शनिवार, एप्रिल 19, 2025
Home Blog Page 1612

राज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान

मुंबई, दि. 22 : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. तसेच सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मतदानाची अंतिम आकडेवारी आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केली. राज्यात 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 पुरुष, 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 स्त्रिया आणि 2 हजार 637 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदारांपैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये 2 कोटी 94 लाख 73 हजार 184 पुरूष, 2 कोटी 53 लाख 64 हजार 665 स्त्रिया आणि 666 तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती देखील श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान

सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचे पुरुष, स्त्री, तृतीयपंथी आणि एकूण मतदार तसेच कंसात मतदानाचा हक्क बजावेले मतदार यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : पुरुष- 9 लाख 40 हजार 751 (6 लाख 45 हजार 248), स्त्री- 9 लाख 9 हजार 497 (5 लाख 94 हजार 287), तृतीयपंथी- 145 (13), एकूण- 18 लाख 50 हजार 393 (12 लाख 39 हजार 548). या निवडणुकीत पुरुष 68.71, स्त्री- 65.56, तृतीयपंथी- 27.83 याप्रमाणे एकूण 67.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. 21 : गेल्या संपूर्ण वर्षात देशाच्या विविध पोलीस दलातील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. देशाच्या विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या 31 पोलीस अधिकारी आणि 261 पोलीस अंमलदारांची नावे यावेळी वाचून दाखविण्यात आली.

नायगाव पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी राज्यपालांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पुष्पचक्र वाहिले.

कार्यक्रमाला विविध देशांचे राजनैयिक प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील आजी व माजी ज्येष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor pays tributes to police martyrs on Police Commemoration Day; meets family members of martyrs

Mumbai 21 :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today placed a wreath and offered tributes at the Police Martyrs’ Memorial on the occasion of Police Commemoration Day.

The Police Martyrs’ Commemoration Day function organised by the Directorate General of Maharashtra Police was held at the Naigaum Police Ground in Mumbai on Monday (21 Oct).

The Governor read out a message paying tributes to the brave police officers and personnel who laid down their lives in the line of duty on this occasion.  The Governor then met the family members of the police martyrs.

State Chief Secretary Ajoy Mehta, Director General of Maharashtra Police Subodh Jaiswal and Commissioner of Mumbai Police Sanjay Barve also laid wreaths at the Martyrs’ Memorial on the occasion.The Commemoration Day started with the presentation of ‘Shok Shastra’. Names of 31 police officers and 261 police personnel from across the country who laid down their lives in the line of duty last year were read out.

The parade presented a general salute and fired three rounds on this occasion. The programme concluded with the playing of the Bigular’s ‘Last Post’ and ‘Rouse’.Diplomats from various countries and senior serving and retired police officers were present on the occasion.

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला

मुंबई, दि. 21 : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

मलबार हिल मतदार संघाच्या रॅाकहील भागातील बालकल्याणी स्कूल या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले असून ‘मी मतदान केले, तुम्ही सुद्धा अवश्य करा’ असे आवाहनही  मतदारांना केले.

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केले मतदान

मुंबई दि. 21 :मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुपुत्र शिवाजी मेहता यांच्या समवेत पेडर रोडजवळील ॲक्टिव्हिटी हायस्कुलच्या केंद्रात जाऊन मतदान केले.मी मतदान केले आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

मुंबई, दि. 21 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावे असे आवाहन करीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

कुलाबा विधानसभा मतदार संघातील के सी महाविद्यालय या मतदान केंद्रावर जावुन त्यांनी मतदान केले.त्यांच्यासह शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, माहिती तंञज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास,सचिव श्रीमती कुंदन, सचिव पराग जैन, माजी पोलीस महासंचालक जावेद अहमद तसेच परिसरातील नव मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच लोकशाहीसाठी मतदान अवश्य करा, असे आवाहनही मतदारांना केले.

राज्यात शांततेत व सुरळीतपणे मतदान विधानसभेसाठी ६०.४६ टक्के मतदान – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 64.25 टक्के मतदान मुंबई, दि. 21 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.   राज्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी सांगताना श्री. सिंह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही. 

राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.

जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे

अहमदनगर 64.93 टक्के, अकोला 56.88 टक्के, अमरावती 59.33, औरंगाबाद 65.06, बीड 68.03, भंडारा 66.35, बुलढाणा 64.41, चंद्रपूर 63.42, धुळे 61.90, गडचिरोली 68.59, गोंदिया 64.06, हिंगोली 68.67, जळगाव 58.60, जालना 67.09, कोल्हापूर 73.62, लातूर 61.77, मुंबई शहर 48.63, मुंबई उपनगर 51.17, नागपूर 57.44, नांदेड 65.40, नंदुरबार 65.50, नाशिक 59.44, पालघर 59.32, परभणी 67.41, पुणे 57.74, रायगड 65.90, रत्नागिरी 58.59, सांगली 66.63, सातारा 66.60, सिंधुदुर्ग 64.57, सोलापूर 64.23, ठाणे 47.91, उस्मानाबाद 62.21, वर्धा 62.17, वाशिम 61.33 आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले.

इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रत्यक्ष वापरात 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आज प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.

प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात / बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.

इव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 152, शिवसेना 89 व इतर 120 अशा एकूण 361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आलेल्या आहेत.

मतदानाची वैशिष्ट्ये :-

महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-

पुणे जिल्ह्यातील 215-कसबापेठ मतदारसंघामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून प्रथमच ‘बार कोडींग’चा वापर करण्यात आला.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एकूण 5 हजार 435 इतकी मतदान केंद्रे वरच्या मजल्यावरुन तळ मजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

अतिवृष्टी झाल्यामुळे 259-कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 31 या केंद्राचे स्थलांतर मतदानाच्या आदल्यादिवशी करण्यात आले.

काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पोलिंग पार्टीच्या दळणवळणामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र पोलिंग पार्टी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मतदान सुरळीतपणे पार पाडण्यात आले. 

रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीजनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले.

शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही, मतदानाचे प्रमाण चांगले राहिले आहे.

आदर्श आचारसंहिता (एमसीसी) :-

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एफएसटी(1567), एसएसटी (1660), व्हीएसटी (1092) इतकी पथके नेमण्यात आली होती. या व्यतिरिक्त दक्ष नागरिकांना आचारसंहिता भंगाची प्रकरणे नोंदविण्यासाठी आयोगाने सी- व्हिजिल हे अँड्रॉईड ॲप उपलब्ध करुन दिले होते.

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) :- 

राजकीय पक्षांच्या  व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टिफिकेशन अँण्ड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी  यांच्या अध्यक्षतेखालील  समिती समोर ऑडीओ, व्हिडीओ व पोस्टरसाठी आतापर्यंत पुढीलप्रमाणे विविध राजकीय पक्षाकडून  विनंती प्राप्त झाली आहे.  

राजकीय पक्ष

मंजूर

एकूण

आक्षेप

एकूण

ऑडीओ

व्हिडीओ

पोस्टर

पथनाट्य

ऑडीओ

व्हिडीओ

पोस्टर

पथनाट्य

शिवसेना

37

39

230

306

15

8

30

53

भारतीय जनता पक्ष

20

72

200

8

300

9

17

29

5

60

वंचित बहूजन आघाडी

9

3

11

23

8

1

9

काँग्रेस

5

15

7

27

5

6

11

राष्ट्रवादी कॉंग्रेस

7

9

2

18

1

1

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

8

8

1

1

एकूण

86

138

450

8

682

31

39

60

5

135

वरील दोन्ही समितीच्या निर्णयाविरुद्ध अपिल करण्याकरिता  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती समोर आजच एक पेड न्यूज संदर्भातील अपील दाखल झाले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. एकच अपील प्राप्त झाले आहे हे पाहता वरील दोन्ही समित्यांनी त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत, असे स्पष्ट होत आहे.

सोशल मिडिया मॉनिटरिंग

पोलीस विभागाच्या सायबर शाखेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत सोशल मिडियाचे निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने मॉनिटरिंग करण्यात आले.

जप्तीची प्रकरणे (सीझर्स) :-

आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये सदुसष्ट कोटी बावन्न लाख (67.52) इतकी रोख रक्कम, रुपये चौप्पन्न कोटी पन्नास लाख (54.50) रकमेचे सोने, रुपये तेवीस कोटी एकवीस लाख (23.21) रकमेचे मद्य व रुपये वीस कोटी पंच्याहत्तर लाख (20.75) मादक पदार्थ, याप्रमाणे एकूण रुपये एकशे पासष्ट कोटी नव्यान्नव लाख (165.99) इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. आचार संहितेच्या उलंघनाबाबत 2124 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याव्यतिरिक्त Prohibition Act, Food & Drugs Act या कायद्याखाली 11506  इतके गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मतदार यादी :-

सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.  मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता स्वीप’अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा खुप चांगला परिणाम झाला. व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 (8,85,65,547) च्या तुलनेत विधानसभा निवडणूक – 2019 मध्ये मतदारांची संख्या 8,98,39,600 इतकी झाली. म्हणजेच मतदारांची संख्या 2,74,053 ने वाढली.

दिव्यांग मतदार :-

भारत निवडणूक आयोगाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी’सुलभ निवडणूका‘ (Accessible Elections) हे घोषवाक्य जाहीर केले होते. याअंतर्गत दिव्यांग मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना मतदान करणे सुलभ व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. त्याचे चांगले फलित म्हणून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये 3,09,233 इतके दिव्यांग मतदार होते परंतू यावेळी सुमारे तीन लाख शहाण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर (3,96,673) इतक्या दिव्यांग व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे 90 हजार नवीन दिव्यांग  मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

मतदान केंद्र :

यावेळी एकूण शहाण्णव हजार सहाशे ऐकसष्ठ (96,661) इतक्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सन 2014 च्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये एकूण आठ हजार एकशे एकसष्ठ (8,161) इतकी वाढ झाली आहे. तसेच आताच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान केंद्रांमध्ये सखी मतदान केंद्र-352, आदर्श मतदान केंद्र-288 दिव्यांग मतदान केंद्र-106 व वेब कास्टिंग-10013 याही मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक कर्मचारी :-

       संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे सात लाख पन्नास हजार (7,49,374) इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे एक लाख चार हजार (1,04,000) इतक्या पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रमाणे सुमारे साडे आठ लाख (8,50,000) इतके कर्मचारी या  निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.

        गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69-अहेरी या मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले एक पोलीस अधिकारी श्री. बापू पांडू गावडे (वय 45 वर्षे ) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने चंद्रपूर येथील शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पंरतु उपचारादरम्यान दुपारी 1-30 वाजता मृत्यू झाला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले शिक्षक श्री. सर्जेराव भोसले यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

       तसेच ठाणे येथील नुतन शाळा, रामबाग या ठिकाणी बंदोबस्तावर नेमण्यात आलेल्या श्री. जयराम तरे (बक्कल नंबर 5352) वय 48 वर्षे यांना ह्रदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांना वेळीच इस्पितळामध्ये दाखल करण्यत आले. आता त्यांच्या जीवावरील धोका टळलेला आहे.

०००००

निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बसेस आरक्षित

मुंबई, दि. 20 : विधानसभेच्या उद्या दिनांक21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. त्यामुळे उद्या एसटीच्या राज्यभरातील विविध मार्गावरील सुमारे18 हजार दैनंदिन फेऱ्या पैकी5 हजार फेऱ्या अंशत: अथवा पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

एसटीच्या फेऱ्या कमी होणार असल्या तरी दि.21 तारखेला मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील सुट्टी असल्याने त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होणार नाही. दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीकोनातून आवश्यक त्या मार्गावर बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ज्या मार्गावर दिवसभरात जास्त फेऱ्या आहेत अशा मार्गावरील  फेऱ्या कमी करून, एखाद दुसरी फेरी असणाऱ्या मार्गावर सोडण्यात याव्यात. तसेच कोणत्याही मार्गावरील अत्यावश्यक फेऱ्या बंद न करण्याचे निर्देशही एसटी प्रशासनाकडून दिले आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी बसेस निवडणूक कामकाजासाठी गेल्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर अंशत: परिणाम होऊ शकतो, असेही महामंडळाने कळविले आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्तेपरमार्थ रत्न 2019′ पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान

मुंबई, दि. 20 : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

परमार्थ सेवा समितीद्वारे दिला जाणारा’परमार्थ रत्न 2019′  पुरस्कार श्रीमती अमला रुईया यांना राज्यपालांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीद्वारे हॉटेल सहारा स्टार येथे दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रामप्रकाश बुबना उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, भारतीय संस्कृती तिच्या मूल्यांमुळे जगात सर्वश्रेष्ठ ठरते. 100 हातांनी जमा केले असेल, तर हजार हातांनी त्याचे दान करावे असे आपली संस्कृती सांगते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण हाच मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. श्वसनासाठी आपण जो प्राणवायू वापरतो, त्याच्या कितीतरी पट अधिक प्राणवायू निर्माण होण्यासाठी झाडे लावली पाहिजेत.

राज्यपाल म्हणाले, जलसंधारणाच्या क्षेत्रात श्रीमती रुईया यांचे कार्य मोठे आहे. इतरांसाठी केलेले छोटे कामही मोठे असते. म्हणून आपण सर्वांनी श्रीमती रुईया यांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे. त्यांचे कार्य समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन श्री.कोश्यारी यांनी उपस्थितांना केले.

सत्काराला उत्तर देताना अमला रुईया म्हणाल्या, या पुरस्कारामुळे जलसंधारणाच्या क्षेत्रात आणखी जोमाने काम करण्यासाठी मला नवी ऊर्जा मिळाली आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद आहे असे मी समजते.

प्रास्ताविक परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियानी यांनी केले. आभार सचिव रवि लालपुरीया यांनी मानले. यावेळी मंचावर समितीचे प्रेसिडेंट गोपाल बियानी, विश्वस्त रामविलास हुरकट, मनमोहन गोयंका आदी उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह अंकाचे अतिथी संपादक

मुंबई, दि. 19 : ‘आपलं मंत्रालयच्या सप्टेंबरच्या विधानसभा निवडणूक 2019’च्या विशेषांकाचे प्रकाशन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या हस्ते आज येथे झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या विशेषांकात निवडणूकविषयक विविध माहितीपूर्ण लेखांचा समावेश आहे. आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता काळात घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये, निवडणुकीतील सोशल मीडिया, सी-व्हिजील अॅप, निवडणूक चिन्ह, निवडणुकीत वापरली जाणारी शाई, घ्यावयाची खबरदारी, जनजागृती मोहीम, निवडणूक प्रक्रिया याबाबतच्या माहितीपूर्ण लेखांचा यात समावेश आहे.

निवडणुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा होणार वापर

मुंबई, दि.19 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक-व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) 288 मतदारसंघात पाठविण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी288 मतदारसंघातील 96 हजार 661 मतदान केंद्रावर 1 लाख 80 हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), 1 लाख 27 हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि  राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.

निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्त्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम2019च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर  करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी...

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा दि. 19: कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

0
मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,...

सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम

0
मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार, 20 एप्रिल,...

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
बीड, दि. 19 :  बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93...