मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
Home Blog Page 1651

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            कोल्हापूरदि. 11 (जिमाका) : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजीपालकमंत्री दीपक केसरकरराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरआमदार प्रकाश आबिटकरखासदार संजय मंडलिकविभागीय आयुक्त सौरभ रावकोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हाधिकारी राहुल रेखावारकोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाणपोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेमाजी आमदार अमल महाडिकमठाचे विश्वस्त उदय सावंतसंतोष पाटील आदी उपस्थित होते.

               मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसध्या जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जलवायूध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होत आहेत. पंचमहाभूतांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.  पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे घेण्यात येणारा सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल व या ठिकाणी भेट देऊन जाणारा प्रत्येक नागरिक पुढील काळात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            पर्यावरण पूरक असलेली सेंद्रिय शेती खूप उपयुक्त असून राज्य शासन ही सेंद्रिय शेतीसाठी प्राधान्य देत आहे. सेंद्रिय शेतीचे उत्पादन घेणाऱ्या बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हा स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगून सेंद्रिय शेतीमुळे शेती पिकांच्या उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कणेरी मठावर घेण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. या महोत्सव कालावधीत येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी विशेषत: शेतकरी बांधवांनी येथील सेंद्रिय शेतीला भेट देऊन या पद्धतीची शेती आपण स्वतः करण्याबाबतचा निश्चय करावाअसे आवाहन त्यांनी केले. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेलअशी ग्वाही ही त्यांनी दिली.

            याठिकाणी उभारण्यात आलेल्या आकाशवायूअग्नीजलपृथ्वी ही पंचमहाभूते व आयुर्वेद यावर आधारित सहा दालनांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंचमहाभूतांची निर्मितीत्यांचे उपयोगमानवाकडून पंचमहाभूतांचा होणारा दुरुपयोग आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती येथील दालनांमध्ये देण्यात आली आहे. त्रिमिती मॉडेलमाहितीपत्रकध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात येत असून या ठिकाणी भेट देणारा प्रत्येक नागरिक हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश येथून घेऊन जाईलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            यावेळी श्री सिद्धगिरी मठ येथील महादेवाचे दर्शन घेतले. तसेच 1100 देशी गायींच्या गोशालेची पाहणी केली. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलची पाहणी करुन याठिकाणी देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतली.

यानंतर गुरुकुलला भेट देवून गुरुकुल शिक्षणपद्धतीची माहिती घेतली. येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केलेल्या योगाची प्रात्यक्षिकेरोप योगाबौद्धिक प्रात्यक्षिकेवैदिक गणितआदी कलागुणांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरुन कौतुक केले. तसेच देशाच्या उन्नतीसाठी हातभार लागेल असे नावीन्यपूर्ण उपक्रम गुरुकुल शिक्षण पद्धती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात येत आहेतअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मुख्यमंत्री महोदयांना सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेली गोशालागुरुकुल शिक्षण पद्धतीकृषी विज्ञान केंद्रहॉस्पिटल सह आदींची माहिती दिली. या महोत्सवात शेकडो स्टॉल लावले जाणार आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या महत्वपूर्ण लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महिला बचत गटांचेही स्टॉल उभारले जाणार आहेत.

‘उष्णतेच्या लाटा: आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा

          मुंबई, दि. ११ : ‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणभारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई)नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील व  महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

            या कार्यशाळेचे उद्घाटन दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ताआपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थीआयआयटीचे संचालक डॉ. सुभाशीस चौधरीआपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.५०  ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ‘वातावरण बदल आणि उपाययोजना’ याविषयी दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहेत. दि. १४ तारखेला ‘उष्णतेच्या लाटा टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना’, राष्ट्रीय, राज्य, जिल्हे आणि गावपातळीवर राबवावयाच्या उपाययोजना या विषयावर सकाळी ९.३० पासून दुपारी २.३० पर्यंत चर्चासत्र होणार आहेत.

उष्माघातामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळणे

         जगभरात वातावरणात अनेक बदल होत आहेत. अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरण बदल आणि मानाकनांनुसार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढली आहे. सन 2004 ते 2019 दरम्यान पंधरापैकी अकरा सर्वात उष्ण वर्षे आली होती. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. या विषयाच्या अनुषंगाने या दोन दिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे.

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट

            उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था आणि या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येवून उष्णतेच्या लाटांबाबत उपाययोजना, तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा बनविणे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रम अंमलबजावणीसमन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुषंगाने या कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यापीठांनी देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

            मुंबईदि. 11 : एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण होईलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  

            आज एचएसएनसी समूह विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ एचएसएनसी विद्यापीठरमा सुंदरी वाटूमल सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी पद्मश्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरविद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानीएचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीशमाजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.

             यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले कीअध्यात्मावर आधारित आपल्या देशाची संस्कृती महान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. आपली शिक्षण पद्धती ही आदर्श असून अनेक देशांनी तिचा स्वीकारही केला आहे. ज्याप्रमाणे आज योगाभ्यास शिकण्यासाठी अनेक देशातील नागरिक आपल्या देशात येत आहेत त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही इतर देशातील नागरिक आपल्या देशाला नक्कीच प्राधान्य देत आहे. तसेच विद्यापीठांनी रोजगारक्षम तरूण पिढी घडवावी, अशी आशाही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या देशातील मातृशक्ती महान असून महिलांना नेहमीच सर्वेच्च स्थान दिले आहे. आज आपल्या देशातील महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आज आयएएस परिक्षा पास होणाऱ्या यादीत पहिल्या तीन महिला आहेत. तसेच या विद्यापीठात विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करतानाही मुलींची संख्या जास्त आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नाही नोकरी किंवा व्यवसाय करताना प्रामाणिकपणे कष्ट केल्याने यश नक्की मिळते. या तत्वाचा अवलंब करून समाजासमोर आदर्श निर्माण करावाअसेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.

भारतीय असल्याचा मला अभिमान

         पद्मश्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणालेभारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण आपल्या देशाची संस्कृती महान आहे आणि अर्थातच आपली शिक्षण पद्धती खूप चांगली आहे. ज्ञानबुद्धीआचारसमता आणि मूल्सवंर्धनावर आधारित  शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडून येतील. त्यामुळे या पद्धतीवर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन कौशल्यपूर्ण शिक्षणानेच सक्षम विद्यार्थी आणि सक्षम भारत घडेल, असेही ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

नागरी नियोजनातील राज्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशामध्ये गौरव- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. ११ : नागरी नियोजनामध्ये नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचा महत्त्वाचा वाटा असून आरक्षण, टीडीआर, समूह विकास, पर्यावरणपूरक इमारती आदी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशातही गौरव झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचा १०९ वा वर्धापन दिन व आणि दुसऱ्या नगर रचना परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, राज्याचे नगर रचना संचालक पुणे अविनाश पाटील, नगर रचना संचालक तसेच सहसचिव प्रतिभा भदाणे, उपसचिव विजय चौधरी, विभागाचे निवृत्त संचालक अरुण पाथरकर, श्रीरंग लांडगे, सुधाकर नागनुरे, के. एस. आकोडे आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी चित्रफीतीद्वारे दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, नगररचना विभाग हा राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा विभाग आहे. महाराष्ट्र सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारे राज्य असून २०३० पर्यंत ५० टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहणार आहे. छोट्या-मोठ्या शहरांचा कायापालट व बदलांमध्ये नगर रचना विभागाचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

नागरी भागाच्या विकासात सुसूत्रता आणण्यासाठी राज्यात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली आहे. तसेच घर खरेदी करू इच्छिणारे नागरिक, बांधकाम व्यावसायिक, विकास वास्तुविशारद आदी बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्व घटकांना लाभ देण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. बांधकाम परवानगी जलद मिळावी यासाठी ‘बीपीएमएस’ तसेच ‘ऑटोडिसीआर’ ॲप विभागाने विकसित केले आहे. या सोप्या व सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रादेशिक योजना मंजूर आहेत. विकास योजना तयार करण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत असून त्यानुसार राज्यातील सुमारे १०६ नियोजन प्राधिकरणाच्या विकास योजना तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती महानगरपालिका भोवतालच्या परिसराच्या विकासासाठी रस्ते विकास आराखडा तयार करण्यात येत आहे, असेही श्री. शिंदे आपल्या संदेशात म्हणाले.

आयुक्त महिवाल म्हणाले, वाढत्या नागरिकीकरणामध्ये नागरिकांच्या सुनियोजित विकासाच्या अपेक्षापूर्तीकडे आव्हान म्हणून पहावे. नागरी नियोजनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. हडप्पा संस्कृतीमधील इमारती, रस्ते आदी नागरी नियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहिले जाते. पुढे टप्प्याटप्प्याने नागरी नियोजनाचा विकास झाला.

आज ५० टक्के नागरी लोकसंख्या आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आदींसह आधुनिक सुविधांबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यावर काम करण्यासाठी, गतीने निर्णय होण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण होण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या आणि सभोवतालचे पर्यावरण यात संतुलन साधत विकास व्हावा, अशी अपेक्षा श्री. महिवाल यांनी व्यक्त केली.

प्रतिभा भदाने म्हणाल्या, शासनाकडून नगररचना विभागाचे आर्थिक साहाय्याचे प्रस्ताव, विकास आराखडे यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी गतीने काम केले जाईल. विभागाने नियोजन आणि प्रत्यक्ष होणारे काम याचा सुवर्णमध्य साधून काम व्हावे. नगर रचना विभाग शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा आहे. विभागासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र इमारत, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.

संचालक श्री. पाटील म्हणाले, नगरविकास विभागाने डिजिटल नियोजनासाठी केंद्र शासनाकडे १ हजार कोटी मिळण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. विभागाने राज्यातील १०६ नियोजन प्राधिकरणांच्या विकास योजना केल्या आहेत. त्यातील ८६ नागरी स्वराज्य संस्थांना हस्तांतरीत केले असून ५९ प्रसिद्धही झाले आहेत. याशिवाय खासगी यंत्रणेकडून केलेले सुमारे १०० असे दोनशेपेक्षा अधिक विकास आराखडे पुढील ३-४ महिन्यात मान्यतेला येतील. याशिवाय नागरी स्वराज्य संस्थांच्या लगतच्या भागामधील ३ हजार ७५७ गावांच्या रस्त्यांचा आराखडा केला आहे.

यावेळी श्री. चौधरी, श्री. पाथरकर, श्री. नागनुरे, श्री. लांडगे, आकोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जानेवारी २०२३ पर्यंत अद्ययावत ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली’चे तसेच ‘नियोजन विचार’ या प्रकाशनाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला विभागाचे सहसंचालक, उपसंचालक, अधिकारी-कर्मचारी, निवृत्त अधिकारी आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी विभागाच्या मध्यवर्ती इमारत येथील नूतनीकरण केलेल्या रेखाकला दालनाचे व ग्रंथालयाचे उद्घाटन संचालक श्री. पाटील आणि श्रीमती भदाने यांच्या हस्ते करण्यात आले.

नवापूरच्या ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरित मिळणार उपचार‍ – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार, दि.10 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा):  नवापूर येथील अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरीत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नवापूर येथे नूतन ट्रॉमा केअर सेंटरच्या लोकार्पण सोहळा डॉ.गावित यांच्या हस्ते काल संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य भरत गावित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, शल्यचिकित्सक डॉ.राजेश वसावे, तहसिलदार मंदार कुळकर्णी, न.पा.मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पाडवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा वळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत वसावे  यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी यांच्यासह नगरसेवक, माजी नगराध्यक्षा, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.गावित म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून केंद्र व राज्यसरकारच्या सहकार्याने नागरिकांना दळणवळणासाठी  चांगले रस्ते निर्माण होत आहे. नवापूर शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असल्याने यामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते, त्यामुळे या मार्गावर अपघात झाल्यास जखमींना व परिसरातील नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी या ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग होऊन  भविष्यात अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकणार आहे.

पुढे बोलतांना डॉ.गावित म्हणाले की, ज्यावेळी मी आरोग्य राज्यमंत्री होतो त्यावेळी जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा बळकट करण्यासाठी व इतर सुविधांसाठी जिल्ह्याचा आराखडा तयार केला होता.  त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते, दळणवळणाच्या सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणावर  सरकारने बांधण्यासाठी घेतले  दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्यात पण त्यावेळी मोठ्या संख्येने अपघात व्हायला लागले. अपघात होत असतांना सरकारने एक आराखडा तयार करण्याचे ठरविले. ट्रॉमा केअर सेंटर कुठे कुठे उभे केले पाहिजे  यासाठी त्यावेळी स्थापन झालेल्या समितीने नवापूर येथे  ट्रॉमा सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले आणि जिल्ह्यातील पहिल्या आधुनिक अशा सुसज्ज इमारत आज ऊभी राहिली असून या सेंटरचा नागरिकांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या ‘भारत माला’ योजनेमार्फत सोनगीर-दोंडाईचा-नंदुरबार-विसरवाडी पर्यत चारपदरी रस्ता तयार करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच याचे काम सुरु होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढल्या असून मेडीकल कॉलेज सुरु झाल्यामुळे येथे तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील अशा वेळी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात येईल.

ट्रॉमा केअर सेंटरमुळे तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार

जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, जास्तीत जास्त अपघात हे राष्ट्रीय महामार्ग व गावानजीक होत असतात त्यामुळे अशा अपघातग्रस्तावर त्वरीत उपचारासाठी या ट्रॉमा केअर सेंटरचा परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. नवापूर येथे उपजिल्हा रुग्णालय होते. याठिकाणी अपघातग्रस्तावर उपचारासाठी सोईसुविधा कमी होत्या आता या ट्रॉमा केअर सेंटरमुळे चांगले तज्ञ डॉक्टर व मनुष्यबळ येथे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ.गावित म्हणाल्या की, अत्यंत चांगली अशी सुसज्ज अशी ट्रॉमा केअर सेंटरची इमारत उभी झाली याचा मला अत्यंत आनंद होत आहे. कोरोनाकाळातही नवापूर येथे आवश्यक बेड उपलब्ध नव्हते त्यावेळी ट्रॉमा केअर सेंटर इमारतीचा उपयोग पर्यायी व्यवस्था म्हणून करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत वेगात सुरु असून  पुढच्या दोन तीन महिन्यात हा महामार्ग  सुरु होईल. चांगले रस्ते तयार झाले तर  वाहनांचा वेगही वाढतो त्यामुळे अशा वाहनांचा अपघातही होतो त्यावेळी एखाद्या अपघातग्रस्त रुग्ण हा रुग्णालयात येतो त्यावेळी त्यासोबत असणारा व्यक्तीं त्याला असणारे आजार सांगतो त्यानंतर डॉक्टर त्या रुग्णावर उपचार करतात. पंरतू अपघात ही अशी दुदैवी घटना असते ज्यावेळी असे अपघात होता त्यावेळी त्यावाहनात प्रवास करणारे सगळेच गंभीर  असतात त्यावेळी कोणीही अशावेळी त्या रुग्णाला काही आजार आहे का याबाबत सांगू शकत नाही.अशा वेळी डॉक्टराची धावपळ होतो त्यामुळे अशा अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असे आहे ट्रॉमा केअर सेंटर

राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि त्यात जखमी होणाऱ्या रुग्णांना तसेच स्थानिक रुग्णांना तत्काळ अत्यावश्यक वैद्यकिय सेवा उपलब्ध होण्यासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात अत्याधुनिक वैद्यकिय उपकरणांसह ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले असून या रुग्णालयात 20 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच याठिकाणी अपघात विभाग, एक्स-रे विभाग, सोनाग्राफी विभाग, आय.सी.यु विभाग, ऑपरेशन थेअटर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. या रुग्णालयात अस्थिरोग तंज्ञ, बधीरीकरण तज्ञ, अपघात वैद्यकीय अधिकारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी असे एकूण 15 अधिकारी कर्मचाराऱ्यांची पदे मजूर आहेत.

या विकास कामाचे झाले भूमिपूजन

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य भरत गावित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, तहसिलदार मंदार कुळकर्णी, मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पाडवी यांच्यासह नगरसेवक, माजी नगराध्यक्षा  तसेच लोकप्रतिनिधी, नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

✅ नवापूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम करणे 170.19 लक्ष.

✅ नवापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातील वर्ग-4 कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे 139.57 लक्ष.

✅ नवापूर येथील राज्य महामार्ग 53 ते नवापूर शहर रस्त्यावर रंगावती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे 170.19 लक्ष.

✅ नवापूर नगरपरिषद नवापूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा योजनेतंर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात चौक सुशोभीकरण करणे 33 लक्ष 74 हजार.

आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक, दिनांक 10 आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडाविषयक गुण व कौशल्यास चालना मिळण्यासाठी तसेच आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याकरिता आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

आज महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, नितीन पवार, हिरामण खोसकर,  आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त तुषार माळी, नाशिक व कळवण प्रकल्प अधिकारी जतीन रहेमान, विशाल नरवाडे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थींच्या रुपाने चांगले खेळाडू तयार होणार आहेत. विविध स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना स्पर्धा, क्रीडा प्रकार व संघानुसार वेगवेगळे ड्रेसकोड असणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्यातील सांघिक भावना वृद्धींगत होईल. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी उत्तम प्रशिक्षकांमार्फत आवश्यक असलेले प्रशिक्षण व साहित्यही आदिवासी विकास विभागाच्यावतीने उपलब्ध करून देत असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.

आगामी वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये देखील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होऊन आपले खेळातील नैपुण्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिस्‍त व योग्य सकस आहाराचे ज्ञान यासोबतच नियमित व्यायाम व खेळाचा सराव करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आदिवासी आश्रमशाळातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी खेळाच्या सरावासह त्यांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले.

यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले की, केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार आगामी काळात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक बोली भाषेतून शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अभ्यासात चांगली प्रगती असलेल्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळांमधून निवड करून त्यांच्यासाठी सुट्टीच्या दिवशी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून गणित, विज्ञान व इंग्रजी याविषयांतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयांच्या आश्रमशाळेतील मुलांसोबतच मुलींना देखील उत्तम प्रशिक्षक देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शालेय सुट्टीच्या काळात शिबीरांच्या माध्यमातून देशपातळीवरील प्रशिक्षकांमार्फत विविध खेळाचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केली.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती देण्यासाठी 1800 267  0007  हा टोल फ्री क्रमांक आज सुरु करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकावर शैक्षणिक योजनांसोबतच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत करण्यात येणार आहे, अशी माहितीही डॉ. गावित यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले तर अपर आयुक्त तुषार माळी यांनी आभार मानले.

सर्वसामान्य लोकांची कामे गतीने होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. १० -लोकांच्या कामासाठी सरकार काम करत आहे. सातबारा, रेशन कार्ड यासह इतर दाखले लोकांना मिळणे सोपे व्हावे यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. खंडाळा तालुक्यातील विंग येथे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्यादारी या शिबिरास पालकमंत्री श्री. देसाई यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, विंगचे सरपंच  पुनम तळेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.   सर्व सामान्य लोकांना जागेवर न्याय मिळाला पाहिजे असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सर्वसामान्य माणसाला त्याच्या नियमित असणाऱ्या कामासाठी हेलपाटे घालायला लागू नयेत अशा पद्धतीचे काम आपल्याला करायचे आहे. सामान्य माणसाच्या दरात शासन गेलं पाहिजे. शासन हे सर्व सामान्य जनतेसाठी आहे. अशा प्रकारचे लोकाभिमूख काम जिल्ह्यात निश्चितच केले जाईल. सर्व सामान्य जनतेसाठी राबवण्यात येणारे असे उपक्रम प्राधान्याने राबवण्यात यावेत, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. या शिबिराच्या माध्यमातून नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवले जातील, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

महाराजस्व अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या शासन आपल्या दरी या शिबिराचे खंडाळा तालुक्यातील विंग येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शासनाच्या महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, पाणी पुरवठा, भूमिअभिलेख या सह दैनंदिन व्यवहारामध्ये सबंध येणाऱ्या व तालुकास्तरावरील मिळणाऱ्या दाखल्यांविषयीचे  लोकांचे कामकाज करण्यात आले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भोईरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन

पुणे, दि.10: उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कॅपिटॅलँड होप फांऊडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भोईरवाडी (ग्रामपंचायत मान) येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, मुळशीचे गट विकास अधिकारी संदीप जठार, कॅपिटालॅंड होप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधांशू दत्त, उपाध्यक्ष मनोज सोमवंशी, शालेय समितीचे अध्यक्ष काशिनाथ भोईर, मुख्याध्यापक रामेश्वर झुळुक आदी  उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, कॅपिटालँड होप फाऊंडेशने सामाजिक उत्तर दायित्व निधीतून खासगी शाळेएवढीच उत्तम दर्जाची  शाळा उभारुन लहान मुलांच्या भविष्याच्यादृष्टीने मोठे काम केले आहे. खासगी शाळांपेक्षाही अधिकच्या सुविधा या शाळेत उपलब्ध केल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थी भविष्यात विज्ञान,  कला, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात पुढे जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खेळ, सांस्कृतिक आदी उपक्रमांबरोबरच शैक्षणिक कार्यासाठी सामाजिक उत्तरदायित्त्व निधी योग्यप्रकारे कसा खर्च करावा याचे हे उत्तम उदाहरण आहे. शाळेची देखभाल, स्वच्छता राखण्याची जबाबदारी शाळा आणि ग्रामस्थांची आहे. गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असेही उद्योग मंत्री म्हणाले.

ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन ग्राम दैवत कमलजादेवी मंदिरासमोरील मोकळी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत, टी.सी.एस कंपनी ते भोईरवाडा नवीन रस्ता बांधणीसाठी रस्त्याबाबत तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आवश्यक निधी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात येईल,  असे श्री. सामंत यांनी सांगितले.

श्री. प्रसाद म्हणाले, देशातील शाळांचा मूलभूत आणि गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ (पीएमश्री) योजनेत जिल्ह्यातील 403 शाळांचा समावेश झाला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या शाळेत सुसज्ज इमारत, ग्रंथालय, संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा, शुद्ध पेयजल, स्वच्छ शौचालये, मध्यान्ह भोजन योजना, सौर उर्जा युनिट, बालवाचनालय आदी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या भागातील उद्योजकांनी वेळोवेळी सीएसआरमधून निधी दिला आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहेत, असे श्री. प्रसाद यावेळी म्हणाले.

कॅपिटालॅंड होप कंपनीच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भारतातील 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून अंतिम निवड झालेल्या 16 पैकी 9 विद्यार्थीं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी शाळेचे आहेत. हे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी विषयी माहिती

या शाळेची स्थापना जून 1960 मध्ये करण्यात असून शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 261 मुले व 244 मुली असे एकूण 505 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सामान्य ज्ञान प्रश्न, प्रश्न मंजुषा, चित्रकला, शालेय खेळ व क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्र भेट उपक्रम, गणित दिवस, भाषा दिन, शिष्यवृती परीक्षा आदी उपक्रम घेण्यात येत आहेत.

महाटेक प्रदर्शनाला भेट

या कार्यक्रमापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कृषि महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित  ‘महाटेक 2023’ या लघु व मध्यम उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. शासन लघु व मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाटेकचे संचालक विनय मराठे, सुमुख मराठे,  प्रकल्प संचालक संतोष नांदगावकर, महाव्यवस्थापक सुधाकर थत्ते, पुणे प्रकल्प संचालक महेन्द्र घारे आदी उपस्थित होते. मंत्री सामंत यांनी विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.

शैक्ष‍णिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि. १० : युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

अंधेरी – मरोळ येथील ‘अलजामिया-टस-सैफिया’ अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी  प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ‘अलजामिया-टस-सैफिया’चे  “कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन, दाऊदी बोहरा” समाजाचे शहजादा अलिअसगर कलीम ऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन तसेच दाऊदी बोहरा समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, दाऊदी बोहरा समाजाच्या चार पिढ्यांसोबत माझा संवाद आहे. कोणताही समाज काळानुसार कसा बदलतो करतो यावरच त्या समाजाचा विकास अवलंबून असतो. दाउदी बोहरा समाज ही काळाप्रमाणे बदलत आहे. काळाप्रमाणे नावीन्यपूर्ण शिक्षणाची कास धरत आहे. ही आनंदाची बाब आहे. ‘अलजामिया-टस-सैफिया’ ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था स्थापन झाली या समाजाचे  हे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न आज साकार झाले आहे. गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ. मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सूरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरतेसाठी काम केले. त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी  होती. आजही मला या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला  प्रेम मिळत आहे. हे प्रेम खूप मोलाचे आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री श्री. मोदी  म्हणाले की, “दाउदी बोहरा” समाज बांधव जगाच्या कुठल्याही देशात असले तरी देशाप्रती त्यांचे प्रेम आणि योगदान खूप आहे आणि भविष्यातही राहील. शिक्षण क्षेत्रातही या समाजाचे खूप मोठे योगदान आहे. शिक्षणाविषयी स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रयत्न करून पूर्ण करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे ‘अलजामिया-टस-सैफिया’ या अरेबिक शिक्षण संस्थेत महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे. यापुढेही महिलांचा विकास, महिलांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ही संस्था आपले योगदान देईल, अशी मला आशा आहे. शासनाकडून युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे राबवली जात आहेत असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री श्री. मोदी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र हे दोन्हीही पूरक असले पाहिजेत, अशी धोरणे राबवत आहोत. दाऊदी बोहरा समाज उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. या उद्योजकांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.उद्योगासाठी कर प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणामुळे नोकरी देणारे तयार होत आहेत. विकास करीत असताना हे शासन वारसा आणि आधुनिकता बरोबर घेवून पुढे जात आहे. देश पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्यात येत आहे. सण – उत्सवांना आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. जुन्या ग्रंथांचे डिजिटलायझेशन केले जात आहे. सरकार पर्यावरणावर भर देत आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्य वर्ष साजरे करत आहे. जी – २० परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळालेला आहे हा मोठा बहुमान आहे.”दाऊदी बोहरा” समाजातील प्रत्येक नागरिक जो जागतिक पातळीवर आहे तो आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून  देशाचे नाव पुढे नेईल, अशी आशा व्यक्त करतो असेही प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.

यावेळी ‘अलजामिया-टस-सैफिया’ शैक्षणिक संस्थेची माहितीवर आधारित ध्वनी  चित्रफित दाखवण्यात आली. दाउदी बोहरा समाजाच्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

‘अलजामिया-टस-सैफिया’ शैक्षणिक संस्थेविषयी

‘अलजामिया-टस-सैफिया’ ही शैक्षणिक संस्था मुंबई (अंधेरी – मरोळ) येथे दहा वर्षापासून सुरू केली आहे. या संस्थेच्या शैक्षणिक शाखा देश – विदेशात येथे आहेत. या संस्थेच्या वतीने अंधेरी येथे पाच इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून एका इमारतीमध्ये महिला वसतिगृह व दुसऱ्या इमारतीमध्ये मुलांचे वसतिगृह सुरु केले आहे. या संस्थेमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य या विषयी मुलांना शिक्षण दिले जाते. या विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ आणि अलिगड विद्यापीठ येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी ग्राह्य धरले जाते. वयाच्या १३ व्या वर्षापासून या शैक्षणिक संस्थेमध्ये मुले व मुली शिक्षण घेतात. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या पदवी शिक्षण समशिक्षण गणले जाते. त्यानंतर अलिगढ़ विद्यापीठामध्ये विद्यार्थी पी. एच. डी. करू शकतात. संस्थेत सुमारे ५००  विद्यार्थी शिकत असून २० शिक्षक कर्मचारी व ३० शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

०००

संध्या गरवारे/राजू धोत्रे/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजकांची दि. १३ व १४ रोजी मुलाखत

मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजक श्वेता ठोंबरे, शैलेश शिंदे, जिगर परीख, निहारिका कोलते-आळेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार  दि. १३, मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

राज्य शासन उद्योग विभाग आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात एक सामंजस्य करार झाला असून याचा लाभ राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करण्यात आले आहे. भारतातील हा पहिलाच अॅक्सिलेटर उपक्रम आहे. या माध्यमातून ‘कॉर्नेल महा-६०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वर्षभर राज्यातील ६० निवडक तरूण उद्योजकांना याअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण  केलेल्या  नवउद्योजकांशी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून संवाद साधला आहे. श्वेता ठोंबरे, शैलेश शिंदे, जिगर परीख, निहारिका कोलते-आळेकर या नवउद्योजकांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले...

नागपूरलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार...

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार

0
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवड्यादरम्यान अवयवदानाकरीता इच्छुक व्यक्तींकडून तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील व सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी...

किसान समृद्धी प्रकल्पांमुळे माल थेट बाजारपेठेत विकण्याची संधी – पालकमंत्री संजय राठोड

0
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकल्पांवर १२ कोटी ४७ लाखाचा खर्च यवतमाळ, दि. १८ (जिमाका): वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतवारी, ग्रेडिंग व...