शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1613

‘इंडिया अँड द नेदरलँड्स इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दिनांक. १७ : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांतया प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई इथे उद्घाटन करण्यात आले.

शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई व रिज्क्स म्युझियम, ॲमस्टरडॅम यांच्यातील हा एक संयुक्त उपक्रम आहे. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, प्रदर्शन दालनात दि. १७ ऑक्टोबर २०१९ ते १६ डिसेंबर २०१९या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.

शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक श्री. सब्यासाची मुखर्जी, माध्यम व विकास रिज्क्स म्युझियमचे संचालक, हेन्द्रीज क्रीबोल्दर व नेदरलँड्चे भारतीय राजदूत गिडो टीलमन यावेळी उपस्थित होते.

नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांची मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला भेट

मुंबई, दि. 17 : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. त्यांच्या पाच दिवसीय भारत भेटीतील हा एक भाग होता. भारत व नेदरलँड यांच्यातील भूतकालीन, वर्तमान व भविष्यकालीन मैत्रीचे प्रतीक म्हणून गेट वे ऑफ इंडियाला डच राष्ट्रीय रंग असलेल्या भगव्या दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आले. त्याचबरोबर डच राष्ट्रीय फूल- ट्युलिपने या परिसरात सजावट करण्यात आली. स्थानिक इतिहासकार सिमीन पटेल यांनी शाही दांपत्याला स्मारकाची माहिती दिली.

नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन

मुंबई, दि. 17 : नेदरलँड‌्सचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत जलद व टिकाऊ बंदर विकास, पर्यावरणाचे संरक्षण, समुद्री शिक्षण व धोरण इ. मुद्द्यांवर भर देण्यात आला. शाही दांपत्याने समुद्री शिक्षण या मुद्द्यावर भर असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीत समुद्री शिक्षणासंबंधी लेटर ऑफ इंटेंट (एलआयओ) व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व रॉटर पोर्ट यांच्यातील सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.

व्हिएनओ-एनसीडब्लूचे उपसंचालक इनेक दिझेन्त्ज हॅमिंग व मुंबई बंदर व भारतीय बंदर प्राधिकरणाचे चेअरमन श्री. संजय भाटिया यावेळी उपस्थित होते.

नेदरलँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय उद्योजकांचा नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर यांच्याशी संवाद

मुंबई, दि. 17 : नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांनी नेदरलँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय उद्योजकांशी हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट घेऊन संवाद साधला. द नेदरलँड्स फॉरेन इन्व्हेस्टमेंट एजन्सी (एनएफआयए) ही अर्थ व पर्यावरण धोरण विभागाची कार्यकारी घटक आहे. त्याचे भारतातील कार्यालय गेल्या बारा वर्षापासून कार्यरत आहे. कार्यकारी संचालक श्री. अर्नोउद बेसेलिंग त्याचे प्रमुख आहेत.

मुंबई, बंगलोर व दिल्ली येथील दूतावासात त्यांच्या कार्यशील टीम आहेत. भारतीय निर्यातीच्या एकूण वीस टक्के निर्यात ही नेदरलँडमार्गे युरोपमध्ये केली जाते व नेदरलँडला भारतासाठी युरोपचे प्रवेशद्वार समजले जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात भारतीय उद्योजक उपस्थित होते.

नेदरलँड्सच्या शाही दांपत्याचे राजभवन येथे स्वागत

मुंबई, दि. 17 : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा  यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.  यावेळी शासनाच्या वतीने राज्यपालांनी शाही दांपत्याचे स्वागत केले.

नेदरलँडमध्ये अनेक भारतीय वंशाचे लोक राहत असून तेथील उद्योग,माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देत असल्याचे राजे विलेम-अलेक्झांडर यांनी सांगितले. भारतीय योग नेदरलँडमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी व फलोत्पादन  पायाभूत सुविधा,जागतिक पर्यावरणातील बदल,सांस्कृतिक संबंध या विषयांवर चर्चा झाली.

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी देशातील सर्वांत पसंतीचे राज्य असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

बैठकीनंतर राज्यपालांनी  शाही दांपत्याला राजभवन परिसराची सैर करविली. ०००००

King Willem – Alexander and Queen Maxima of Netherlands meet Maharashtra Governor

Mumbai dated 17:King Willem-Alexander and Queen Maxima of the Netherlands met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at the Governor’s sea-side residence Raj Bhavan in Mumbai on Thursday (17th Oct).

King Willem – Alexander told the Governor India and Netherlands have shared a long history of trade and cooperation. He said many Indian companies, especially those from the Information Technology sector are  operating from the Netherlands.

The King said Netherland has a large population of Indian expats who are making handsome contribution to the economy of his country.

Issues of mutual cooperation in the areas of agriculture, horticulture, water and sanitation and climate change were discussed during the meeting. The King and Queen of the Netherlands were accompanied by a high level delegation.

The Governor told the royal dignitaries that Maharashtra is the most investment – friendly destination in the country offering avenues of cooperation in several areas.

The Royal visitors are currently on a State visit to India on the invitation of President of India Ram Nath Kovind. They were accompanied by the Dutch Minister of Foreign Affairs Stef Blok and a high level official delegation.

Information provided by the Consulate of the Netherlands in Mumbai

His Majesty King Willem-Alexander and Her Majesty Queen Máxima are in the Republic of India for a State Visit at the invitation of President Ram Nath Kovind. The visit is taking place from14to18October, and includes the cities of New Delhi, Mumbai and the state of Kerala. The State Visit is set to reaffirm the excellent relations between India and the Netherlands. It will focus on key sectors like water technology, maritime development, healthcare, sustainable agriculture, social initiatives & cultural heritage. The King and Queen will be accompanied on their visit by Stef Blok, Minister of Foreign Affairs & the Minister for Foreign Trade and Development Cooperation, Sigrid Kaag depending on the programs. The State Visit will have a broad parallel trade mission to India which is set to explore potential for further economic partnerships between both countries. Also visiting with the trade mission are the Minister for Healthcare, Bruno Bruins, and the State Secretary for Economic Affairs and Climate Policy, Mona Keijzer.

००००

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई,दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावाए यासाठी मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोव्हेंबर  महिन्यात  जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा- कॉलेजमधील इच्छुक कलावंत स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या युवा महोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ते २९ वयोगटातील कलाकारांसाठी आहे.

लोकनृत्य, लोकगीत,एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीत, सितार, गिटार, बासरी, तबला, वीणा, मृदुंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य, मणीपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, वक्तृत्व यात सहभागी होणाऱ्या कलावंतांनी 15नोव्हेंबर 2019 पर्यंत आपल्या प्रवेशिका dsomumbaisub@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

मुंबई, दि. 17 – महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप…

एकूण मतदार

·      महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.

·      महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.

·      यामध्ये पुरुष मतदार – 4 कोटी  68 लाख 75 हजार, 750

·      महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635,

·      तृतीयपंथी मतदार-  2 हजार 634 आहेत.

·      दिव्यांग मतदार – 3 लाख 96 हजार आहेत

·      सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत

 मतदार जनजागृती

·      आतापर्यंत 20.8 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी 14.40 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली.

 जनजागृतीसाठी सदिच्छादूत

·      मतदार जागृतीच्या मोहिमेत‘सदिच्छादूतम्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

मतदान केंद्रे 

·      विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत.

मुख्य मतदान केंद्र– 95, 473

सहायक मतदान केंद्र– 1,188

·      खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352सखी मतदान केंद्रेस्थापन केली जातील.

मतदारांसाठी सोयी-सुविधा

·      किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील.

·      दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे.

·      सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था

·      दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.

·      अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.

·      लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

 दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना

·      ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत.

·      पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी आहे, तिथे लिफ्टची व्यवस्था. 

यंत्रणा सज्ज

·      विधानसभा निवडणुकीसाठी  1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

·      विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

 मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

·      मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्याhttps://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

·      या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदारांच्या सुविधेसाठी

·      आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.

·      ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिताGPS Tracking App,

·      मतदारांच्या मदतीसाठी‘व्होटर हेल्पलाईन-1950. या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.

·      मतदारांसाठी‘व्होटर हेल्पलाईन ॲपही सुरु.

·      दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

·      मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.

·      भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

1.  पासपोर्ट (पारपत्र)

2. वाहन चालक परवाना

3 छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,

  सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

4.                       छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक

5.                        पॅनकार्ड 

6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती

निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

7.                       मनरेगा जॉबकार्ड

8.कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

10.                   खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11.                    आधारकार्ड

००००

दिव्यांगांकडून होणार १०६ मतदार केंद्रांचे संचालन; मतदान केंद्राध्यक्षासह सर्वच कामांसाठी दिव्यांगांची नियुक्ती

मुंबई, दि. 17 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 106 मतदान केंद्रे ही दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 8 मतदान केंद्रे ही लातूर शहर मतदारसंघातील असून त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात 6 मतदान केंद्रे ही दिव्यांग संचालित असतील.

निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तींना निवडणूकविषयक कामे देऊ नये, असे निर्देश दिले असले तरी दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे सर्व कामे करू शकतात ही बाब सिद्ध करण्यासाठी निवडणूकविषयक कामात त्यांना सहभागी करून घेतले जात आहे.

विद्यार्थ्यांचे सहाय्य

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना त्यांच्या शारीरिक मर्यादा/विकलांगतेमुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करण्यात अडथळे येऊ नये, त्यांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

शाळा, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच नागरी संरक्षण विभाग, आपत्त्कालीन परिस्थितीत काम करणारे स्वयंसेवक व गृहरक्षक दल यांची मदतनीस/स्वयंसेवक म्हणून निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर दिव्यांग आल्यानंतर त्यांच्या वाहनापासून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत त्या वाहनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी हे स्वयंसेवक पार पाडतील. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, पाणी, गरज भासल्यास प्रसाधनगृह व प्रथमोपचार यांची उपलब्धता करून देण्याचे काम हे स्वयंसेवक करतील. या अनुषंगाने या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/17.10.2019

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत

मुंबई,दि.१७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘जय महाराष्ट्र’व  ‘दिलखुलास’कार्यक्रमात प्रधानसचिव  व मुख्य  निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांचीविधानसभा निवडणूक तयारीया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.  ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरउद्याशुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. १८ आणि सोमवार  दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.   ‘दिलखुलास’हा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’या ॲपवरही  शुक्रवार दि. १८ आणि सोमवार  दि. २१ ऑक्टोबर  २०१९  रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत  ऐकता येईल.  निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांकरिता मतदारसंघातील तयारी,विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर,मतदानात युवक व महिलांची टक्केवारी वाढण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न,भारत निवडणूक आयोगाच्या’स्वीप’या उपक्रमाचे यश,राज्यात मतदार जनजागृतीसाठी सदिच्छादूतांचा सहभाग,राज्यातील एकूण मतदार संख्या,मतदार केंद्रे,प्रत्यक्ष मतदानादिवशी मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या  सोयीसुविधा,  दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना,ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बद्दलचा संभ्रम दूर करण्याकरिता होत असलेले प्रयत्न,राज्यातील  सर्व्हिस वोटरची संख्या,  या विषयांची माहिती श्री.बलदेव सिंह यांनी’जय महाराष्ट्र’आणि  ‘दिलखुलास’कार्यक्रमातून दिली आहे.

नवउद्यमींच्या आत्मविश्वासू, नाविन्यपूर्ण संकल्पनामुळे देशाच्या आर्थिक विकासात भर – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

आयओडी एमएसएमई समीट २०१९चे उद्घाटन

मुंबई, दि. १६ : देशाच्या आर्थिक विकासात उद्यमशीलतेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नवउद्योजकांचा आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण संकल्पना यामुळे देशाच्या आर्थिक विकास वाढीत भर पडेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.  केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास मंत्रालय, एसडीए बोकोनी- एशिया सेंटर यांच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी आयोजित केलेल्या पहिल्या आयओडी एमएसएमई समीट२०१९या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता क्षेत्राशी निगडीत शिखर परिषदेचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकासाच्या दृष्टीने अनेकविध प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवउद्योजकांसाठी या क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योजकांनाही स्वयं..मृगेंद्रताया उक्तीनुसार आत्मविश्वासाने प्रवेश करावा लागेल. त्यासाठी अलीकडच्या काळातील स्टार्ट-अपची उदाहरणेही प्रेरणादायी आहेत.  प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटीच त्यांना या क्षेत्रात यश देऊ शकते, हे पुढे आले आहे. अशा नवउद्योजकांना वित्तीय पुरवठाही सुलभपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. उद्योग वाढीसाठी आवश्यक अशा विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नवउद्योजकांनी आता नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन या क्षेत्रात आत्मविश्वासानेच प्रवेश करावा, असेही त्यांनी सांगितले.

उद्घाटन सत्रात एसडीए बोकोनी-एशिया सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक अलेसांड्रो गुईलियानी यांनी प्रास्ताविक केले. आयओडीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती यांनी परिषदेची संकल्पना स्पष्ट केली. एसडीए-बोकोनीचे अधिष्ठाता डेव्हीड बार्दोले, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक ए. आर. गोखे यांची भाषणे झाली. आयओडीचे पश्चिम विभागीय संचालक विकेश वालिया यांनी स्वागत केले आणि आभार मानले.

डीकोडींग एमएसएमई ग्रोथ ऑपर्च्युनिटीजया संकल्पनेवर आधारित या एक दिवसीय परिषदेत या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आदी मान्यवर पाच विविध सत्रात मांडणी करणार आहेत. 

ताज्या बातम्या

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणा व शौर्याचे प्रतिक - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगर, दि.18 एप्रिल, (विमाका) : महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त होते...

आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन

0
वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह भीमालपेन जन्मोत्सव यात्रेला उपस्थिती नागपूर, दि 18 : कुवारा भिवसन देवस्थान पंचकमेटी, भिवगड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही...

सुराबर्डीत होणार भव्य गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय; ३० मे पूर्वी सर्व प्रक्रियेची पूर्तता करा...

0
जून महिन्यात होणार कामाला सुरुवात  नागपूर, दि 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आदिवासी समाजाची संस्कृती जगासमोर यावी यासाठी सुराबर्डी येथे...

भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व परिसरात अध्यासन इमारतीचे भूमीपूजन कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज...

रुग्णांना दर्जेदार सेवा द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर दि : 18 (जिमाका ) राज्य शासन धर्मदाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते. या धर्मदाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व सौजन्यपूर्वक सेवा...