फे आयोजित अनुभूती कवी संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. श्री.कोश्यारी यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी सर्व कवींचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी खासदार तथा यु.पी. हिंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ.उदय प्रताप सिंह यांना राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. संयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या‘शऊरे अस्र आणि दश्त ए जाँ या पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

हे संमेलन भारतीय भाषा आणि साहित्याच्या प्रचार व प्रसारासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे श्री.खालिद यांनी सांगितले.

कवि संमेलनात कवी प्रा. अशोक चक्रधर, माजी खासदार तथा यु.पी.हिंदी संस्थानचे अध्यक्ष डॉ. उदय प्रताप सिंह, इंदिरा गांधी सेंचर फॉर आर्टस नवी दिल्लीचे निदेशक डॉ. सच्चिदानंद जोशी, दीक्षित दनकौरी, हस्तीमल हस्ती, माया गोविंद, संदीप नाथ, रणजित चौहान, अभिनेते राजपाल यादव उपस्थित होते.

कवी अथर शकील यांच्या तु रश्के जमी, तु रश्के जहाँ मेरे ही हिंदोस्ता… या शेरने काव्य संमेलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ. उदय प्रताप सिंह यांच्या साँस खिंचने की पूर्व ठिक से विचार करे…न मेरा है न तेरा है, हिंदुस्तान सबका है…या काव्यपक्तीने श्रोत्यांच्या टाळ्या घेतल्या.

दीक्षित दनकरी यांनीही श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांच्या ए गझल पास ना आ… गुनगुना लू तुझे… तू सवारे मुझे…मैं सवारे तुझें…या कवितेने श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रा. अशोक चक्रधर यांनीही आपल्या कविता सादर केल्या.

अवकाळी पाऊस पीक नुकसान भरपाईसाठी दहा हजार कोटींची तरतूद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय, केंद्राकडेही निधीची मागणी

मुंबई, दि. 2 : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

राज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहोचली नसेल, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिकनिहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आपत्तीच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडेही वित्तीय सहाय्य मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.  तथापि, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत देईल. राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही विमा कंपन्यांनी तात्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यामध्ये पिकनिहाय नुकसानीचे अंदाजित क्षेत्र, विविध फळपिके, मच्छिमारांचे नुकसान याबाबतही चर्चा झाली. ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नुकसानीची अंतिम आकडेवारी निश्चित होईपर्यंत प्रशासनाने या भरपाईसाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करावी असे निर्देश देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावरून पंचनामा अहवाल प्राप्त होताच कोणत्या पिकांसाठी किती मदत द्यायची हे निश्चित केले जाईल. येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणातील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, पदुममंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, ग्राम विकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी उपस्थित होते. ०००००

अकाली बारिश से हुए फसल के नुकसान के मुआवजे के लिए

दस हजार करोड़ रूपए का प्रावधान

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडल उपसमिति की बैठक में निर्णय,केंद्र की ओर भी की निधि की मांग

मुंबई,दि. 2 : राज्य में अकाली बारिश के कारण हुए फसलों की नुकसान के मुआवजे (भरपाईसाठी) के लिए दस हजार करोड़ रूपए का प्रावधान करने का निर्णय मंत्रिमंडल उपसमिति की बैठक में लिया गया है,यह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज बैठक में बताया।

राज्य में अकाली बारिश और खरीप हंगाम के फसल की नुकसान को लेकर आज मंत्रिमंडल उपसमिति की बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में वर्षा शासकीय निवासस्थान पर बैठक संपन्न हुई। बैठक के बाद मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने सूचना प्रसार माध्यमों को यह जानकारी दी।         मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने कहा कि अकाली बारिश के कारण किसानों का बहुत नुकसान हुआ है। इस नुकसान तथा क्षतिग्रस्त फसलों का पंचनामा करने के निर्देश इसके पहले ही दिए गए है। उसके अनुसार प्रशासन और संबंधित यंत्रणा क्षेत्रीयस्तर पर सक्रिय हुई है। इसके अलावा जहां पर यंत्रणा पहुंची नहीं होगी,ऐसे जगहों पर भी किसानों ने मोबाईल पर फोटो अपलोड करने पर उसे सबूत के रूप में ग्राह्य मानने के निर्देश भी दिए गए है। नुकसान की रिपोर्ट प्राप्त होते ही फसल के अनुसार मुआवजा (भरपाई) निश्चित कर वह सीधे किसानों के खाते में जमा किए जाएंगे। इस आपदा के निवारण के लिए केंद्र सरकार की ओर भी वित्तीय सहायता की मांग का प्रस्ताव भेजा जा रहा है। लेकिन अभी केंद्र के मदद की राह न देखते हुए राज्य सरकार अपने निधि से ही मदद दे रही है। राज्य के तकरीबन पचास लाख किसानों ने पीक बीमा लिया है। उन्हें भी बीमा कंपनियां तत्काल मदद करें,इसके लिए संबंधित कंपनियों को निर्देश दिए गए है।

मंत्रिमंडल उपसमिति की बैठक में राज्य के अकाली बारिश के कारण फसल के नुकसान का विस्तार से जायजा लिया गया। इसमें फसल के अनुसार नुकसान का अनुमानित क्षेत्र,विविध फल के फसल,मछुआरों के नुकसान पर भी चर्चा हुई,हालांकि यह विशेष स्थिति है। इस कारण किसानों को अधिक से अधिक मदद देने को लेकर भी निर्णय लिया गया। नुकसान की अंतिम आकडेवारी निश्चित होने तक प्रशासन ने इस मुआवजे के लिए  तकरीबन दस हजार करोड़ रूपए का प्रावधान करने के निर्देश दिए गए। क्षेत्रीय स्तर पर पंचनामा रिपोर्ट प्राप्त होते ही किसी भी फसलों के लिए कितनी मदद देना है,इसे निश्चित किया जाएगा। आगामी तीन-चार दिनों में इस संदर्भ को लेकर अंतिम निर्णय होगा। उसके बाद सीधे किसानों के खाते में नुकसान मुआवजा (भरपाई) की राशि जमा की जाएगी। किसानों को तत्काल मदद मिले,इसके लिए क्षेत्रीय स्तर पर विविध यंत्रणा ने समन्वय से पंचनामा करने के लिए प्रयास करने के निर्देश दिए गए है। इसके लिए राजस्व,कृषि,कृषि महाविद्यालय,पशू संवर्धन ऐसे विविध यंत्रणा के मानव संसाधन का प्रभावपूर्ण तरीके से उपयोग करने के संदर्भ में भी चर्चा हूई है।

बैठक में राजस्व मंत्री चंद्रकांतदादा पाटिल,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,कृषि मंत्री डॅा. अनिल बोंडे,सामाजिक न्याय मंत्री डॅा. सुरेश खाडे,पदुम मंत्री महादेव जानकर,सहकार मंत्री सुभाष देशमुख,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत,राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता,वित्त विभाग के अपर मुख्य सचिव संजय कुमार,राजस्व विभाग के अपर मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव,मुख्यमंत्री के प्रधान सचिव भूषण गगराणी,सार्वजनिक निर्माणकार्य विभाग के प्रधान सचिव मनोज सौनिक,सहकार विभाग की प्रधान सचिव आभा शुक्ला,कृषि विभाग के सचिव एकनाथ डवले,ग्राम विकास विभाग के  सचिव असीमकुमार गुप्ता,मदद एवं पुनर्वसन विभाग के सचिव किशोर राजे निंबालकर आदि उपस्थित थे।

०००

Provision of rupees ten crore for crop damage reimbursement caused due to erratic rainfall

CM Devendra Fadnavis

A decision was taken in the meeting of cabinet’s subcommittee, financial aid requested at the Centre also

Mumbai, date.2nd: CM Devendra Fadnavis told today that a decision was taken in the meeting of cabinet’s subcommittee. According to the decision, the provision of ten crore rupees is made to reimburse crop damage occurred due to erratic rainfall.

A meeting of cabinet’s subcommittee was held today at official residence Varsha. The meeting took place under the presidency of CM Devendra Fadnavis and the meeting was held regarding the erratic rainfall in the state and crop damage in Kharif season.  CM Shri. Devendra Fadnavis gave the informed media after the meeting.

CM Devendra Fadnavis told, farmers had to suffer loss in a great deal due to erratic rainfall. The creation of damage reports is ordered already.  Administration and related systems are activated on their level. It is also directed that if farmers from such places where system is not accessible upload photos on mobile, it should be accepted as proof.   Crop-wise reimbursement will be decided as soon as damage report is received and the amount of reimbursement will be directly transferred to the farmers’ account. A prospect will be sent to the Central Government requesting financial aid to redress this calamity.   But the State Government will not solely depend on the Central Government’s help and will provide financial aid form its own fund.  Around fifty lakh farmers are crop insured in the state.  Insurance companies should also help them immediately. Related companies are given related instructions.

Crop damage situation in the state due to erratic rainfall was reviewed in the meeting of Cabinet’s subcommittee.  Crop-wise damaged filed, various fruit crops, loss bared by anglers were also in the meeting. This is a crucial situation. Therefore, decision was taken to provide maximum help to the farmers.  Provision of ten crore rupees is directed by the administration as reimbursement until the final damage report is made. As soon as zonal crop damage report is received, reimbursement for each crop will be decided. A final decision will be taken in upcoming few days. Reimbursement will directly transferred to the farmers’ account after that.  Systems on zonal areas are directed to coordinate for reports so farmers will get timely help. Utilizing human resources from Revenue Department, Agriculture Department, agriculture colleges, and animal husbandry were also discussed.

Revenue Minister Chandrakantdada Patil, Water Irrigation Minister Girish Mahajan, Agriculture Minister Dr. Anil Bonde, Social Justice Minister Dr. Suresh Khade, Animal Husbandry Minister  Mahadev Jankar, Co-operation Minister Subhash Deshmukh, Water Irrigation Minister for State Vijay Shivtare, Agriculture Minister for state Sadabhau Khot, Chief Secretary of the state Ajoy Mehta, Upper Chief Secretary of Finance Department Sanjay Kumar, Upper Chief Secretary of Revenue Department Manukumar Srivastava, CM’s Principal Secretary Bhushan Gagrani, Principal Secretary of PWD Manoj Saunik, Principal Secretary of Cooperation Department Abha Shukla,  Secretary of Agriculture Department Eknath Davle, Secretary of Rural Development Department Asimkumar Gupta, Secretary of Relief and Rescue Department  Kishor Raje Nimbalkar were present in the meeting.

०००००

राज्यपालांची बाणगंगा तलावाला भेट; जीर्णोद्धार कार्याची घेतली माहिती

मुंबई, दि. 2 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली तसेच तेथील जीर्णोद्धार व वारसा जतन कार्याची माहिती घेतली.

त्यानंतर राज्यपालांनी जवळच असलेल्या कवळे मठाच्या शांतादुर्गा मंदिरालादेखील भेट दिली. जीएसबी मंदिर विश्वस्तांच्या वतीने यावेळी राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा, नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, महापालिकेचे उपायुक्त प्रवीण गायकवाड, बाणगंगा जतन कार्यात सहकार्य करणाऱ्या आरपीजी फाउंडेशनचे अधिकारी, बाणगंगा तलाव जीएसबी टेम्पल ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे तसेच कवळे मठाचे विश्वस्त भूषण ज्याक आदी उपस्थित होते. 

००००

Governor visits historic Banganga Tank;

takes stock of restoration work

Mumbai Dated 2 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today visited the historic Banganga Tank at Walkeshwar and obtained information about the heritage conservation work being carried out.

The Governor also visited the Kavale Math Shanta Durga Temple for a darshan. He was felicitated by the GSB Temple trustees on the occasion.

Malabar Hill MLA Mangal Prabhat Lodha, Corporator Jyotsna Mehta, Deputy Municipal Commissioner of BMC Pravin Gaikwad, officials of RPG Foundation, Trustee of GSB Temple Trust Pravin Kanvinde and Secretary Bhushan Jack were present.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडून अवकाळीग्रस्त भागाची पाहणी; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

मुंबई दि. 2 : अवकाळी पावसाने तसेच अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परिवहन व खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते हे पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. श्री.रावते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून परिस्थितीची पाहणी करत आहेत.

वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, भावनाताई गवळी, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि नितीन देशमुख हे लोकप्रतिनीधीही संबंधित जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून परिस्थितीची पाहणी करत आहेत. पाहणीनंतर ते मंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडील बैठकीत चर्चा  करणार आहेत.

शेतीपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने तातडीची मदत जाहीर करावी, 3 महिन्याचे वीज देयक माफ करण्याचा निर्णय, शासनाचा पंचनामा ग्राह्य धरत पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश संबंधित विमा कंपन्यांना देण्यात यावेत.  या संदर्भातील निवेदन श्री. रावते यांनी मुख्यमंत्री यांना सादर केले आहे.

छट महापर्व तेजस्वी परंपरा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 2 : आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून सूर्यपुजनाचे विशेष महत्व असणारे छट महापर्व ही त्यापैकीच एक तेजस्वी परंपरा असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

छट उत्सव महासंघातर्फे जुहूबीच, अंधेरी येथे छट पुजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार अमित साटम, श्वेता शालिनी, मनीष झा व मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून विविध सण, उत्सव हे त्याचेच प्रतिक आहेत. निसर्गातील विविध शक्तींचे पूजन आपल्या संस्कृतीत केले जाते. छट महापर्वालाही मोठी परंपरा आहे. यामध्ये सूर्यपुजनाचे विशेष महत्व आहे. उगवत्या सूर्याबरोबरच मावळत्या सूर्याच्या पूजनाचे महत्वही नमूद करण्यात आले आहे. देशभर हे महापर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जात असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी छट उत्सव महासंघातर्फे या महापर्वानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत

दहा हजार कोटींची तरतूद

मुंबई, दि. 2 : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असून पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीयस्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचली नसेल, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पीकनिहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही तत्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीयस्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणातील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यात येवून तातडीने पंचनामे करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले नाही त्या शेतकऱ्यांनी ग्राम किंवा तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्याला तातडीने कळवावे.

सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्र्वस्त केले आहे.

ताज्या बातम्या

धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डॉ. बाबासाहेब

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळेस धुळे शहरास भेट दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार ललित चव्हाण यांनी...

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री शंभुराज देसाई यांची...

0
गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती कोल्हापूर, दि.१२ : राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत...

डॉ. आंबेडकर कृषिक्रांतीचे जनक

0
परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांचे, अस्पृश्यांचे प्रश्नच सोडविले असे नाही, तर त्यांनी या देशाच्या विविध प्रश्नांचा मूलगामी विचार केला. त्यांची मूलभूत...

जागा निश्चिती होताच आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार – उद्योग मंत्री उदय सामंत यांची...

0
गुंतवणूक परिषदेत १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सहकारी बँकांमधूनही होणार कर्जपुरवठा; येत्या पंधरा दिवसांत शासन निर्णय काढण्याची उद्योग...

राजधानी दिल्लीशी डॉ. बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे नातं…..

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत गेला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिल्लीचे एक वेगळे नातेही निर्माण झाले.  ब्रिटिश सरकारच्या  म्हणजे प्रांतीय मंत्रिमंडळात...