सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 40

ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ९ :- राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लागृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहलमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत अनुभवाची अट ३० वर्षे वरुन २५ वर्षे करण्याची तसेच वयाची अट ६० वर्षे वरून ५८ वर्षे करण्याची मागणी पत्रकार संघटनेने केली आहे. या योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनेच्या सुचना मागवून घेऊन नव्याने प्रस्ताव सादर करावे. तसेच सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या वाढीव मानधनाच्या रक्कमे संदर्भात योग्य तो मार्ग काढण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पत्रकारांसाठी कांदिवली येथे गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे. या सदनिकांसाठी आकारण्यात येणारे दर कमी करण्यासंदर्भात म्हाडाने योग्य तो तोडगा काढावा. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी कल्याण निधीमधून पत्रकारांच्या आजारपणात देण्यात येणाऱ्या एक लाखापर्यंतच्या मदतीची रक्कम वाढविण्यासंदर्भात विचार केला जाईल. तसेच पत्रकारांच्या आरोग्य योजना महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी सलंग्न करून यादीतील आजारशिवाय इतर आजारांच्या प्रतिपूर्तीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. अधिस्विकृतीधारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बसमध्ये सवलत देण्यासंदर्भात एसटी महामंडळाने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

सध्या मंत्रालयात प्रवेशासाठी फेशियल रिकग्नेशन’ यंत्रणा राबविण्यात येत आहे. या यंत्रणेअंतर्गत पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशासाठी येत्या पंधरा दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेराज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशीसंघाचे सरचिटणीस दीपक भातुसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत

मुंबईदि. ९ :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदशीलतेमुळे अवघ्या दोन तासात एक लाख रुपयांची मदत मिळाली असून वेळीच मदत मिळाल्याने मुलीच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणालेरसवंती चालवताना या मुलीचे केस अचानक मशिनमध्ये गुंतले आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गावकरी आणि सरपंच निवृत्ती कठोरे यांनी तात्काळ मुलीला जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने त्वरित उपचार सुरू केले. दरम्यान समाजभान’ या सामाजिक संस्थेने औषधाच्या खर्चाची जबाबदारी उचलली. या घटनेची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षापर्यंत पोहोचली. मुलीच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अवघ्या दोन तासांत एक लाख रुपयांची मदत मंजूर केली. रुग्णालयानेही उपचाराचा उर्वरित खर्च उचलला.

कर्तृत्ववान मुलगी

वडिलांच्या अकाली निधनानंतर या १६ वर्षीय मुलीने कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. अभ्यासात हुशार असलेल्या १९ वर्षीय मोठ्या बहिणीला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि नऊ वर्षीय भावाला शालेय शिक्षणासाठी प्रेरणा देत ती स्वतः गावातील बसस्थानकावर रसवंतीचा व्यवसाय करत होती. आईच्या मदतीने कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुलीवर आलेल्या संकटाने सर्वांचे मन सुन्न झाले होते. वेळीच मिळालेल्या उपचार आणि आर्थिक मदतीमुळे तिला नवजीवन मिळाले.

आईने मानले आभार

डोक्याला गंभीर दुखापत आणि मेंदूवरील सूज यामुळे मुलीच्या उपचारासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्रमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या मदतीनंतर रूग्णालय प्रशासनाने उर्वरित उपचारासाठीचा खर्च माफ केला. यामुळे मुलीच्या कुटुंबावरील आर्थिक ताण कमी झाला. आमदार नारायण कुचे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रूग्णालयात जाऊन उपचार सुरु असलेल्या मुलीची भेट घेतली. शिवाय मुलीचा पुढील संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. दरम्यान सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्या मुलीचे प्राण वाचले. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुखआमदारसरपंचसामाजिक संस्था आणि डॉक्टरांची आयुष्यभर ऋणी राहीन‘, अशी भावना मुलीच्या आईने व्यक्त केली.

0000

 

महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

महावीर जयंतीचा दिवस तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसात्यागक्षमाजीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण करून देतो. महावीर जयंती निमित्त मी राज्यातील सर्व लोकांनाविशेषतः जैन बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

Governor C P Radhakrishnan greets people on Mahavir Jayanti

Mumbai, 9 : Maharashtra Governor C P Radhakrishnan has extended his greetings to the people of Maharashtra on the occasion of Mahavir Jayanti. In his message, the Governor has said: “Mahavir Jayanti reminds us of Bhagwan Mahavira’s sublime life and his teachings of Ahimsa, penance, forgiveness, compassion and Anekantavada. I convey my heartiest greetings and good wishes to all, especially to Jain brothers and sisters, on the auspicious occasion of Mahavir Jayanti.”

0000

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा

मुंबईदि. ०९ : कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासनाच्या जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

या जमिनींच्या जवळ पारंपरिक जुनी मंदिरे व धार्मिक स्थळे असूनत्यावर विविध विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तथापिया जमिनींवर विकासकामे करण्यासाठी वन (संरक्षण) अधिनियम१९८० अंतर्गत वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. परिणामीविविध मूलभूत सुविधा व धार्मिक-सामाजिक कामांचे प्रस्ताव रखडलेले आहेत. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तातडीने या जमिनीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावाअशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिल्या.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील प्रलंबित कामांचा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा मंत्रालयात घेण्यात आला.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले कीया जमिनींच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या १२ डिसेंबर १९९६ च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांचा संदर्भ घेतदेवरहाटी जमिनीवर विकासकामांसाठी पुढील कार्यवाही निश्चित करावी. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये पारंपरिक मंदिरेसभागृहअंगणवाड्याशाळास्वच्छतागृहे यांसारखी अनेक मूलभूत कामे वन परवानगी अभावी रखडलेली आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीग्रामपंचायती व प्रशासनाकडून या कामांसाठी वेळोवेळी प्रस्ताव प्राप्त झाले असूनत्यावर जलद गतीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणालेदेवरहाटी जमिनीच्या विकासाचा प्रश्न संवेदनशील असला तरी न्यायालयीन निर्णयकायदेशीर बाबी व स्थानिक जनतेच्या भावना यांचा समतोल राखूनच निर्णय घेतला जाईल.

बैठकीस दूर संवाद प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीरत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंगसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटीलविभागीय वन अधिकारी चिपळूणउपवन संरक्षक सावंतवाडीतर मंत्रालयात महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

कोल्हापूर – सांगली राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनासंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई दि. ९ – कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावीअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळावाअशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावातो मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात येईलअसेही  महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरखासदार धैर्यशील मानेआमदार अशोकराव मानेमाजी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकरमहसूलचे अधिकारी आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले कीकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करुन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा. या रस्त्याला यापूर्वी गुणांक ‘१’ होता तो आता गुणांक ‘२’ करण्यात यावा. ज्यामुळे या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील. शासनामार्फत यावर तातडीने निर्णय घेण्यात येईलअसेही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

खासदारांनी मानले महसूल मंत्र्यांचे आभार

खासदार धैर्यशील माने म्हणाले कीगेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्रमहसूलमंत्री बावनकुळे यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरही तातडीने निर्णय घेण्याची तयारी दर्शविल्याने हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्यावतीने आभार मानण्यात आले.

 

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

लहान आकारमानाचे पापलेट मासे पकडल्या प्रकरणी दोन नौकांवर कारवाई

मुंबई दि. ९ : वसई – उत्तन कार्यक्षेत्रात नौका तपासणीवेळी किमान कायदेशीर आकारमानापेक्षा कमी आकारमानाची चंदेरी पापलेट मासळी पकडल्या प्रकरणी दोन नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ (सुधारणा २०२१) अंतर्गत संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. तसेच पापलेट क्षेत्र असलेल्या पालघर जिल्ह्यांतर्गत एमएलएस नियमनासाठी वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले असून या पथकामार्फत कमी आकारमानाची मासळी पकडणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

कमी आकारमानाची मासळी पकडण्याविषयी घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी कक्षाचे अध्यक्ष व सचिवसहआयुक्त महेश देवरे आणि प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसायमुंबई नागनाथ भादुले यांच्यामार्फत गस्ती नौकांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. 

पारंपरिक माच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारीसाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने ५८ प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाबाबत शिफारस केली आहे. त्याप्रमाणे अपरिपक्व मासे पकडणे टाळण्यासाठी कोवळ्या माशांची मासेमारी करण्यावर कृषी व पशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या २ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशाने ५४ प्रजातीच्या किमान कायदेशीर आकारमानाचे विनियमन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित – २०२१) कलम १७(८)(अ) व (ब) नुसार कायदेशीर आकारमानापेक्षा कमी आकारमानाच्या माशांच्या मासेमारी बंदीच्या उल्लंघनासाठी दंडात्मक कारवाईची तरतुद आहे. तसेच या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी)मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली ७ सागरी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसायसागरी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी व पोलीस अधिक्षक यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला एक तात्पुरता अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात आला असून यासमितीचे सदस्य सचिवप्रादेशिक उपायुक्तमत्स्यव्यवसायकोकण विभाग हे आहेत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना

मुंबईदि. ९ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवारदि. १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटासहचित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या दिनानिमित्ताने महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने सकाळी ११ वाजता महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.

महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्सफेसबुकयूट्यूब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

 ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेचलाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटांचा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. या माहितीपटाचे मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहेतर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहेतर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमहाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या चित्रपटातून समजते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी यांनीतर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. या चित्रपटाचे सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपूरफोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवसाचे आयोजन’; विश्वकल्याणासाठी नवसुत्री अंगीकारण्याचे प्रधानमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. : ‘विश्व नवकार महामंत्र’ दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अनेक देशात आयोजित या कार्यक्रमाला प्रधानमंत्री यांनी यावेळी संबोधित केले.

तर, मुंबई येथे ‘विश्व नवकार महामंत्र दिन’ महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएससीआय डोम वरळी, मुंबई येथे सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

आपल्या भाषणातून प्रधानमंत्री यांनी देशवासियांना नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, आईच्या नावाने एक वृक्ष लावा, स्वच्छता पाळा, स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करा, देशातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यावी, सेंद्रिय शेतीला चालना द्यावी, निरामय जीवनशैली अंगीकारावी, श्रीअन्नाचा अधिक वापर करावा, योग आणि क्रीडा यांना जीवनात स्थान द्यावे तसेच गोर-गरिबांना मदत करावी, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी नवकार महामंत्र हा केवळ शब्द – अक्षरांचा समूह नसून तो अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधू आदी ज्ञानी आत्म्यांचा सन्मान करणारा प्रभावी मंत्र असल्याचे सांगितले.

नवकार महामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनाला, मतभेदापेक्षा एकतेला आणि संघर्षापेक्षा शांततेला महत्व देण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

मुंबईतील कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गच्छाधीपती नित्यानंद सुरी, आचार्य के. सी. महाराज, आचार्य नय पद्मसागरजी महाराज, मुनी विनम्र सागरजी, आचार्य डॉ. लोकेश मुनी, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी महाथेरो, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) चे पदाधिकारी, जैन समाजाचे प्रतिनिधीआदी उपस्थित होते.

विश्व नवकार महामंत्र दिनाचे आयोजन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ‘जिटो’ या संस्थेतर्फे करण्यात आले होते.

**

Prime Minister addresses global ‘Vishwa Navakar Mahamantra Day’ event

from New Delhi; asks people to adopt 9 vows

Maharashtra Governor presides over

the Vishwa Navkar Maha Mantra Day in Mumbai

As part of the celebrations of Bhagwan Mahavir Jayanti, the ‘Vishwa Navkar Maha Mantra Day’ was organised globally by JITO and other Jain organisations on Wednesday (9 April).

Prime Minister Narendra Modi addressed the global ‘Vishwa Navakar Maha Mantra Day event from Vigyan Bhavan in Delhi, which was relayed all over the world.

In Mumbai, Maharashtra Governor C P Radhakrishnan and Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha participated in the Vishwa Navkar Maha Mantra Day programme organised by Jain International Trade Organization (JITO) at NSCI Dome in Mumbai.

Speaking on the occasion, Prime Minister Modi appealed to the people to adopt 9 vows for the welfare of humanity. He appealed to the people to save every drop of water, plant one sapling in the name of mother, observe Swachchhata Mission, be ‘Vocal for Local’, visit various places in the country, promote natural farming, adopt a healthy lifestyle, increase the use of millets in food, promote sports and yoga and help the poor and the needy.

Speaking on the occasion in Mumbai, Governor Radhakrishnan said the Navkar Maha Mantra is not merely a set of syllables, it is an invocation that honours the enlightened souls: the Arihantas, Siddhas, Acharyas, Upadhyayas and all Sadhus.

He appealed to the people to let Navkar Maha Mantra Day be a new dawn for humanity and asked people to choose reflection over reaction, unity over division, and peace over conflict.

Gachchadhipati Nityanand Suri, Acharya K C Maharaj, Acharya Naya Padmasagar Ji Maharaj, Muni Vinamra Sagar Ji, Acharya Dr Lokesh Muni, President of All India Bikkhu Sangh Bhadant Rahul Bodhi Mahathero were among those present.

**

युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत युवा पिढीला आणि महिलांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंतर योग फाउंडेशन उपक्रमांची माहिती घेतली. तसेच फाउंडेशनद्वारे योग आणि मानसिक आरोग्यविषयक सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.

मंत्री पाटील म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, महिलांना आणि युवापिढीला योग व आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे प्रवृत्त करून त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही महत्त्वाची बाब असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.

यावेळी अंतर योग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी आणि अंतर योग फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

२५ पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार

मुंबईदि. ९ : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटनासोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांनी निवासस्थानीव्यवसायाच्या ठिकाणी किंवा निवासी कल्याण संघटनासोसायटीमध्ये वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची एकत्रित बुकिंग केल्यास कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येणार आहे.

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येत आहे. अशा जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता तीन उत्पादकांची परिवहन विभाग मार्फत निवड केली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर ही पाटी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा. ही पाटी बसविण्याकरता वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी संचासह बसविण्याचे जीएसटी वगळून शुल्क

दुचाकी वाहने व ट्रॅक्टर ४५० रुपयेतीन चाकी वाहने ५०० रुपयेहलकी वाहनेप्रवासी कारमध्यम व जड वाहने ७४५ रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. या शुल्काशिवाय इतर कुठलेही शुल्क अनुज्ञेय नाही. काही फिटमेंट केंद्रामध्ये जुन्या वाहन नोंदणीच्या पाटी काढायचे शुल्क घेतले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी नागरिकांच्या याविषयी काही तक्रारी असल्यास त्यांनी 022- 20826498 या क्रमांकावर आणि hsrpcomplaint.tco@gmail.com या ईमेलवर कराव्यात असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

000

नीलेश तायडे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...