शनिवार, मे 24, 2025
Home Blog Page 250

‘महापारेषण’चे प्रकल्प तात्काळ मार्गी लावावेत – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. 6 : महापारेषणचे विविध प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

फोर्ट येथील एम एस ई बी होल्डिंग कंपनी कार्यालय येथे आयोजित महापारेषण कंपनीच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.

यावेळी महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, संचालक सतीश चव्हाण, अविनाश निंबाळकर, सुगत गमरे, तृप्ती मुधोळकर यांच्यासह महापारेषण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील ऊर्जा क्षेत्र स्वयंपूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेवर विशेष भर देण्यात यावा. महापारेषणच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी, तक्रारींचे निराकरण वेळेत करण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे तसेच प्रकल्पांची कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देशही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) च्या कामकाजातील विविध विषयांचा आढावा घेतला. महापारेषणच्या विविध प्रकल्पांची प्रगती, सौर ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी, तसेच अर्थविषयक बाबींवरही चर्चा करण्यात आली.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

  • शिवपाणंद व शेत रस्त्यांची कामे दर्जेदार करा
  • ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार
  • पाणंद रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार
  • मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार

मुंबई, दि. ६ : राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शिवपाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

नागपूर पॅटर्न राबवणार

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत.

मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार

पाणंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून श्री. बावनकुळे म्हणाले, अशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करुन नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

कामठी छावणी परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी निधी लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.६ : नागपूर जिल्ह्यातील कामठी छावणी परिषद पाणी पुरवठा प्रकल्पासाठीचा उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत १०.३८ कोटी रुपये किंमतीच्या कामठी छावणी परिषद पाणीपुरवठा प्रकल्पास दि. २९ ऑगस्ट, २०१९ रोजी शासनाने मंजूरी दिली आहे. या प्रकल्पाच्या कामाचा श्री. बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या प्रकल्पात राज्य शासनाचे अनुज्ञेय अनुदान ९.३४२ कोटी रुपये (९०%) आणि कटक मंडळाचा स्वहिस्सा १.०३८ कोटी रुपये (१०%) इतका आहे.

या प्रकल्पास शासनाद्वारे प्रकल्पाचा रुपये ३.११४ कोटी रकमेचा पहिला हफ्ता १ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या व ३.११ कोटी रुपयांचा दुसरा हफ्ता ३ जुलै, २०२३ रोजी वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच, या प्रकल्पाच्या तिसऱ्या हप्त्यापोटीचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत शासनास प्राप्त झाला असून त्याअनुषंगाने निधीच्या उपलब्धतेनुसार ०.४३ कोटी रुपयांचा निधी २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधीसाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येऊन निधी उपलब्ध होताच कामठी कटक मंडळाच्या या प्रकल्पास निधी वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी नगरविकास विभागामार्फत देण्यात आली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

निवड मंडळाच्या यादीनुसार समुपदेशनाद्वारे तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी

मुंबई, दि. 6 : निवड मंडळाच्या गुणवत्ता यादीनुसार समुपदेशनाद्वारे भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी. तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक असल्याने या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य सेवा आयुक्तालयात सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, राज्य आरोग्य विमा आयुक्त अस्तिकुमार पांडे, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कंदेवाड, डॉ. बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आव्हाड, उपसचिव श्री. दिपक केंद्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य  मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, रिक्त पदभरती सोबतच येत्या 15 दिवसांत सर्व पदोन्नतीची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात यावी. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-अ वैद्यकीय अधिकारी यांची पदे यापूर्वी एमपीएससी कक्षातून वगळण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर राज्य आरोग्य विमा विभागामधील वैद्यकीय अधिकारी यांची पदे देखील एमपीएससी कक्षातून वगळण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी दिल्या.

बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात यासाठी एक वर्ष ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र हे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करावी.

ग्रामीण पातळीवर मागणीनुसार औषध पुरवठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी इतर राज्यात कशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचा अभ्यास करावा. तसेच यासाठी मध्यवर्ती प्रकल्प ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देशही आरोग्यमंत्री श्री.अबिटकर यांनी दिले.

0000

अर्चना देशमुख/विसंअ/

सामाजिक बांधिलकी अखंड जपत रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 6: तंत्रज्ञान खूप वेगाने वाढत आहे. तसेच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारही वेगाने वाढताना दिसतात. एक प्रकारे तंत्रज्ञान आणि आजार यांची स्पर्धा चाललेली आहे. परंतू नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णाला दिलासा मिळत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा अखंड जपत वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या व अत्याधुनिक सुविधा देण्याचं काम पटवर्धन कुटुंब करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मोशी येथे धनश्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह,  रुग्णालयाचे संस्थापक डॉ. राजीव पटवर्धन, रवींद्र भुसारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, अलिकडच्या काळामध्ये आरोग्य सुविधा महागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’ सिस्टीम लागू केली आहे. महात्मा फुले जन आरोग्यच्या माध्यमातून मोठ्या रुग्णालयांमधून 1 हजार 300 सेवा मोफत देण्यात येतात. या माध्यमातून केंद्र शासनाच्या 1 हजार 800 सेवांचे पॅकेज राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. धनश्री रुग्णालयानेही या सेवा दिल्यास गरजू रुग्णांना पैसे नसले तरी उपचार घेता येईल. शासन मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मादाय सहायता कक्षाच्या माध्यमातून कोणत्याही पॅकेज मध्ये न बसणाऱ्या आजारांसाठी अर्थसहाय्य देत असल्याचे सांगून या सेवाही धनश्री रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या दोन्ही कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा या रुग्णालयामार्फत दिल्याने अत्याधुनिक सेवेचा लाभ गरजूंना मिळू शकेल असेही श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, सामाजिक बांधिलकीने पटवर्धन कुटुंब काम करत आहे. या रुग्णालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या सर्जरी तंत्रज्ञानामुळे सोप्या झाल्या आहेत. रोबोटीक सर्जरीमुळे दुसऱ्या कुठल्याही अवयवाला धोका पोहोचत नाही. या सर्व आधुनिक सुविधा देण्याचं काम धनश्री रुग्णालयाने केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, उत्तम आरोग्य सेवा सुदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाज प्रगती करु शकतो. आजच्या काळात केवळ मोठ्या शहराममध्येच नव्हे तर ग्रामीण आणि निमशहरी भागातही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची गरज भासत आहे. धनश्री हॉस्पिटलने ही गरज ओळखून 100 खाटांचे आधुनिक रुग्णालय सुरु केले आहे. शासनही नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य देत आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत. धनश्री रुग्णालयासारख्या खाजगी संस्थांमुळे या सेवांना पूरक आधार मिळतो व सरकारच्या आरोग्य सेवांना बळकटी येते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक सुविधा व्यवहार्य होत आहेत. महाराष्ट्राने या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे, असे सांगून धनश्री रुग्णालयात रुग्णाला उत्तम सुविधा मिळतील, असा विश्वास   श्री. पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

****

महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात औद्योगिक क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात

पुणे, दि. 6 : महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य असून, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुनील शेळके, लोट्टे समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन, रिपब्लिक ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली, उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगम, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, माजी आमदार बाळा भेगडे, हॅवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा दबदबा होता. अनेक गुंतवणुकीचे करार या ठिकाणी करण्यात आले. विविध उद्योजकांशी चर्चा करुन, त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत, राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. दोनच दिवसांपूर्वी मैत्री कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. या पोर्टलवर उद्योगासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. Ease of doing business या धोरणावर शासनाचे काम सुरू आहे.

आपल्याला लहानपणी आईस्क्रीम खूप आवडायचे. एक महिना आईस्क्रीम फॅक्टरी मध्ये राहायला जावे असे वाटायचे, असे सांगत आज या प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बालपणीच्या आठवणीत काही क्षण रमले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते लोट्टे आईस्क्रीम उत्पादन सुविधांचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आईस्क्रीम प्रकल्पाची पाहणी केली.

कार्यक्रमात समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन आपल्या मनोगतात म्हणाले, लोट्टेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो, भारत आमच्यासाठी एक महत्वाची बाजारपेठ आहे, आणि आमच्या जागतिक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. हॅवमोरला भारतातील सर्वात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बनविण्याच्या उद्देशाने आम्ही पुण्यातील प्रकल्पामध्ये 16 प्रॉडक्शन लाईन्स सुरू करणार आहोत.

रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली यांनीही मनोगत व्यक्त केले. हा आईस्क्रीम प्रकल्प एकूण साठ हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेला असून, या प्रकल्पात 50 दशलक्ष लिटर अशी प्रभावी वार्षिक उत्पादन क्षमता आहे. पुण्यातील या प्रकल्पाची रचना विशेष करुन तीव्र उन्हाळ्याच्या काळात आईस्क्रीमची मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये नऊ प्रोडक्शन लाईन कार्यरत आहेत. हॅवमोर प्रकल्प आपल्या विकासाला पुढील तीन वर्षात अधिक गती देईल. पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ऐतिहासिक उत्पादन प्रकल्प पुढील दोन वर्षात हजार लोकांना रोजगार देईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाला स्थानिक कोरीअन असोसिएशन समुदाय सदस्य, लोट्टे इंडीयाचे व्यवसाय सहकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

****

महाराष्ट्र शासनाचे ११, १२, १३ व १४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्री

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्री

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

 महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची – मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 6 : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे  मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात आज राज्यातील तलाव ठेक्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री. राणे यांच्या उपस्थितीत बैठक  झाली. त्यावेळी ते बोलत होते.

तलावांच्या ठेके वाटपात शिस्त आणण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले की, ग्रामीण भागातील अर्थकारणास चालना देणे आणि ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवणे हा तलावांचे ठेके देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या संस्थांचा आर्थिक विकास होण्यासाठी मत्स्य उत्पादन वाढ महत्वाची आहे. यासाठी निविदा पद्धतीने ठेके वाटप झाले पाहिजे. या सर्व व्यवसायावर एक नियंत्रण हवे. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारण्यात यावे. राज्यात मत्स्य उत्पादन वाढीसाठी मोठी संधी आहे. मासेमारी हा राज्यातील एक मोठा व्यवसाय आहे. यासाठी तलाव ठेक्यांची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीवर आणावी. या प्रणालीमध्ये सर्व माहिती उपलब्ध असावी. त्यामध्ये ठेका कोणत्या संस्थेला दिला. कधी दिला. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाव आहेत. याची सर्व माहिती असावी, अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री. राणे म्हणाले की, राज्यात कोणकोणत्या संस्थांना कधी ठेके दिले आहेत. त्यांनी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे का? कधी केले आहे? नूतनीकरण नियमितपणे झाले आहे का? या विषयी सविस्तर माहिती पुढील आठवड्यात सादर करावी. विभागाने मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय उद्योग विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान मंत्री श्री. राणे यांनी रेडी बंदर विषयी आढावा घेतला. रेडी बंदर रेल्वे आणि चारपदरी महामार्ग याने जोडले जाणार आहे. त्यामुळे या बंदराच्या विकासास गती मिळणार असल्याचे मंत्री श्री. राणे म्हणाले. तसेच या बंदर बाबत फेमेंतो कंपनीस येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सागरी महामंडळाने सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप, कॅप्टन प्रवीण खारा, संजय उगुलमुगले, महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, फेमेंतो कंपनीचे कॅप्टन करकरे आणि उन्मेष चव्हाण उपस्थित होते.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा उपक्रम

मुंबई, दि. 6 : युवकांना काळानुरूप कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी प्रथमच दिली असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

अभिरुप स्वरूपात कौशल्य विकास मंत्री म्हणून पदभार सांभाळलेल्या राजवर्धन कारंडे यांनी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांचे आभार मानून नूतन मंत्रिमंडळाने कौशल्य विकास विभागाचे कामकाज जाणून घेतले.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रालयातील आपल्या कार्यालयात भेटीसाठी आमंत्रित केले होते. शासनाची कार्यप्रणाली समजावी आणि मंत्रालयाचा अनुभव मिळावा हा या भेटीमागे उद्देश होता. या भेटीत कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचा कार्यभार एका तासासाठी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिरुप स्वरूपात सोपवण्यात आला.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमंधून निवडणुकीद्वारे प्रतिनिधी निवडले जातात आणि प्रतिनिधींचे शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येते. या विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची माहिती, त्यांच्या कार्याची पद्धत समजते आणि लोकोपयोगी योजनांची माहिती होते. नुसते शॅडो मंत्रिमंडळ नव्हे तर या उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मंत्रालयात येऊन कामकाजाचा, विभागांचा अगदी जवळून अनुभव घेता यावा यासाठी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालया च्या संचालिका माधवी सरदेशमुख यासह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे  मंत्रिमंडळ समृद्धी तुपे – मुख्यमंत्री, रिया खानोलकर – गृहमंत्री, पार्थ थोरवत, आर्यन दराडे – उपमुख्यमंत्री, पर्णवी धावरे – सभापती म्हणून उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले “आजचे विद्यार्थी आपले उद्याचे नेते असून, त्यांना प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अनुभव देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आपल्या लोकशाहीला जपणारे हे प्रतिनिधी प्रशासनाच्या संपर्कात येतील तेव्हा नक्कीच त्यांना हा आपला अनुभव आठवेल. हा एक छोटा अनुभव असला तरी, त्यांना त्यांच्या भविष्यातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी प्रेरित करणारा ठरू शकतो. अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना थोडे नवीन शिकायला मिळते आणि ते आपले विचार अधिक सुस्पष्ट आणि विस्तृत करू शकतात.

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केंद्र शासनाच्या योजना, कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्याचप्रमाणे युवांना देण्यात येणारे विविध प्रशिक्षण, विभागाचे कामकाज याची सविस्तर माहिती दिली.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे गतीने पूर्ण करा-  मंत्री जयकुमार गोरे

  • अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा
  • भूमिहीन लाभार्थ्यांना गायरान, गावठाण जमीनीवर घरकुल
  • प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मार्ट’ विक्री केंद्राची स्थापना

अमरावती, दि. ०६: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत अमरावती विभागाला 3 लाख 16 हजार 339 उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 2 लाख 69 हजार 987 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. यानुषंगाने समाजातील प्रत्येक गोर-गरीब घटकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकुलांच्या कामांना गती देऊन उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय बैठकीत मंत्री श्री. गोरे यांनी विविध आवास योजनासंबंधी अमरावती विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र (अमरावती), मंदार पत्की (यवतमाळ), वैभव वाघमारे (वाशिम), बी. वैष्णवी (अकोला), गुलाब खरात (बुलडाणा) यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन श्री. गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोनमध्ये विभागात अपूर्ण घरकुलांची संख्या अधिक आहे. विविध कारणांमुळे विभागातील अपूर्ण असलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक कशोशीने प्रयत्न करावे. त्यासाठी तालुका व ग्राम पातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे. घरकुल योजनेतील अडचणी दूर करुन कामांना गती द्यावी. आवास योजनांच्या जमीनीसाठीच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. गायरान जमीनीवर घरकुल बांधण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे, त्यानुसार भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी गायरान जमिनी उपलब्ध करुन द्याव्यात. आवास योजनांच्या घरकुलांसाठी वाळू, वीटा व सिमेंट आदी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी केंद्र उभारण्यात यावे. आवास योजनेंतर्गत पहिला हप्ता, दुसरा हप्ता तसेच मनरेगा अंतर्गत मिळणारा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात सुरळीतरित्या जमा करण्यात यावा. मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या तरतूदीसाठी घरकुल बांधणीच्या पहिल्या दिवसापासून कुटुंबातील सदस्यांचे, मजुरांचे मस्टर नियमितपणे पूर्ण ठेवावे. या कामात कुठलिही हयगय होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. विविध आवास योजने अंतर्गत विभागाची सद्यस्थिती व अंमलबजावणी संबंधीचा आढावा मंत्री महोदयांनी यावेळी घेतला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागातील स्वयं सहाय्यता समूह, कुटुंबे, ग्राम संघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी आदीबाबत मंत्री श्री. गोरे यांनी माहिती जाणून घेतली. स्वंय सहाय्यता समुहांना बँक कर्ज वाटप, लखपती दिदी योजना, वैयक्तिक व्यवसाय उभारणी व बँकेमार्फत कर्ज पुरवठा आदीबाबत सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. लखपती दिदी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून महिलांना स्वयंरोजगार, व्यवसाय उपलब्ध करुन द्यावा. महिलांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी बँकाकडून वैयक्तिक कर्ज पुरवठ्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तालुका व ग्राम पातळीवर व्यवसायाच्या ठिकाणी तसेच मोक्याच्या ठिकाणी ‘उमेद मार्ट’ विक्री केंद्र उभारण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी केल्या.

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा सन 2025-26, लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी, पंचायत लर्निंग सेंटर्स, 15 वा वित्त आयोग प्राप्त निधी व खर्च, ब वर्ग तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रम, विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्न आदीबाबत मंत्री महोदयांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस विकास आराखड्यांतर्गत ग्रामविकास विभागात झिरो पेन्डंन्सी, गोर-गरीब, महिला भगिनींसाठींच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच 100 टक्के उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून पारदर्शक व लोकाभिमूख प्रशासन म्हणून विभागाची ओळख निर्माण करण्यात यावी, असे आवाहन मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

ताज्या बातम्या

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार...

0
एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचाही वापर मुंबई, दि. २३ : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

0
मुंबई, दि. २३ : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत...

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

0
मुंबई, दि. २३ : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे...

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा; मंत्री अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण...

0
मुंबई, दि.२३ : मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग तर मंत्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार...

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सांगली, दि. 23 :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस...