शुक्रवार, ऑगस्ट 15, 2025
Home Blog Page 178

सर्वसामान्यांना परिपूर्ण वैद्यकीय सुविधेसाठी शासनामार्फत विविध सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

नागपूर,दि. 31 : सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिल्या जात आहे. नागपूर मधील विविध शासकीय रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वैद्यकीय सुविधांचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून शासकीय दंत रुग्णालयातील ही अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाची अर्थात मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची राज्यातील पहिली उपलब्धी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

येथील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रीया गृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागीय संचालक डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पंदीलवार आदी उपस्थित होते.

अशा आहेत सुविधा

नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये लॉमीनार ऐअर फ्लो सारखे जीवाणू आणि धुळ कमी ठेवणारी यंत्रणा असल्याने निर्जंतुकीकरण सोपे झाले आहे. यात भविष्यातील गरजेप्रमाणे आवश्यकते बदल केव्हाही करता येऊ शकतात. सुरक्षिततेसाठी असलेली आंतरराष्ट्रीय मानके लक्षात घेऊन या नवीन ऑपरेशन थिएटरमध्ये सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

सिम्युलेशन लॅब

सिम्युलेशन लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था आहे. यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव आपल्या कौशल्यात वृध्दी करुन घेता येईल. देशातील अत्याधुनिक अशी पहिली सिम्युलेशन लॅब म्हणून याकडे पाहिले जात आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही नवी उपलब्धी करुन देण्यात आली आहे. यात आवश्यक तेवढे एक्स-रे आणि दंत प्रक्रिया शिकण्यास मदत होईल. विशेषत: येथील आधुनिक उपकरणाच्या मदतीने टायपोडोन्ट दातांवर थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक उपचार पध्दती शिकविली जात आहे.

0000

 

‘लोकराज्य’ जून २०२५

‘लोकराज्य’ जून २०२५

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची  जयंती  महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर.विमला यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, सहायक निवासी आयुक्त, डॉ राजेश आडपावार, स्मिता शेलार यांच्यासह  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

अहिल्यानगर दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी ता.जामखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरातील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते  महाआरतीही करण्यात आली.

000

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशित 

अहिल्यानगर, दि. ३१ : अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘लोकराज्य’ च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्यात  आयोजित या प्रकाशन सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,  आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार नारायण पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार चित्रा वाघ, आमदार काशिनाथ दाते, आमदार मोनिका राजळे, आमदार सुरेश धस, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, माजी आमदार रमेश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि ‘लोकराज्य’चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर जन्म त्रिशताब्दी निमित्ताने तयार करण्यात आलेले बोधचिन्ह आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य, त्यांचे महाराष्ट्रातील कार्य, धर्मपरायणता, समाजकार्य, राज्यकारभाराचा आदर्श, दातृत्व, त्यांनी उभारलेल्या विविध वास्तूंची माहिती अंकात देण्यात आली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी लिहिलेले लेख अंकात समाविष्ट आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसह शासनाने जन्म त्रिशताब्दी उत्सवानिमित्त घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देखील या अंकात देण्यात आली आहे.

000

 

विभागीय आयुक्तालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहायक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दी निमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई दि. ३१: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

०००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उपसचिव दिलीप देशपांडे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे, यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन 

नागपूर, दि. ३१ –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त

छत्रपती संभाजीनगर : दि.30 (विमाका) :- मराठवाडयात विभागीय आयुक्त म्हणून काम करताना एक दिवस गावकऱ्यांसोबत, सस्ती अदालत, संवाद मराठवाडयाशी असे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. शासकीय सेवेत विविध पदावरून सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद मिळाला अशी भावना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपक्रम लोकाभिमूख करणारे अधिकारी अशी ओळख असणारे श्री. गावडे आज (31 मे) रोजी नियत वयोमानानूसार सेवा निवृत्त होत आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित निरोप समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी छत्रपती  संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन) देविदास टेकाळे, उप आयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा, विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या पत्नी मनिषा गावडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

श्री.गावडे म्हणाले, शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदावरून सुरूवात केली असून राज्यातील विविध विभागात 35 वर्ष सेवा केली आहे. सर्वसामान्य माणसासाठी काम करताना समर्मित भावनेने काम केले आहे. पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर तसेच विदर्भातही काम करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्त् होताना मराठवाडयात सेवा करण्याची संधी मिळाली, व या सेवेत कामाचा मोठा आनंद मिळाला. विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी कमी वेळेत ऑनलाईन उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी  सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. सेवेत समवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी तसेच नागरिकांनी सहकार्य केले असल्याचे सांगताना श्री. गावडे यांनी सेवा कालावधीतील प्रसंगानिहाय आपले अनुभव विषद केले.

यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागनिहाय अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अपर आयुक्त सुरेश वेदमुथा यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. श्री वेदमुथा यांनी मराठवाडयात सर्व एकत्रितपणे काम करतात, याचा अनुभव आपल्याला आल्याचे सांगितले. पुणे जिल्हयातील गावडेवाडी सारख्या छोटे गाव ते विभागीय आयुक्त असा आयुक्तांचा प्रवास आमच्यसाठी प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक अपर आयुक्त श्री परदेशी यांनी केले, त्यांनी श्री गावडे यांच्या सेवाकालावधी व त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******

ताज्या बातम्या

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि...

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री

0
पुणे, दि. १५ : संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला...